इच्छामरण


आजकाल सरकार काही धाडसी निर्णय घेताना दिसत आहे. ‘समलिंगी संबंधांना मान्यता’, ‘दहावीची परीक्षा रद्द करावी काय?’ आणि आता ‘दहावीसाठी ए.टी.के.टी लागु’ ही त्यापैकीच काही उदाहरणं. मला असं वाटतं आता वेळ आली आहे ते अजुन एका कायद्याबद्दल गांभीर्याने निर्णय घेण्याची – ‘इच्छामरणाचा कायदा’

माझ्या जवळच्या आप्तांपैकीच एकीला त्यांच्या घरच्यांनी काही कारणामुळे वृध्दाश्रमात ठेवले. त्यांना भेटण्यासाठी काही वेळा मी वृध्दाश्रमात जातो. तेथील लोकांची अवस्था बघुन शब्दशः अंगावर काटा येतो. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था आहे त्यांची. आयुष्यभर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर, सगळे अवयव थकल्यावर जेंव्हा विश्रांतीची आवश्यकता असते तेंव्हा कधी स्वतःच्याच चुकीने, कधी कृतघ्न पुत्रांमुळे तर कधी दुसरा कुठलाच उपाय नसल्याने अनाथश्रमाची / वृध्दाश्रमाची वाट धरावी लागते. दुर्धर आजाराने ग्रासलेले शरीर, थकलेले मन, अधु दृष्टी अश्या अवस्थेत धड जगताही येत नाही आणि मरताही येत नाही.

विज्ञानाने प्रगती केली आहे.. नक्कीच, पण काही वेळा, काही लोकांसाठी हा विज्ञानच डोके दुःखी ठरत आहे. ‘डायलिसीस’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. डायलिसीस वर उपचार घेणाऱ्या काही पेशंट्सची उदाहरण पहावयास मिळाली जी अंगावर काटा आणतात. डायलीसीस हा अतिशय खर्चीक प्रकार आहे. महिना नाही म्हणलं तरी साधारण पणे २५ हजार खर्च येतो. पण अनेक लोकं अशी आहेत ज्यांना हा खर्च परवडत नाही.

एक उदाहरण सांगतो, एक बाई आहेत ज्यांच्या दोन्ही किडनी निकामी आहेत. त्यांना डायलीसीस करण्याशिवाय उपाय नाही. या बाईंना नवरा, मुलगा काही नाही. त्या पापड लाटण्याचे काम करतात. पापड लाटुन पैसे साठले की मग त्या डायलीसीस करु शकतात. वेळेवर डायलीसीस करुन घेणे अतीशय आवश्यक असते नाहीतर पाणी शरीरात साठत रहाते. या बाई जेंव्हा डायलीसीस ला येतात तेंव्हा त्यांचा चेहरा, शरीर, हात, पाय सगळे प्रचंड सुजलेले असतात. हातावर आपले बोट दाबले तर हातात साठलेले पाणी जाणवु शकते. डायलीसीस होईपर्यंत प्रचंड थकवा, जड शरीर, ह्रुदयावर ताण सहन करत या बाई जगत आहेत.

दुसरे उदाहरण, एक गृहस्थ होते ज्यांची प्रकृती शेवटच्या स्टेजला होती. त्यांच्यासाठी पाणी म्हणजे जणु विषच झाले होते. घरातले त्यामुळे त्यांना पाणी पिऊन देत नसतं. पण तहानेच काय? ती तर लागणारचं ना. शेवटी शेवटी ते गृहस्थ संडासात जाऊन पाणी पित असतं. काय ही अवस्था?? पाणी सुध्दा एखाद्याचे आयुष्य इतके केवीलवाणे करु शकते हे ऐकुनही विश्वास नाही बसत.

डायलीसीस धड जगु देत नाही, नाही धड मरु देत. परवाच एका ९ वर्षाच्या मुलीची केस बघीतली जिला डायलीसीस आवश्यक आहे. आयुष्याची सुरुवातच अशी असेल तर तीचे आयुष्य कसे जाणार?

पॅरालिसीस झालेले अनेक पेशंट्स चे आयुष्य कसे आहे हे आपण जाणतोच. त्याचबरोबर असे अनेक आजार आहेत जे माणसाचे आयुष्य दर्दनाक करतातच पण त्याचबरोबर त्याचा मृत्युही तितकाच क्लेशकारक असतो. आजारपण… म्हातारपण… येणारच. हातपाय थकतात… आणि मागोमाग खर्चीक, त्रासदायक औषधं… डॉक्‍टर या चक्रव्युव्हात अडकुन पडतात..

आत्महत्या हा एक मार्ग जरुर आहे. पण गळफास घेउन, स्वतःला जाळुन घेउन, रेल्वेखाली जिव देऊन येणारे मरण हे जितके क्लेशकारक आणि भयानक आहे, तितकाच त्याचा विचार सुध्दा. मग अश्या वेळेस स्वतःच्या घरात, केवळ एक इंजेक्शन टोचुन घेउन, झोपेतच शांतपणे मृत्यु यावा असे जर कुणाला वाटत असेल तर त्यात गैर काय आहे? मृत्यूबद्दल विचार करताना प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला चांगले मरण यावे. इच्छामरण ह्याचा शाब्दिक अर्थ आपल्याकडे ब-याचदा शाब्दिक अर्थाने – ’इच्छा असताना घेता येणारे मरण’ असा लावला जातो. परंतु तो अर्थ तसा नसून ’युदेन्शिया’ ह्या त्यासाठी वापरल्या जाणा-या ग्रीक शब्दाचा अर्थ “चांगले मरण” असा होतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा, हा विचार काही आपण टाळू शकत नाही. परंतु ते आपल्या हातात कुठे असते?

ज्या देशांमध्ये इच्छामरणाचा कायदा संमत आहे, तेथील प्रत्येक जण त्याचा उपयोग करतो आहे असे नाही. कित्तेक जण डॉक्टरांकडुन मिळवलेली औषध बरोबर बाळगुन आहेत. स्वतःचे मरण स्वतःच्या हाती घेउन फिरणारी ही मंडळी शेवटपर्यंत आपला स्वाभीमान, बाणेदारपणा सांभाळु शकतात.

इच्छामरणाचा कायदा झाला तर त्याचा गैरवापर होईल असा एक सुर ऐकायला मिळतो, पण आज असा कुठला कायदा आहे ज्याचा गैरवापर होत नाही? असा कोणता कायदा आहे जो पायदळी तुडवला जात नाही. इच्छामरणाची याचीका करणाऱ्या हजारो लोकांच्या जागी स्वतःला ठेवुन सरकारने या कायद्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते. व्यवस्थीत नियम बनवले, प्रत्येक सुक्ष्म गोष्टी, अटी स्पष्ट केल्या, लोकांमध्ये त्याची जागृकता निर्माण केली, निट प्रबोधन केले तर हा कायदा अनेकांसाठी वरदानच ठरेल. तसे झाले तर वेदनेने तळमळत, मृत्युची वाट बघत बिछान्यावर पडुन राहीलेल्या हजारो लोकांची तगमग तरी कमी होऊ शकेल.. नाही का?

Advertisements

6 thoughts on “इच्छामरण

 1. अगदी खरं आहे. मी ह्याचं उदाहरण आमच्या घरातच बघत आहे. 85 च्या वर वय उठुन बसण्याची देखिल शक्ती नाही आणि सगळे नैसर्गिक विधी बिछान्यावरच. ते बघणं देखिल क्लेश्कारक असतं. आजारी माणसाला तर त्रास होतोच होतो पण आजुबाजुचे जे लोक रात्रंदिवस झटत असतात त्यांचे पण चेहरे केविलवाणे असतात. म्हणलं तर आपलं माणुस त्याची सेवा करायलाच हवी … पण किती दिवस, किती महिने, किती वर्ष. कधितरी मनात विचार डोकावतोच ईच्छामरण कायदेशिर असते तर….

 2. ha tpoic khupach debatable aahe. Tyach implementation ha saglyat chintecha wishay aahe. aadhich bichaanyala khilela manus durbal. tyaat jar aajubajula tyachya marantun faayda ukalu paahnare naradham astil tar te ya kaaydyacha durupyog kartilach. shiway halli doctor/vakil wikat ghene farse kathin rahilele nahi. tyamule yat gairprakar jast wadhtil ase watate.

  1. पण हे म्हणजे “चोर सोडुन संन्याश्याला फाशी’ दिल्यासारखे झाले. अश्या लोकांवर वचक निट ठेवता येईल अश्याप्रकारे नियमावली बनवुन हा सक्षम कायदा बनवल्यास अश्या अंथरूणावर खिळलेल्या, दुर्बल माणसाला फायदा नाही का होणार.

   तसे ही त्याच्या दृष्टीने या वेळेस संपत्ती, जायदाद, इस्टेट या सगळ्या गोष्टी गौणच असतील.

   वर म्हणल्याप्रमाणे.. कायद्याचा दुरुपयोग तर होईलच.. प्रत्येक कायद्याचा होतोच की.. म्हणुन कायदाच नाही करायचा म्हणजे…

 3. आशा करतो की कमीत कमी अजुन 30-40 वर्षांनी जेव्हा मला इच्छामरण घ्यायचे असेल तेव्हा हा कायदा मंजूर झालेला असेल.

 4. lahan mule ani mhatari manse swataha kontahi nirnay ghayala sakshkham nasat mag asha veles ninirnay ghenar kon ani kuthlya adhikaran.

  Mitra konalahi kiti hi chanlya prakarcha ka hoi na pan mrityu dene mhanze hatycha ki

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s