निळु भाऊंचे निधन


दीर्घकाळ मराठी रंगभुमीवर सर्व प्रकारच्या व्यक्तीरेखा गाजवणारे सर्वांचेच लाडके निळु भाऊ, अर्थात निळु फुले यांचे आज पुण्यात निधन झाले. काही दिवसांपुर्वीच त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले होते. कर्करोगाने आणि वृध्दापकाळाने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे निवेदन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिले होते. आज पहाटे दीड वाजता त्यांचे निधन झाले.

एक गाव बारा भानगडी, सामना, पिंजरा, सिंहासन, पांढर या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका केवळ अविस्मरणीयच पण त्याचबरोबर ‘सखाराम बाईंडर’ नाटकातील सखारामची भूमिका ही तितकीच लोकप्रिय ठरली. मराठी / हिंदी चित्रपट, लोकनाट्य, एक समाजसेवक अश्या अनेक आघाड्यांवर त्याचे योगदान महत्वाचे होते. स्वतःच्या वेगळ्या अश्या संवाद फेकीच्या शैलीमुळे ते कायमचे लोकांच्या मनात घर करुन गेले.

शांताराम नांदगावकरांच्या निधनाने बसलेल्या धक्यातुन लोकं आजुन सावरत नाहीत तो वर हा दुसरा धक्का बसला आहे.

कधी आपल्याला हसवणारे तर कधी त्यांच्यातील खलनायकाच्या व्यक्तीरेखेने चिड आणणारे निळु भाऊ आज आपल्यात नाहीत. 😦

Advertisements

2 thoughts on “निळु भाऊंचे निधन”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s