कोळ्याचं जाळं


मला ना, कोळ्याचं आणि त्याने विणलेल्या जाळ्याचं नेहमीच कौतुक आणि आश्चर्य वाटत आलं आहे. म्हणजे बघा नं, इतकं सुंदर असतं ते जाळं, दिसताना इतकं नाजुक दिसतं पण तरीही तितकेच मजबुत. एकदा का एखादं भक्ष्य त्यात अडकलं की मग सुटनं मुश्कील. पण असं असुनही तो कोळी मात्र त्यात कध्धीच अडकत नाही. विणत असतानाही आणि विणुन झाल्यावरही.

आपल्या माणसांच मात्र अगद्दी उलटं असतं. जन्मल्यापासुनच माणुस एक-एक नाती जोडत असतो. जन्मल्याक्षणापासुनच तो कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ/बहीण, कुणाचा नातु तर कुणाचा कोण असतो. ह्या नात्यांच्या बंधनामध्ये तो इतका अडकुन जातो की कित्ती वेळा इच्छा असुनही तो नंतर त्यातुन बाहेर पडु शकत नाही. हिच नाती कधी त्याच्या प्रगतीच्या आड तर कधी जिवनाच्या आड येतात. या नात्यांमध्ये तो एतका गुरफटलेला असतो की जिवनाचे त्रिकालाबाधीत सत्य ‘मृत्यु’ ह्याची ही तो नको तितकी भिती बाळगतो, त्यापासुन दुर पळायला बघतो. या नात्यांपायीच कित्तेक दुखांचा धनी होतो. ही नातीही कोळ्याच्या जाळ्याइतकी मजबुत नसतात. ताणली तर लगेच तुटतात.. पण जेंव्हा एखादे नाते तुटते तेंव्हा असंख्य वेदनांचे व्रण आणि घाव ते माणसाच्या मनावर उमटवते.

खरंच कोळ्यासारखे रहाता आले तर? आपल्याच जाळ्यात आपण न अडकता?.. अलिप्तपणे जिवन जगता आले तर?

Advertisements

4 thoughts on “कोळ्याचं जाळं”

    1. 🙂 मी कुठे आहे माझे मलाच माहीत नाही? अनेक ठिकाणी असुनही कुठेच नाही. प्रचंड बिझी आहे, पण कश्यात ते मात्र सांगता येणार नाही.. म्हणजे प्रॉडक्टीव्ह अस्सं काहीच नाही. नुसतेच दिवस येउन जात आहेत

  1. कोळ्याचे जाळे कोळ्याच्या शरीरांतील तंतूंपासून निर्माण झालेले असते आणि कोळी त्याचा उपयोग भक्ष्य मिळविण्यापुरताच करतो. नात्याना ही लेबले लागू पडत नाहीत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s