“भारतातला” पाऊस


असंच इतरांचे ब्लॉग वाचताना, एक ब्लॉग वाचनात आला ज्यामध्ये परदेशात स्थाईक झालेल्या लेखीकेला भारतातला पाऊस म्हणजे “बरोबर चिखल, राडा, डबकी,वेगवेगळे वास,ट्रॅफिक जॅम ,खूप सारे हॉर्नचे आवाज” घेउन येणारा वाटतो. हरकत नाही. प्रत्येकाला ब्लॉगींग वर व्यक्तीगत मत व्यक्त करण्याची मुभा आहे..with all due respect..i accept it. पण परदेश्यातल्या पावसाचे जसे छान-छान वर्णन केले तसे “भारतातल्या” पावसाचे नव्हते ना केले.. फार अपुर्ण वाटले.. कदाचीत परदेशात राहुन भारतातल्या पावसाचा आनंद विसरला असावा..तो पुर्ण करण्यासाठी भारतातल्या पावसाची काही आनंददायक घटना इथे नमुद करत आहे..

१. मातीचा मस्त सुगंध
२. डबक्यात आणि चिखलातील पाण्यात कागदाच्या बोटी सोडण्याचा आनंद
३. प्रियकर / प्रेयसीला दुचाकीवर बसवुन पावसात भिजत, बेभान होत हॉर्न वाजवत फिरण्यातला आनंद
४. गल्ली-कोपरा, डोंगर, तळी, समुद्रापाशी भिजत मक्याची कणसं खाण्याचा आनंद
५. एकांत तर नेहमीच असतो.. गर्दी गोंगाटात “ये रे येरे पावसा म्हणत रस्त्यावर नाचण्याचा आनंद”
६. शेतामध्ये हिरवा-पाचु उगवणार, घरात पैसा येणार या आशेचा आनंद
७. बेभान, बेधुंद झालेल्या समुद्राच्या लाटांचे रुप पहाण्याचा, त्याचे तुशार आंगावर घेण्याचा आनंद
८. ऑफीस सुटल्यावरच नेमक्या येणाऱ्या पावसाला नावं ठेवत घरी आल्यावर, बायकोने दिलेल्या कपड्याने पटकनं डोकं पुसुन, कपडे बदलुन भजी आणि कॉफी पित, खिडकीतुन बाहेर कोसळणाऱ्या पावसाला बघण्याचा आनंद
९. ‘फारंच पाऊस आहे बाबा!!’ म्हणुन कधी कधी अचानक ऑफीसला दांडी मारुन, आणि पोराला शाळेला सुट्टी देउन घरी एकत्र धम्माल करण्यातला आनंद
१०. उन्हाच्या लाहीने त्रासलेल्या धरतीला, शरीराला आणि आत्म्याला मिळणारा आनंद
११. धुक्यात हरवलेली वाट शोधत गिर्यारोहण करण्यातला आनंद
१२. डबक्यापाशी बेडकांचे डराव डराव, कोकीळीचे गायन, मोरांचा पिसारा फुलवुन केलेला डौलदार नाच, सह्याद्रीच्या पाठारावर उगवेलेली अनेक मनमोह्क रंगाची आणि सुवासाची फुले पाहुन झालेला आनंद
१३. गाडीच्या काचेवर साठलेल्या धुक्यावर बोटांच्या रेश्यांनी बनवेल्या चित्रांचा आनंद
१४. नविन रेनकोट खरेदीचा आनंद
१५. पावसावर मन-फुलुन निर्माण झालेल्या उभरत्या कविंच्या कविता लिखानातला आणि त्या वाचनातला आनंद
१६. उचंच उंच पर्वतावरुन कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यातला आनंद
१७. या पावसाचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी कधीही, कुठेही, कसेही, केव्हाही फिरण्यात असणाऱ्या स्वातंत्र्यातील आनंद

कित्ती सांगु हो तुम्हाला या भारताच्या पावसातील आनंद..सांगत बसलो.. तर पानंच्या पानं भरली जातील..

Advertisements

10 thoughts on ““भारतातला” पाऊस

 1. Jhakaas. Aho kitihi pardeshat rahilo tari aplya goshti kashya visarta yetil. Swatahacha gun-gaan navhe pan dar varshi paaus pahayla june-july madhe sutti gheun mi Bharatat jato. Ani tumhi ithe sangitlelya baryachshya goshtincha anand gheto. Surekh lihilay.

 2. Agadi Khare aahe.. Mast 🙂 Pawsala ha majhahi far aavdata rutu aahe..Aajkal office mule jara nakosa hoto (Shale sarkhi sutti an college sarkhe bunk milat nahi na joracha paaus aala tar 🙂 )

 3. मला पावसाळ्यातलं सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ते म्हणजे मातीचा सुगंध.. !! I just love it. By the way तुमचा ब्लॉग खूप छान आहे. मी रोजच वाचते. Keep it up.

 4. १८) पावसातल्या चिखलात रंगलेला फ़ुट्बॊलचा खेळ..
  १९) आपल्याला पण खेळात घ्यावे म्हणुन त्यांच्याकडे आशेने पहाणारी शेंबडी लहान मुले..
  २०)चहा..चहा..चहा……….

  खरंच ही यादी न संपणारी आहे.

 5. Aniket,
  Mi tumcha blog roj wachto, agdi n chukta pan majhya blog cha follow up nahi ghet.
  Majhya blog war tumchi comments baghun mi dhany jhalo.
  Mi tumchya blog warche sagle articles wachle pan comments takaichi himmat navhti keli karan tumche likhan khupach apratim aahe tyachi tarif karnyapeksha durun te anubhavaiche ase mi tharavle hothe.
  pan aaj tumche comments baghitle an ha reply detoy.
  Eka wakyat aamhi tumche fan jhalo aahe.
  tumhi kuthe kaam karta? An IT madhe asun hi likhana la evdha wel devu shakta, thats amazing. Keep it up.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s