वचन दिले मी तुला…


Promise_Pinky Promise2पुना से जम्मु जानेवाली झेलम ए़क्स्प्रेस प्लॅटफॉर्म नं. ४ पे आ रही है

अनांउन्समेंट चालु असतानाच झेलम ए़क्स्प्रेस धडधडत स्टेशनवर येत होती.

प्लॅटफॉर्मजवळील पायऱ्यांवर एक मुलगी दोन्ही हाताची बोटं एकमेकांत अडकवुन गुडलक ची आशा करत होती. हातातील बॅग छातीशी घट्ट धरलेली तर पाय गुडघ्यात मुडपुन पोटाजवळ घेतलेले. प्लॅटफॉर्म नेहमीप्रमाणे गजबजलेला.. तिच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते.. सगळेच आपआपल्या कामात..

रेल्वे जस-जशी जवळ येऊ लागली तस-तशी तीची अस्वस्थता अजुन वाढत होती. तिची नजर सारखी मागे बघुन कुणाचा तरी शोध घेत होती. दर अर्ध्या मिनीटाला एकदा मागे बघ तर एकदा घड्याळात बघ अशी तिची चुळबुळ चालु होती. कधी दोन्ही तळहात एकमेकांमध्ये गुंफुन त्यामध्ये आपला चेहरा झुकवुन स्वतःला, “येईल.. तो नक्की येईल.. माझा विश्वास आहे त्याच्यावर!” बजावत होती.

सेकंदावर सेकंद उलटत होती. थोड्यावेळाने ती उठुन उभी राहीली.. “का वेळ लागला आहे एवढा? फोनही लागत नाहीये.” मनामध्ये विचार चालु होते. तेवढ्यात तिला अपेक्षीत चाहुल लागली. तिने मागे वळुन बघितले. ‘तो’ अर्धमेल्या अवस्थेत धावत येत होता. चेहरा घामाने डबडबलेला होता.. हेलकावत येत असला तरी चेहऱ्यावर वेळेत पोहोचल्याचे समाधानाचे भाव होते.

“अरे कित्ती उशीर? कुठे हरवला होतास इतक्या वेळ?.. आणि हे काय..?? रक्त?? काय झाले”, तिने चिंतीत स्वरात त्याला विचारले.

“अगं रक्त नाही गं बाई, आत्ता गडबडीत आत येताना कॅंन्टीन मधुन बाहेर पडणाऱ्या एका माणसाला धडकलो.. त्याच्या हातातील टॉमॅटो स्वॉस अंगावर सांडला.. चल तु पटकन”.. असं म्हणुन तो तिचा हात धरुन रेल्वेच्या दिशेने जाउ लागला.

“आणि तु तरी कशाला चिंता करतं होतीस गं? तुला प्रॉमीस केलं होतं ना मी काही झालं तरी मी येणारच. विश्वास नाही माझ्यावर?”, लाडीक रागाने तो तिला म्हणाला..

त्याने हात धरताच तिच्या तोंडातुन एक अस्पष्टसा वेदनेचा स्वर बाहेर पडला..”आsss”..

“काय झाले..?” त्याने तिच्या हाताकडे बघत विचारले..”हे हाताला ओरखडे कसले?”..

“अरे काही नाही.. खिडकीतुन पळुन जाताना बाहेर पडताना.. थोडेसे लागले आहे एवढेच.. आणि विश्वास कसा नाही? विश्वास आहे ना.. म्हणुनच तर शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट बघत थांबले होते.. चल..”, ती त्याचा हात धरुन पळत पळत नुकत्याच सुटु लागलेल्या गाडीत जाउन बसली.

************************************

टी.व्ही वर संध्याकाळी बातम्या चालु होत्या.

पुण्यातील एका दुर्दैवी घटनेत पळुन जाण्याच्या प्रयत्ना असणाऱ्या एका प्रेमी-युगुलाचा दुर्दैवी अंत झाला. ‘राकेश’ वय वर्ष २८, याला आपल्या प्रेयसी- रितीकाबरोबर पळुन जाण्यासाठी रेल्वे स्टेशन वर जात असताना एका डंपरने ठोकरले आणि त्याचा जागेवरच अंत झाला. या घटनेची माहीती कळताच रितीका, वय वर्ष २६ राकेश च्या वियोगाचे दुःख सहन करु शकली नाही. तिने आपल्या राहत्या घरी मनगटाच्या नसा कापुन आत्महत्या केली.

मित्र-मैत्रिणींमध्ये लोकप्रिय असलेल्या राकेश आणि रितीकाच्या अचानक मृत्युने त्यांच्या मित्र वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

**************************************

रितीका आणि राकेश एकमेकांच्या बाहुपाशात विसावले होते. शेवटी प्रत्येक सुखासाठी भौतीक अस्तित्वाचीच गरज असते असे नाही. शरीराने साथ सोडली असली तरी.. एकमेकांसाठी, एकमेकांवरील प्रेमासाठी, विश्वासासाठी मृत्युनंतरही दोघ एकत्र होते.. एकमेकांना दिलेले वचन पाळण्यासाठी..

13 thoughts on “वचन दिले मी तुला…”

 1. मित्रा ,
  पहिल्यांदा तुझी एखादी स्टोरी सुरुवाती पासून शेवट पर्यंत , कोणतीही शंका न येता झक्कास वाटली ..
  सही लिहिली आहेस … शॉर्ट एन स्वीट !!!

  असच लिहीत रहा …!

  .. शॉललेट

 2. very good story .मी तुमचा ब्लॉग जवळ जवळ रोजच वाचते. खूप छान लिहिता तुम्ही. keep it up.

 3. I read your blog regularly. U r amazing & extremely good writer. (I think so bcoz most of the times our views or opinions are too match!)

 4. खूप भारी…सहीच !!!
  कळलच नाही आधी…पण खूप आवडली.
  keep it up…

 5. Dangerch shevat aahe..
  Mendula thodi patnari thodi na patnari..
  Matra aahe mast…
  Aasha shevat aasnarya goshti vachlya ki thoda vait vatata…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s