काहीतरी बदललेले आहे


आज सहजच पिकासामध्ये जुने फोटो चाळत होतो आणि बघता बघता असं लक्षात आले की सध्याचे माझे फोटो आणि जुने फोटो.. खुप फरक आहे. सध्याच्या फोटोमध्ये जो ‘मी’ आहे तो ‘मी’च आहे, पण तरीही ‘तो मी नव्हेच’. कदाचीत मला नक्की काय म्हणायचे आहे ते सांगता येणार नाही पण काहीतरी बदलले आहे नक्की.

लहानपणी वाटायचे मोठ्ठा झाल्यावर हे करीन, ते करीन. पण यातले खरं तर मी काहीच करत नाहीये.. किंबहुना काहीच करु शकत नाही आहे. आयुष्याकडुन मिळणारा आनंद, दुःख, फ्रस्ट्रेशन्स अनुभवताना / त्याच्याशी झगडताना ‘जे करावेसे वाटते आहे’ त्यासाठी वेळच नाही.

प्रत्येक वेळेस आयुष्य एक वेगळेच वळण घेते.. चांगले असो की वाईट.. पण त्या वळणावर मला जे हवे असते ते कधीच दिसत नाही. विचार करतो..”थांब.. थोडा वेळ थांब, तुझ्या ज्या आयुष्याकडुन अपेक्षा आहेत त्या होतील पुर्ण..पण कधी??” या ‘रॅट रेस’ मध्ये नुसता धावतोच आहे.. किंबहुना.. ढकललो जात आहे. जेंव्हा कडेला बघतो तेंव्हा जाणवते आपण फार काही पुढे गेलो नाही… पण बाजुने दिसणारे जग मात्र भराभर मागे धावत आहे. प्रत्येक वळणावर मी पुढे काय दिसते आहे हेच पहात रहातो.. त्या तिथे, पलीकडे, ज्याला आपण क्षितीज म्हणतो.. कदाचीत तिथेच माझी स्वप्न सत्यात उतरतील..

अर्थात मी निराश नक्कीच नाही, माझ्या आयुष्याबद्दल मला तक्रारही नक्कीच नाही. जे मिळाले आहे, जे मिळत आहे ते भरभरुन मिळाले आहे. पण तरीही काही तरी राहुन गेले आहे. अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटा अनुभवलेल्या, खडकांवरुन उडणारे पाण्याचे तुषार झेलले, असंख्य रंगेबीरंगी शंख-शिंपले जमवले, पण तो शिंपला ज्यामध्ये मोती दडुन बसला आहे.. तो काही केल्या मिळतच नाहीये. मी शांत असतो, पण मनामध्ये कुठेतरी खोलवर.. ‘स्केड्युल्ड टास्क’ प्रमाणे प्रश्नोत्तरांचा खेळ चालुच असतो. ‘असं केलं तर?’, ‘ते करुन पाहीलं तर?’ पण नुसतेच प्रश्न आणि त्यांचे पर्याय.. मग मीच एखादा पर्याय निवडतो. मनामधला होस्ट और दोस्त प्रश्न विचारतो.. ‘लॉक करु?’ आणि मी परत स्तब्ध होऊन जातो.. समोर असलेल्या पर्यायांवरुन परत परत नजर फिरवत..

आयुष्याकडुन मला अजुनही अपेक्षा आहेत.. वाटते, ज्याची इच्छा केली आहे, जे स्वप्न पाहीले आहे ते पुर्ण होईल..मी जे काही करु शकतो ते करीनच.. पण सध्या तरी.. ह्या वाहत्या पाण्यात वहावत जाणारी एक काडीच बनुन राहण माझ्या हातात आहे. प्रवाहाविरुध्द वाहण्याची ही वेळ नक्कीच नाही..

ही पोस्ट लिहीत असतानाच जाणवलं की ब्लॉगचा व्हिजीटर काऊट ५०,००० च्या वरं गेला की बघता बघता. कध्धीच अपेक्षा नव्हती.. चला.. आनंदाचा एक थेंब तर पडला अंगावर.. त्यामध्ये चिंब भिजुन घेतो.. पुढचे उन्हाने रणरणलेले वाळवंट पार करण्याआधी..

Advertisements

10 thoughts on “काहीतरी बदललेले आहे

 1. सगळ्यात आधि ब्लॉग हिट्स बद्दल अभिनंदन…लिहीत रहा…

  बाकी तो मनातल्या ’होस्ट’ आणि ’दोस्त’ चा गोंधळ मस्त मांडला आहेस…ही एक फेज असावी जी सगळ्यांच्या आयुष्यात येते….

 2. “पण तरीही काही तरी राहुन गेले आहे. अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटा अनुभवलेल्या, खडकांवरुन उडणारे पाण्याचे तुषार झेलले, असंख्य रंगेबीरंगी शंख-शिंपले जमवले, पण तो शिंपला ज्यामध्ये मोती दडुन बसला आहे.. तो काही केल्या मिळतच नाहीये…”

  अगदी माझ्या मनाताले शब्द तुम्ही इथे उतरवले आहेत. मला तर बरेचदा वाटते मला मोती मिळाला देखील होता पण कधी ते कळलेच नाही. मी आपला आजही कधी ना कधी मोती मिळेल ह्या आशेवर हातातल्या शंख-शिंमपल्यांचा आनंद घ्यायचा विसरून गेलोय…

 3. काय बोलू आणि काय नाही हेच नेमकं कळत नाहिये, तुमच्या ह्या लेखावर…. तरीपण जुन्या आठवणी जर आठवल्या किंवा त्यांचे स्मरण झाले की आपल्याला आपण पुर्वी काय ठरवलं होतं किंवा काय इच्छा होत्या, आणि त्यांची परिपूर्ती झालियं का नाही.. हा विचार नक्कीच गोंधळास्पद असतो, तरीही आठवणींना जर उजाळा मिळत असेल, तर ते शेवटी चांगलेच…. असो….
  >>>>तुमचा हिट काउन्टर ५०,००० च्या वर गेलायं, हे मात्र तुम्हाला नक्कीच सुखावेल, तुम्ही असे़च तुमचे कॉन्स्टन्ट लेखन चालू ठेवा ही सदिच्छा…..

 4. ब्लॉग हिट्स बद्दल अभिनंदन….अशी फ़ेज मला वाटतं आपल्या प्रत्येकाला येते. नव्हे ती आपल्याला जाणवते हे कदाचित आपल्या जुन्या अस्तित्वाची चांगली खूण आहे असंही म्हणूया हवं तर…तुला त्याचवेळी निदान वाळवंटातला आनंदाचा शिडकावा आहे या ५००००+ च्य निमित्ताने हे बरं आहे. लिहिते रहो (जागते रहो च्या तालावर)

 5. अनिकेत,
  ब्लॉग ५० हजारी च्या वर गेल्याबद्दल अभिनंदन!
  असंच लिहित जा आणि लवकरच लाखाचा काऊंटर पार होवो – शुभेच्छा!

 6. धन्यवाद भुंगा.. तु सुध्दा या मायाजालावर अस्साच भुणभुणत रहा

 7. अभिनंदन! प्रवाहाविरूध्द कधी पोहावे आणि कधी प्रवाहाबरोबर शांतपणे तरंगत राहावे हे ज्याला जमले तो पुढे जाउन स्वत:च्या आकांक्षांची पूर्तता नक्कीच करतो रे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s