रॉबरी- [भाग २]


भाग १ पासुन पुढे..

“ब्ल्यु नाईल क्लब” मध्ये जय्यत तयारी चालु होती. इंटेरीयरची फेरजुळणी, अधीक आरामदायी सुविधा यांचबरोबर सेक्युरीटीच्या दृष्टीने सि.सि.टीव्ही मध्ये अधीक नविन तंत्रज्ञानाची जोड देउन शक्तीशाली यंत्रणा लावली जात होती. डिसुझा, ‘रेड-आय सेक्युरीटीजचा’ सेक्युरीटी-प्रमुख सर्व गोष्टींमध्ये जातीने लक्ष देऊन होता. त्या दिवशी होणाऱ्या इव्हेंटची आणि कॅश ट्रॅन्स्फरची पुर्ण जबाबदारी त्याची होती. ऐन वेळेस प्लॅन मध्ये बदल करण्याची त्याची खासीयत होती.

‘त्या दिवशी सेक्युरीटी व्हॅन बरोबर दोन साध्या बंदुकधारींऐवजी .४४ कोल्ट, ऍटोमॅटीक असलेला एक उंचापुरा, आडदांड डिसुझा असेल’, मनातल्या मनात तो विचार करत होता.

“हाय डिसुझा.. संध्याकाळी काय करतो आहेस?” डिसुझा ची तंद्री भंगली ती ब्ल्यु-नाईलमधल्या बार-गर्ल, जेनी च्या आवाजाने. ‘स्त्रि’, डिसुझाचा फार मोठ्ठा विक-पॉईंट होता. तुम्ही त्याला कसलाही विचार न करता ‘स्त्री-लंपट’ ही संज्ञा खुश्शाल बहाल करु शकता.

“नथींग जेनी.. तुझ्यासाठी मी सदैव मोकळाच आहे,” चेहऱ्यावर अर्थपुर्ण हास्य आणत डिसुझा म्हणाला..

************************

ठरलेल्या वेळी पंकी, क्रिश, रफिक, बंटी आणि डॉली एकत्र जमले होते. क्रिशची नजर डॉलीच्या सर्वांगावरुन फिरत होती, पण तिच्या डोळ्यातील तो करडा थंडपणा त्याला त्याच्या विचारांपासुन दुर सारत होता.

“टाईम फॉर मोर डिटेल्स..”, पंकी सांगु लागला, “डॉक नाकाच्या थोडे पुढे पोलीस चौकीच्या समोर एक रिकामी जागा आहे. ति जागा आपण जहाज मोडणीच्या कामासाठी भाड्याने घेतलेली आहे. उद्यापासुन तिथे जहाजाचे सुट्टे भाग यायला सुरुवात होईल.”

रफिकने काही बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्या आधीच पंकीने त्याला थांबवले..”डर मत रफीक, पोलीस चौकी समोर असली तरी आपल्याला त्याचा फारसा धोका असणार नाही. उलट झाला तर फायदाच होईल. चोरलेली कॅश आपल्या समोरच आहे असा विचार कुठलाही पोलीस वाला करणार नाही. एक महीना आधीपासुन चालु असलेले जहाजाच्या कामात कश्याला कोण लक्ष घालायला येईल? दुसरी गोष्ट, समजा काही वाईट घडलेच आणि व्हॅन चोरीची बातमी पोलीसांना लागली तर ताबडतोब नाकाबंदी करण्यात येईल. अश्यावेळेस कॅश पेटी घेऊन बाहेर जाणे आपल्याला अवघड होईल. त्यापेक्षा इथे आपल्याला जास्ती सुरक्षीत वातावरण आहे..

तर रफिक तु आणि बंटी उद्यापासुन तिकडे जायचे. जोपर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत इकडे यायचे नाही किंवा मला फोन सुध्दा करायचा नाही. काही कंत्राटी कामगार सोबत घेउन कामाला सुरुवात करायची. पण त्याचबरोबर शेड मध्ये एखादा कोपरा असा ठेवायचा जिथे इतर कामगारांना यायला बंदी असेल. जिथे आपले कॅश पेटी फोडण्याचे काम आपण बिनबोभाट करु शकु. अधुन मधुन समोरच असलेल्या पोलीस चौकीतील पोलीसांना तुम्ही दिसाल याची काळजी घ्यायची. शक्य झालेच तर एक-दोन हवालदाराशी ओळख सुध्दा काढायची. अगदी त्यांना मुद्दामहुन आपल्या शेडमध्ये सहजच चहापाण्याला बोलावुन त्यांना खरंच काम चालु आहे हे नकळत दाखवुन द्यायचे.

चिकना क्रिश, तु आणि डॉली, तुम्ही दोघं उद्यापासुन अधुन मधुन ‘ब्ल्यु नाईल क्लब’ ला भेट द्यायची. तुम्ही दोघं ‘एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले कपल’ आहात याची जाणीव तेथील स्टाफ ला करुन द्यायची. तेथे जुगार खेळा, मौज मजा करा पण त्याचवेळेला तेथे घडणाऱ्या बारीक-सारीक घटनांची नोंद ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली पाहीजे.. मेक नो मिस्टेक अबाऊट इट.. मग ती कितीही क्षुल्लक असो.

डॉली तु.. बेंजोच्या संपर्कात रहायचे आणि तेथील बातम्या गोळा करायच्या.

आता डिटेल्ड प्लॅन. सद्य माहीतीनुसार १ मार्चला ९.३० वाजता ‘रेड-आय सेक्युरीटीजच्या’ व्हॅन मधुन ती मोठ्ठी कॅश बॉक्स मुंबईकडे रवाना होईल. बरोब्बर १०:०५ ला क्रिश तु आणि डॉली गाडीने त्यांच्या मागे निघायचे. कोरेगाव-पार्क मधील रेंन्ट-अ-कार मधुन एक बऱ्यापैकी बोजड गाडी २ दिवसांसाठी भाड्याने घेउन ठेवायची. उदा. तवेरा, स्कॉर्पीयो, इनोव्हा.

क्रिश इथे तुझा अनुभव आपल्याला लागणार आहे. तुम्ही शक्य तितक्या वेगाने त्या व्हॅनच्या मागुन जायचे. व्हॅन ला ओव्हरटेक करायच्या आधी तुम्ही अतीशय घाईमध्ये आहात हे त्या ड्रायव्हरच्या नजरेत आणुन द्यायचे. सारखा लाईट मारणे किंवा हॉर्न ब्लो करणे वगैरे. ओव्हरटेक करताना डॉली तु क्रिशच्या ड्रायव्हींगला खुप घाबरली आहेस असे चेहऱ्यावर भाव ठेवायचे. त्या गाडीतील ड्रायव्हर किंवा सेक्युरीटी गार्डस ना तुझा चेहरा, तुझ्या चेहऱ्यावरील भयभीत भाव व्यवस्थीत दिसले पाहीजेत.. क्रिश ओव्हरटेक केल्यानंतर ताशी १२०च्या वेगाने तुम्ही पुढे निघुन जा. या ठिकाणी एक़्स्प्रेस-वे थोडासा अरुंद आणि वळणाचा आहे तेथे तुम्हाला तुमची गाडी पलटवायची आहे.. जेणेकरुन अपघात झाला असा भास होईल..” पंकी ने ए़क्स्प्रेस-वेचा नकाशा काढुन त्यावरील एका ठिकाणावर बोट ठेवले..

‘काय? तुला वेड लागले आहे का? ए़क्स्प्रेस वे वर वेगवान गाडी अशी पलटवणे तुला गम्मत वाटली काय? साला…ss मी नाही तयार.. मरायचे आहे काय?’ क्रिश ने मध्येच आपला विचार मांडला..

“क्रिश..मान्य आहे थोडी रिस्क आहे.. पण अशक्य नाहीये. असे कित्तेक स्टंट्स तु सिनेमात केले आहेस, करवले आहेस.”, पंकी

“अरे सिनेमातली गोष्ट वेगळी, तेथे सेक्युरीटी मेझर्स असतात, व्यवस्थीत काळजी घेतलेली असते..” क्रिश बोलत होता..

“मी तयार आहे.. पैसे मिळवायचे असतील तर रिस्क घ्यावीच लागले..कुणाचा बाप पैसे घरी आणुन देणार नाही..” डॉलीने क्रिशच्या डोळ्यात डोळे घालत आपला विचार मांडला..

सर्वांच्या नजरा क्रिश वर होत्या..

“ठिक आहे.. पण मला एक दिवस आधी गाडी लागेल. थोडी तयारी करावी लागेल. गाडीच्या खाली मला एक नायट्रोजन सिलींडर लावावा लागेल. स्टीयरींग व्हिलपाशी एक छोटे बटन करुन घेईन. योग्य वळण येताच मी ते बटण दाबीन. बटण दाबताच व्हॉल्व उघडला जाईल.
नायट्रोजन त्या सिलेंडर मधुन उच्च-दाबाने बाहेर पडेल आणि पिस्टॉन मध्ये घुसेल. पिस्टनला एक ४mm जाडीचे घट्ट झाकण असेल जे नायट्रोजन गॅस अडवुन ठेवेल आणि त्यामुळे पिस्टोन मधील दाब वाढत जाईल. काही क्षणातच ते झाकण तुटेल आणि गॅस अती उच्च दाबाने बाहेर फेकला जाईल आणि कार फ्लिप होईल आणि एक-दोन पलट्या घेउन थांबेल.”

“फॅन्टास्टिक..आत्ता कसं..” पंकी म्हणाला..

“माझा असा समज आहे की तुम्ही काय करत आहात याची तुम्हाला जाणीव आहे आणि यामध्ये असलेला धोका तुम्हाला समजतो आहे मिस्स.. डॉली..” आपल्या भुवया उंचावुन क्रिशने डॉलीला विचारले.

“पंकी..पुढे..” डॉलीने जवळ-जवळ क्रिशला दुर्लक्षीत केले..

“हम्म.. गाडी उलटि झाली की तुम्ही दोघंही हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेउन बाहेर येऊन पडुन रहाल. काही मिनीटांतच कॅश-व्हॅन तुमच्या इथे पोहोचेल. ड्रायव्हर किंवा सेक्युरीटी गार्डस तुमची गाडी ओळखतील. डॉली तुला अश्या पध्दतीने खाली पडावे लागेल की कोणताही माणुस तुला रस्त्यावर टाकुन जावु शकणार नाही.. लक्षात आले ना मी काय म्हणतो आहे?” पंकी..
“हम्म..” डॉली..

“गाडीतुन कोणीतरी खाली उतरेल.. तो तुमच्या जवळ आला की एकाने रिव्हॉल्हर त्याच्यावर रोखायची. त्याचवेळेस बाजुलाच लपुन बसलेल्या रफिक किंवा बंटी पैकी कोणीतरी एक व्हॅन मध्ये घुसेल आणी ड्रायव्हर आणि सेक्युरीटी गार्डला बंदुकीच्या धाकाने गप्प करेल. शक्य झालेच तर डोक्याच्या मागे बंदुक मारुन काही वेळासाठी त्यांना बेशुध्द करेल. डॉली तु तेथेच बेशुध्द झाल्याचे सोंग घेउन पडुन रहाशील. क्रिश जो उतरला असेल त्याला रिव्हॉल्व्हर लावुन.. मात्र आपण जखमी आहोत आणि त्याचा आधार घेउन व्हॅन मध्ये येत आहे असे दाखवत व्हॅन मध्ये येईल ज्यामुळे आजुबाजुच्या गाड्यांना संशय येणार नाही.

तो आणि रफिक किंवा बंटी जो कोणी असेल तो मिळुन ती व्हॅन घेउन पुढे निघुन येतील. त्यानंतर तु उठुन बस. तु अजुनही अन-कॉन्शीयस असशील. मागुन येणाऱ्या गाड्या आधीच रस्ता अरुंद त्यात तुमची गाडी मध्येच पडली असल्याने वेग हळु करतील. तु उठुन उभी रहाशील.. आणि तिथे अपघात कसा झाला वगैरे सांगायला सुरुवात करशील. तुला शक्य तेवढी सगळी नाटकं शक्य तितक्या जास्ती वेळ तिथे करायची आहेत, जेणेकरुन व्हॅनच्या मागे लगेच कुठल्या गाड्या येणार नाहीत.

व्हॅन मध्ये रफिक / बंटी आधीच सेक्युरीटीचा ड्रेस घालुन असेल. क्रिश तुला गाडीत बसल्यावर पटकन कपडे बदलावे लागतील. मग तुम्ही पुढचा टोल नाका पार कराल. नंतर ५ मिनीटांच्या अंतरावर मी मोठ्ठा ट्रक घेउन थांबलो असेन. तुम्ही व्हॅन सरळ आत आणायची. आत मध्ये मी, क्रिश आणि रफिक/बंटी ती पेटी बाहेर काढु. त्यानंतर ट्रक घेउन पुढच्या ए़क्झिटला मी बाहेर पडेन. तुम्ही पुढचा टोल नाका पार झाल्यावर व्हॅन सोडुन गायब व्हायचे. डॉली तु कुणाचीतरी लिफ्ट घेउन पुढे निघ आणि मग मध्येच काहीतरी कारण काढुन उतर आणि गायब हो.. एकदा कॅश पेटी इथे पोहोचली की मग फक्त प्रश्न उरतो तो ती पेटी कधी फुटणार याचाच आणि मग आपण सगळे करोडपती..

काय कसा वाटला प्लॅन?”

सर्वजण विचारात मग्न होते.. ती व्यक्ती मनातल्या मनात हसत होती. एकदा पेटी उघडली की सगळा पैसा माझाच. तुम्हाला कळणारही नाही एक-एक करत तुम्हाला मृत्युनी कधी कवटाळले ते..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

13 thoughts on “रॉबरी- [भाग २]

 1. chaan chaan…kaay wichar kelayas chhotya cchotya details cha..maan gaye. asha stories lihayla logic jam solid pahije. good going. I have bought the fact that these are educated guys…hehehhe.

  1. अनिकेत

   aapalich krup, magchya veles aikun ghyave lagle na missing gaps aahet
   kaal ter car flip kashi kartat he adhi net ver search kele.. nitrogen gas vagaire aani mag te study karun stroy madhe lihile bagh 🙂

 2. आरती

  खरेच स्तुत्य प्र्यत्न आहे…काय पण डिटेलिंग! इतके बारीक सारीक मुद्देही विचारात घेतलेले पाहून छान वाटलं. ( या आधी कधी असा प्लॅन केला होता की काय?)
  पण मस्त आहे कथा….जरा सस्पेंस ही घातल्याने अजूनच उत्कंठावर्धक!
  ते जहाज दुरुस्तीचं कसं काय सुचलं बुवा मध्येच?

  1. अनिकेत

   धन्यवाद आरती. प्रयत्न तर नाही केला, पण मध्ये अती गुन्हेगारीवरील चित्रपट पाहुन, कथा वाचुन एक काळ असा आला होता की बॅकेमध्ये गेलो की माझे लक्ष अलार्म कुठे आहे, वॉचमन कुठे असतो, त्याच्याकडे बंदुक कुठली आहे, गोळ्या भरलेल्या आहेत का? कॅश सेफ मधुन आत-बाहेर कशी करतात याकडेच असायचे 🙂

   जहाजाचे म्हणाल तर काहीतरी अशी गोष्ट पाहीजे होती जेथे असले तोड-फोड करता येईल. मध्ये भारतात कुठलेतरी जहाज येणार होते मोडण्यासाठी ज्यावरुन वाद उठला होता ते आठवले

  1. अनिकेत

   नका रे.. नका कुठल्या चित्रपटाशी तुलना करु. एका उभरत्या लेखकाची अस्मीता अशी पायदळी तुडवु नका 🙂
   देवाशप्पथ सांगतो, इटालियन जॉब मी बघीतला नाही आणी त्याची कथा ही ऐकली नाही

   1. vijay

    अरे बाबा त्यात तुझी काहीच चुक नाहीए…

    तू जे लिहीत आहेस ते उत्तम आहे, त्यात काही शंकाच नाही.

    चालू देत तुझं लिखाण … शुभेच्छा !!!

    तुझा वाचक/फॅन आहेच मी … सो नो वरी ..!

 3. Sadhana

  अहो अनिकेतराव लय भारी, अहो एवढे पण छान लिहु नका की समोरच्याला डाउट होईल, बाकी मस्त जमली आहे कथा, वेटिंग फॉर नेक्स्ट पोस्ट.

 4. rohan

  बारीक सारिक डिटेल्स मस्त टाकले आहेस .. खुप विचारपूर्वक प्लान बनवला आहेस तू … सही … मज्जा येते आहे वाचायला …

 5. देवेंद्र चुरी

  भट्टी छानच जमुन आली आहे आतापर्यंत…
  येउन देत पुढचे पोस्ट्स लवकर

 6. अनिकेत, तुझी लेखनशैली मला फार आवडली. एकच सूचना, आधीच्या भागाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक दिलीस तर बरं होईल. पहिल्या भागानंतर दुसरा भाग प्रकाशित केल्यावर पहिला भाग क्रमश: कसा?

  1. अनिकेत

   सुचना चांगली आहे. पुढील लेखनात याचा नक्की वापर करीन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s