मनातली प्रश्नोत्तर


मनामध्ये चाललेला प्रश्नोत्तरांचा खेळ काही केल्या थांबायची चिन्ह दिसत नाहीत. तुंबलेल्या गटारासारखे असंख्य प्रश्न मनामध्ये साठुन राहीलेले आहेत आणि त्या गटारावर उडणाऱ्या माश्यांप्रमाणे प्रत्येक प्रश्नाची असंख्य उत्तर कधी त्या प्रश्नावर बसतात तर कधी उडुन निघुन जातात. शेवटी सर्व प्रश्न आणि त्यांची मनाने शोधलेली उत्तर एकत्र मांडण्याचे ठरवले. निदान मनाने कुठल्या प्रश्नाची कुठल्या उत्तराशी जोडी जोडली आहे हे तरी मला निट कळेल..

प्रश्न – काय अनिकेत काय चालेले आहे सध्या?
उत्तर – काय सांगु? प्रचंड वैताग आला आहे. कंटाळा आला आहे सगळ्याचा. बदल हवा आहे.

प्रश्न – का रे? काय झालं? का वैतागला आहेस एवढा?
उत्तर – एक का कारण आहे? फारच निरस आयुष्य झाले आहे. आयुष्यात तों तोचपणा आला आहे.

प्रश्न – म्हणजे? जरा निट सविस्तर सांग ना..
उत्तर – म्हणजे आता हे बघ. सकाळी उठतो, ऑफीसला पळतो, तेंतीच लोकं. तेच तेच काम. त्याच कटकटी संपवुन संध्याकाळी वैतागुन घरी. मग थोडे ब्लॉगींग, टि.व्ही. पोराशी खेळ, रात्री जेवण, झोप. शनिवार-रविवार कधी येतो आणि कधी जातो तेच कळत नाही

प्रश्न – अच्छा म्हणजे थोडक्यात नोकरी कंटाळवाणी आहे का? मग बदल नोकरी.
उत्तर – हॅ.. बदल नोकरी. इतकं का सोप्प आहे ते.. बाहेर कित्ती वाईट परिस्थीती आहे. आणि कंपनीचा प्रॉब्लेम नाही रे. कुठल्या कंपनीत प्रश्न नसतात? कुठेही गेले तरी तेच. मला कामातील तोंतोच पणाचा कंटाळा आला आहे.

प्रश्न – मग करीअर बदल
उत्तर – करीअर..हॅ.. आणि सध्या जे काही चालु आहे.. ते तरी माझे खरे करीअर आहे का हाच प्रश्न मला पडतो. सध्या तर ५ वर्षापुर्वी मी जे काम करत होतो तेच परत करत आहे. आजुबाजुची आणि समोरची प्यादी वेगळी एवढेच.

प्रश्न – मग तुला काय काम आवडतं? किंवा आवडेल?
उत्तर – हम्म.. कदाचीत ट्रॅन्स्लेशन किंवा ऍनीमेशन, किंवा ते डिस्कवरी, नॅट-जिओ मध्ये असते तसले..

प्रश्न – मग करं.. येते तुला यातले काही? नाही ना? शिकायची तयारी, जिद्द आहे? वेळ आहे?
उत्तर – ….

प्रश्न – बरं अजुन काय म्हणणे आहे तुझे..
उत्तर – हसणार नसशील तर सांगतो. सध्या तिव्रपणे मनात जो विचार आहे तो सांगतो. हे बघ.. सरासरी आयुष्य जगण्याचे मानवाचे वय मी ‘६०’ समजतो. म्हणजे नंतरही माणुस जगत असतोच.. पण दवाखान्याच्या वाऱ्या, अंथरूणावर पडुन जगलेल्या आयुष्याला मी जगणे समजत नाही. सध्याचे माझं वय.. ३२.. म्हणजे जवळ जवळ अर्ध आयुष्य उलटुन गेले.. नाही का? मग बाकीचेही आयुष्य जसे आत्ता चालले आहे तसे घालवुन नंतर खुप काही करायचं राहीलं असं वाटुन घेण्यात काही अर्थ आहे का?

प्रश्न – नाही.. नक्कीच नाही. मग? तुझं म्हणणं काय?
उत्तर – म्हणजे बघ.. अजुन २-३ वर्ष नोकरी करायची आणि रिटायर व्हायचे.. ऐक..ऐकुन घे. तुझे खुप प्रश्न असणार आहेत. मला आधी बोलु दे आणि मग विचार. तर.. सगळे सोडुन द्यायचे जायचे परत जिथे माझे मन गुंतले आहे तिथे.. कोकणात. जितके पैसे आत्ता साठले आहेत तितक्या पैश्यात आयुष्य अगदी आरामात तिकडे खेड्यात घालवु शकेन.

आता म्हणशील आणि मुलाचे काय? त्याचे शिक्षण?.. सांगतो.. शिक्षण तिकडे ही आहेच की. माझे अर्धे शालेय शिक्षण तिकडेच झाले ना? काय अडलं माझं? इथे शहरात येऊनही काय असं शिकलो मी. फक्त बि.ए. ग्रॅड्युएट आहे मी. तरी बि.ई. झालेले लोकं माझ्या हाताखाली कामं करत होतेच ना? शेवटी हा सगळा नशीबाचा आणि तुम्ही कित्ती मेहनती आहात यावर अवलंबुन असते. आणि कोकणातली मुलं तिकडे शिकतातच ना? का त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले? किंबहुना कित्ती सुखी आहेत ती मुलं! निसर्गाच्या सानीध्यात त्यांचे बालपण कित्ती फुललं आहे मस्त. माझंच उदाहरण समोर आहे ना. कित्ती मज्जा केली होती बालपणी त्याची १०% सुध्दा मज्जा शहरात सगळी भौतीक सुख असुन मिळाली नाहीत.

कधी कधी असं वाटतं माझा मुलगा या सगळ्या आनंदाला मुकत आहे. त्याचे स्वातंत्र्य इथे हिरावले जात आहे. नकळतपणे तो सुध्दा या ‘रॅट रेस’ मध्ये ओढला जात आहे. सर्व सुखः मिळावलेला माणुस खरंच सुखी होतो का? ए/सी घर/गाड्या, दिमतीला नोकर-चाकर, मोठ्ठा बंगला असलेला खऱ्च सुखी असतो? सगळेच असतात असं नाही ना!

आता बघ, मागच्या आठवड्यात ‘दिवेआगर’ ला गेलो होतो. तिथली शांतता बघुन मन एकदम शांत झालं. कसलीही गडबड नाही. कुणालाही कसली घाई नाही. सोमवार असो की रविवार, सगळ आरामात. बसकी कौलारु घरं, व्हरांड्यात खुर्च्या टाकुन आरामात ताणुन बसलेली मंडळी, संध्याकाळी ७-८लाच सर्वत्र चिडीचुप. कुठे टि.व्ही. चे आवाज नाहीत, वाहतुकीचे गोंधळ नाहीत. कोपऱ्यावर घोळके जमवुन गप्पा मारणारे लोकं. कित्ती छान. रस्त्यावरुन पळापळी करणाऱ्या ३-४ पोरांना मी अडवले, नावं विचारली, शाळा विचारली.. अगदी तो़ऱ्यात सांगीतलं ‘इंग्लीश शाळेत शिकतो’. नुकतेच समुद्रावर बागडुन आले होते आणि आता गर्द झाडीत काजवे शोधायला घुसत होते. म्हणलं.. ‘रोज कुठं खेळता रे?’, काय म्हणाले माहीतेय? ‘गाव भर!!’

स्वच्छंदी जिवन हेच का ते? नाही तर आपल्या मुलांना वाहतुक, चोर-उचक्क्यांच्या भितीने असे मोकळेपणाने कुठे पाठवता येते? खेळायला मैदानं कुठे त्यांना मग पैसे भरुन ग्राऊंड वर पाठवा. इथे शहरात राहुन पोराला ‘काजवा पकडुन बाटलीत भरण्यातली मज्जा काय कळणार?’, इंटरनेटवरुन आभ्यास करताना ‘आंब्याच्या झाडांवर चढुन मित्रांबरोबर केलेले पाठांतर कसे असते ते काय कळणार..’ हायजेनीक या सोफिस्टीकेटेड शब्दात अडकलेल्या त्याला ‘चिखलातल्या पाण्यात नाचण्याचे, त्यात कागदाच्या होड्या सोडणे काय कसे सांगणार?’, हजारो रुपये डोनेशन भरलेल्या शाळेत त्याला चिखंल तुडवुन शाळेत जाण्याची तिथल्या टिपीकल मास्तरांची गोडी काय कळणार..

जाऊ देत गोष्टी अनेक आहेत, सगळ्या सांगत बसलो तर शब्द कमी पडतील..

प्रश्न – बरं तु काय करणार?
उत्तर – खुप काही करायचं आहे रे..! बागकाम करायचे आहे, कित्तेक पुस्तक वाचायची आहेत, सुर्यास्ताला समुद्रकिनारी कुटुंबाबरोबर बसुन गप्पा मारायच्या आहेत, स्टेट्सची चिंता विसरुन ढगाळ हाफ-चड्डी आणि खांदे उतरलेले कपडे लटकवुन गावभर फिरायचे आहे, खुप सारे लेखन करायचे आहे. स्वच्छ मोकळा वारा फुफुस्सात भरुन घ्यायचा आहे. काही ही नकरुन सुध्दा खुप काही करायचे आहे.. मला हे मिळालेले आयुष्य जगायचे आहे. नाही रमत मनं ह्या शहरात.. सगळं असुनही काहीच नसल्यासारखं.. प्रत्येक निर्जीव वस्तुत सुख शोधत फिरायचे, पाण्यासारखा पैसा घालवायचा आणि शेवटी ‘तेल गेले तुप गेले हाती राहीले धुपाटणे..’

प्रश्न.. हम्म.. विचार करायला लावलसं खरं.. सध्या तरी गप्प केलेस, पण ह्या जगात जगणे इतके सोप्प नाही. विचार करायला, हवेत पुल बांधायला सोप्प आहे, प्रत्यक्षात उतरवणं अवघड.. तुझ्या म्हणण्यावर विचार करतो मी.. आणि लवकरच परत येईन नविन प्रश्नांची कोडी घेउन मग बसं सोडवत स्वतःच.. शेवटी प्रत्येक प्रश्नांची उत्तर गुगलवर मिळत नाहीत म्हणलं… हा हा हा… 🙂

मी बसलो आहे विचार करत.. मनाचे पुढचे प्रश्न काय असतील? काय विचारेल तो? काय करावं मी विचार करतो आहे ते पुर्ण चुक आहे का? असं काही आहे का ज्याच्या माझ्या या वेड्या मनाने विचार नाही केला अजुन…

14 thoughts on “मनातली प्रश्नोत्तर”

 1. काय अजून झगडा सुरूच आहे वाटतं? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलबाबा देत नाही हे खरचं पण अशा काही प्रश्नांची उकल ज्याला त्यालाच करायला आवडेल अन हवीच ना.
  जे आपल्याकडे नसतं त्याचीच आस असते परंतु आपल्याकडे असलेले कितीक जणांकडे नाही हे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. बाकी शहर असो गाव असो जिथे आपली माणसे आहेत तिथे जीव रमतो. (माझा मात्र सदैव मायदेशातच-माझ्या माणसात कसा कोण जाणे मला सोडून राहून पडलाय-सॊरी रे. उगाच काहीबाही बडबडते आहे )
  छान मांडलस-आता खरे तर हे वेगळे सांगायला हवे का?:)

 2. अनिकेत,
  खूप विचार करायला लावणारा लिख आहे आजचा. आपण ह्या ’रॅट रेस’ मधे नक्की काय कमवतो अन काय काय गमवतो हे खरच एकदा त्रयस्थपणे बघितल पाहीजे.
  शहरात भले भौतिक सुखे भरपूर असतील पण आपल्या धकाधकाचीच्या आयुष्यात आपण त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही.

  खरच खूप विचारात पडलोय.

  अनिकेत वैद्य.

 3. ब्लॉग वरचा फ़ोटो हा आगरातला (दिवे आगरचा) का रे?

  मी श्रीवर्धनचा आहे. जरा ओळखीच वाटल म्हणून विचारल.

  अनिकेत वैद्य

 4. छ्या! असं जीवन जगायचं तर लग्न बिग्न करून उपयोग नाही.
  म्हणजे गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाच्या मधलीच कुठलीतरी फेज आहे ही…

 5. मनातलं आयडीयल लाईफ नेहमीच खुणावत असतं. 🙂
  माझ्या डायरीत यासंबंधी रेखाटलेलं चित्र आहे, http://thelife.in/?p=167 वर मागे लिहिलं होतं, पण तुम्ही मात्र भन्नाट लिहिलय !

 6. mala pan hech watte yaar……
  gav te gaavch… shahrat sagle bhautik sukhe asli tari aaplya gavchi chav nahi aahe.
  mi vidarbhtla, ghari jato tevha 14 – 14 tas load shedding aste, pan tithe ji jhop lagte na ti ithe light asun, macchar nasun pan lagat nahi.
  an tithe light chi garaj pan watat nahi… sandhyakali purn kutumbane angnat basaiche, tithech jevan urkaichi…
  manoranjanasathi TV, cable, internet aslya tatsam chij chi kadhi garajch watat nahi…
  Shahrat aapan fakt dhavaiche kase te shikto, gavat jagaiche kase te kalte….

 7. अगदी मनातल लिहिलस बघ.मी पण हेच प्रश्न स्वत:ला विचारले?आणि ठरवून टाकले की, लवकर रिटायर होऊन गावी निघून जाऊ.अगदी शोभनारा लेख आहे ब्लागच्या नावाला. असच लिहित राहा…..

 8. wichar karayla lavnara lekh aahe……..compitataion chya jagat manatal aayush jagaych rahun jatay……………khup chan………

 9. I read your blog regularly, particularly this article almost once in a week to remind myself what I have to do. Many Thanks Aniket.

 10. APAN JASA VICHAR KARTO TASAC SAGAL GHADAT ASAT ANAND ANI SAMADHAN APLAYA MANNYAT AST AANI TE CHOTYA CHOTYA GOSTIT SHODANYAT HI AST

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s