रामदेव बाबा की जयगेले दोन आठवडे चालु असलेला मायग्रेन नामक डोके दुखीचा त्रास वाढतच चालला होता आणि सहन करणे अशक्य झाले होते. नेहमीच्या डॉक्टरकडे ३-४ खेपा झाल्या. दर वेळेला वेगळ्या गोळ्या, पण एक कणही फरक पडत नव्हता. कार्यालयात सुट्यांवर सुट्या पडत होत्या. शेवटी दुसरा उपाय करुन पहावा म्हणुन घराशेजारीच असलेले श्री. रामदेव बाबा यांचे आयुर्वेदीक “पतंजली चिकित्सालया”त जाऊन पहावे असा विचार मनामध्ये आला. बऱ्याच लोकांकडुन चांगले रिझल्ट्स ऐकुन होतो शेवटी जाऊन आलोच.

अपेक्षा आजाबात केली नव्हती, पण दुसऱ्या दिवसापासुनच खुsssप फरक पडला. डोकेदुखी अगदी थांबली नसली तरी जाणवण्याइतपत कमी झाली.

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या अमेरीका गावातल्या क्लायंटच्या ‘कॉल’ मध्ये क्लायंटला माझ्या आवाजातला फरक लग्गेच जाणवला. बऱ्याच दिवसांनंतर बरा वाटत होतो. म्हणुन मग त्याने आस्थेने चौकशी केली. काय उपचार केले, कसा काय फरक पडला एकदम. म्हणुन मग मी त्याला माहीती सांगीतली. इथे एक ‘रामदेव बाबा’ म्हणुन आहेत, त्यांचे ‘आयुर्वेदिक क्लिनिक्स’ आहेत, त्यांच्या जडी-बुटीने फरक पडला. खुप प्रसिध्द आहेत ते. त्यांचे योग-शिबीर फार प्रसिध्द आहेत, लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित रहातात वगैरे.

इतर नॉन-भारतीयांप्रमाणे त्याचीही योग, आयुर्वेद वगैरे शब्द ऐकल्यावर चिकित्सा जागृत झाली म्हणुन त्याने इंटरनेट्वर सर्च मारला आणि रामदेव-बाबा बघुन तो जरा दचकलाच. त्याच्या लेखी एखादा सुटा-बुटातला डॉक्टर असावा बहुदा.

त्याने लगेच आय.एम वर मला रामदेव-बाबांच्या फोटोची लिंक पाठवली आणि विचारतो कसा..

“इज धिस जेंटलमेन चेक्ड यु? इज ही अ डॉक्टर?”

मग त्याला समजावले, अरे बाबा क्लिनिक्स त्याचे आहेत, पण तो नाही येत इकडे तपासायला. तो औषध बनवतो आणि योग-विद्येचे ज्ञान देतो. रामदेव-बाबांचे यु-ट्युब वरील व्हिडीओ बघुन तो खुपच प्रभावीत झाला होता आणि मी त्याची (अत्यंत कडवट, अत्यंत घाणेरड्या चवीची) अत्यंत गुणकारी ठरलेली औषधं घेऊन.

त्यामुळे आजच्या तारखेला मी जरूर म्हणु इच्छीतो ‘रामदेव बाबा कीssss जय!!!’

Advertisements

5 thoughts on “रामदेव बाबा की जय”

  1. मी सुद्धा ऐकून आहे बरेच रामदेव बाबांबद्दल… कसे का असेना.. तूला आराम पडला हे ऐकून बरे वाटले.

  2. client ni vicharle tula mhanje gr8t yaar. burr zale tuzi recovery zalli ti.

    tuze results pahun me hi gele hote tikde.

    aushaadh chalu ahet for neck pain, baghun kitpat guun yeto te 🙂

  3. डोक्यात भुंगा आहे, सतत भुणभुणणारा, सतत काहीतरी बोलत असतो, सांगत असतो, नवनविन कथा सुचवत असतो. त्याची सक्रियता वाढली की त्याचे म्हणणे डोक्यातुन बाहेर कुठे-तरी मांडावेसे वाटते, डोके हलके करण्यासाठी. त्यासाठीच

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s