चिनी ‘कम’ला


आता चिनीही भारताच्या सीमेमध्ये ‘कम’ला. आत्तापर्यंत पाकिस्तानकडुन घुसखोरी चालु होती ते कमी की काय म्हणुन चिनचे सैन्यसुध्दा घुसखोरी करु लागले आहेत. काही दिवसांपुर्वीच चिनचे हेलीकॉप्टर्सने हवाई हद्दीचा भंग करुन ‘लेह-लडाख’ प्रांतात अन्नाची पाकीटं टाकली. हे कमी म्हणुन की काय, नुकतेच भारताच्या सिमेमध्ये घुसुन लेह-लडाख प्रांतातील काही दगड त्यांनी लाल रंगांनी रंगवुन टाकल्याचेही समोर आले आहे.

आधी ‘हिंदी चिनी भाय-भाय’, मग ‘चायनीज फुड’ चे वाढत असलेले भारतातील प्रस्थ, त्यानंतर चिनी खेळण्यांचा बाजारात वाढलेला सुळसुळाट आणी आता हा प्रकार.

अर्थात यात आपले राजकारणी काय करणार? ते बिच्चारे निवडणुक तोंडावर आल्याने कामात मग्न, कुणाशी गटबंधन करायचे आणि कुणाशी युती तोडायची ह्याच्या गहन विचारात मग्न, ते तरी कुठे कुठे लक्ष घालणार? ‘नुसताच रंग दिला आहे ना? ठिक आहे ना मगं? अजुन द्या म्हणाव रंग, आमच्या परराष्ट्र मंत्रालयाची इमारत तशीही बेरंग झाली आहे, पावसाळ्यानंतर रंग द्यायला काढायची होती.. त्यालाच देऊन टाका ना रंग.. म्हणजे त्याचे पैसे लाटायला आम्ही मोकळे..’

अर्थात विदेश-मंत्रालयाने ह्या घटनेला गंभीरतेने घेतले आहे आणि चिन सरकारकडे याचा जाहीर तिव्र निषेध नोंदवला आहे हे सांगणे नं लागे..

3 thoughts on “चिनी ‘कम’ला”

  1. आपला निषेध इतका तीव्र असतो की मला तीव्र शब्दाचा अर्थ आजपर्यंत चुकीचा कळला असे वाटते. तीव्र म्हणजे कदाचित फुसुकली वैगरे असावं. कारगिलच्या वेळी देखील दुश्मन बराच आत आल्यानंतर आपण जागे झालेलो. भारतीय जवानांचे हकनाक बलिदान दिल्याशिवाय सरकार जागे होणार नाही…

  2. For a more balanced, less hysterical and less cynical view of Indo-China War of 1962, please read Maj Gen DK Palit’s book ‘War In High Himalayas’. It is a captivating read and will open your eyes as to the reality. Parts of this book are available as e-book.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s