माश्यांचे हळदी-कुंकु आणि पक्षांना खाऊ


दिवाळीच्या शाळांना सुट्या लागुन काही दिवस सुध्दा नाही झाले की पोरांचे घरात उद्योग सुरु झाले. गेल्या दोन दिवसांतील दोन उद्योग ऐका –

 • घरात असणाऱ्या फिश-टॅक मधील माश्यांचे परवा जोरदार हळदी कुंकु झाले. त्याचे झाले असे की मंडई मधुन हळदी-कुंकु च्या पुड्या आणल्या होत्या. आवरु नंतर म्हणुन तश्याच कडेला ठेवल्या होत्या. दुपारी बराच वेळ झाला तरी पोराचा काही आवाज नाही, आश्चर्य वाटले म्हणलं एवढी शांतता आहे, बघावं काय चालु आहे म्हणुन मागच्या खोलीत गेलो तर सगळे हळदी-कुंकु फिश-टॅक मध्ये ओतले होते आणि हातातल्या काठीने ते पाणी पोरगा ढवळत होता. सगळे पाणी रंगीत झाले होते. मासे हळदी-कुंकुवाने माखले होते.

  नशीब एखादा गचकला नाही, हो ना.. एवढे महागाचे ते शार्कस बिच्चारे वाचले, त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

 • पुन्हा एकदा अशीच दुपारची भयाण शांतता. पोरगा बऱ्याच वेळ शांत आहे म्हणल्यावर काहीतरी उद्योग सुरु आहेत हे समजुन जावे. लगेच खोलीत धाव घेतली आणि जे पाहीले ते डोक्यावर हात मारण्यासारखेच होते.

  खिडकीत तुर-डाळ धुवुन वाळत टाकली होती. आमच्या समोरच्या झाडावर भरपुर पोपट असतात. अगदी एका वेळेस कमीत-कमी १५-२० तरी नक्कीच असतात. आमचे दिव्य रत्न त्या पक्षांना मुठ-मुठ भरुन डाळ खायला म्हणुन फेकत होते. साधारण एक किलो डाळ खिडकीतुन खाली फेकण्यात आली होती.

  थांबवले तर परत आम्हालाच चिडुन म्हणतोय, ‘अरे त्या पक्षांना खाऊ देत होतो ना.. ते बिच्चारे काय खाणार मग??’

 • फक्त दोन दिवसांच्या सुट्टी मध्येच असले उद्योग, पुर्ण दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत असे काय काय उद्योग होणार आहेत हे त्या परमेश्वरालाच ठाऊक..

  ॥ ओम नमः शिवायः ॥

7 thoughts on “माश्यांचे हळदी-कुंकु आणि पक्षांना खाऊ”

 1. सही!!!!परवा दह्याचा बाउल फोडला ते वाचले होते….हे नवे उद्योग….ओजस लगे रहो!!!!

  1. तन्वी,
   काही विचारु नकोस बघ, नको वाटते सुट्टी त्यापेक्षा कार्यालयात आलेले बरं. घरातल्यांवर काय प्रसंग ओढवत असतील हे मी घरी असले की कळते 🙂
   आता तर काय फटाके सुरु झालेत, टिकल्यांच्या आवाजांनी घर अगदी दुमदुमुन गेले आहे, ठार वेडा नाही तर बहीरा होणार आहे मी कारण मला १७-२५ ऑक्टोंबर कार्यालयाला सुट्टी आहे.

 2. अनिकेत.. प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि मी करिन तेच बरोबर आहे हा बाणा मात्र एकदम खास..

  अरे तुम्ही त्याला पकडल्यावर पण आपण जे केलं ते योग्यंच आहे, म्हणुन पटवुन देण्याची स्टाइल वाखाणण्याजोगी आहे.

  करु द्या हो… आता नाही तर कधी करणार मस्ती??

 3. तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!
  पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

  1. धन्यवाद हेमंत, तुम्हाला सर्वांना सुध्दा दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s