हार्ट ब्रेक किड


Heart Break Kid
Heart Break Kid
पुण्यनगरी नामक एका गावात ‘अ’ नावाचा एक मेहनती, गरजु, कामसु मुलगा रहात होता. त्याची मेहनती वृत्ती आणि कामाबद्दलची एकनिष्ठता पाहुन ‘ब’ नावाच्या आय.टी. कंपनीने त्याला नोकरीत रुजु करुन घेतले.

‘अ’ ने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला. एक-एक करत त्याला त्याच कंपनीत सहा वर्ष झाली. या सहा वर्षात अनेक कसोट्यांवर तो खरा उतरला. त्याच्या कामाबद्दल त्याला त्या कंपनीत अनेक बक्षीस मिळाली, लोकांची प्रशंसा मिळाली. पगार वाढ मात्र जेमतेमच.. परंतु कठोर मेहनतीचे फळ कधीतरी मिळतेच या विश्वासावर तो काम करत राहीले. बाहेरील विश्वातुन अनेक मोहाचे क्षण आले, परदेशगमनाच्या संधी चालुन आल्या पण तो एकनिष्ठतेने काम करत राहीला. त्याचे सहकारी आले आणि गेले… किंबहुना असे म्हणु की आले आणि दुसऱ्या कंपनीत रुजु होऊन त्याच्या पुढे गेले.. पदानेही आणि पगारानेही. कित्तेकांनी त्याला “कंपनीचा जावई”, “कंपनीचा पिलर”, “पेंन्शन प्लॅन कंपनी” म्हणुन हिणवले परंतु तो नेहमी कामावर लक्ष देऊन बाकीच्या गोष्टी दुर्लक्षीत करत राहीला.

पगारवाढीच्या मागण्या कधी हासण्यावारी न्हेऊन तर कधी थातुर-मातुर कारणं देऊन टाळण्यात आल्या. परंतु ‘अ’ ने त्याच्या कामात कधीही कमीपणा येऊन दिला नाही. काम कुठलेही असो. कनिष्ठ पातळीचे की उच्च दर्जाचे त्याने कधी नाही म्हणले नाही.

हळु हळु त्याच्या असे लक्षात यायला लागले की त्याला ‘टेकन फॉर ग्रांटेड’ म्हणतात तसे होऊ लागले आहे. त्याच्याकडुनच्या अपेक्षा इतक्या उंचावल्या गेल्या होत्या की त्यापुढे त्याने केलेले काम दिसुनच येत नव्हते. “हे ना?? त्यात काय तो करु शकतो ना!” अस्सेच होऊ लागले.

आय.टी. कंपन्यांमध्ये हे व्हायचेच म्हणुन त्याने ही अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. पण पाणी हळु-हळु डोक्यावरुन जाऊ लागले. आजचा दिवस मात्र त्याच्या आयुष्यात वेदनादायक ठरला. साल २००९ मध्ये आज त्याने पहील्यांदा सुट्टीसाठी अर्ज दिला. पहिल्यांदा. गेल्या ८ महीन्यात एकदाही सुट्टी नं घेतलेल्या त्याने एक दिवस.. फक्त एक दिवस सुट्टी मागीतली. जेणे करुन त्याला जोडुन सुट्टी घेऊन बायका-मुलं, मित्र मंडळींसोबत ३ दिवस कुठेतरी जाता येईल. त्याला विश्वास होता की सुट्टी मिळणारचं. पण तसं झालं नाही. दिवस संपला तरीही अजुनही सुट्टी मान्य झालेली नाही, ३ दिवस आधी सांगुनही..!! रात्री क्लायंटशी बोलणं झाल्यावर सुट्टीचे ठरेल असं सांगण्यात आले.

‘अ’ च्या मनातला संवाद –

याला काय अर्थ आहे? एक दिवस सुध्दा सुट्टी मागु शकत नाही का? तुम्ही म्हणलात शनिवार-रविवारी या.. आलो.. तुम्ही म्हणालात आठवड्यात कसलीशी सुट्टी आली होती त्याची भरपाई म्हणुन शनिवारी कामं करा.. केली.. तुम्ही म्हणालात रात्री कितीही उशीर झाला तरी कामं संपवुनच घरी जा.. गेलो. तुम्ही म्हणायचे… आम्ही करायचे.. कधी आम्ही म्हणालो आणि तुम्ही केले असे एकदा तरी होऊ देत!!

कामं असतात.. असणारचं.. पण म्हणुन आम्हाला सोशल लाईफ़ नाही की काय? बरं असंही नाही की आम्ही सारख्याच सुट्या घेतोय. या ८ महीन्यात पहिल्यांदाच मागीतली ना सुट्टी? क्लायंटच काय हो.. तो पैसे मोजतोय आमच्यासाठी. आम्ही त्याच्यासाठी काहीच नाही. तो कश्याला म्हणेल नका येऊ शनीवारी, घ्या सुट्या. पण आम्ही तुमचे तर आहोत ना?? (म्हणजे असे आम्हाला वाटते बरं का!!) मग तुम्ही नको आम्हाला पाठीशी घालायला? एकदातरी? का क्लायंट म्हणाला उठ की उठायचे.. तो म्हणाला बसं की बसायचे? अस्संच होणार असेल तर मग तुमच्यात आणि बाहेरच्या कंपन्यांमध्ये फरकं असा तो काय उरला? उलट त्या कंपन्या तरी बऱ्या.. असल्या हमाली कामाचे पैसे तरी मोजतात.. खोऱ्याने.

आज त्याला राहुन राहुन वाटते आहे.. मित्रांच ऐकायला हवे होते.. त्याचे एक मोठ्ठे सिनीयर एकदा त्याला म्हणाले होते.. “पुढे जायचे असेल, पैसा कमवायचा असेल तर कामावर प्रेम करा कंपनीवर नाही..”

आज ‘अ’ खुःपच दुखी आहे. दुःख सुट्टी नं मिळाल्याचे नाही.. नक्कीच नाही. आय.टी. कंपन्यांमध्ये कोणी कुणाचे नसते. काम हेच महत्वाचे, क्लायंट हाच भगवान. पण ‘अ’ च्या दृष्टीने ही आय.टी. कंपनी नव्हती ना.. ते त्याचे एक घरंच होते.. त्याचे सहकारी त्याचे एक कुटुंब होते. जे बाहेरच्या कंपन्यांमध्ये होते ते इथे झाले नव्हते, होतं नव्हते याचा त्याला आनंद आणि अभिमान होता. मग दुःख कसले? दुःख याचे आहे की ज्यांना तो आपले म्हणत होते, जे त्याला आपला-आपला म्हणत होते.. ते खरंच तस्संच आहे का याचा विचार करावा लागला म्हणुन!! बिच्चारा ‘अ’.. हार्ट ब्रेक किड

या कथेतील सर्व पात्र, घटना, नावं काल्पनीक आहेत. त्याचा कुणाशीही सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

17 thoughts on “हार्ट ब्रेक किड”

 1. This is what i got in e mail today …

  Pareshaan thi Champu ki wife
  Non-happening thi jo uski life
  Champu ko na milta tha aaram
  Office main karta kaam hi kaam

  Champu ke boss bhi the bade cool
  Promotion ko har baar jate the bhul
  Par bhulte nahi the wo deadline
  Kaam to karwate the roz till nine

  Champu bhi ba nna chata tha best
  Isliye to wo nahi karta tha rest
  Din raat karta wo boss ki gulami
  Promotion ke ummid main deta salami

  Din guzre aur guzre fir saal
  Bura hota gaya Champu ka haal
  Champu ko ab kuch yaad na rehta tha
  Galti se Biwi ko Behenji kehta tha

  Aakhir ek din Champu ko samjh aaya
  Aur chod di usne Promotion ki moh maya
  Boss se bola, “Tum kyon satate ho ?”
  “Promotion ke laddu se buddu banate ho”

  “Promotion do warna chala jaunga”
  “Increment dene par bhi wapis na aunga”
  Boss haans ke bola “Nahi koi baat”
  “Abhi aur bhi Champus hai mere paas”

  “Yeh duniya Champuon se bhari hai”
  “Sabko bas aage badhne ki padi hai”
  “Tum na karoge to kisi aur se karunga”
  “Tumhari tarah Ek aur Champu banaunga”

 2. अनिकेत, खरं तर “या कथेतील सर्व पात्र, घटना, नावं काल्पनीक नसून खरी आहेत आणि IT कंपन्यांमधल्या लोकांशी सार्धम्य आढळलेच पाहिजे” असा शेवट हवा 😀 IT कंपन्यांमध्ये कुणाचे कुणाशिवाय अडत नाही हेही तितकेच खरे.

  मी देखील आज उगाचच दांडी मारली. त्यावर नुकतीच नोंद देखील प्रकाशित केली आहे. उद्या मॅनेजरचं कडवट तोंड पाहावं लागणार… बघू!!!

 3. मित्रा, अगदी अस्सेच होते बघ आपल्याबाबतीत !!!
  आपण मान मोडेपर्यंत काम करायचे अन्‌ एखादा दिवस सुट्टी मागीतली की यांचा जीव जातो… कृतघ्न कुठले..
  मीही यावर्षीची पहिली रजा जुलैमध्ये घेतली तर माझ्या वरिष्ठाने राखी सावंतला लाजवेल असा तमाशा केला 😀 म्हणे क्लायंट will not approve it..म्हणजे इकडे स्वाईन फ्लुने एखादा मरायला लागला तरी ते म्हणतील तेवढी एक डिलिव्हरी करून जा….सगळा बाजारूपणा झालेला आहे…
  लोक आपल्याला taken for granted धरू लागलेत हेही कळते आताशी.
  पण वाचून felt really bad !!

 4. आपल्याला असा काही अनुभव नाही बाबा (कोण म्हणाला रे, आय टी मध्ये प्रामाणिकपणे काम करून बघा मग कळेल ?)

  पण वर सिदधार्थने म्हटलंय ते खरं आहे, “IT कंपन्यांमध्ये कुणाचे कुणाशिवाय अडत नाही” अगदी सौ प्रतिशत सच 🙂

 5. खरच यात काही काल्पनिक नाहीय. हे मॅनेजर लोक म्हणजे 9 बायका देवून 1 महिन्यात पोराची डिलीवरी मागणारी जमात आहे. आपल काम चोख ठेवायच आणि बिनधास्त उलट उत्तरे द्यायची फालतू प्रश्नांना. एकदा या मॅनेजर लोकांना कळले की याच्या तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही के ते ही मागे पडत नाहीत. राहता राहिला प्रश्न अप्रेजलचा, तर चांगल काम करून काही चांगल्या ग्रेड मिळतात अशातला भाग नाही. whatever you do everything is expected . मग मरेस्तोवर काम करण्यात काय अर्थ आहे.

 6. “राहिला प्रश्न अप्रेजलचा, तर चांगल काम करून काही चांगल्या ग्रेड मिळतात अशातला भाग नाही.”

  अगदी अगदी. जो होता हैं वो मंजुरे खुदा (हे मॅनेजमेंट असं वाचलं तरीही चालेल) होता हैं 🙂

 7. @Pravin
  हे मॅनेजर लोक म्हणजे 9 बायका देवून 1 महिन्यात पोराची डिलीवरी मागणारी जमात आहे.
  Good One….

 8. अनिकेत, छान लिहिल आहेस. पण ही अवस्था फक्त आय. टी. वाल्यांचीच नही रे तर सिन्सिअरली काम करणार्‍या प्रत्येकाची आहे!!

 9. Mitra, wait nako watun ghevu pan chuk hi ghar dar, baiko poranna durlakshit karun kaam karnaryanchich….
  Company sobat imandar rahaichi garajch nahi…
  Imandar aplya palkanshi, baikoshi rahaiche.. tyanna wel dyaicha..
  kaal kya chalta rehta hai…
  tumchi extra sicere image banli ki asech hothe..
  aamhi n sangta dandi marli tari lokanna naval watat nahi…. 🙂
  Anyways…. its everybodys way to live the Life….
  And an mi ya kathetil A kon te olakhle bare… 🙂

  1. सुज्ञास अधीक सांगणे नं लागे 🙂 अधीक लिहीत नाही

 10. ekadam patya. mahendra ni dileli kavita pan khaas.

  kaamaache samaadhaan pan have, yogya mobadala hava ani work – life balance pan hava asa ha tidha aahe. IT madhye tar aahech, anya kshetraat suddha asavi.

 11. pramanik pane kaam karnarya pratek mansala kahtetil ” अ” pramanech jagav lagat……..
  pratek gost manala patli……
  ..mahendra chi kavita khup aavdli……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s