रॉबरी- [भाग ६-शेवटचा]


भाग ५ पासुन पुढे…

“थांब डॉली.. कश्यालाही हात लावु नकोस..”.. खाली कोसळलेल्या रफिककडे बघत पंकी म्हणाला.. “मला वाटते आहे ह्या कॅश वर काहीतरी विषारी पदार्थ किंवा वायु फवारलेला असावा.. आपल्याला काळजी घ्यायला हवी. तु एक काम कर, बेंजो कडुन याबद्दलची माहीती काढुन घे.. आणि तस्सेच काही असेल तर ही कॅश क्लिन कशी करायची याचीही माहीती मिळव आणि मला लग्गेच कळव.. तोपर्यंत ही कॅश हाताळणे आपल्या दृष्टीने धोक्याचे आहे.”

डॉलीने मान हालवली आणी ती तेथुन निघुन गेली.

घारीसारखी नजर ठेवुन असलेल्या थॉमसला ही बातमी कळताचे त्याने गुंजाळला फोन लावला..
“विषबाधा..?? .. हम्म.. ” .. गुंजाळच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.. “रेड आय सेक्यु्रीटीच्या माणसांना त्यांचे काम चांगले समजते तर.. ”

***************************

डॉलीने बेंजोकडुन दोन-चार दिवसांतच सर्व माहीती गोळा केली आणि पंकीला कळवली. त्यासाठी लागणारे रसायन आणि बाकीची साहीत्य पंकीने गोळा केली आणि तो कामाला लागला. प्रत्येक बंडल, प्रत्येक नोट साफ करायला..

*****************************
“.. थॉमस.. वेळ आली आहे.. प्रथम त्या बार्बी डॉल ला उडव.. पण मरण्यापुर्वी तिला जाणिव करुन दे तिच्या स्त्रित्वाची, तुझ्या पौरुष्याची. तिला कळु देत गुंजाळच्या पैश्याला हात लावुन तिने काय गुन्हा केला आहे.. हाल हाल करुन मार तिला..”..गुंजाळचा थंड आवाज थॉमसच्या कानात बोचऱ्या वाऱ्यासारखा घुसत होता..
*****************************

डॉली आपल्या अलिशान बेडवर झोपली होती. रात्रीचे २.३० वाजले असतील अचानक तिला जाग आली. डॉलीला आपल्या इंन्टींक्ट्स वर पुर्ण भरवसा होता. अशी अचानक जाग आली याचा अर्थ काहीतरी नक्कीच धोका आहे. काही क्षण ती बेडवरच पडुन आवाजाचा अंदाज घेत राहीली. मग शांतपणे ती उठली, शेजारच्या ड्रॉवर मधुन तिने .३२ ऍटोमॅटीक काढले. आजपर्यंत फार कमी वेळा तीने याचा वापर केला होता. पण कधीही .३२ने तिला धोका दिला नव्हता. “आज पुन्हा एकदा वेळ आली आहे..” तिने विचार केला. अंधारात आवाजाचा अंदाज घेत ती भिंतीला लागुन दरवाज्याच्या दिशेने सरकली. खिडकीतुन तिने हळुच खाली वाकुन पाहीले.

अंधारलेल्या रस्त्यावर थांबलेल्या गाडीतुन तिने एक काळी आडदांड आकृती उतरताना पाहीली. त्या आकृतीने एकवार डॉलीच्या खिडकीकडे नजर टाकली आणि मग चित्याच्या चतुराइने ती व्यक्ती इमारतीमध्ये शिरली.

डॉलीने सायलेंन्सर लोड केला, मॅगझीनमधील गोळ्या बघीतल्या आणि ती हळुच दार उघडुन बाहेर आली. आपल्या मागे तिने दार लावुन घेतले आणि बाजुच्या जिन्यामध्ये ती लपुन बसली.

जिन्यामधुन येणारा जड पावलांचा आवाज जवळ-जवळ येत चालला होता. डॉलीच्या दारापाशी तो आवाज थांबला. डॉली लपुन त्या काळ्या आकृतीवर लक्ष ठेवुन होती. त्या आकृतीने.. थॉमसने खिश्यातुन एक हत्यार बाहेर काढले. सफाईने त्याने ते दरवाज्याच्या कुलपात घालुन ते कुलुप हळुवारपणे उघडले आणि अंधारात प्रवेश केला. डॉलीच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. ति जागेवरुन उठली, एक बोट ट्रिगरवर घट्ट पकडलेले होते. हळुवारपणे तिने त्या आकृतीच्या मागोमाग प्रवेश केला. ती आकृती अंधारात चाचपडत अंदाज घेत पुढे सरकत होती. डॉलीने विजेच्या चपळाईने त्या आकृतीच्या अंगावर उडी मारली. अचानक झालेल्या हल्याने ती आकृती बेडवर कोसळली.

डॉलीने त्याला आपल्या हातांनी घट्ट पकडले आणि आपले नाजुक ओठ त्या आकृतीच्या ओठांवर टेकवुन एक दीर्घ चुंबन दिले..

“ओह थॉमस..आय मिस्स्ड यु सो मच..” डॉली थॉमसला म्हणाली..

“डॉली.. आता अजुन जास्ती वेळ घालवण्यात अर्थ नाही. गुंजाळने आजच मला तुला खलास करायला सांगीतले होते.. उद्या जर त्याला तु जिवंत आहेस असं कळलं तर तो मला या आयुष्यातुन उठवेल.” डॉलीला बाजुला सरकवत थॉमस म्हणाला.. ” पंकीचे काम कुठपर्यंत आले आहे..मला वाटतं आजच त्याला आपण खलास करु आणि इथुन पळुन जाऊ. कुठलीही गोष्ट गुंजाळपासुन फार काळ लपुन रहात नाही.. मला खात्री आहे. माझ्यावर लक्ष ठेवायला गुंजाळने अजुन एखादा माणुस माझ्या मागे लावला असणारच.. आज ना उद्या त्याला कळेलच की मी ही या कटात सामील आहे…”

“.. नाही थॉमस तु नाही, मी संपवणार पंकीला. त्याने मला अजुन निट ओळखले नाही. या सर्व कामात त्याने माझा वापर करुन घेतला आणि त्याचे सगळे थर्ड क्लास, आळशी, भित्रट मित्र आराम करत होते. त्या पैश्यावर माझा हक्क आहे आणि मी त्याच्या समोरुन ते पैसे घेउन येणार..” तु तुझे सामान घेउन सकाळी डॉक पाशी ये. मी सर्व पैसे घेउन तिकडे पोहोचतेच..”

“ठिक आहे.. पण डॉली.. डोन्ट ट्राय टु डबल-क्रॉस मी..” उद्या १०.३० पर्यंत तु डॉक-पाशी नाही आलीस तर मी सरळ पोलीस-स्टेशनला जाऊन गुन्हा कबुल करीन आणि पोलीसांना किंवा गुंजाळला तुझ्यापर्यंत पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. तु नाही आलीस तर माझ्यापाशी दुसरा पर्यायही राहात नाही कारण मी गुंजाळपाशी परत जाऊ शकणार नाही.. आज नाही तर उद्या त्याला सत्य कळेलच…” थॉमसला गुंजाळच्या विचारांनीही घाम फुटला होता.

“येस डीअर.. डोंन्ट वरी.. मि पोहोचते..” डॉली..

दोघांनीही एकमेकांना अलिंगन दिले आणि मग थॉमस बाहेर पडला. डॉलीने आपली रिव्हॉल्व्हर पुर्ण लोड केली आणि ती पण थॉमसच्या मागोमाग बाहेर पडली.
*************************

शेडमध्ये दिवा अजुनही जळत होता.. ५ दिवस-रात्र काम केल्यानंतर तो पुर्ण थकुन गेला होता. सर्व कॅश त्याने रसायनचा वापर करुन निर्जंतुक, बिनविषारी केली होती. त्याने एकवार घड्याळात नजर टाकली..”काम झाले आहे पुर्ण म्हणुन डॉलीला फोन करावा का? का झोपली असेल ती अजुन..” तो स्वतःशीच विचार करत होता. अचानक त्याला दरवाज्यात कुणाच्यातरी असण्याची जाणीव झाली. त्याने जवळच पडलेले आपले रिव्हॉल्व्हर उचलले आणि तो मागे वळला. दारात डॉलीला बघुन त्याला आश्चर्य वाटले..

“बरं झालं तु आलीस.. मी तुला आत्ता फोनच करणार होतो. सर्व काम पुर्ण झाले आहे. वु आर ऑल क्लिअर..” जवळच पडलेल्या नोटांच्या बंडलांकडे बोट दाखवत तो म्हणाला.

“.. ग्रेट..” डॉली त्याच्या जवळ जात म्हणाली.. “पंकी आज आपण आपल्या कामात फत्ते झालो.. उद्या आपण दोघंही वेगवेगळ्या रस्त्याला असु.. पण त्याआधी मला काही गोष्टी तुला जाणवुन द्यायच्या आहेत. हा सर्व प्लॅन मी नसते तर पुर्ण झालाच नसता. तुझ्या एकाही मित्राची धड मदत झाली नाही, उलट झालाच तर त्रासच झाला. तिघंही जण आप-आपल्या चुकांनीच मेले. असो.. आता आपण दोघंच उरलो आहोत आणि मला नाही वाटत ह्या पैश्यात आपली ५०%-५०% भागीदारी होऊ शकते. तु जे काम केले आहेस ते एकुण कामाच्या १०% सुध्दा नाही.. आणि खरं सांगायचं तर मला तेवढे सुध्दा तुला द्यायची इच्छा नाही.. सो.. गुडबाय पंकी.. आपला मार्ग इथेच वेगळा होतो..” डॉलिने तिच्या हॅडबॅगमधुन रिव्हॉल्व्हर काढुन पंकीवर रोखली.. पंकीचे डोळे मोठ्ठे झाले.. भितीची एक लहर त्याच्या अंगातुन सळसळत गेली. त्याचे लक्ष त्याने जवळच ठेवलेल्या त्याच्या रिव्हॉल्व्हर कडे गेले.. पण त्याने काही करायच्या आधीच डॉलिने .३२ चा दोनदा ट्रिगर दाबला होता.

पंकी क्षणार्धात खाली कोसळला.

डॉलीने बाहेरुन कार मधुन दोन मोठ्या बॅगा आणल्या आणि एक-एक करत सर्व कॅश त्यात भरली. मोठ्या कष्टाने तिने त्या बॅगा गाडीत आणुन ठेवल्या. सकाळ व्हायला काहीच वेळ बाकी होता. तिने आपल्या गाडिला वेग दिला. उद्या संध्याकाळी आपण थॉमसबरोबर ह्या देश्याच्या बाहेर असु ह्या विचारांनीच ति सुखावली होती. वाटेत तिने हॅडबॅगमधुन आणलेले दोन सॅंन्डविचेस काढले आणि खायला सुरुवात केली. पहीले सॅडविच खाल्ले आणि तिला अचानक गरगरायला लागले. तिने गाडी कडेला घेतली. थोड्याच वेळात तिच अंग प्रचंड गरम झाले.. तोंडातुन फेस आला आणि काही कळायच्या आतच ती जागेवरच गतप्राण झाली.

तिने जर पंकीला व्यवस्थीत ओळखले असते तर तिने सर्व कॅश हाताळायची चुक केली नसती. पंकीने सर्व बंडल्स रसायनाने निर्जंतुक केले होते, पण एक मात्र त्याने मुद्दाम तस्सेच ठेवले होते. “जर डॉलीने फसवायचा प्रयत्न केला तर ती सुध्दा ह्या पैश्याचा उपभोग घेउ शकणार नाही. कधीना कधी ती ह्या बंडलाला हात लावेल आणि त्यावरील विष तिचा क्षणार्धात जिव घेईल..” पंकी ने विचार केला होता.

सकाळी थॉमस डॉक वर डॉलीची वाट बघत होता. डॉलीला उशिर व्ह्यायला लागला तसं तसं त्याच्यावर दडपण वाढु लागले. थॉमसने काल रात्रीपासुन गुंजाळला फोन सुध्दा केला नव्हता. डॉलिच्या कामाचे काय झाले याबद्दल सुध्दा काहीच अपडेट दिले नव्हते. गुंजाळ काही एवढा मुर्ख नव्हता न समजायला.

डॉलिला फोन लावुन लावुन थॉमस थकला होता.. “बिच्च..हरामी साली.. फसवला मला पण.. पण अजुनही उशीर झाला नाही.. मला फसवुन फार लांब गेली नसेल.. मी नाही तर तु सुध्दा नाही.. गुंजाळच्या हातुन मरण्यापेक्षा पोलीसांकडे जाणे योग्य.. निदान काही वर्ष तुरुंगात काढल्यावर जिवंत तरी बाहेर निघेन.. पुढचे पुढे.. ”

त्याने आपला मोबाईलवर १०० नंबर फिरवला.. “हॅलो पोलीस स्टेशन??.. माझ्याकडे ब्ल्यु-नाईल रॉबरी केस बद्दल आणि त्या अनुशंगाने झालेल्या ३ खुनांबद्दल महत्वाची बातमी आहे..”

[समाप्त]

39 thoughts on “रॉबरी- [भाग ६-शेवटचा]

 1. vijay

  वाह वाह टिपिकल हॉलीवुड एण्ड, (तसं आजकाल बॉलीवुड मधे पण अशाच बनत आहेत, पण नो क्वालिटी !)

  सही आहे मित्रा !!!
  असाच लिहीत रहा.

 2. आल्हाद alias Alhad

  डॉकॅलिटीवाला एण्ड केलात की!
  पुलेशु

 3. Shailesh S. Khandekar

  फारच चित्तथरारक शेवट केलात! मी प्रथमच ही कथा वाचली आणि योगायोगाने केवळ शेवटचा भाग वाचला. कथा सांगायची तुमची हातोटी विलक्षण आहेत. तुम्ही जेव्हा कादंबरी प्रकाशित कराल तेव्हा त्यावर तुमची स्वाक्षरी असलेली प्रत घ्यायला मला नक्कीच आवडेल.

  1. अनिकेत

   🙂 ऐकायला फारच सुखावह आहे हे.. माझं स्वप्न आहे आयुष्यात एक तरी पुस्तक प्रकाशीत करायचे. बघु कसे जमते ते. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 4. मित्रा..(पुन्हा एकदा) तोड्‍लस्‌….. काय भारी शेवट केलायं!!!
  लईईई भारी….सॉल्लीड… सुहास शिरवळकरानंतर तूच रे बाबा…. झक्कास… What Next?

  1. अनिकेत

   नको रे बाबा एवढं उंचावर न्हेऊस.. खालीचं बरं असतं, अपेक्षांचे ओझं पेलणं अशक्य असतं

  2. अनिकेत

   What Next? hmm.. विचार चालु आहे. अशी एखादी कथा जी कल्पनांचे सर्व बांध तोडुन जाईल, मन मुक्त पक्ष्यासारखे आकाश्यात भरकटु शकेल असे काहीतरी 🙂

 5. Sonali

  khup ch chan. khup divasani mast marathi katha vachali.

  I am so glad I came across your blog, Surely will follow it now.

 6. jivanika

  खूप छान. तुमचा ब्लॉग वाचायला खूप आवडतो. तुमच्या ब्लॉगला असं नाव देऊ शकता ‘ थोडंसं मनातलं ‘ नवीन ब्लॉगची लिंक नक्की पाठवा. favorite मध्ये save करायला.

  1. अनिकेत

   Sutalo ekdache..???

   एव्हढी पकाऊ होती का? कधी एकदा संपते आहे अशी?? 😦

 7. Ritesh

  Read all parts in one go… khurchila khilavun thevnaari katha hoti..
  khupach chan Aniket.. tumchya likhanachi shaili apratim ahe..

 8. Rakhi

  akach shabdat sangayache tar, Mast!!!!!!!!!
  Bharpur aavadali katha, vachtana angawar kata yet hota, pudhe kay honar yachi utsukta lagun hoti. Kharach chaan. Punha ashich akhadi katha vachayla aavadel.

 9. राजू

  अप्रतीम…………! अत्यंत थ्रिलर. अनिकेत तुझ्याकडून अशीच अपेक्षा आहे☺

Leave a Reply to अनिकेत Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s