झुकी झुकी नजर


सकाळी कार्यालयात येत असताना गाडीत कुठल्याश्या रेडीओ चॅनलवर ‘झुकी झुकी सी नजर’ गाणे लागले आणि क्षणात मन भुतकाळात गेले.

जे मला कमी ओळखतात त्यांच्या दृष्टीने मी तसा ‘लाजाळु’ आहे. पण खरं सांगायचं तर मी ‘लाजाळु’ कमी आणि ‘खालं मुंडी पाताळं धुंडी’ अधीक आहे. म्हणजे कसं असतं ना, आपले डोळे फार बोलके असतात, मनातले विचार पटकन उघड करतात, त्यामुळे मी ना, अश्यावेळी खाली बघुनच बोलतो.

तर, खुप मागे एकदा आम्हा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप वर्षासहलीनिमीत्त गाड्यांवरुन भटकायला बाहेर पडला होता. ग्रुप मध्ये ‘प्रिती’ नावाची एक गोड मुलगी होती.. कुणालाही आवडेल अश्शीच.. अगदी ‘गर्ल नेक्स्ट डोअर’, आणि दुर्दैव म्हणजे माझ्याच मित्राची गर्ल-फ्रेंड होती. त्यामुळे ‘भाभी मां..’ नाही का. ती दिसायला जितकी गोड होती, तितकाच तिचा आवाज. गाणी गुणगुणत असली म्हणजे ऐकतच रहावं.

वाटेत एका ठिकाणी आम्ही सर्व जण थांबलो होतो. सगळे जण तिला ‘प्रिती गाणं म्हण ना एखादं’ म्हणत होते आणि ती म्हणाली.. ‘ओके.. पण हे गाणं.. अनिकेत साठी..’
पावसाळ्याचे दिवस होते.. हवेत गारठा होता आणि तिच्या त्या वाक्याने.. एखादं अतीथंडगार मोराचे पिसं अंगावरून फिरल्यासारखे झाले बघा.

त्यावेळेस तिने..’झुकी झुकी सी नजर..’ हे गाणं म्हणलं होतं. त्याला ८ एक वर्ष झाली. पण ते गाणे.. ते क्षणं.. तो थंडगार अनुभव आज परत एकदा ताजा झाला.

गर्ल-फ्रेंड आपली असतीच हो. पण दुसऱ्याच्या गर्ल-फ्रेंड ने तुमच्यासाठी म्हणलेले गाणं म्हणजे.. अहम्म..अहम्म् .. खासंच.. नाही का?

16 thoughts on “झुकी झुकी नजर

  1. अनिकेत

   नक्कीच, अजुनही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण, त्या प्रत्येक क्षणातला तो अनुभव अजुनही जश्याच्या तस्सा.. लक्षात आहे 🙂

 1. अनिकेत दादा, हं त्यावेळी मात्र तुझी “अब मैं क्या करूं..?”अशीच प्रतिक्रिया दिसली असणार, कारण एखाद्या “दि गर्ल नेक्स्ट डोअर (नक्कीच एलिशा कटबर्टसारखीच असणार ती…)” सारख्या मुलीनं तुझ्यासाठी असल्या टाइपचं गाणं आणि तेही फक्त तुझ्याचसाठी आणि दुसर्‍याच्या गर्लफ्रेण्डने म्हणणं म्हणजे…. नवलचं!!!!
  आमच्यासारख्यांनाही अशी संधी कधी मिळावी….?(अजुन चाइल्डहूडचं तर आहोत…!)

  1. अनिकेत

   टेंशन नको घेउ.. या जगात प्रत्येकासाठी कुणी ना कुणी तरी असतेच.. अहं..मी नाही असं म्हणतं, असं शाहरुख खान आणि माधुरी दीक्षीत म्हणतात ‘दिल तो पागल है मध्ये’ 🙂

 2. rohan

  वा … एकदम दिलखुलासपणे लिहिल आहेस. तुझ्या त्या मित्राने हा पोस्ट वाचला आहे की नाही ??? 😉 हा हा … आणि खुद्द ‘प्रिती’ने ???

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s