मायकेलचा मृत्यु, खरा की खोटा?


मायकल जॅक्सनच्या मृत्युला दोन आठवडे सुध्दा नाही झाले आणि आता ‘मायकल जॅक्सनचा मृत्यु खरा की खोटा?’ या चर्चेला उधाण आले आहे. दोन वेगवेगळ्या विषयावरील ब्लॉग माझ्या पहाण्यात आले.

एकाचे म्हणणे आहे की ‘मायकल जॅक्सनचा मृत्यु साधारणपणे १५ वर्षापुर्वीच झाला आहे. २००५ साली ‘सॅंता बार्बरा’ येथील पोलीसांना एक मानवी सापळा सापडला. DNA चाचण्या केल्यावर त्याचे रिपोर्ट्स ‘मायकल जॅक्सनचे’ असल्याचे स्पष्ट झाले. परंतु मायकेल त्यावेळेस जिवंत म्हणुन वावरत होता तो कोण? त्याबद्दलची माहीती या ब्लॉग वर दिलेली आहे.

तर दुसरा विषय असा म्हणतो की मायकेलचा मृत्यु हा केवळ दिखावा आहे. MJ अजुनही जिवंत आहे. कदाचीत काही वर्षांनी तो प्लॅस्टीक सर्जरी करुन कोणीतरी नविन कलाकार म्हणुन परत स्टेज वर येईल किंवा मिडल-इस्ट मध्ये एक साधारण सिटीझन म्हणुन तो उरलेले जिवन घालवेल. आता याबद्दलची अधीक माहीती आणि हे सर्व तो कशाला करेल याचेही स्पष्टीकरण या ब्लॉग वर दिले आहे.

अर्थात या सर्व अफवाच असणार, असु शकतात.. पण आजच्या या जगात इतके अनाकलनीय गोष्टी घडत असताना, विज्ञानाने इतकी प्रगती केलेली असताना प्रत्येक गोष्टीला अशक्य नाही ना म्हणु शकत. या सर्वांची उत्तरे येणारा काळच देईल.

Advertisements

One thought on “मायकेलचा मृत्यु, खरा की खोटा?

  1. माइकेल म्हटला की आठवते शाळेत असताना ऐकलेली आणि पाहिलेली त्याची गाणी … आणि त्या नंतर ‘जोनी लिवर’ने त्याच्यावर केलेला एक item … 🙂

    माणूस म्हणुन तो कसा होता ते माहीत नाही पण संगीत क्षेत्रात त्याचे योगदान नक्कीच उल्लेखनीय राहिल … !!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s