Monthly Archives: August 2009

चिडचिड


वैतागवाडी

वैतागवाडी

आज सकाळपासुनच डोकं फिरलं होतं. डोक्यात भुणभुणणाराही भुंगाही भंजाळला होता. मला तर वाटत होतं की डोक्यातील भुंग्याची प्रजा वाढली आहे आणि डोक्यात एक नाही असंख्य भुंगे भुणभुणत आहेत.

कॉफी रुममधला संवाद –

“.. डोकं सटकलंय रावं..”

“का रे.. काय झालं..”

“काय सांगु? आणि कित्ती सांगु?”

“अरे शांत हो..”

“शांत?? असं वाटतयं सगळं तोडुन फोडुन फेकावं. आगं लगा दुंगा दुनीयाको..sss”

“अरे हो हो.. परत काही पाकिस्तानबद्दलची बातमी वाचलीस का?”

“अरे कसलं हिंदुस्तान आणि कसलं पाकिस्तान..? असं वाटतं सगळ्या जगाचेच कब्रस्तान करुन टाकावं.. नाहीतर बर्फीस्तान.. कश्याला मानवाची प्रगती झाली? पहीले ‘आईस एज’ किंवा ‘स्टोन एज’ होते तेच बरं होतं. काय वाईट चाललं होतं तेंव्हा. मस्त एखादा डायनासोअर झालो असतो.. महाकाय.. अवाढव्य.. किंवा एखादी उडणारी मोठ्ठी छिपकली. कश्याला सगळं विकसीत झालं? आणि या विकासाने काय मिळवलं माणसाने.. फ्रस्ट्रेशन्स? वैताग? कटकटी? टेंन्शन्स? परतं एखादा महाप्रलय यावा, पृथ्वीवर मोठ्ठा ग्रह आदळावा, ज्वालामुखी फुटावा…” …काय काय विचार येत होते डोक्यात.

या वैतागवाडीतुन तो कर्ता-कर्वीता परमेश्वरही सुटला नाही आणि अश्यातच एक मस्त कविता मिळाली. वाटलं कृष्णाचा ई-मेल आयडी असता आपल्याकडे तर लग्गेच दिला असतं फॉरवर्ड करुन.. पण काय करणार या बाप्पांचे सगळे पत्ते प्रायव्हेट..

“तुने १८ साल की उमर मे मामा कंस को मारा,
बिन लादेन को हाथ लगा कर तो दिखा..

तुने अर्जुन को तो सारी गिता सुनायी,
मेरे प्रोजेक्ट मॅनेजर से एक बार बात कर के तो दिखा..

तुने अर्जुन को सारथी बनाके पांडवों को जिताया,
इंडीयन क्रिकेट टिम का कोच बनके वर्ल्डकप जिताके तो दिखा..

तुम भरी मैफिल मै द्रौपदी को सारी पहनाई,
मल्लीका शेरावत को एक जोडी कपडे पहनाके तो दिखा..

तुने गोकुल कि १६०० गोपीया पटाई,
मेरी कंपनी की सिर्फ एक लडकी को पटा कर तो दिखा..

हे क्रिश्ना तु इस कलयुग मै आ कर तो दिखा…
हे क्रिश्ना तु इस कलयुग मै आ कर तो दिखा…”

बाप्पा आले घरी


महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, १४ विद्या आणि ६४ कलांच्या अधिष्ठात्या गणरायाचे आज आगमन झाले. स्वाईन-फ्ल्यु, वाढता दहशतवाद, जागतीक मंदी, अपुरा पाऊस आणि त्या अनुषंगाने येऊ घातलेला दुष्काळ, नोकऱ्यांवर कोसळलेली बेकारीची कुऱ्हाड या आणि अश्या अनेक विघ्नांच्या पार्श्वभुमीवर बाप्पाचे आगमन झाले आहे. डेडलाईन्स, रिलिझेस, परफॉर्मंन्स अश्या अनेक गोष्टींशी नाळ जोडल्या गेलेल्या मानवाप्रमाणेच या विघ्नहर्त्याला या सर्व विघ्न नष्ट करण्याचे अनेक भक्तांकडुन विनंतीवजा अपेक्षांचे ओझे लादले जाणार हे निश्चीत 🙂

अर्थात शेवटी या चैतन्यदायी प्रेरणेच्या आगमनाने जनमानसावर आलेले हे काळे सावट काही काळासाठी का होइना दुर होईल आणि सर्व जण बाप्पाच्या आगमनात आणि त्याच्या सेवेत बुडुन जातील.

आजुबाजुने ढोल-ताशे, सनई-चौघडे, संगीताबरोबरच टाळ, घंटानाद आणि “सुखकर्ता-दुखःहर्ता” चा टाळ्यांच्या गजराचा नाद कानावर पडत आहे. रक्त सळसळवणारी शिवगर्जनाचा नाद अंगामध्ये उत्साह ओतप्रोत भरत आहे. वातावरण भारावलेले तर नक्कीच आहे पण उदबत्ती, कापुर, चंदनाच्या सुवासाने प्रफुल्लीत सुध्दा झाले आहे. या सर्व सुवासाबरोबर अजुनही एक सुवास दरवळतो आहे आणि तो म्हणजे वाफाळलेल्या उकडीच्या मोदकाचा आणि त्यावर ओतलेल्या तुपाच्या धारेचा.

अजुन जास्ती काही नाही.. आता घेतो एक स्वयंपाक-घरात धाव- मोदकांवर आडवा हात मारण्यासाठी, पण त्यापुर्वी.. जोरदार -.. “गणपती बाप्पा …. मोरयाssssss”

अंगावर रोमांच आणणारे “मोरया-मोरया” व्हिडीओ:

बैलपोळ्याच्या शुभेच्छा


बैलपोळा

सर्व बैलांना बैलपोळ्याच्या हार्दीक शुभेच्छा. आम्ही तर बाबा कार्यालयात मस्त नटुन-थटुन आलो आहोत वाट पहातोय फक्त पुरण-पोळी मिळण्याची.. तुम्ही कसा साजरा करत आहात?

सर्व बैल भक्तांना बैल-पोळ्यानिमीत्त दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणुन हा खटाटोप..

निसटुन चाललेले आयुष्य


कार्यालयाला सोमवारी अचानकपणे सुट्टी मिळली होती. पुण्यात पसरत चाललेल्या ‘स्वाईन-फ्ल्यु’ च्या पार्श्वभुमीवर कार्यालयात शनिवार-रविवारी औषध फवारले होते. त्याचा दर्प ३ दिवस रहातो म्हणुन सोमवारीही कार्यालय बंद होते.

अर्थात या सुट्टीचे ‘मेक-मोस्ट-ऑफ-इट’ करणे शक्य नव्हते कारण जवळ-जवळ अख्ख पुणं बंदच होते आणि घरी सक्तीची आज्ञा होती की संगणकासमोर बसायचे नाही. त्यामुळे सगळा दिवस लोळणे, टि.व्ही पहाण्यातच गेला.

संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसलो होतो. मला सुट्टी असली तरी कॉलनीमधील लोकांची कार्यालये चालु होती. संध्याकाळी कित्तेक दिवसांमध्ये न दिसलेली लोकांना आज मी कार्यालयातुन परतताना बघत होतो. मनामध्ये विचारचक्र चालु होते. अरे हा केवढा मोठ्ठा झाला, किंवा काकांचे आता वय झालं नाही!. आजोबा थकले आता काठी कधी पासुन वापरायला लागले? किंवा नुकतेच रिटायर झालेले दांपत्य ‘इव्हनिंग वॉक’ ला जाताना, नुकतेच चालायला लागलेले बाळ. कित्तीतरी नविन गोष्टी कळत होत्या. इतके दिवस कामात बुडुन गेलेले मन आज या सगळ्या गोष्टी टिपत होते.

सहज विचार आला. बघता बघता ३२ वर्षाचा झालो कि.. असेच दिवस निघुन जातील चाळीशी येईल. बघता बघता मीही कामातुन निवृत्त होईन. मग मी सुध्दा या लोकांसारखाच एक होऊन जाईन. मुलगा मोठ्ठा होऊन शिक्षणासाठी किंवा कामानिम्मीत्त दुरगावी गेला असेल. दिवस कसाही जाईल पण संध्याकाळ अशीच खायला उठेल. प्रकृती साथ देत असेल तर उत्तम नाहीतर औषध-पाणी चालुच असेल. छे..छे.. विचार सुध्दा नकोसा वाटत होता. आकाश अंधारुन आले होते आणि मनामध्ये पण त्याची काळी सावली पडली होती. मन निराश झाले होते.

कॉलनीमधीलच एक मित्र ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये कामाला असतो. सहा महीन्यातुन एकदा त्याला घरी येता येते. जेंव्हा इथुन गेला होता तेंव्हा त्याला नुकताच मुलगा झाला होता. आणि आता परत आला आहे तेंव्हा त्याचा मुलगा हात धरुन चालायला लागला होता. काय चालु असेल त्याच्या मनामध्ये? त्याची बायको अधुन मधुन दिसते मुलला फिरवताना. काय विचार करत असेल ती? मुलाला बाबांबद्दल काय सांगत असेल? मित्राला काय सांगत असेल त्याच्या मुलाबद्दल? विचार करुन मन अधीकच सुन्न होतं होते.

अचानकपणे आपण करत असलेले हे काम खरंच आनंददायी आहे का? पैसा हवा म्हणुन जगतोय का जगायला पैसा लागतो म्हणुन तो मिळवतो आहे हेच कळत नव्हते. प्रखरपणे जाणवत होते की दिवस फार भरभर उडुन चालले आहेत, आयुष्य हातातुन निसटते आहे. काही तरी करायला पाहीजे. डोळ्यांदेखत हातातुन निसटुन चाललेले हे क्षणांमधले काही कण तरी हाताच्या तळव्यांना चिकटुन ठेवता आले पाहीजेत.

काही दिवसांपुर्वी एक मित्र लेह-लडाखला मोटारसायकलवरुन जाऊन आला. त्याचे ते ‘ब्रेक-फ्री’ फोटो अती-उत्तम होतेच पण एका फोटोमध्ये तो विशाल बर्फासमोर विचार करत बसला होता आणि त्या फोटोला कॅप्शन होते..

“DO I NEED A LIFE OR DO I NEED A JOB”

पाण्याचे थेंब (फोटो)


रविवार सकाळ, कित्तेक दिवसांपासुन मनात साठुन राहीलेली एक सुप्त इच्छा पुर्ण करायचे ठरवले होते.. पाण्याच्या थेंबांचे फोटो काढायचे. पण काम वाटले त्यापेक्षा फारच कठीण निघाले आणि तितकेच संयम पहाणारे. जवळ जवळ एक तास घालवुनही मनाला पाहीजे होते तसे फोटो निघालेच नाहीत. .. हरकत नाही.. प्रयत्ने वाळुचे कण रगडीता.. तेलही गळे म्हणतात ना.. आज, ना उद्या पाहीजे तसा फोटो निघेलच.. तोपर्यंत काही निवडक फोटो इथे जोडत आहे..

साहीत्य –

  • पाण्याने काठोकाठ भरलेली बादली
  • निळ (निळ्या पाण्याचा इफ़ेक्ट येण्यासाठी)
  • निळा कागद – खिडकीच्या काचांवर लावल्यास बऱ्यपैकी निळा प्रकाश पडतो
  • प्लॅस्टीकची एक पाण्याने भरलेली बाटली घेउन त्याच्या तळाशी एक छोटे भोक पाडावे ज्यातुन आपल्याला पाहीजे तितक्या वेगाने पाण्याचे थेंब पडतील.
  • थोड्या उंचीवर दोऱ्याने ही बाटली बादलीच्या थोड्या वर बांधावी. एक दोन प्रयत्नांनंतर याची उंची निश्चीत करता येते

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा


भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीब्लॉग्सच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा.

एक छोटास्सा किस्सा सांगतो, अमेरीकेतील एका मित्राशी सकाळी फोनवर बोलत होतो, सहजच विचारले “१५ ऑगस्ट ला काय करणार?”

मला म्हणाला..”अरे झाला आमचा स्वातंत्र्य दिन ४ जुलैलाच.. तुमच्या आधी मिळाली सुट्टी आम्हाला..”

म्हणलं.. “अरे वा.. तुमचा का? कधीपासुन अमेरीकेचा झालास रे तु? भाxxxxx”
४ जुलैनिमीत्तची सुट्टी उपभोगुन १५ ऑगस्टला देशाला विसरलेल्या अश्या असंख्य लोकांना एकच आठवण करुन द्याविशी वाटते.. भारत देशाची आपण शाळेत घेतलेली प्रतिज्ञा विसरु नका. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मानाने विराजमान झालेल्या ह्या प्रतिज्ञेला आज मनातल्या कुठल्या का होईना एखाद्या पानावर जरुर स्थान द्या..

भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

जय हिंद… जय भारत

Vodpod videos no longer available.
दोन वर्षापुर्वी बनवलेल्या एका छोट्याश्या, आधीच पोस्ट केलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मला पुन्हा एकदा इथे जोडत आहे.. एकच विनंती म्हणुन.. “……जरा याद करो कुर्बानी..”

पुणे क्रिटीकल मास (सायकल)-फोटो


“क्रिटीकल मास” हा सायकलींगचाच एक इव्हेंट आहे. साधारणपणे प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या शुक्रवार / शनिवारी जगभर आयोजीत केला जातो. अर्थात दुर्दैवाने भारतात अजुनही हा परदेशाइतका मोठ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अमेरीकेतील सॅन-फ्रॅन्सिस्को येते १९९२ साली या इव्हेंटची सुरुवात झाली आणि नंतर त्याचे लोन जगभर पसरले. शहरातील रस्ते सायकल चालवण्याऱ्यांसाठी किती आयोग्य आहेत याचबरोबर जर मोठ्या संख्येने सायकलवाले रस्त्यावर आले तर वाहतुकीला कित्ती त्रास होऊ शकतो या घटनांकडे लक्ष्य वेधण्यासाठी “क्रिटिकल मास” ची स्थापना झाली.

ठरलेल्या वेळी, शहरातील एका ठिकाणापासुन दुसऱ्या ठिकाणापर्यंत एकत्र मिळुन सायकल चालवणे म्हणजे क्रिटीकल मास. क्रिटीकल मास बद्दलची अधीक माहीती इथे वाचायला मिळेल.

काही फोटो:

फोटोग्राफ सौजन्य- आनंद सहा
नविन ब्लॉग जोडला जाईपर्यंत हा ब्लॉग सुरुच ठेवण्याचा द्रविडी प्राणायम करावा लागणार असे दिसते आहे 😦