समलिंगी संबंधांना हायकोर्टाची मान्यता


एक धाडसी निर्णय, जो होणार-होणार म्हणुन कित्तेक दिवस बातम्यांमध्ये झळकत होता तो अखेर आज घेण्यात आला. परस्पर सहमतीने प्रौढांनी ठेवलेले समलिंगी संबंध गुन्हा ठरत नसल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. समलिंगी संबंध गुन्हा ठरविणे, हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करण्यासारखे असल्याचे न्यायालयाने आपल्या तब्बल १०५ पानी निकालपत्रात म्हटले आहे.

एक विनोद आठवतोय.. “दोन मित्र गप्पा मारत बसलेले असतात. समोरुन एक ‘हॉट’ आणि ‘सेक्सी’ मुलगी जाताना दिसते. एक मित्र म्हणतो.. ती मुलगी बघ ना कसली हॉट आहे.. दुसरा लगेच म्हणतो.. अरे ते सोड.. हीच एवढी हॉट असेल तर हिचा भाऊ कसला हॉट असेल!!”

यातील विनोदाचा भाग सोडला तर.. समलिंगी संबंधाना मान्यता मिळाल्याने अशी वाक्य काही वर्षात ऐकु आल्यास नवल वाटु नये.

नवतारुण्यात पदार्पण केलेल्या मुलींना त्यांच्या आया समजावत, ‘मवाली मुलांपासुन सांभाळ गं स्वतःला.’ काही वर्षात याचीच सुधारीत ‘मवाली मुलांपासुन आणि मुलींनपासुनही सांभाळ गं स्वतःला’ किंवा एखादा बाप आपल्या मुलाला..’मवाली मुलांपासुन सांभाळ रे स्वतःला’ अशी निघाल्यासही आश्चर्य वाटायला नको.

अर्थात या निर्णयावर कौतुक आणि टीका दोन्ही होणार हे नक्की. परंतु मला तरी यात गैर असे काही वाटत नाही. माझ्या मते हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. सुधारीत कायदा प्रत्येकाला समलिंगी व्हा असे म्हणत नसुन ज्यांची समलिंगी संबंध ठेवायची इच्छा आहे त्याला कायद्याने मान्यता देत आहे एवढेच. अर्थात फक्त शारीरीक समलिंगी संबंधाना या कायद्याने मान्यता दिली आहे? का त्या दोघांना ‘फॅमीली’ चा दर्जा देउन लग्न करण्याची सुध्दा मुभा आहे का? हे मला निश्चीत माहीत नाही. पण तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होणार.. जसे.. ‘रेशन कार्डावर नाव काय लावणार? कोण पती आणि कोण पत्नी?’ आणि नविनच काही कॅटेगरी असेल तर अश्या असंख्य फॉर्म्स वर बद्ल घडवावे लागतील.

खरं सांगायचं झालं तर सरकारने कायद्यात बदल घडवण्याबरोबरच, समलिंगी लोकांना गरज आणि अपेक्षा असेल ते समाजाची मानसीकता बदलण्याची. जेंव्हा हे घडेल तेंव्हाच त्यांना खऱ्या अर्थाने मुक्तपणे जिवन जगता येईल.

‘दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या विचार चालु आहे’ हे सध्या ऐकुन आहे.. त्यापाठोपाठ हा निर्णय!! वर्षानुवर्ष चाललेल्या प्रथेत सध्या तरी सरकार आमुलाग्र बदल करत आहे.. हे बघुन तात्पुर्ता का होइना आनंदच झाला आहे. अर्थात त्याचे परीणाम काय होतील हे मात्र येणार काळच ठरवेल..

Advertisements

One thought on “समलिंगी संबंधांना हायकोर्टाची मान्यता

  1. यातून किमान जे आपण नाही ते प्रीटेंड करण्याचा आटापीटा थांबला तरी खूप चांगले होईल. मानसिक कुचंबणा काही अंशी तरी कमी ह्वावी. शिवाय लग्नात होणारी ( दोन्ही बाजूने…. मुलगा/मुलगी ) फसवणूकही काही प्रमाणात थांबेल.
    तू म्हटल्याप्रमाणे काही गंमतीही घडतीलच. शिवाय ते फॊर्म्स बदलणे……. :))

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s