मायग्रेन


दसऱ्यामुळे जोडुन आलेली सुट्टी उपभोगणे नशीबात नव्हते बहुदा. शनिवार, सुट्टीचा पहिला दिवस, सकाळी उठलो तिव्र डोके दुःखी घेउन. ही डोके दुःखी नेहमीसारखी नव्हती. एक तर डोक्याचा एकच भाग दुखत होता. आणि ते पण म्हणजे दोक्याला काही जोरदार लागलं असेल तर कसं दुखतं ना… तस्सच, कपाळाचा भाग तर अत्तीच दुखत होता. शेवटी पेन किलर घेतली आणि दुपारनंतर उतार पडला.

रविवार आणि सोमवारची सकाळ सुध्दा तस्सेच.. दुपारपर्यंत प्रचंड डोके-दुखी आणि दुपारपर्यंत उतार. शेवटी आज अशक्यच झाले म्हणुन डॉक कडे धाव घेतली.

डॉक्टरही नेहमी उशीराच येणारी गोष्ट आहे. एक एक क्षण तासासारखा काढला. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे ‘ब्रेन ट्युमर’ वगैरे तर नसावा ना झालेला असलेही विचार डोक्यात तरळुन गेले. नेहमीची डोकेदुखी ही खचीतच नव्हती त्यामुळे डोक्यात नानाविवीध शंकांनी थैमान घातले होते.

डॉक आला.. त्याने पाहीले आणि.. डॉक्टरने पहीलाच बॉम्ब टाकला, ‘मायग्रेनची लक्षणं’ दिसत आहेत. मी डोक्यालाच हात लावला.. “अरे देवा..” लगेच दोन दिवसांचे डोस दिले आहेत त्यावरुन कळेल काय खरं आणि काय खोटं.

घरच्यांनी याचे खापर लग्गेच त्या बिच्चाऱ्या संगणकावर फोडले. ‘त्यामुळेच तुझे डोके दुखते सारखे’ हे दिवसभरात १०-१० वेळा ऐकवुन झाले.

घरी आल्या आल्या कार्यालयात मेल्स पाठवतो च्या नावाखाली संगणकावर बसलो आणि मायग्रेन बद्दल महाजालावर जरा शोधाशोध केली आणि अजुनच घाम फुटला.

बिच्चारा.. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा आजारी पडला 🙂

Advertisements

11 thoughts on “मायग्रेन”

 1. घरच्यांनी याचे खापर लग्गेच त्या बिच्चाऱ्या संगणकावर फोडले. ‘त्यामुळेच तुझे डोके दुखते सारखे’ हे दिवसभरात १०-१० वेळा ऐकवुन झाले.>> malahi assach watata bara aniket.. :p
  get well soon!!

 2. बिच्चारा.. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा आजारी पडला

  हाहाहा.
  लवकर बरे व्हा आणि परत भुणभुणायला लागा!

  1. हो प्रयत्न तर तोच आहे.. ते तिन दिवस मला माझ्या आयुष्यात परत कध्धीच नको आहेत.. फार हाल झाले राव.. मायग्रेन नसावं.. नाही तर उठलोच आयुष्यातुन

  1. ho attach mi “patanjali chikitsalay” ramdev-babanche clinic jaun aalo, dili aahet kahi ayurvedic aushadhe aani kahi yoga sangitle aahet, hope to get recovered from it sooooooon

 3. hi,
  barech upay aahet ethe.migrain valyanchi mhane net var grup dosti aahe (konitari sangitle).upay kara and get wel lavkar.
  anuja

 4. sorry jara ushirach wachatey…pan mygrain mhanaje dokyacha bhuga…bhungyachya dokyacha bhuga asa kahisa watala te sangawasa pan watala mhanun hi pratirkiya……
  aata Ramdev babani bara kelach aahe mhana…mhanaje punha gungun chalu hoil…..(ani dokyachi bhunbhun band…kase??)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s