दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी


“एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”
“काय कटकट आहे! सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”
“उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”

ही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..

दिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.

कढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.

मध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.

दिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.

तेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.

कुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..

मग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..

हम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.

ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा

7 thoughts on “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी

  1. अनिकेत तुम्हा सर्वांना देखील दिपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा….

  2. छान!!!!!!
    दीपावलीच्या आपणास, घरच्या मंडळींना व आप्तेष्टांना हार्दिक शुभेच्छा!!!

  3. chaan..far nostalgic jhale re mi..halli ashi diwalichi maja nahi raahili. Sagli mitra mandali maargi laalyawar he sakali ekatra jamun fatake fodne, dewlat jane, aani nantar building madhe saglyanchya ghari jaun wish karane, khau wasool karne he sagal aathwanit gel aata.
    Tujhya lekhachya nimittane manatlya manat ti diwali punha saajri keli mi.

  4. मी हा लेख आज वाचला… पण डोळ्यासमोर दिवालीचा दिवस उभा राहिला. अगदी असाच असायचा…. आंघोळ फटके फराळ…. मी डोम्बिवली चा. आम्ही सगळे फडके रोड वर जात असू आणि तिथे गणपतीच्या देवळत जात असू. म्हणजे तो नुसता बहाणा बाकी रस्त्यावरच भटकंती असायची. मस्त आणि घराची आठवण झाली.😦

  5. “एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”
    “काय कटकट आहे! सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”
    “उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”

    ही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..

    दिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.

    कढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.

    मध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.

    दिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.

    तेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.

    कुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..

    मग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..

    हम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.

    ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s