रॉबरी- [भाग ३]


भाग २ पासुन पुढे चालु..

क्रिश आणि डॉली, प्रेमी युगुल ‘ब्ल्यु-नाईल क्लब’ ला वारंवार भेट देऊ लागले. पब्लीक प्लेस मध्ये डॉली कायम क्रिश ला बिलगुन असायची, तिच्या वागण्यावरुन क्रिशला सुध्दा आपण हिला गेले कित्तेक वर्ष ओळखतो आणि ती खरंच आपली प्रेयसी आहे असे वाटे. परंतु एकांतामध्ये डॉली त्याला काही क्षणातच अपरीचीत करुन टाके.

बंटी आणि रफिकने डॉक वरील उभारलेल्या मोठ्ठ्या शेड मध्ये आपले काम चालु केले होते. मधुनच कधी एखादा मोठा ट्रक येई तर कधी छोट्या-मोठ्या टेंपो मधुन सामान येत असे. आजुबाजुलाच रहाणाऱ्या ८-१० कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामाला लावले होते. दिवसभर ठोका-ठोकीचे आवाज, वेल्डींगच्या दिव्यांचा झगमगाट, गाड्यांची ये-जा मुळे परीसर गजबजुन गेला होता. पोलीसांची रफिकला फार भिती वाटे त्यामुळे चौकीत हळुहळु ओळख काढण्याचे काम बंटीच करत असे.

एके-दिवशी शेड मध्ये सहजच आलेल्या हवालदाराला पाहुन रफिकची घाबरगुंडी उडाली होती. त्याचा तो पांढरा-फटक पडलेला चेहरा पाहुन बंटीने त्याला नंतर चांगलेच फैलावर घेतले होते.. “फट्टु साला..ss अजुन चोरी केली नाही तर तुझी ही अवस्था.. नंतर काय करशील? साला त्या हवालदाराला डाऊट आला असताना.. भेंxxx”

पंकीने आपला प्लॅन पुन्हा-पुन्हा तपासुन पाहीला होता. त्याच्या साथीदारांबरोबर चर्चा केली होती.. ” एक बारीकशी चुक.. आणि आपण कायद्याच्या जाळ्यात अलगद सापडु..” तो म्हणाला होता.. लागणाऱ्या हत्यारांची जमवाजमव त्याने करुन ठेवली होती. डॉली या प्लॅनची ‘कि’ होती. ब्ल्यु-नाईल मधल्या हालचाली, तेथे घडणाऱ्या घटना क्रिशपेक्षा अधीक अचुकतेने ती टिपत होती. बेंजोशी संपर्क ठेवुन तेथील माहीतीघेणे चालुच होते. ऐन रॉबरीच्या वेळी सुध्दा तिचा रोल अतीशय महत्वाचा होता. इतर सर्वांपेक्षा तो डॉलीवर जास्त निर्भर होता. परंतु तीची ती करडी नजर त्याला अस्वस्थ करत असे. “पैसा हातात मिळाल्यावर ही कुणाला धोका तर नाही ना देणार?” त्याच्या मनात विचार चमकुन गेला.

पण तिच का? इतर तिघं जणं. आपण त्यांना गेली कित्तेक वर्ष ओळखतो, पण पैसा माणसाला काय काय करायला भाग पाडेल कुणाला सांगता येईल. रफिक? कदाचीत कमी धोकादायक. भित्रा प्रवृत्तीचा.. पण तरीही ‘खाल मुंडी पाताळ धुंडी’ त्याच्या मनात काय विचार चालु असतील कुणास ठाउक!, बंटी.. सांगता येत नाही. क्रिश? चेहऱ्यावरुन भोळा दिसत असला तरी पैश्यासठी तो काय वाट्टेल ते करु शकतो. या सर्वांपासुन जपुन राहुनच आपण आपले “डाव” आखले पाहीजेत

दिवसांमागुन दिवस जात होते. तारीख जवळ-जवळ येत होती. ‘ब्ल्यु-नाईल’ अतीथींच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. हळु-हळु मिडीयाचे ही लक्ष वेधले गेले होते आणि तुरळक प्रमाणात का होईना ब्ल्यु-नाईल त्यांच्या ब्रेकींग-न्युज चा एक भाग बनला होता.

पंकीला हे फार खटकत होते. इथे होणारा इव्हेंट, इथला पैसा याला जितकी प्रसिध्दी मिळेल तितके त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. जास्त प्रसिध्दी, जास्त सुरक्षा, जास्त धोका..

******************

आज क्रिश खुप खुश होता. डॉली सकाळपासुन त्याच्याशी व्यवस्थीत वागत होती. दोघांनीही एकत्रपणे ब्ल्यु-नाईल मधील स्विमींग-पुल मध्ये स्विमींग केले होते. टु-पिस बिकीनीमधील डॉलीला बघुन क्रिश स्तब्ध झाला होता. लॉंग बॅक, स्लिम लेग्स, पाठीवर रुळणारे बरगंडी रंगाने हायलाईट केलेले केस आणि फार मुश्कीलीने दिसणारे तिचे मादक हास्य पाहुन क्रिश घायाळ झाला होता.

स्विमींग नंतर तेथील खुच्यांवर उन्हात बसलेल्या क्रिश जवळ डॉली येउन बसली होती.

“सो.. काय करणार या पैश्याचे?” तिने क्रिशला विचारले.

“काही विशेष नाही.. पण या फिल्म लाईन मधुन बाहेर पडणार.. या ऍक्टर लोकांचे डमी बनुन जिवावर बेतलेले स्टंट्स करायचे आणि प्रसिध्दी मात्र ही लोक मिळवणार.. तु? तु काय करणार?”

“वर्ल्ड टुर… हे जग खुप सुंदर आहे क्रिश मला हे सगळं बघायचं आहे. प्रत्येक देश फिरायचा आहे. लांब अथांग पसरलेल्या निळ्याशार समुद्रा स्वतःची हॅच घेउन कित्तेक दिवस प्रवास करायचा आहे..” मग अचानक तिने क्रिशच्या डोळ्यात डोळे घालुन विचारले.. “तु येशील क्रिश माझ्या बरोबर? आपण दोघंही जावु. मला आवडेल तुझ्याबरोबर जग फिरायला..”

तिच्या अनपेक्षीत प्रश्नाने क्रिश गोंधळुन गेला..”..पण. हे सगळं आपल्या वाट्याल येणाऱ्या पैश्यात शक्य आहे डॉली?”

“हम्म.. तेही आहेच म्हणा..” डॉलीच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.. “खरं तर ना यामध्ये आपल्या दोघांना जास्त वाटा मिळायला हवा होता. मुख्य आणि धोकादायक काम तर आपणच करणार आहोत. विचार कर गाडी उलटवण्याचा अंदाज चुकला आणि गाडी दुसऱ्या बाजुला जाउन पडली, एखाद्या वेगवान ट्रक किंवा बसने उडवल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही क्रिश. सेक्युरीटी गार्ड बंदुक बघुन बधला नाही, त्याने काही वेडे-वाकडे केले तर ?? बाकीच्या लोकांची कामं एवढी जोखमीची नाहीत.. तुला काय वाटतं ?? ५ करोड, कमी रक्कम नाही ही. ही रक्कम आपल्या दोघांनाच मिळाली तर? विचार कर क्रिश, आपण फक्त दोघंच आणि फिरायला सगळे जग मोकळं.. कित्ती मज्जा येइल ना.. ५ करोड क्रिश.. ५ करोड..” डॉली बोलत होती.. क्रिश मात्र ऐकत नव्हता.. त्याला डोळ्यासमोर दिसत होतं तो आणि डॉली स्विझर्लंडमधे बर्फाळ प्रदेशात, कुडकुडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या मिठीत समावलेले, मॉरीशस च्या प्रचंड तप्त उन्हाळ्यात एका प्रायव्हेट बोटीवर फक्त तो आणि डॉली.. आणि सोबतीला पसरलेला निळाशार समुद्र..

*****************

रॉबरी डे मायनस २… दोन दिवस राहीले होते. रेंट-अ-कार मधुन क्रिशने स्कॉर्पिओ भाड्याने घेतली होती. त्याच रात्री त्याने नायट्रोजन किट बसवुन टाकला. पिस्टन फिटींग, गॅस प्रेशर, बटन सगळे काम मनासारखे झाल्याचे पाहुन मग त्याने उसासा सोडला.

त्याचे काम होईपर्यंत डॉली त्याच्याबरोबर गॅरेजमध्येच होती. काम झाल्यावर त्याने डॉलीकडे एकदा बघुन मान हलवली..

******************************************

हॉर्स रेस डर्बीचे मोठ्या थाटात उदघाटन झाले. अनेक धनीक आपल्या उंची जातीच्या घोड्यांना घेउन शहरात दाखल झाले होते. शहरातील पंचतारांकीत हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स गजबजले होते. पण सगळ्यात जास्त गजबजला होता तो ब्ल्यु-नाइल क्लब. सकाळचा उद्घाटन सोहळा संपला आणि जस-जसा दिवस मावळतीकडे झुकायला लागला तसं-तसा खऱ्या अर्थाने या क्लब मध्ये रंग चढु लागला होता.

संस्कृती, शिष्टाचाराच्याखाली सुरु झालेली नाच-गाणी मावळत्या सुर्याबरोबर अश्लिलतेकडे झुकु लागली होती. कॅसीओ मध्ये पैशाच्या राशीच्या राशी येऊन पडत होत्या. विवीध प्रकारचे, देशांचे खाद्य, उंची मद्य यांची रेलचेल होती. क्रिश आणि डॉली या गर्दीचाच एक भाग होऊन तेथे होणारी पैश्याची उधळण डोळे विस्फारुन बघत होते. सर्व काही सुरळीत पार पडले तर ह्याच नोटांच्या गड्या काही दिवसात आपल्या हातात असतील या विचारांनी दोघंही जण सुखावले होते. पण त्याचबरोबर.. तो दिवस, तो क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे ह्या विचारांनी धास्तावले सुध्दा होते.
******************************************

१ मार्च – दी (रॉबरी) डे..

फट्टु रफिकने शेडमध्येच थांबायचे ठरवले. बंटीने ए़क्स्प्रेस-वे वरील त्या वळणावर आपली पोझीशन हेरुन ठेवली होती.

पंकी काही क्षणातच तो मोठ्ठा ट्रक घेउन ए़क्स्प्रेस वे ‘हिट’ करणार होता.

क्रिश ने गाडीची पुन्हा-पुन्हा तपासणी केली. सर्व मिटर्स, गॉज व्यवस्थीत चालु आहेत ना याची खात्री केली. सिल्की, डार्क काळ्या, गुड्घ्यापर्यंतच्या फ्रॉक मध्ये डॉली अधीकच आकर्षक दिसत होती.

“अजुन १५ मिनीटं आणि करोडोंची कॅश घेउन ती व्हॅन ‘ब्ल्यु-नाईल क्लब’ मधुन निघेल..” क्रिशने घड्याळात बघत विचार केला.

“ऑल सेट?” डॉलीने विचारले…
“येस.. ऑल सेट फॉर द डे…” क्रिश म्हणाला…

[क्रमशः]

पुढचा भाग>>

16 thoughts on “रॉबरी- [भाग ३]

  1. अनिकेत

   जुई डी,

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आम्हास विशेष आनंद होतो जेंव्हा आपण वेळ काढुन आमच्या ब्लॉगला भेट देता.

  1. अनिकेत

   मंडळ आभारी आहे. पुढचा भाग लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न आहे.

 1. Aniket Vaidya

  उत्कंठा खूप वाढली आहे. लौकर पुढचा भाग लिहा.

 2. Aniket,
  Mi tumcha blog roj wachto, agdi n chukta pan majhya blog cha follow up nahi ghet.
  Majhya blog war tumchi comments baghun mi dhany jhalo.
  Mi tumchya blog warche sagle articles wachle pan comments takaichi himmat navhti keli karan tumche likhan khupach apratim aahe tyachi tarif karnyapeksha durun te anubhavaiche ase mi tharavle hothe.
  pan aaj tumche comments baghitle an ha reply detoy.
  Eka wakyat aamhi tumche fan jhalo aahe.
  tumhi kuthe kaam karta? An IT madhe asun hi likhana la evdha wel devu shakta, thats amazing. Keep it up.

  1. अनिकेत

   अरे बापरे.. नाही रे बाबा एवढं काही चांगलं लिहीत नाही रे.. आणि कमेंट्स तर जरुर टाक, त्याशिवाय मला कळणार कसं काय चुक काय बरोबर. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियाच तर मला अधिक चांगलं लिखाण करायला प्रेरीत करतात.

   आणि वेळेच म्हणशील तर रात्र आपलीच आहे नाही का!! अर्थात बायकोची बोलणी ऐकावी लागतात. उगाचच काहीतरी टाईम-पास करतो.. कश्याला कोण तुझा ब्लॉग वाचतेय आणि हे आणि ते.. पण घेतो ऐकुन बिचारा मी करणार काय! बाकी दिवसाला २४च तास का असतात, अजुन का नाही हा मला फार दिवसांपासुन पडलेला प्रश्न आहे.

   ब्लॉग वरील लोभ असाच कायम रहावा.

 3. तिसर भाग अजून आला नाही 😦 किती वेळ लावणार अजून?
  हे म्हणजे झी किंवा स्टार वरच्या ब्रेकपेक्षाही जास्त वेळ चाललाय राव…. चाहत्यांचे प्राण आता कंठाशी आणणार काय?

  1. अनिकेत

   माफ कर रे मित्रा.. अनेक गोष्टी राहील्या होत्या करायच्या त्यामुळे थोडा कमी वेळ मिळाला.. पण दिवसाला एक पार्टचे नक्की प्रॉमीस 🙂

 4. Ritulika

  Awesome…I am thouroughly enjoying this one…I do not mind you stretching this into few more parts…I do not want it to end…:)

  1. अनिकेत

   Thanks Ritulika, even i am enjoying it while writing. I don’t want the story to put a sudden end. This time i’ll make the story very clear and without much gaps. Won’t mind if it extends to more 2-3 parts than putting it short with gaps

 5. आल्हाद alias Alhad

  “परंतु एकांतामध्ये डॉली त्याला काही क्षणातच अपरीचीत करुन टाके.”
  She is true professional!
  🙂

 6. क्या बात है! मस्त डिटेलिंग दिलं आहेस. शिव्या पण XXX मधे. सही! पंकी, चिकना ही नावं पण आवडली मला.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s