सावधान, बायको गाडी शिकत आहे


फारच भयानक, चित्तथरारक, ह्रुदयाची धडधड वाढवणाऱ्या, हातापायांना कंप फुटवणाऱ्या अनुभवातुन सध्या मी जात आहे. हो.. माझी बायको गाडी शिकत आहे… आणि या घटनेचा साक्षीदार जबरदस्तीने मला व्हावे लागत आहे.

त्याचे झाले असे की काही वर्षांपुर्वी ड्रायव्हींग स्कुल मधुन ट्रेनींग घेउन, पर्मनंट लायसन्स सहीत बायको गाडी शिकली (!!). त्यावेळेस आमची सॅन्ट्रो होती. परंतु कालापरत्वे तिची गाडी चालवायची सवय सुटली. परंतु अचानकपणे तिला आता परत गाडी चालवावीशी वाटायला लागले आहे. त्यामुळे जबरदस्तीने मला तिच्याबरोबर शेजारी बसुन हा भयावह अनुभव घ्यावा लागत आहे.

रोलर-कोस्टर, मेरी-गो-राऊंड आणि तत्सम राईड्स मध्ये जेवढा थरार मी अनुभवला नसेल तेवढा.. किंबहुना त्यापेक्षा जास्ती अनुभव मी घेत आहे.

सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम आहे की गाडी चालवतान (?) बायको फक्त पुढे पहाते, पण मला मात्र डावीकडे, उजवीकडे, मागु, पुढे सगळीकडे लक्ष ठेवावे लागते. सकाळचीच गोष्ट घ्या ना.. मी गाडीचे हॅंडल घट्ट पकडुन बसलो होतो.. इतके घट्ट की तळव्यांना घाम फुटला होता.. गाडी ताशी ६० च्या वेगाने चालली होती. सर्व काही सुरळीत चालले होते आणि अचानक समोर सिग्नल लागलेला दिसला.

“आता काय करु?”.. बायको..
“काय म्हणजे..? ब्रेक तर लावावा लागेल ना…!. बर आधी गाडिचा गेअर बदल..”
“अरे पण आत्ता कुठल्या गेअर मध्ये आहे गाडी?”
“म्हणजे..? तुला गाडी कुठल्या गेअर मध्ये आहे हे पण माहीत नाही?”
“विसरले.. सांग ना पटकन बघुन”
“तिसऱ्या…”

सिग्नल लागलेला बघुन नेमकी एक फुलवाली समोर आली.

“सावकाश हा.. समोर फुलवाली आहे.. गाडी तिला धडकली ना.. तर तिच फुलं तिच्यावर टाकावी लागतील..”

नशीबाने.. तिच्याही आणि आमच्याही, बऱ्याच खाडखुडी नंतर गाडी थांबली..
सिग्नल सुटल्यावर नेहमीप्रमाणे गाडीने एक इंच पुढे जाऊन (क्लच निट दाबला नसल्याने) दम तोडला. परत इंजिन चालु करुन पुढे जाईपर्यंत मागच्या गाड्यांनी हॉर्न वाजवुन भंडावुन सोडले होते.

काही अंतर थोडे पुढे गेल्यावर मी अचानक किंचाळलो..
“अर्र..र्र…अर्र्र्र्र”
“काय झालं आता?” वैतागुन बायको म्हणाली..
“वाचले.. सुदैवाने वाचले.. काही नाही अगं.. डावीकडुन ना.. एक नवपरीणीत जोडपे चालले होते बघ दुचाकीवरुन, नुकताच त्यांच्या वंशाला फुल आलेले पण दिसत होते.. नशीबाने त्यांचा संसार उधळता उधळता वाचला…”

जाता-येता एकतर ती सारखा गाडीचा हॉर्न तरी वाजवत होती नाही तर समोरुन येणाऱयाला हातानेच खाणा-खुणा करुन थांबा, जा, असले प्रकार करत होती. विज्ञानाने का हो अजुन ‘माणुस अदृष्य होउ शकेल’ असा शोध नाही लावला? रेडीओ वर आर.जेंची चालु असलेली अखंड बडबड इरीटेट करत होती.. पण समोरचे लक्ष काढुन त्या रेडीओला हात लावायची माझी काही हिम्मत झाली नाही

माझ्यापायाशी ब्रेक नव्हता तरीही नकळत पायाने मी ब्रेक दाबत होतो.. तेवढ्यात समोर बहुतेक करुन लग्न किंवा तश्याच कुठल्यातरी समारंभासाठी साडी-शृंगार करुन जाणारी एक तरुणी समोर आली.. ती पण बावचळली आणि मी पण, पण बायको मोठ्ठी धिराची हो.. काहीच फरक पडला नाही तिला.. (मला शंका आहे.. तिने बघीतलेच नसणार..) तर अश्या अनेक पामरांचे जिव वाचवत घरी परतलो.

रात्रीची वेळ.. सहसा रहदारी कमी म्हणुन आम्ही परत गाडी चालवायला बाहेर पडलो.. थोडे अंतर पुढे गेलो आणि जोरदार पाऊस सुरु झाला. पुढचे काहीच दिसेना. शेवटी.. ‘भगवानने मेरी सुनली’ आणि बायकोने घरी जायचा निर्णय घेतला.. ते सुध्दा कडेला बसुन.. कारण पावसात गाडी चालवणे जमत नव्हते.

रस्त्यावर गर्दी नसल्याने आम्ही गाडी रस्त्याच्या मध्धेच उभी करतो बरं का.. मग गाडीचे इंजीन बंद करुन ती उतरली.. मी सुध्दा उतरलो जागा बदलण्यासाठी..

“अगं बंद नको करु गाडी.. मी बसतोच आहे ना..” म्हणल्यावर तिने परत बॅटरी ऑन केली आणि दार लावले.. मी सुध्दा दार लावले.

आता झाले काय, की बॅटरी ऑन केली आणि दार बंद असतील तर गाडी सेंट्रल लॉकींग मुळे आपोआप लॉक होते.. आणि झाले ही तसेच.. आम्ही दोघंही गाडीच्या बाहेर आणि ट्विक ट्विक वाजुन दार झाली की लॉक.. आता? आत कसे जाणार? गाडी रस्त्याच्या मधोमध.. गाडीचे दिवे, पार्कींग लाईट्स, व्हायपर्स चालु.. पण दरवाजा बंद.. नशीब घर जवळच होते.. मी तेथेच पावसात भिजत गाडीपाशी थांबलो आणि बायकोने घरी जाऊन दुसरी किल्ली आणली.

काय सांगु तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रसंगातुन जात आहे. ड्रायव्हींग स्कुलवाल्यांच मला खरंच कौतुक वाटते.. दिवस-रात्र ते कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरे जात असतात.. स्वतःला शांत राखत.. खरंच

देवा.. वाचव रे बाबा या संकटातुन लवकर..!

ये देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया,
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया
ऐ देवा दिली हाक उद्धार करायाssss,
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया….
मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया

22 thoughts on “सावधान, बायको गाडी शिकत आहे

 1. अनिकेत
  सस्पेन्स पिक्चर पहातोय असं वाटत होतं. सारखं आता पुढे काय? असा प्रश्न मनात यायचा. मस्त आहे रे पोस्ट..
  माझा अनुभव तर ड्रायव्हिंग शिकवायचा आहे. एकदा आम्ही नाशिकला गेलो असतांना बायकोला ड्रायव्हिंग शिकवायचा प्रयत्न केला होता…. फक्त एकदाच.. त्यावर लिहितो आता ब्लॉगवर..

 2. suhas

  कोणत्या रस्त्यावर चालले आहे हे सगळे म्हणजे आम्ही त्या रस्त्यावर येत नाही. 🙂

  1. अनिकेत

   :)) कुठेही, कधीही. बहुदा कर्वे रस्त्यावरच, पण शक्यता आहे की हाफ क्लच प्रॅक्टीस साठी चांदनी चौक पण असु शकतो.. 🙂
   सावधगीरीचा इशारा म्हणुन.. कुठेही.. शंभर वेळा बंद पडत, वाकडी-तिकडी, कधी जोरात तर कधी हळु लाल रंगाची स्विफ्ट दिसली तर दिसेल त्या गल्ली-बोळात घुस बाबा.

 3. ha..ha.. tari bara gharachya killya pan gaDit navhatya rahilya. tya manane tuza nashib barach joravar disataye, tevha don’t worry..

  hya hi prasangatun suTashil. 🙂

  masta post!!

 4. Ajit

  एक नवपरीणीत जोडपे चालले होते बघ दुचाकीवरुन, नुकताच त्यांच्या वंशाला फुल आलेले पण दिसत होते.. नशीबाने त्यांचा संसार उधळता उधळता वाचला…”

  he lai bhari..mast lihile aahes re..
  mi pan kothrud la shift zaloy march madhye..now I have my own home in Mangaldham Hsg. soc. Tu pan javalpas rahatos ase disatay..
  aani ho aata red swift disali ki sambhalun wagen..

 5. मस्तच झालीये पोस्ट. गाडी लॊक आणि तुम्ही दोघे बाहेर हे सहीच झाले म्हणायचे. बरे तर बरे घर जवळ होते. 🙂
  मी जेव्हा ड्रायव्हींग शिकले तेव्हा नचिकेतने मला शुभेच्छा देण्यासाठी पत्र पाठविले अन त्यावर मी गाडी मी चालवतेय व आजूबाजूचे लोक सैरावैरा पळत आहेत अशी चित्रांची मालीका मस्त कार्टून स्टाईलने स्वत: काढून पाठविली. 😀

 6. hilarious…maja aali wachun.
  माझ्यापायाशी ब्रेक नव्हता तरीही नकळत पायाने मी ब्रेक दाबत होतो. LOL 😀

 7. Charu

  Ekdum sahi, amchya kade ha scene alikade sarkha -sarkha ghadato aahe…mi gadi shikate aahe aani navara jeev muthit dharoon basato shejari !!!
  Mala ha lekh wachatana tumchya jaagi Navara aani aani tumchya baiko chya jaagi mi disat hote……..farak itkaach ki he sagale ithe Seattle nagari madhe ghadate aahe !!
  Mast lihile aahe tumhi !!

 8. Abhijit

  “सावकाश हा.. समोर फुलवाली आहे.. गाडी तिला धडकली ना.. तर तिच फुलं तिच्यावर टाकावी लागतील..” 🙂

 9. Neelam Pawar

  Lay Bhariiiii ! vachatana evhade hasu ale ki P.L.Deshpande nchi aathavan aali. kharach asech hot asel pratyek navryasobat jevha tyachi bayko gaadi shikat asel.

 10. Nilesh S. Pawar

  एक तरुणी समोर आली.. ती पण बावचळली आणि मी पण, पण बायको मोठ्ठी धिराची हो.. काहीच फरक पडला नाही तिला.. (मला शंका आहे.. तिने बघीतलेच नसणार..)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s