‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-२]


भाग १ पासुन पुढे..

मनावर चढलेला फ्रेशनेस उतरल्यावर केतनला आता प्रवासाचा थकवा जाणवु लागला.. जेट-लॅग.. संध्याकाळची कशी-बशी जेवण उरकुन केतने स्वतःला बेडवर झोकुन दिले. झालेल्या एकुण घटनांचा शरीरापेक्षा मनाला जास्त थकवा आला होता.. विचार करता-करताच त्याचा डोळा लागला. जाग आली तेंव्हा उन्ह चांगलीच वर आली होती. केतनला खोली बाहेर पडायचा प्रचंड कंटाळा आला होता. पण शेवटी तो उठला. खाली सर्वत्र साम-सुम होती. केतन फ्रेश होऊन बाहेर हॉल मध्ये येउन बसला.

“अरे.. उठलास वाटतं तु?”, केतनची आईने बाहेर येत विचारले.. “झाली ना भरपुर झोप? चहा घे आता मस्त वाटेल.. घेतोस ना चहाच का कॉफी टाकु?”

“नाही.. घेतो चहा.. चालेल..” केतन अजुनही सुस्तावलेलाच होता ..”काय गं आई एवढी शांतता का आहे? कुणी दिसत नाही ते?”

“अरे सगळे गेले आहेत देवी दर्शनाला. सुशांत-अनु चे लग्न आठवड्यावर येउन ठेपले ना.. म्हणुन एकदा जावुन यावं म्हणुन गेले आहेत. सकाळीच गेलेत सगळे ५.३० ला येतीलच एवढ्यात.. आधी फक्त अनु आणि सुशांत दोघंच जाणार होते, पण मग अनुच म्हणाली सगळ्यांनाच घेउन जाऊ काय १००-१५० कि.मी. चा तर प्रवास, मग काकांनी गाडी काढली आणि सगळेच गेले बघ. फार गोड आहे रे ती पोरगी! सगळ्यांमध्ये मिळुन मिसळुन असते..” आई बोलत होत्या

अनुचे नाव ऐकल्यावर केतन परत विचारात बुडुन गेला..”काय गं आई.. काय करते अनु? आय मिन अनुराधा..?”

“अरे चायनीज भाषेचं काहीतरी करते बघ. महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतीक खातं आहे ना, त्यातील चिन देशाशी संबंधीत संस्कृतीची देवाण-घेवाण करणं, आपल्या इथे चिनी भाषेबद्दल जागृकता निर्माण करणं, त्याचे क्लासेस असंच काहीतरी चालु असते. परवाच आली ती परत, एक महीना शांघायला गेली होती..” आई.

“हम्म. म्हणजे तीच ही आहे तर.. चुकुन माकुन एकसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती असु शकतात.. पण कसलं कायं? नशीबाने ऐन वेळेस धोका दिला..” केतन मनाशीच बडबडत होता.

बाहेर गाडीचा आवाज आणि गोंगाट ऐकुन तो जागा झाला..थोड्याच वेळात सगळी जत्रा आत मध्ये घुसली. केतनला बघुन ‘केतन दादा उठला.. केतन दादा उठला’ म्हणुन बारक्यांनी घर डोक्यावर घेतले.. “ए काय रे केतनदा.. कित्ती लवकर झोपलास काल तु? आम्हाला कित्ती गप्पा मारायच्या होत्या तुझ्याशी..” शरु लाडात येउन म्हणाली. मागोमाग सुशांत आणि अनु पण आतमध्ये आले. क्षणभरासाठी अनुची आणि केतनची नजरानजर झाली.. एका क्षणासाठीच.. आणि मग अनु आतमध्ये निघुन गेली. पांढरा-शुभ्र सलवार-कुर्ता घातलेला सुशांत केतन समोर येउन बसला..

“काय राजे झाली का झोप? जमतंय ना भारतात? का अमेरीकेच्या मऊ-मऊ गाद्यांची सवय झाली आहे?” सुशांत म्हणाला..

“अरे कसलं अमेरीका आणि कसलं भारतं.. आपलं घर म्हणल्यावर युगांडा असले तरी झोप छानच लागणार..” केतन चेहऱावर उसनी हास्य आणुन म्हणाला..”चलं मी जरा फ्रेश होऊन येतो.. तु ही कर आराम.. दमला असाल ना?”

“छे रे.. इथेच तर होते.. आणि अनु बरोबर असल्यावर प्रवासाचा थकवा? शक्यच नाही!” चलं हो तु तयार.. मी जरा व्हिसाचं बघतो.. अजुन तारीख नाही मिळाली व्हिसा-इंटरव्ह्युची” सुशांत म्हणाला..

केतनने चहा संपवला आणि तो आवरण्यासाठी उठला..

केतनने एक बघीतले होते.. अनु घरात फारच सगळ्यांच्या आवडती होती. बारकी बारकी पोरं तिला ‘अनुताई गोष्ट सांग’ म्हणुन मागे, तर आई/काकु/आत्या.. “अनु भाजी मस्त जमली आहे बरंका..”, बाबा/आजोबा.. पुस्तकं, गाण्यांच्या सि.डी.ज साठी अनुच्याच मागे.

“अरे काय चाल्लेय काय? जो बघावं तो आपलं अनुचेच गोडवे गातोय?”, केतनचे डोके भुणभुणले होते..तो अनुचा विचार डोक्यातुन काढुन टाकायला बघायचा पण ते शक्यच होतं नव्हते..”ही रहाते तरी कुठे? बघावे तेंव्हा इथेच दिसते?.. जा ना म्हणावं आपल्या घरी.. लग्न झाले नाही तुझे अजुन” चिडक्या स्वरात तो स्वतःशीच बोलायचा

दुपारी वेळ बघुन त्याने आईला तसे विचारले ही..तेंव्हा आईने सांगीतले.. “अरे हे काय.. समोरच तर रहाते ती. १८-१९ वर्षांची होती जेंव्हा ती आणि तीचे आई-बाबा इथे रहायला आले. आणि तेंव्हा पासुन ती आपल्या घरचीच होऊन गेली. ती तिच्या घरी कमी आणि आपल्या घरीच जास्त असते.. सुशांतच्या लग्नाचे बघायला सुरुवात केली तेंव्हा आमच्या डोक्यात तिचेच नावं पहीले आले.. आणि ५-६ वर्ष झाली सुशांत-अनु एकमेकांना चांगले ओळखतात पण ना.. त्यामुळे लगेच जमुन गेले..”

संध्याकाळी टी.व्ही बघत असतानाच अनु दारातुन आत आली.. “काकु..ss” सरळ आत मध्ये जातच तिने हाक मारली..

“आई नाही ये घरी.. बाहेर गेली आहे..”, हॉलमध्ये बसलेल्या केतनने तिच्याकडे नं बघताच उत्तर दिले

“ओह..बर ठिक आहे, मी नंतर येते” म्हणुन अनु परत वळली.. क्षणभर थांबुन ती म्हणाली.. “बाय द वे, कसं झालं तुझ बॅंगलोर चे सेशन? आणि मित्र भेटला का एअरपोर्ट वर का खुप वेळ नंतर थांबावे लागले?”

“छान झाले.. हो भेटला मित्र.. ट्रॅफीक मध्ये अडकला होता. त्यामुळे यायला उशीर झाला त्याला..” केतनने उडत-उडत उत्तर दिले.

अनु काही वेळ तिथेच ओढणीच्या टोक हातात धरुन उभी होती..आणि मग..”बरं चलं जाते मी.. काकुंना निरोप सांग.. नाहीतर राहुदे.. मीच येउन जाईन तासाभराने..” म्हणत निघुन गेली..

केतनने स्वतःशीच विचार केला..”तिला अजुन काही बोलायचे होते का माझ्याशी? मी फारच उध्दटासारखा वागलो का? पण काय बोलणार? भिती वाटते की माझ्या मनातले विचार तिला कळाले तर? इतर कुणाला समजलं कि शांघायला भेटलेली हीच ‘ती’?.. शेवटी काही झालं तरी सुशांतदा ची ती होणारी बायको आहे..छे.. उगाच आलो आपण इकडे.. अमेरीकाच बरी.. असले इमोशनल ड्रामा तरी नसतात तिकडे.. ते काही नाही.. सुशांतचे लग्न झाले की पुढची सुट्टी रद्द करुन टाकु आणि काहीतरी कारण काढुन जाऊ परत तिकडेच..”

इतक्यात अनु परत आली.. “.. दोन मिनीटांसाठी इकडे आले होते, तेवढ्यात आई कुठेतरी बाहेर गेली आहे दार लावुन!” अनु आत मध्ये आली आणि केतन समोरीलच एका खुर्चीवर येउन बसली. बोलावे का नं बोलावे या विचारात केतन होता.. कदाचीत अनुच्या मनातही तोच विचार असेल, पण शांत बसेल तर ती ‘अनु’ कसली. मग तिनेच केतनला अमेरीकेबद्दल विचारले, त्याचे काम, तो कुठे रहायचा? कुणाबरोबर रहायचा. अनुच्या मोकळेपणाने केतनवरीलही दडपण दुर झाले आणि मग तो सुध्दा गप्पा मारण्यात गुंग होऊन गेला. मग

अनुने विचारले… ‘अरे हे ब्लॉंड चे प्रकरण काय आहे? सुशांत म्हणाला मला.. तुला म्हणे अमेरीकन मुलीशीच लग्न करायचे आहे म्हणुन?”

“नाही गं.. म्हणजे हो.. माझा होता विचार तसा.. पण आता बदलला..” केतन म्हणाला..

“बदलला? इतक्या वर्षात नाही बदलला तो एकदम असा अचानक? का? कोणी भेटली की काय तुला?” अनु डोळे मिचकावत म्हणाली

मग केतननेच विषय बदलला आणि अनुला तिच्याबद्दल विचारले, विशेषतः चिन आणि तिथल्या लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल. अनु भरभरुन बोलली त्या विषयावर. केतनचे मात्र तिच्या बोलण्याकडे अज्जीबात लक्ष नव्हते. अनुच्या चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे भाव, तिच्या पापण्यांची होणारी उघडझाप, दर मिनीटाला केसांची बट कानामागे सरकवण्याची लकब बघण्यातच तो गुंग होऊन गेला होता. सुशांतला हीच आवडायला हवी होती का? दुसरी नव्हती का कोणी? त्याला सुशांतचा नकळत राग यायला लागला होता.

थोड्यावेळ बोलुन मग अनु निघुन गेली, पण केतनच्या मनातुन ती काही केल्या जात नव्हती. प्रत्येक वेळा तिल्या बघीतल्यावर त्याची बैचैनी वाढतच होती. ‘तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे हा’ तो स्वतःशीच म्हणायचा.. इच्छा असुनही मी काहीच करु शकत नाही.

जेवणं उरकल्यावर केतन आपल्या खोलीत गेला. झोप आलेली नव्हती, येणं शक्यच नव्हतं म्हणुन मग तो व्हरांड्यात खुर्ची टाकुन बसला. समोरच अनुचे घरं होते. “काय करत असेल अनु? वरची खोली तिचीच असेल का? नाहीतर गेली असेल सुशांतदा बरोबर कुठेतरी..” त्याचे विचारचक्र भंगले त्याच्या मोबाईलच्या वाजण्याने.

‘हॅलो.. हु ईज धिस?’, केतनने नेहमीच्या सवयीने विचारले
‘अरे हु ईज धिस काय? अनु बोलतेय’ पलीकडुन आवाज आला
‘अनु? तुला नंबर कुठुन मिळाला?’ केतनने आश्चर्याने विचारले..
‘अरे.. तुच दिला होतास ना रे बॅंगलोर ला!!..काय करावं याचं..!! बरं ते जाऊ देत, ऐक, सिनेमाला येतोस माझ्याबरोबर? इथे जवळच्याच थिएटर ला लागलाय..’दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे’ खुप्प आवडता सिनेमा आहे माझा तो.. सुशांतला विचारले असते रे.. पण तो चिडतो माझ्यावर हा सिनेमा म्हणलं की.. कित्तीवेळा त्याने बघीतला आहे माझ्याबरोबर पण आता नाही येत.. नवरा होणारे ना.. भाव खातो जास्त.. चल ना..प्लिज..’ अनु बोलत होती.
‘अगं पण आत्ता? एवढ्या रात्री..?’.. केतन
‘का? कुकुलं बाळ आहेस? अरे १०.३० चा आहे शो. चल ना.. मी कोपऱ्यावर वाट बघतेय तुझी १० मिनीटात ये… येतो आहेस ना?’ अनु
‘बरं ठिक आहे आलो..’ केतन

घरी जुन्या मित्राचा फोन आला होता.. त्यांच्याकडे चाललो आहे सांगुन केतन बाहेर पडला. त्याला आपल्या निर्णयाचा आनंद वाटला.. अनु बरोबर पिक्चर बघणे म्हणजे एक पर्वणी ठरली त्याच्यासाठी.. जवळ-जवळ प्रत्येक संवाद तिच्या पाठ होता. नंतर नंतर तर एक शेजारचा माणुस म्हणाला पण..’ओ ताई.. ऐकुद्याना सिनेमा आम्हाला पण..’ इतक्यावेळा सिनेमा बघणारी अनु अजुनही प्रत्येक विनोदी सिन ला तितक्याच उत्साहाने हसत होती, तर दुःखी प्रसंगांना आत्ता रडते का नंतर अशी परीस्थीती. तो सिनेमापे्क्षा तिच्यातच रमला होता..

‘कौन है वो लडकी?’ अनुपम खेरच्या आवाजाने तो भानावर आला..
‘सिम्रन…!! कौन लडकी??” शाहरुख..
“वही.. जिसकी सुरत तुम चांद मै धुंडनेकी कोशीश कर रहे हो..” अनुपम खेर..”देखो बेटा मै तुम्हारा बाप हु..बताओ मुझे कौन है वो लडकी..”
“पॉप.. सिम्रन नाम है उसका”, शाहरुख
“प्यार करते हो उससे?”, अनुपम खेर
शाहरुख मान डोलावतो..
“और वो..”, अनुपम खेर
“पता नही.. और वैसे भी उसकी शादी तैर हुई है”, शाहरुख
“तैर हुई है ना.. अभी तक हुई तो नही? जावो.. बतादो उसे की तुम उसीसे प्यार करते हो..और ले आओ उसे इस घरकी दुल्हन बनाके.. बेटा एक याद रखना.. दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए..” अनुपम खेर..

सिनेमा संपुन केतन घरी आला.. पण त्याच्या मनात अनुपम खेरचे ते वाक्य अजुनही मनात घोळत होते…

…दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए………

[क्रमशः]

पुढचा भाग>>

3 thoughts on “‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-२]”

  1. आइला… कसले ट्विस्ट देतो आहेस … इकडे भुंगा वळवळतोय.. 😀 उद्याच शेवटचा काय तो भुंगा भूरभूरव… 😀

  2. अब आया उंट पहाडके नीचे…….
    आता काय? ’मेड ओफ़ ऑनर’ ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ’प्रिन्सेस डायरी-पार्ट २’ ’माय बेस्ट फ्रेंडस्‌ वेडींग’ का अजून काही वेगळी खास ’अनिकेत समुद्र’ स्टाईलची मेंदू भणाणून टाकणारी ट्विस्ट?? काही गेस करणेच अवघड आहे…..
    पण मान्यवर, त्या बिचार्‍या सुशांतवर अन्याय करू नका प्लीज….त्याची काय चूक? उगाच त्याला आयुष्यातून उठवू नका……….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s