निसटुन चाललेले आयुष्य


कार्यालयाला सोमवारी अचानकपणे सुट्टी मिळली होती. पुण्यात पसरत चाललेल्या ‘स्वाईन-फ्ल्यु’ च्या पार्श्वभुमीवर कार्यालयात शनिवार-रविवारी औषध फवारले होते. त्याचा दर्प ३ दिवस रहातो म्हणुन सोमवारीही कार्यालय बंद होते.

अर्थात या सुट्टीचे ‘मेक-मोस्ट-ऑफ-इट’ करणे शक्य नव्हते कारण जवळ-जवळ अख्ख पुणं बंदच होते आणि घरी सक्तीची आज्ञा होती की संगणकासमोर बसायचे नाही. त्यामुळे सगळा दिवस लोळणे, टि.व्ही पहाण्यातच गेला.

संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसलो होतो. मला सुट्टी असली तरी कॉलनीमधील लोकांची कार्यालये चालु होती. संध्याकाळी कित्तेक दिवसांमध्ये न दिसलेली लोकांना आज मी कार्यालयातुन परतताना बघत होतो. मनामध्ये विचारचक्र चालु होते. अरे हा केवढा मोठ्ठा झाला, किंवा काकांचे आता वय झालं नाही!. आजोबा थकले आता काठी कधी पासुन वापरायला लागले? किंवा नुकतेच रिटायर झालेले दांपत्य ‘इव्हनिंग वॉक’ ला जाताना, नुकतेच चालायला लागलेले बाळ. कित्तीतरी नविन गोष्टी कळत होत्या. इतके दिवस कामात बुडुन गेलेले मन आज या सगळ्या गोष्टी टिपत होते.

सहज विचार आला. बघता बघता ३२ वर्षाचा झालो कि.. असेच दिवस निघुन जातील चाळीशी येईल. बघता बघता मीही कामातुन निवृत्त होईन. मग मी सुध्दा या लोकांसारखाच एक होऊन जाईन. मुलगा मोठ्ठा होऊन शिक्षणासाठी किंवा कामानिम्मीत्त दुरगावी गेला असेल. दिवस कसाही जाईल पण संध्याकाळ अशीच खायला उठेल. प्रकृती साथ देत असेल तर उत्तम नाहीतर औषध-पाणी चालुच असेल. छे..छे.. विचार सुध्दा नकोसा वाटत होता. आकाश अंधारुन आले होते आणि मनामध्ये पण त्याची काळी सावली पडली होती. मन निराश झाले होते.

कॉलनीमधीलच एक मित्र ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये कामाला असतो. सहा महीन्यातुन एकदा त्याला घरी येता येते. जेंव्हा इथुन गेला होता तेंव्हा त्याला नुकताच मुलगा झाला होता. आणि आता परत आला आहे तेंव्हा त्याचा मुलगा हात धरुन चालायला लागला होता. काय चालु असेल त्याच्या मनामध्ये? त्याची बायको अधुन मधुन दिसते मुलला फिरवताना. काय विचार करत असेल ती? मुलाला बाबांबद्दल काय सांगत असेल? मित्राला काय सांगत असेल त्याच्या मुलाबद्दल? विचार करुन मन अधीकच सुन्न होतं होते.

अचानकपणे आपण करत असलेले हे काम खरंच आनंददायी आहे का? पैसा हवा म्हणुन जगतोय का जगायला पैसा लागतो म्हणुन तो मिळवतो आहे हेच कळत नव्हते. प्रखरपणे जाणवत होते की दिवस फार भरभर उडुन चालले आहेत, आयुष्य हातातुन निसटते आहे. काही तरी करायला पाहीजे. डोळ्यांदेखत हातातुन निसटुन चाललेले हे क्षणांमधले काही कण तरी हाताच्या तळव्यांना चिकटुन ठेवता आले पाहीजेत.

काही दिवसांपुर्वी एक मित्र लेह-लडाखला मोटारसायकलवरुन जाऊन आला. त्याचे ते ‘ब्रेक-फ्री’ फोटो अती-उत्तम होतेच पण एका फोटोमध्ये तो विशाल बर्फासमोर विचार करत बसला होता आणि त्या फोटोला कॅप्शन होते..

“DO I NEED A LIFE OR DO I NEED A JOB”

Advertisements

18 thoughts on “निसटुन चाललेले आयुष्य”

 1. >>> काही का असेना, तुम्हाला सुट्टी मिळाली, अन जिवनाच्या नविन परिभाषा सुद्धा, स्वाइन फ़्लु ची किमयाच झाली की!
  >>> आणि तसं तुम्ही खरचं छान विषय निवडलाय, आजच्या या धावपळीच्या युगात नुसतं कामात गुंतल्यामुळे मानवी जिवनात इवोल्युशन होत चाललयं, त्याला आपल्या परिजनांकडे तर सोडाच, स्वत: कडे सुद्धा लक्ष द्यायला सवड नाही!

 2. पैसा हवा म्हणुन जगतोय का जगायला पैसा लागतो म्हणुन तो मिळवतो आहे

  प्रश्न लाख मोलाचा आहे… मात्र त्याचे उत्तर शोधण्यातच आयुष्य जाते.

 3. mi pan tuzyach vayachi zale….aani ase vichar manat yet rahile ki asa vatata ha quarter life crisis tar nahi na????? aapan faar laukar mhatare hot chalaloy…aaplya aai vadlana ya goshtincha vicha karayala pan vel navata…aani ho, mala shevatacha caption pan khup aavadala….tasach tuza lekh pan.

  1. खरं आहे तुझं म्हणणं, शेवटी अती तेथे माती हेच खरे

 4. हा प्रश्न ज्यांना पडतच नाही त्यांचे जगणे त्यांच्यासाठी सुसह्य, मात्र तुमच्या आमच्यासारखे वारंवार हाच प्रश्न समोर उभा राहत असूनही मार्ग बदलू न शकणारे- नाईलाज-वाढविलेल्या गरजा,शक्य नाही…कारणे काहीही असोत, उत्तर नाही-किंबहुना उत्तर आहे पण त्यावर मार्गक्रमण करू शकत नाही त्यांना कशातूनच सुटका नाही.
  अनिकेत, तुझी सुटी सार्थकी लागली रे.:)

  1. कसली सार्थकी.. डोक्यात बसलाय ना ह्याचा भुंगा भुणभुणत 🙂

 5. ““DO I NEED A LIFE OR DO I NEED A JOB””
  काय हे? आता माझ्याही डोक्यात हाच भुंगा भुणभुणणार…
  😦

 6. baryach divasanni blogs visit katey..khup kam aahe sadhya..Pan ha post khup sunder jhalay. khupda malahi asach watat. martana evadh waatu naye ki ‘aayushya jagayachach rahun gel’ hich iccha aahe.

 7. अनिकेत खूप छान लिहिलंय. गेले काही महिने नोकरी शोधताना मी हा विचार सतत करतेय. आसपास घुटमळणारं माझं बाळ मोठं होताना पाहणं यासारखा आनंद नाही पण मंदीने फ़टका दिला तर आधार हवा म्हणून आणि इतके वर्षांची काहीतरी प्रॉडक्टिव करायची सवय म्हणून नोकरी हवी….(म्हणजे नोकरीलाच आपण प्रॉडक्टिव म्हणतो ना 😦 )
  असो…खूप विचार करायला लावणारा विषय आहे हा….अजून लिहिलं तर इथेच एक ब्लॉग होईल…

  1. खरं आहे. आमच्या घरी जाणिवपुर्वक बायको नोकरी करत नाही. मी सुध्दा पैश्याच्या मागे नं धावता आहे तिथेच सांभाळुन आहे. परदेशवारीचे काही पर्याय सुध्दा नाकारले. पण कधी कधी वाटतं मुलगा मोठ्ठा झाल्यावर मलाच म्हणाला तर..”बाबा तुम्ही इतरांसारखे पैसे का नाही कमावलेत? का तुम्ही मी लहान असतानाच अमेरीका किंवा इतर तत्सम देश्यात सेटल झालात?” त्याला मला वाटलेले नाते-संबंध, फॅमीली टाईम, देश्याबद्दलच्या भावना यांचे महत्वच त्या वेळेस कळाले नाही तर? याच सर्व गोष्टी बाजुला सारुन त्याच्यासाठी राखुन ठेवलेला वेळ क्षुल्लक वाटला तर?

   1. अनिकेत,

    १. आंब्याच्या कोयीपासून आंब्याचच झाडं उगवतं, फणसापासून फणसच, त्यामुळे मुलगा असलं काही विचारेल याची अजिबात काळजी करू नका :), परवाचा एक लेख आठवला : http://thelife.in/?p=121

    २. केवळ नातेसंबंध, फॅमिली, देश-भावना यासाठीच परदेशात जायचं नाही असा विचार असेल तर मला वाटतय तुम्ही थोडा पुन्र्विचार करायला हवा. कारण समर्थांनी सांगीत्लं आहे : वडिले जे निर्माण केले, ते ते पाहिले पाहीजे | ..

 8. माझ्यासाठी तरी – जगायला पैसा लागतो म्हणुन तो मिळवतो आहे हे खरे आणि पैसा हवा म्हणुन जगतोय हे खोटे. अरे आणि शेवटी तू लडाखचा उल्लेख केलास तर पटकन मला वाटल की माझ्या बद्दलच लिहिला आहे की काय 😀 पण लगेच लक्ष्यात आल की ही पोस्ट बरीच आधीची आहे आणि मी आत्ता गेलो होतो शिवाय गेलो तेंव्हा बर्फ सुद्धा नव्हता…

  बाकी तू हे असे काहीतरी लिहितोस .. ते पण सुट्टी घेउन आणि आमच्या डोक्यातले भुंगे भुणभुणतात मग. 😀

 9. “पैसा हवा म्हणुन जगतोय का जगायला पैसा लागतो म्हणुन तो मिळवतो आहे”
  yavar wichar karayla gel tar aayushch jagaych rahun jayel…khup chan post aahe…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s