माले, मुळशी सायकलींग राईड (फोटो)


रविवारची साखरझोप मोडुन सकाळी ५ वाजताच घरातुन बाहेर पडलो ते एक अविस्मरणीय अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी. मुळशी मधील ‘माले’ या एका छोट्याश्या गावापर्यंत सायकलींग राईड पुण्यातील काही हौशी सायकलवाल्यांनी आयोजीत केली होती. घरापासुन-ते-घरापर्यंत जाऊन येऊन एकुण किलोमीटर झाले फक्त ९० कि.मी.

दोन घाट आणि बाकीचा चढ उताराचा रस्त्याने फुल्ल वाट लावली. घरी आलो तेंव्हा पायाचे अक्षरशः तुकडे पडले होते. परंतु तो पर्यंत मुसळधार कोसळणाऱ्या पावसात, धुक्यात, वाऱ्याच्या विरुध्द दिशेने सायकल हाकण्यात जो आनंद अनुभवला तो स्वर्गीय होता. ‘माले’ येथे ग्रुप मधील एकाचे फार्म हाउस होते. त्यांनी ‘उपमा, खजुर, बाकरवडी, चहा, बिस्कीट’ असा चविष्ट ब्रेकफास्ट पुरवला. तेथे गेल्यावर फुल्ल तुटुन पडलो आम्ही त्याच्यावर.

येतनाही सुरुवातील जबरदस्त पाऊस होता, पण नंतर मात्र कडक उन पडले आणि आमच्या घामाच्या धारा वाहु लागल्या. एक मात्र मजेची बाब होती. आम्ही परत असताना अनेक जण पावसात भिजायच्या विचाराने मुळशीच्या बाजुला चालले होते. पण उन बघुन त्यांचे चेहरे पडलेले तर आम्ही मात्र, “आम्ही भिजलो बाबा मस्त पावसात..’ अश्या चेहऱयाने परतत होतो.

एकुण कॉलेज मध्ये जाणाऱ्या पासुन निवृत्त झालेल्या ५०-५५ वया पर्यंतच्या साधारण ७६ तरूण-तरूणींचा गृप होता. अर्थात या राईड बद्दल लिहीन तेवढे कमीच, पण सध्या तरी फक्त फोटोच टाकत आहे.


[पहिला घाट]


[आम्हाला नको बुवा पेट्रोल]


[घाट चढल्यानंतर उताराचे काय सुख असते ते सायकलवालाच जाणे]


[हिरवा निसर्ग हा भोवतीने]


[मित्र-मित्र]


[चला, मारा पॅंडल]


[निसर्गाच्या सानीध्यात]


[आलो बाबा एकदाचे]


[नभ उतरूनी आले]


[मुळशी धरणाची भिंत]


[खाऊ]


[खिडकी]


[खाणे चालुच]


[लव्हली लेडीज]


[लव्हली लेडीज]


[धडपडलेली लोकं]


[व्हि.. फॉर व्हिक्टरी]


[परतीचा प्रवास.. बाप रे अजुन ३५ कि.मी.!!]


[जरा विसावु या वळणावर]

9 thoughts on “माले, मुळशी सायकलींग राईड (फोटो)”

 1. अरे वा! मस्तच झाली म्हणायची ही ट्रिप पण!

  तुमच्या पोस्ट आणि सायकलिंगच्या गोष्टी वाचुन मीही पुन्हा सायकल घ्यायचा विचार करतोय…
  पण गेली १० वर्षे खंड पडलाय – मात्र त्याआधीचा १० वर्षांचा अनुभव आहेच की… बघुयात… या दिवाळीला सायकल गेतोच !

  जरा माहिती द्याल काय…? म्हणजे कुठली चांगली…. काय पहावुन घ्यावी… वगैरे..! मी आधी हिरो रेंजर चालवायचो.. पण आता ३०+ आहे..ते पण लक्षात घ्यायला पाहिले 😉

  1. जरुर.. by all means. सर्व प्रकारची माहीती आनंदाने देईन. अगदी कुठली घ्यावी पासुन कुठुन घ्यावी, किंमत किती पडेल, प्रत्येकीचे फायदे, तोटे, सर्व काही. मी तर म्हणीन बिलकुल दिवाळीची वाट बघु नकोस, शुभस्य शिघ्रम. आजच संध्याकाळी घरी गेलो की तुला डीटेल्ड मेल टाकतो.

   तु पुण्याचाच ना? म्हणजे तुला दुकानाचे रेफरंन्सेस द्यायला…!

 2. वा ! खुप बहारदार झाली म्हणायची तुमची ट्रिप ! खरच काय मजा आली असेल नाही ! नाही तर आम्ही … मुम्बैत अस सायकल वर नाही ना जाता येत …

  http://asachkahitari.wordpress.com/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s