पुण्यातील ‘सायकल ट्रॅक्स’


काही दिवसांपुर्वीच पुण्यातील रस्त्यावर एका १५ वर्षीय सायकल स्वाराला बसने ठोकरल्याने गंभीर अपघात झाला आणि पुण्यात ‘बनवलेल्या’ सायकल ट्रॅक्स चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त भागाचा अधीक तपास केल्यावर असे लक्षात आले की त्या मुलाने सायकल चालवताना जर सायकल ट्रॅक्सचा वापर केला असता, तर कदाचीत हा अपघात टळु शकला असता.

काही दिवसांपुर्वी माहीतीच्या आधीकाराखाली मागवलेल्या माहीतीत असा उल्लेख आला होता की डेक्कन ते कोथरूडपर्यंत (साधारण पणे ६ कि.मी.) सायकल ट्रॅक बनवलेला आहे. वाचताच मला धक्काच बसला? माझा नेहमीचा रस्ता आणि मलाच माहीत नाही. म्हणुन मग आवर्जुन शोधाशोध केली तेंव्हा रस्त्याच्या कडेला काही तुरळक पाट्या दिसल्या ज्या त्या रस्त्याला ‘सायकल ट्रॅक्स’ असे संबोधीत होत्या.

ह्या ट्रॅक्स वर काही ठिकाणी वेडी वाकडी वाढलेली मोठ्ठाली झाडं आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर अक्षरशः एखाद्याला सायकलवरुन खाली उतरुन वाकुन पुढे जावे लागेल. अनेक सायकल ट्रॅक्स वर भाजीवाले, फेरीवाले, दुकानाचे बोर्ड्स, पंचरच्या दुकानाचे टायर्स सर्रास पडलेले दिसतात. अनेक ठिकाणी लोकं गप्पा मारत मध्येच उभे असतात. शेवटी एका ठिकाणी मी मुद्दामहुन सायकलची घंटा वाजवुन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या पदरी थट्टाच पडली 😦

ज्या रस्त्यावर अपघात झाला तो कर्वे रस्ता ‘जवाहरला नेहरु नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन’ योजनेखाली येतो ज्या योगे अश्या रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक्स’ असणे आवश्यक आहे. परदेशवारी करुन आल्यावर तिथल्या योजना इथे राबवायच्या म्हणुन अनेक ठिकाणी पुण्यात सायकल ट्रॅक्स बनवले गेले आहेत. काही खरोखरच उत्कृष्ठ आहेतही, पण केवळ हातावर मोजण्यासारखेच. बाकीच्या ठिकाणी अर्धवट बांधकाम झालेले, उखडलेले, वाट्टेल तसे बांधलेले ट्रॅक्सच जास्त आहेत.

जोपर्यंत हे ट्रॅक्स वापरण्यायोग्य होत नाहीत, त्यावरील अतिक्रमणं दुर होतं नाहीत तो पर्यंत त्याचा वापर होणे कठीण. सायकल चालकांवरही त्यानंतर रस्ता वापरल्यास कारवाई होणे गरजेचे आहे. नुसतेच सायकल वापरा, पर्यावरण वाचवा, प्रदुषण टाळा, वाहतुकीवरील बोज खाजगी वाहनं कमी वापरुन कमी करा म्हणुन होणार नाही तर त्यासाठी योग्य पर्यायी मार्गाची पुर्तता होणे हे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.

Advertisements

4 thoughts on “पुण्यातील ‘सायकल ट्रॅक्स’”

 1. नक्कीच. मी सिंहगड रोड ते हडपसर असा नेहमीच प्रवास करतो. गेल्या 1 वर्षापासून रस्त्याचे काम चालू आहे, पण सुरळीत सायकल चालवता येईल असा सायकल ट्रॅक अजूनतरी दिसला नाही. दिवाळीच्या आदल्या दिवशी माणिकबागेत एक 14 वर्षाचा मुलगा सायकल खेळत असताना ट्रक खाली आल्यामुळे गेला. बहुतांश अपघात हे वाह्तुकीचे नियम न पाळल्यामुळे/पुरेशी सावधानता न बाळगल्यामुळे होतात.
  त्यासाठी सर्वात सोपा नियम आहे.

  Safety First

 2. सायकल ट्रक आहेत पण तिकडे लोक पार्किंग करतात, भाजीवाले भाजी विकतात, दुकानदार अतिक्रमण करतात, हॉटेलवाले खुच्या टाकतात, महानगरपालिकेवालची कचराकुंडी सुद्धा याच सायकल ट्रक वर असते. यातुन जर जागा राहिली तर ती सायकलसाठी 🙂

 3. नमस्कार,

  तुमचा ब्लॉग आज पहिल्यांदीच वाचला. खरे सांगायचे तर ’पुण्यातील सायकल ट्रॅक्स’ हे शिर्षक असे होते की त्याने लक्ष वेधून घेतले.

  तुम्ही लिहिलेली सायकल ट्रॅक्स बद्दलची माहिती आवडली…..हे सायकल ट्रॅक्स बहूदा ’Commonwealth Youth Games’ च्या वेळेस केले होते….Games संपले…आणि त्यानंतर ट्रॅक्सकडे कोणी बघितले नाही …..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s