भटकंती- निळकंठेश्वर फोटो आणि माहीती


पुण्यापासुन फक्त ५० कि.मी. दुर निळकंठेश्वर नावाचे हे सुंदर भटकंतीसाठी ठिकाण आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. सिंहगडापासुन फक्त २० कि.मी. वर अत्यंत कमी गर्दीचे आणि सिंहगडाच्या तुलनेचे, किंबहुना त्याहुनही सुंदर ठिकाणाबद्दल थोडेसे आणि काही फोटो.

निळकंठेश्वर हे खरं तर एका मोठ्या डोंगरावर बसलेल्या शिव-शंकराच्या देवळाचे नाव. ह्या देवळाच्या भोवती असंख्य पौराणीक काळातील सुंदर शिल्प उभारली आहेत. मी या-आधी तिन वर्षापुर्वी या ठिकाणाला भेट दिली होती त्यानंतर आणि आजच्या भेटीमध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्व शिल्प त्यांचे सौदर्य टिकवुन होती हे आश्चर्य.

निळकंठेश्वरला जाण्यासाठी सिंहगडापायथ्याशी वसलेल्या डोणजे गावापासुन फाटा फुटतो जो पानशेत/ वरसगावाकडे जातो. त्या रस्त्याने थोडे गेल्यावर दोन मार्ग आहेत.

१. खानापुरच्या थोडे पुढे गेल्यावर निळकंठेश्वराची पाटी दिसते. तेथे गाडी लावायची. तेथुनच एक छोटी मोटरबोट धरणाच्या पाण्यातुन निळकंठेश्वराच्या पायथ्याशी आणुन सोडते. तेथुन पर्वताच्या टोकावर जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २ तासाचे चढण आहे. अर्थात रस्ता बरा आहे त्यामुळे घसरण्याची भिती नाही.

२. याच रस्त्याने वरसगाव धरणापर्यंत सरळ जायचे. वरसगाव धरणाच्या भिंतीपासुन एक छोटा रस्ता निळकंठेश्वराकडे जातो. हा रस्ता अत्यंत खराब आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी ओढे, नाले, छोटे धबधबे लागतात जे पार करुन जावे लागतात. अर्थात गाडीनेही वरपर्यंत जाता येत नाही. गाडी साधारण पर्वताच्या मध्यापर्यंतच जाते तेथुन पुढे चालतच जावे लागते. हे अंतर साधारण-पणे १ तासाचे आहे.

वर खाण्यापिण्याची फारशी (चांगली) सोय नाही त्यामुळे बरोबर खाणे घेउन जाणे हेच योग्य.

फोटो –

बहुतांश शिल्प ही दशावतार, अष्टविनायक, भिम-बकासुर, वाली-सुग्रीव युध्द, महाभारत, रामायणातील इतर काही प्रसंग, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, संत रामदास, सावित्री-यम आणि अश्या अनेक घटना, प्रसंगाबद्दल आहेत.

पावसाळ्यात इथे वातावरण खुपच सुखःद असते. रविवारी आम्ही गेलो होतो तेंव्हा अगदी हलका पाऊस पडत होता आणि सर्वत्र दाट धुके होते.. खुप्प्च सुंदर. वरुन दिसणारे पानशेत आणि वरसगावचे बॅक वॉटर आणि सर्व पॅनोरमा विहंगमच. हे सर्व अनुभवायला पावसाळ्यात इथे एकदा भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे.

Advertisements

5 thoughts on “भटकंती- निळकंठेश्वर फोटो आणि माहीती”

  1. खरं आहे – निलकंठेश्वर अजुनही बर्‍याच लोकांना माहित नाही!

    ‘लाइफ-साइज’ मुर्त्या हे या ठीकाणचं वैशिष्ट आहे…. सभोवतालचा हिरवागार पहिसर.. धुके… धबधबे… एकंदरीत भन्नाट वातावरण!

    अगदी आवर्जुन भेट द्यावे असे. आम्हीही दोन वर्षांपुर्वी गेलो होतो… फोटो भटकंती [शेअर केलेत] वर आहेत.

    नोटः फोटोज फार छान आहेत.. मीराचा फोटो विसरलात की काय?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s