‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-३]


भाग २ पासुन पुढे…

सकाळी उठल्यावर केतन आरश्यासमोर उभा राहीला. आज आरश्यात त्याला दोन शिंग, एक शेपुट आणि हातात त्रिशुळासारखे शस्त्र होते.. डेव्हील.. डर्टी डेव्हील.. तो स्वतःलाच म्हणाला.. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ऍंन्ड वॉर’ असं सगळेच म्हणतात, मग आपण तरी कशाला मागे रहायचं. निदान तिला माहीती तरी करुन दे तुझ्या मनात काय आहे ते..

सुशांत ऑफीसलाजाई पर्यंत तो खोलीतच पडुन राहीला.. सुशांत गेल्यावर केतन खाली आला आणि आईला म्हणाला.. “आई..सुशांतला ऑफीसला जायच्या आधी मला भेटायला सांग हं.. माझं जरा काम आहे..”

“अरे आत्ताच गेला सुशांत.. का रे? काय कामं होतं?”, आईने विचारले..
“गेला??.. अगं मला जरा शॉपींग करायचे होते..इथे कुठलातरी जवळ मॉल सुरु झाला आहे ना? त्याला घेउन गेलो असतो जरा वेळ..” केतन सहजच म्हणाला..
“अरे मग अनुला घेउन जा ना बरोबर.. ति सगळा मॉल तुला मस्त फिरवेल आणि तिचा चॉईस सुध्दा चांगला आहे बरं का..” आई म्हणाल्या..

केतनला हेच उत्तर अपेक्षीत होते.. त्याला माहीत होते.. आईच काय, कुणीही ‘अनु’च म्हणले असते.. प्रत्येक गोष्टीला ‘अनु’ हेच पहिले उत्तर सगळ्यांकडे होते.

“अगं नको.. कश्याला उगाच तिला त्रास.. मी जाईन ना एकटा..” केतन
“अरे त्रास काय.. ती नक्की येईल.. लाव फोन तिला मी विचारते.. तसेही ती २-३ दिवस सुट्टी घ्यायची म्हणत होती..”

शॉपींग, मग ते कुणासाठी का असेना, अनु कधी नाही म्हणु शकली आहे का?

मॉल मध्ये अनुने अगदी निवडक दुकानात जाऊन केतनसाठी शॉपींग केले. कुठला शर्ट चांगला दिसेल हे केतनपेक्षा तिलाच जास्ती माहीती होते. भरपुर फिरल्यानंतर तेथीलच एका कॉफी शॉप मध्ये केतन आणि अनु बसले. कॉफीचे दोन घोट घश्यात उतरल्यावर, केतन म्हणाला..

“अनु.. एक सांगु?”
“नाही रे.. बोलं ना..” अनु कॉफीवरचे क्रिम खाण्यात मग्न होती..
“.. तु विचारत होतीस ना.. अमेरीकन मुलीचा विचार मनातुन का काढुन टाकला? दुसरी कोणी भेटली का?..”
“हम्म..”
“खरं तर भेटली होती एक.. तिला भेटल्यावर वाटलं.. कित्ती मुर्ख होतो मी.. नसत्याच्या मागे धावत होतो.. आणि ती मात्र माझ्या इतक्या जवळ होती.. मीच डोळे बंद करुन बसलो होतो..”

अनुने कॉफीवरचे आपले लक्ष काढुन घेतले होते आणि ती केतनचे बोलणे ऐकत होती.

“.. तिला भेटल्यावर वाटलं.. बस्स.. हीच..”
“ओsssह.. लव्ह ऍट फर्स्ट साईट की काय?”
“तसं म्हण हवं तर…”
“मगं? पुढे काय झालं? बात आगे बढी की नही?”
“नाही ना.. इथे आल्यावर मला कळाले की तिचे लग्न ठरले आहे..” हातातल्या कॉफी-कप बरोबर चाळा करत केतन बोलत होता..
“आई…गं.. सो बॅड.. पण मग संपलं सगळं?”
“काय करावं तेच कळंत नाही.. दुसरा कोणी असतं तर कदाचीत मी विचार सुध्दा नसता केला.. पण ज्याच्याशी तिचं लग्न ठरलं आहे.. तो… तो माझा भाऊच आहे म्हणल्यावर..”

‘काय? तु कुणाबद्दल बोलतो आहेस केतन?’
‘सुशांत.. मी सुशांत बद्दल बोलत आहे..’ केतन अनुकडे न बघताच म्हणाला
‘अरे तु काय बोलतो आहेस केतन? तुला कळतेय का?’
‘हो अनु? पण तु मला सांग ना माझी काय चुक आहे याच्यात? ती मुलगी मला भेटली तेंव्हा मला नव्हते ना माहीती की ही माझ्या होणाऱ्या भावाची बायको आहे. तिच्याबरोबर घालवलेल्या ४-६ तासांतच ती माझ्या मनात बसली. मग आता असे अचानक मला कळल्यावर कसं मी तिला मनातुन बाहेर काढुन टाकु? तुच सांग अनु!!’
‘माझ्याकडे उत्तर नाही केतन.. चल आपण जाऊ घरी.. मला उशीर होतो आहे..’ अनु जागेवरुन उठत म्हणाली..
‘माझं बोलणं तरी संपु देत.. थोडा वेळ नाही का बसु शकणार?’
‘केतन, उशीर होतं आहे, चल लवकर’
‘अनु.. माझी इच्छा आहे की त्या मुलीने मला माफ करावं..मी दोषी नाही आहे. मला पुर्ण कल्पना असुनही मी तिच्यावर प्रेम केले असते तर मान्य आहे.. पण..’
‘केतन.. तु येणार आहेस का मी ऑटो ने जाऊ घरी?’ अनु काही ही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हती.
शेवटी केतन खांदे उडवुन उठला आणि अनुबरोबर बाहेर पडला..
********

“सुशांत याला काय अर्थ आहे अरे… लग्न ६ दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि आता तु ४ दिवस बॅंगलोर ला निघालास?..” काकु सुशांतला विचारत होती

“अगं आई.. मी काय स्वतःच्या मर्जीने चाललो आहे का? मी तरी काय करु? एक तर आधीच माझी अमेरीका व्हिजीट जवळ येउन ठेपली आहे.. त्यासाठीच काही ट्रेनींग चा भाग म्हणुन मला जावं लागत आहे.. नाही कसं म्हणणार..?” सुशांत अनुकडे बघत आईशी बोलत होता..

“ते ठिक आहे रे.. पण घरात कित्ती कामं पडली आहेत..अनु एकटी किती आणि काय काय करणार रे..” आई..
“अगं एकटी कश्याला? हा आहे ना केतन!! तो करेल की मदतं… काय रे? करशील ना?” सुशांतने केतनला विचारलं..

केतनने अनुकडे एकदा बघीतले..

“अरे तिच्याकडे काय बघतो आहेस? ती काय नाही म्हणणार आहे का? मी शक्यतो लवकर येण्याचा प्रयत्न करीन..” सुशांत बोलत होता..

दुसऱ्या दिवशी सकाळीच सुशांत निघुन गेला.

केतनला अनु आपल्याला बरोबर घेईल याची यत्किंचीतही शक्यता वाटत नव्हती. तेवढ्यात आईने त्याच्या खोलीचे दार वाजवले.. “केतन आवर रे बाबा लवकर, अनुचा फोन आला होता.. बरीच काम आहेत बघ, ती १५ मिनीटांत येते आहे..”

केतन पटकन बेड वर उठुन बसला. अनपेक्षीत असा एक धक्काच बसला होता त्याला. पटापट त्याने आवरले, खाली येईपर्यंत अनु येउन थांबली होती. मग दोघंही एकत्रच बाहेर पडले. केतनने त्या दिवशीचा काहीच विषय काढला नाही. तो कोणती कामं आहेत? काय काय करायचं आहे याबद्दलच बोलत होता. अनुचा मुड नेहमीसारखा नव्हताच. शेवटी केतनने खिश्यातुन आय-पॉड काढुन कानाला लावला आणि गाणी ऐकतच तो चालु लागला. केतनला गाणं ऐकताना, चालु असलेले गाणे गुणगुणायची फार सवय होती. ‘ओम-शांती-ओम’ मधलं चालु असलेले गाणं तो गुणगुणत होता:

दिलं जुडे बिना ही टुट गये..
हथं मिले बिना ही छुट गये…
की लिखे ने लेख किस्मत ने..

गाणं म्हणतानाच सहज त्याने अनुकडे बघीतले तर तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्याने इयर-प्लग काढुन विचारले.. “काय झालं?”

“ओ..देवदास.. ओम मखिजा.. अहो.. घरात लग्न आहे आपल्या.. कश्याला रडकी दुख्खी गाणी म्हणताय.. राहुद्या.. बंद करा ती गाणी..” असं म्हणत अनुने तो आयपॉड जवळ-जवळ काढुनच घेतला..

“ऍक्च्युअली नां, मी नंतर खुप विचार केला.. मला मान्य आहे तुझी त्यात काही चुक नाहीये. इनफॅक्ट तु मनातले बोलुन दाखवुन खुप मोठेपणा दाखवला आहेस..आय एम सॉरी..” अनु केतनला म्हणाली..

“अच्छा? मग सकाळ पासुन आपला मुड का बरं असा खराब होता?”
“का काय? मी सुशांत वर चिडले आहे.. मला नाही पटत त्याचे वागणं.. कामापुढे त्याला प्रत्येक गोष्ट नगण्य आहे.. अगदी मी सुध्दा.. कधी कधी तरं मला वाटतं खरंच आम्ही दोघं मेड फॉर इच आदर आहोत का?”
“अगं पण त्याला जाण गरजेचं होतं ना?.. उगाच का गेला आहे तो?”
“पण मी म्हणते.. हे अमेरीकेला जायलाचं हवं का? सगळेजण इथे असताना आपण तिकडे एकटे दुर रहायचे म्हणजे..”
“अगं असते एकेकाला क्रेझ अमेरीकेची..”
“असं काही नाही.. आता तुच बघ ना.. इतकी वर्ष अमेरीकन मुलीशी लग्न करायचं म्हणुन ठाम होतास.. पण मला भेटल्यावर.. आय मीन.. तुला कोणीतरी एक मुलगी भेटली..जी तुला आवडली आणि तु क्षणार्धात निर्णय बदललास ना..!! का तरीही तु तुझ्या निर्णयावर ठाम राहीलास?..”

“हम्म.. प्रेमापुढे सगळं निरर्थक आहे असं मानणाऱ्यातला मी आहे.. तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होतो.. अगदी अमेरीका सोडुन कायमचा भारतात यायला सुध्दा..” केतन बोलत होता.. अनु ऐकत होती. एका ठिकाणी थांबुन आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी केतनकडे बघत ती म्हणाली..”कित्ती फरक आहे तुम्हा दोन भावंडात..”
“:-).. मगं? बघ बदलते आहेस का विचार? कदाचीत तुला सुशांतदा बद्दल वाटते ते प्रेम नसेलही. तुम्ही दोघं एकमेकांना लहानपणा पासुन ओळखता आहात.. तुम्ही चांगले मित्र असु शकता..” केतन

“चल चल.. थट्टा पुरे झाली.. बरीच कामं रेंगाळली आहेत..” अनु म्हणाली..

तिच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव मात्र केतनने अचुक हेरले होते..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

Advertisements

6 thoughts on “‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-३]

 1. काय रे … part 3 … part 4 … संपव की आता … त्या केतन आणि अनुपेक्षा इकडे आम्हाला जास्त उत्सुकता लागली आहे … 😉

  1. थंड रख पुत्तर 🙂 .. पुढचा भाग शेवटचा.. प्रॉमीस..

 2. एका चित्रपटाची कथाच तयार होते आहे ही.
  छान, येउदयात !

 3. Ye please yar tuzya story cha fakt star plus kimva Ztv nakos karu mhanaje zala …

  Khoda pahad nikala chuha nako mhanun.

  Pan vachayala chan vatate!

  Good !!!

  1. विजु भाऊ, take it from me, it won’t.. तसे झालं तर सरळ खुर्चीवरुन उठ, इथे ये आणी बुकल मला 🙂
   चुहा नाही.. मोठ्ठा हात्ती काढीन मग तर झालं? काल तु ज्या पॉसीबिलीटीज सांगीतल्यास त्यातली एक पण नाही ending याची 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s