मराठीचा मुद्दा चुकीचा कसा?


ही मिडीया खरं सांगायचं तर डोक्यात गेली आहे माझ्या. अक्कल नसल्यासारखं ‘बायस’ होऊन बातम्या देणं चालु आहे असं मला तरी वाटतं.

 • अबु आझमी बद्दल जे काही घडलं त्यावरुन त्यांनी ‘राज ठाकरेचे गुंड’ हा जो उल्लेख केला तो मला तरी फार खटकला. मारामाऱ्या काय फक्त राज ठाकरेच करतो का?
 • गेल्या वर्षी कलेक्टर कचेरीवर जी मोडतोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली त्याची भरपाई म्हणुन राज ठाकरेने ५२ हजार रुपये जमा केले ही बातमी का मग झाकोळली गेली?
 • मराठी आरक्षणाला लोकांचा विरोध आहे. का? का तर म्हणे देश्याच्या फाळण्या होतील. मग
  – दलीत, बॅकवर्ड क्लास वगैरेंची कास धरुन जी आरक्षणं ठेवली जातं आहेत त्याचं काय?
  – आंबेडकरांनी ५० वर्षापुर्वी त्यावेळची परीस्थीतीला अनुसरुन जाती-जमातींना आरक्षणं दिली होती. आज त्याची काय किंमत? खरंच त्याची गरज आहे?
  – धनाड्य, करोडपती असुनही जाती-जमातीचे दाखले देऊन फिज मध्ये कन्सेशन्स दिली आणि घेतली जात आहे. टक्के जास्त असताना, केवळ कमी टक्के असलेला मागासवर्गीय आहे म्हणुन एखादा हुशार मुलगा प्रवेश्यापासुन डावलला जात आहे. जातीच्या दाखल्यावरुन निदर्शन केली तर ते गुंड नाहीत का? तेंव्हा मात्र ते आपल्या हक्कासाठी लढणारे साधु संतच ना!
  – स्त्रियांची आरक्षणं अजुनही चालु आहेत. गेल्या वर्षीच स्त्रियांना आरक्षणं मिळावीत म्हणुन मोर्चे उठवले गेले त्याचे काय? आज कुठल्या क्षेत्रात स्त्रिया मागे आहेत? माफ करा, पण पुरुषांसाठी बनवलेल्या कंन्डोमच्या जाहीरातीत सुध्दा स्त्रियांचा वावर आहे. मग आरक्षणं हवीतच कश्याला?
  एकीकडे आजची स्त्री अबला नाही सबला आहे, स्वकर्तुत्वावर उभी आहे.. आहे ना, पण मग इंजीनीयरींगला, शाळा प्रवेशात, गव्हर्नमेंट सर्व्हीसमध्ये आरक्षण कश्याला?
 • ज्या वाहीन्या मराठीचा मुद्दा चुकीचा मानतात, त्याच वाहीन्या प्रादेशीक वाहीन्या करतातच कश्याला मग चालु. मराठी, बांगला, कन्नड, पंजाबी. जर हिंदी देशभाषा आहे तर सर्व वाहीन्या हिंदीतुनच करा ना! पण नाही. प्रादेशीक वाहीन्यांमुळे मिळत असलेला पैसा कोण सोडणार?

अर्थात प्रत्येक स्त्री आरक्षणं मागत नाही, दलित लोकं सांगायला जात नाहीत आम्हाला आरक्षण द्या. स्वाभीमानी लोकही आहेतच. त्यामुळे वरचा प्रश्न त्या मोजक्या लोकांना जे या आरक्षणाच्या चुलीवर आपल्या भाकऱया भाजुन घेतात आणि सरकारला आहे

राज ठाकरेने आज ‘भारतीय स्टेट बॅकेला’ चिठ्ठी लिहुन महाराष्ट्रात मराठी मुलांना प्राधान्य द्यावे अशी सुचना केली तर मिडीयाच्या दृष्टीने ती ‘धमकी’ कशी होते? काय चुकीचे केले त्याने?

शिवाजी महाराजांनी आपल्याच मुलुखात घुसुन मुजोरी करणाऱ्या शाहीस्तेखानाची बोटं तोडली. मग माजलेल्या ‘आबु आझमीच्या’ कानफाटात लावल्यावर ते चुकीचे कसे?

एका नॅशनल टि.व्ही. ला दिलेल्या मुलाखतीत त्याने संपुर्ण मराठीचा वापर केला. समोरचा माणुस हिंदी, इंग्रजीतुन प्रश्न विचारत होता आणि राज ठाकरे त्याला मराठीतुनच उत्तर देत होता. जमत नसतानाही तोंड वेडी वाकडी करत हिंदी/इंग्रजीतुन मुलाखती देणाऱ्या नेत्यांसमोर ही मुलाखत खुपच छान वाटली.

राजने जे बोलले ते करुन दाखवले. नुसत्या गर्जना नाही केल्या. आज महाराष्ट्राला खरंच अश्या नेत्याची गरज आहे जो जे बोलेल ते करुन दाखवेल.

जातीय वाद हा प्रादेशीक वादापेक्षा नक्कीच वाईट आणि राजने जातीय वाद केलेला माझ्या तरी स्मरणात नाही.

प्रश्न अनेक आहेत. कदाचीत ते चुकीचे सुध्दा असतील. राज ठाकरेने पत्करलेला मार्ग काही अंशी चुकीचा असेलही पण पुर्णपणे चुकीचा नक्कीच नाही.. आय.एम.एच.ओ (इन माय ऑनेस्ट ओपीनीयन)

हा लेखामुळे कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतु नक्कीच नाही, तरीही कुणाला वाईट वाटले असल्यास मी मनापासुन माफी मागतो

Advertisements

53 thoughts on “मराठीचा मुद्दा चुकीचा कसा?

 1. राजने पत्करलेला मार्ग चुकीचा नाहीच, हे अबू आझमीच्या प्रकरणावरून स्पष्टच झालेलं आहे. जे आपलं आहे, ते सरळ मागून मिळत नसेल, तर जी कृती केली जाते, त्याला गुंडगिरी म्हणणे शंभर टक्के चुकीचं आहे.

  1. प्रतिक्रियेबद्दल आभार कांचन.

   बाळासाहेबांना नावं ठेवली म्हणुन शिवसेनेने आता आबु विरुध्द बंड पुकारले आहे. त्या दिवशी काय झालं होतं मग, मुग गिळुन बसायला जेंव्हा तोच आबु महाराष्ट्राला, मराठीला डावलु बघत होता.

  1. अगदी खरं अजय. मला पटलं ते तो जे काही बोलला तसा वागला. त्याला राजकारणंच करायचे असते तर असा ‘राडा’ नसता केला. परीणामांची चिंता करुन गप्प नसता का बसला!

   खादी-कुर्ते घालुन फिरणाऱ्या पुळचट नेत्यांपेक्षा शर्ट-पॅंन्ट मध्ये वावरणारा तडफदार राज मला तरी फार भावतो.

 2. किती दिवसानी लिहीलस पण खणखणीत मुद्दे असणारं मस्त पोस्ट टाकलस!!!!

  1. धन्यवाद तन्वी. गेले काही आठवडे कधी आले आणि कधी गेले कळलेच नाही. ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. टि.व्ही. वरील त्यान-त्याच बातम्या बघुन इतकं डोकं सटकलं होतं म्हणुन शेवटी त्यावर टाकली एक पोस्ट

   प्रतिक्रियेबद्दल आभार

 3. तुमच्या प्रादेशिक वाहिन्यांच्या मुद्द्याला जोडुन पुढे – जेंव्हा हॉलीवुडचे चित्रपट भारतात प्रदर्शित होतात तेंव्हा ते हिंदी बरोबर तमिळ आणि तेलगु मध्ये पण डब केले जातात. का? तर त्या लोकांना हिंदी कळतं नाही. तेंव्हा हिंदी राष्ट्रभाषा आहे हे लक्षात नाही राहात? प्रत्येक भैय्याने आपले घर सोडल्यावर प्रथम चेन्नईमध्ये एक वर्ष काढले पाहिजे. मगच मुंबईला या. मग कळेल मराठी माणसे गुंड आहेत की सॉफ्ट आहेत ते?

  1. मनातलं बोललास सिध्दार्थ. आणि रामदास आठवले दलितांचा पक्ष बनवुन त्यासाठी लढतात मग राज ठाकरेने मराठीसाठी पक्ष काढुन त्यासाठी लढले तर कुठं बिघडलं. त्याने तसे केले तर मग ते ‘राज’कारण म्हणुन नावाजले जाते, मराठीचा मुद्दा मत मिळवण्यासाठीच आहे असे म्हणले जाते. का?

   1. ha ramdas aathwalencha mudda ekdum fit basto udaharan denyasathi, shiway raj thakre jatiyawadi nahi yabaddal khoop changala watata, nahitar bhartat aajparyant jati warunach sagale galat gelet

 4. Aaaila sahi aahe post ekdam. ajibaat diplomatic na banata je vaatel te bedhadak pane lihilay saral. like the post for that………
  Aand also agree with Sidhart’s comment.

 5. आजच्या पेपर मध्ये पुण्यातील एक ‘सद-गृहस्थ’ लिहीतात

  गांधीजींसारखे नेते उघड्या अंगाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देश भर फिरले आणि आता चे नेते अंगावर दोन-दोन किलोचे दागीने घालुन मिरवत आहेत हे पाहुन मनसेचे आणि त्यांना मतं देणाऱ्या मतदारांचे वाईट वाटते वगैरे.. (रमेश वांजळेंना उद्देशुन होते हे)

  मला पहिल्यांदा हासुच आले त्याचे आणि मग किव करावीशी वाटली.

  रमेश वांजळे काय त्याच्या ‘बा’ च्या पैश्यातुन दागीने घालुन फिरतो का? तो त्याचा स्वतःचा पैसा आहे आणि त्याचे त्याने काय करायचे हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.

  गांधिजी उघड्या अंगाने फिरले मग म्हणाव तु पण फिर ना उघड्या अंगाने. तुला दागीन्यांचा एवढा त्रास आहे तर काढ ना घरातले दागीने बाहेर आणि कर अर्पण देश्यासाठी.

  आणि तुम्हि मनसेला मतं नं देउन काय झाले हे इतके वर्ष बघतोच आहोत आपण. देश्याचा लाखो रुपायांच्या पैश्याचा चुराडा करत शपथविधीसाठी बांधलेले मांडव पडुन होते.. का? तर केवळ मलई-दार पद मिळवण्यासाठी ह्या सद-गृहस्थांनी निवडुन दिलेले सरकार भांडत होते, त्याबद्दल काय?

 6. अनिकेत,नमस्कार
  मराठीचा मुद्दा चुकीचा कसा लेखात व्यक्त केलेल्या मतांशी मी सहमत आहे. तामिळनाडू, कर्नाटक आदी ठिकाणी जितका भाषाभिमान दाखवला जातो, त्या तुलनेत आपण मराठी माणसे कितीतरी सहनशील आणि सहिष्णू आहोत. त्याचीच फळे आज आपण भोगतोय. पण मला लेख आवडला.
  माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या ब्लॉगवर अबूप्रकरणी मी उलट्या बोंबा हा लेख लिहला आहे. जमल्यास वाचून आपलीही प्रतिक्रिया कळवावी.
  बाकी आपले लेख अधूनमधून नियमितपणे वाचत असतो. मला आवडतात.
  शेखर

  1. शेखर, अनिल, दिपक, भाग्यश्री, प्रविण, देवेंद्र – प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

 7. Sahi aniket bhau….
  agadi aaj pratyekala je watat aahe tech tumhi lihilat……
  pratyek news channel rajsahebanchya virodhat ani tya IBNLOKMATCHYA wagalena kay bolayche.Ekikade media mhanto aamhi khara te dakhavto ani dusrikade manala yeil te baraltat agadi marathi media suddha.Are te UP wale bolale
  mumbaikarancha mendu sadlay…….tenvha sagale gappa basale ekte rajsaheb fakt virodhat hote..tenvha media la shahanpan nahi suchale nirbhid patrakarita karayche…………ani raj saheb jara kuthe marathi manasabaddal bolalae ki lagech hech media wale bolnaar raj thakre desh todtahet.he itar sarv pakshatale marathich ahet ka ashi shanka yete aaj kal………ya nirlajjanmule aaj maharashtrat marathi manoos martoy.vidhansabhetil mansevarchi karvai sudhha pakshapatipane keli geli.ya sarkarcha dhikkar aso……..Jai Manase……..jai maharashtra
  RAJSAHEBANCHA VIJAY ASO
  -Kunalahi dukhavinyacha mazahi hetu nahi kuni dukhavale gelyas kshamaswa…ANIKET manatil bhavna moklya karayla dilyabaddal abhari aahe…….

 8. राज ठाकरेचा मुद्दा बरोबरच आहे. आणि हे सगळे ” लाथोंके भूत बातोंसे नहीं मानते ” यातच मोडतात. तेव्हां यांना जर याच भाषेत समजावलेले कळणार असेल तर मग तसेच समजवायला लागणार. दुसरे असे की हे सगळे भय्ये स्वत:चे घर सोडून सारखेच का दुस~याच्या घरात घुसत आहेत…
  अनिकेत लेख मस्त झालाय रे.

 9. पूर्ण पणे सहमत. राज यांनी मराठी मराठी केलं कि देश तुटतो, कन्नड तमिळींनी त्यांच्या राज्यांत असलं काही केलं कि देश तुटत नाही. बंगलोर (सॉरी बंगळूरू) मध्ये आणि चेन्नई मध्ये असताना त्यांचं भाषाप्रेम फार जवळून पाहिलयं. चेन्नईत हिंदी पाटी लावणाऱ्याचा मी जाहीर सत्कार करायला तयार आहे.
  इतकी वर्षे या सर्व पक्षांनी काय केलं. मनसेला अंशत: संधी मिळाली अन त्यांनी आपला प्रचारतील मराठीचा मुद्दा केवळ प्रचारात राहणारा नव्हता हे दाखवून दिलं. झालं ते चूक की बरोबर हा भाग अलहिदा, पण प्रत्येक खरा मराठी माणूस त्या अबू टेररिस्ट्च्या कानपूरात जळगाव काढल्याने नक्कीच सुखावला असणार.

 10. atishay = lihile aahes 🙂 tya ….. abu azami cha satkar aahe mhane UP madhe Hindi madhe bolal la mhanun ….
  South madhe koni sudha hindi bolat nahi mag tyanche kase chalvun ghetale jate sagali kade ka marathi galchepi ……

 11. Aniket Dada,

  Tumache sagale Mudde ekdam barobar aahe, Media ani eatar lokaanni chalu kelele vadal ya baddal mi ekch mhan mhanu ichhitio ti pan Hindi tun “Hathi Chale Bazaar, Kutte Bhoke Hazzar”

 12. गेल्या वर्षी कलेक्टर कचेरीवर जी मोडतोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली त्याची भरपाई म्हणुन राज ठाकरेने ५२ हजार रुपये जमा केले ही बातमी का मग झाकोळली गेली? …..thanks for this information

 13. —-रमेश वांजळे काय त्याच्या ‘बा’ च्या पैश्यातुन दागीने घालुन फिरतो का? तो त्याचा स्वतःचा पैसा आहे आणि त्याचे त्याने काय करायचे हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.—–

  अनिकेत,
  लय्य्य्य्य भारी…
  बाकी लेख एकदम मर्मावर बोट ठेवणारा आहे. हे सगळे त्या ’राज ठाकरेने फिर उगला जहर’ किंवा ’मनसेकी गुंडागर्दी’ किंवा ’राजके लोगोंके तेवर तो देखे’ वगैरे पक्षपाती बातम्या देणार्‍या हिंदी चॅनेलवाल्यांनी वाचले पाहिजे आणि समजावून घेतले पाहिजे…
  आणि कहर म्हणजे काल संघाच्या भागवतांनी मराठी अस्मितेवर लढणार्‍या लोकांवर टीका केली !!!!
  पण मला वाईट एकाच गोष्टीच वाटतयं की मराठी मातीत जन्मलेले, महाराष्ट्राला आयुष्यभर ज्यांनी लुबाडून खाल्ल असे मराठी नेते मात्र ’राज’ च्या पाठीशी उभे रहायचे सोडून मतांसाठी त्याला विरोध करत आहेत.. शेम…शेम…शेम…

 14. mazya mate marathi manase (men) ya sarvala jababadar aahet. kiti marathi manase ek mekala marathi tun boltat, aadi aapn sarvani marathi cha aagrha dharala pahije mag baghu hi upare marathi kase shikat nahit tey.
  Jay Maharashtra

 15. आणि मी म्हणतो बॅकेत मराठी मुलांना प्राधान्य देण्याची मागणी केली तर त्यात चुकलं कुठे?

  उद्या आपले आई-वडील, आज्जी-आजोबा बॅकेत गेले आणि काऊंटरच्या पलिकडे बसलेल्ल्या माणसाला मराठी समजत नाही म्हणल्यावर त्यांनी काय करायचं? तोडक्या-फोडक्या हिंदी आपलं म्हणणं त्याला समजावत बसायचं? आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या विचीत्र हिंदी बोलण्याबद्दल टिंगलेस पात्र व्हायच? का?

  मागच्या आठवड्यात मॅक-डोनाल्ड मध्ये गेलो होतो, घरी येताना ‘टेक-अवे’ भागात जाऊन म्हणलं. ‘चार बर्गर बांधुन द्या’

  समोरचा तोंड वाकडं करुन बघत होता, शेवटी ओशाळुन म्हणाला ,’मराठी समजता नही!’

  जाम मज्जा आली.. वाद घालावासा वाटत होता खरं तर.

 16. Hich tar khari gochi aahe na ANIKET bhau
  Tyana marathi yet nastanahi maharashtrat yeun te paise kamavtat……..
  ARE Maharashtrat marathi yeu na shaknara abu aazmi crorepati hoto ani nivdun yeto….ase Dusarya ekhadya rajyat hoil ase vatat nahi………..Ani varun aamche sarkaar nebhalat…….
  ATA FAKT RAJ CHE RAJ AALE PAHIJE

 17. tuza mhanan agdi barobar ahe, pan mukhya problem ha ahe ki aplyatach eki nahiye, aplyatlech anek bindok buddhivadi tyanchya bajune boltat. aarakshan kasa garjecha ahe he jad-jad bhashet sangat firnare anek bramhin sapadtil tula, tasach maharashtriyans baddal sudha, aaj baherun alele mansa hinditach boltat dhanda kartat, ani aplyatle anek lok garaj tyana asun hi todkya modkya bhashet hindi bolun vastu vikat ghetat, tyana jar ithe yeun dhanda karaycha asel tar tyani marathi shikayla nako ka? pan ya sathi apan swataha marathicha abhiman balgayla hava, punya sarkhya thikani tar marathi bolna mhanje magaswargiyatech lakshan hou pahatay saglikade engrajaleli marathi (shikshan pandharit). tikde south madhe jaun paha. badal hou pahatayt ata tari ek hovuya…….jay manase………….

 18. तुमचे सर्व मुद्दे पटले, हिंदी वृत्तवाहिन्या का राज ठाकरे चा विरोध करतात ते तर उघडच आहे…त्यांचा प्रेक्षकवर्ग फक्त बिहार, उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.
  त्यांना कुठे आपल्यासारख्या प्रादेशिक (आणि दर्जेदार) वाहिन्या उपलब्ध आहेत. (दर्जेदार असल्यावर त्यांना कळणार नाहीत हे देखील तितकेचखरे)

 19. abu azmi chya chapaleche kaya?
  abuazmi ya ne manase chya amdaravar ugaralelya chappaleche kay, tychya var pan karvai vyalach pahije , tyal pan nilambit ka nahi kele , mns vale doshi ani abuazami tevdha shahana ka/

 20. Barobar aahe Anand…Abu aazmine chappal dakhawali ha mudda koni uchalala nahi…….Mediala fakt marathisathi bhandnare Manase che umedwarch disale……..Ani ho hya saglyat marathi media suddha rajsahebana doshi tharwat hota…….Media sobat charcha karayla kon congress ani rashtravadiche mantri……te kay mhantat tar manase che krutya lajirvane……………………
  Are jya pakshala bahumat astana tyani keval malaidaar khatyansathi janateche lakho rupaye udhalale ,tyani he sangaychi garaj nahi ki maharashtratil lokani kaay karave.
  Ani congress rashtravadine khup changale kaam kele ase nahi….Mazya mahitinusar Aaghadi sarkarchya kalat maharashtrat jast dangli zalya,Tata Nano,BMW sarkhya Sandhi daar thotavat astana he fakt dillishwarnchi marji rakhnyat gung hote….te project maharashtrat ale aste tar…
  Shevati mala eka gosticha dukha watate….asha akaryaksham sarkarla lokani bahumat dile……ata pudhaci 5 varshe bhogave lagnaar…..Pan raaj saheb naakich sarkar var ankush thevtil ashi asha aahe

 21. Ho Agadi Barobar Aahe tumche….

  Payakhalchi valu sarku lagali ki rajkarani manse…mag Hat marayala suruvat kartat tyatala ha prakar. ( AAzmi Cha)

  Jyana Marathitun 3-4 olinchi shapath gheta yet nahi te Aamachya var rajya karu pahatat…Ka ? Kasya Sathi? Aaplay Mantryna tyache Kahi Nahi (?).

  Jya AAichya kushitun janma zala ti Aai mothi…Pahilyanda aaplya tondatun baher padalela Pahila Shabd …MArathitun Hota…..Tya Matru bhashecha jar koni apman kela tar tyala ~~~~~~~~

  Je Kahi Zale te Yogyach Hote…

  Raj Saheb Tumhi aahat…aamhi pan tumchya barobar aahotach.

  Jai Maharashtra.

 22. kharach ……………….mazya marathi bandvano ekatra ya .

  manse madhe pravesh karu ya.
  aapli boli aapla bana.
  Raj saheb tumhi maharastrat
  MARATHI aana

 23. महाराष्ट्र मध्ये मराठीचा आग्रह नाही करणार तर कुठे, मराठीचा मुद्दा फ़क़्त राज ठाकरे उठवत आहेत असा जे चित्र मेडिया वाले रंगवत आहेत त्यांना कदाचित माहित नसेल कि तमाम मराठी जनतेचे हेच म्हणणे आहे कि महाराष्ट्र मध्ये मराठीचा सन्मान हा झालाच पाहिजे, महाराष्ट्राला वेळोवेळी राष्ट्रनिष्ठा शिकवण्याचे काम करणार्यांनो एकदा या महाराष्ट्राचा इतिहास तपासून घ्या आणि मग हिम्मत करा आम्हाला राष्ट्रवाद शिकवण्याची,

  तुम्ही मांडलेले मुद्दे बरोबर आहेत पण या लेख मध्ये तुम्ही जातीय आरक्षण आणि महिलांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची इथे गरज नव्हती, आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे त्यावर सविस्तर चर्चा होऊ शकते, पण जेव्हा आपण सबंध मराठी माणसांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा पुन्हा जाती-पातीचा उल्लेख करून त्यांच्या मध्ये दुही निर्माण होऊ शकते.

  बाकी राज साहेबांनी उंचावलेला आवाज हा तमाम आकार कोटी मराठी जनतेचा आवाज आहे तो दाबण्यासाठी असे कित्ती हि अबू आझमी जन्माला आले तरी तेशक्य नाही.

  आणि आपण म्हणल्या प्रमाणे मी सुद्धा मेडिया चा निषेध करतो , एक कल्ली बातमी देवून अमराठी लोकांमध्ये मराठी जनतेची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे..

  असो .. तुम्ही स्टार माझा च्या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.

  जय महाराष्ट्र
  अमोल सुरोशे

 24. सर्वप्रथम तुमच्या अनुदिनीला पारितोषिक स्टार माझा कडून मिळाल्याबद्द्ल तुमचे अभिनंदन ..
  [though star maza is just media gimmick to attract marathi people and earn money nothing else.]

  दुसरी गोष्ट की तुम्ही इतका चांगला लेख लिहीलात पण शेवट अनावश्यक माफी मागितलीत. तुम्ही जे मांडलंत त्याच्याशी मी सहमत आहेच पण् ते मत ऐकून कोणी दूखावले तर तो त्यांचा प्रश्न आहे. आता कुठे blogs ना लोक वाचू लागले आहेत त्याना अंतरजालाच महत्व पटू लागलं आहे. तुमची ही अनुदिनी उत्तरोत्तर अशीच वाचकांना आनंद देत राहील यात शंका नाही ..
  धन्यवाद आणि मना पासून अभिनंदन.

 25. Namaskar Mitra,

  Atishay uttam likhan, aapn je mudde lihile aahet te hi kharach hangle ghetale aahe, pan kai karayche he sarv mudde bakichay lokana samjat nahit, tya madhe jast karun congress aani rastravadi congress jyana kalte pan valat nahi, eka pardeshi nagrikachya talawar nachat aahe, hya congressi lokanamule maharajache je swapna hote te purn honar nahi, maharajani sarvana samjale hote aani raj hi samjat aahet, fakt baki manase bhiyaa ha shabd aiktat te 15 varshe aikat nahit bahuda tyanchya kanpurata uposhan chalu asel, jaude kadhi tari aiktil, thokar laglyavar samjel..aapan aaple kam karuyat aani raj thakrenna madat karuyat pudhache paul aaplech aahe ……

  Vishal Pise
  Bhangerwadi Adhyksha (Ward 21)
  Lonavala
  Maharashtra Navnirman sena

 26. हो बरोबर आहे, आपल्या मराठी माणसांचा प्रोब्लेम काय आहे ना. त्यांना कुणी साथ द्याची म्हटली कि लगेच त्या माणसाला चुकीचं ठर्वाय ची. आज किती मराठी माणसा त्या अबू ची बाजू घेऊन बोलतात. त्या ची लायकी तरी आहे का विधान सभेत उभी राहण्या ची पण त्याला आज किती मान (हा अबू मुंबईकर) आहे आणि राज ठाकरे गुंड. मराठी माणूस आपल्या माणसाला साथ देत नाही तर बाकी कोण त्यांना साथ देणार. तो आबू काय पण आजून किती नेते असे आहेत ज्यांना विधान सभेत उभेच करायला नको पण आपण त्यांच्या विरुद्ध कधीच आवाज उठवत नाही आणि आज असा एक माणूस आला आहे ज्याची मुंबई ला खरच गरज आहे. राज ठाकरे गुंडगिरी करतो आणि बाकी सर्व साधू संत आहेत. आज मिडिया मध्ये बोल्नार्यान पैकी कितीतरी लोक मराठी असतील पण त्यांना पण स्वताचा भाषेचा आभिमान नाही. आज मराठी माणूस डोळे बंद करून बसला आहे. कधी उघडणार देवजाणे.

 27. पण हे न्यूज़ वाल्यना का समाजात नाही.
  सामना बरोबर सागितएल उनम्मत हत्ती.
  त्याना फकत कोणे कोणे काही बोलेले का त्याचा इशु करायाच. आणि सान्ध्यकाळ झलली की ओरडत बसायच .पण त्याचा विचार नाही करायचा. असे प्रगतिशील विचार नाही च. हे मीडीया वले मॅहणजे ” तोड्ड दाबून मुकायच मार आहे” याचा बद्दल कही बोलायच नाही. आणि कोणी म्हटले तर त्याचा समाचार घ्यायच.

 28. waaa… apratim. agadi manatla bollat…

  me sadhya bangalore la mba karat aahe. ata sahajik ithe deshbharatun mula ali aahet. bharpur vela raj thakre chukicha kasa he sangnyat yeta..pan apli baju mandun kahich fayda nasto karan ithe marathi manus minority madhe asto…
  ithe bharpur tamil pora hi aali aahet..ani shokantika mhanje tyana tamil va english shivay bhasa yet nahi…”hindi” he apli rashtriya bhasha he suddha yet nahi kiva ti shiknyacha prayatna hi karat nahi…

  sangnyacha mudda asa ki marathi manasane awaj uthavla ki to “gunda” to “deshdrohi”..pan mag hya south chya lokancha kaay???

  sarkha hindi che dos aplyalach ka pajle jatat… jau de manat bharpur bolnya sarkha aahe…

  baaki je lihilay te zhakaas…

 29. अनिकेत,
  आजच आपला ब्लॉग पहाण्यात आला.
  मराठीचा मुद्दा ही काळाची गरज आहे.
  मला राज ठाकरे यांचे सर्व मुद्दे पटतात.

  मराठी माणसाच्या पराक्रमाचा दबदबा पानिपतच्या तिसर्या युद्धा पर्यंत देशभरात होता. तसेच स्वातंत्र्यासाठी मराठी माणसांनी जे प्रयत्न केले आहेत ते पण सर्व देशाला माहिती आहेत. या सर्व कारणांमुळे इतर राज्यांना महाराष्ट्राबद्दल भितीयुक्त आकस आहे, आणि ते आपली गळचेपी करत आहेत. खुद्द शिवाजी महाराजांनी मराठी भाषेवर झालेले अरबी/फारसी चे आक्रमण कमी करून भाषा नियमितीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते.

  राज ठाकरे यांनी राजकारणासाठी हा मुद्दा घेतला आहे,
  असे अनेकजण म्हणतात. तसेच त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली असेही म्हणतात. आपले याबाबत काय मत आहे ? कारण राज यांचे सर्व मुद्दे पटणारे असुनही या आक्षेपांना काय उत्तर द्यावे कळत नाही.

  धन्यवाद,
  महेश

  1. असे अनेकजण म्हणतात. तसेच त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली असेही म्हणतात. आपले याबाबत काय मत आहे ?

   मला वाटतं, उत्तर अगदी साधं आहे. राज ठाकरेंचा इतर भाषा शिकायला विरोध नाही. त्यांचा विरोध आहे महाराष्ट्रात राहुन इतर भाषांच्या वापराला. त्यांच म्हणणं इतकेच आहे, जिथे रहाता तेथील भाषेचा मानं राखा. ते हिंदी किंवा इंग्रजी भाषा शिकु नका असे कधीच म्हणत नाहीत.

   उद्या राज ठाकरेंची मुलं इतर देश्यात कामानिमीत्त गेली तर त्यांनी तिथे इंग्रजी भाषाच वापरावी, असेच त्यांचे मत असणार आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमात शिकणे काही गैर नाही, नाही का?

 30. Raj Thakre yana marathi panach mudda ka mandawa lagtoy aaj? karan baki sare lok ithe yeun marathi manasachya pudhe nighlet, yat kewal tyancha kawebaj panach nahi tar marathi mansachi nishkriyata pan karnibhut aahe. ekhadi gosht aaplyala kayamchi sadhya karaychi asel tar tatpurti dhadpad karnyapexa aapan uthun jagrut houn tyana mage takle pahije, mhanje ithe tyana kam aani yash milayacha band zale ki te aapoaap baher jatil. pan tyasathi pratyek marathi mansala, jaat paat sagala wisarun swatahachya udharasathi zatawa lagel tarach aapan maharashtracha udhar karu shaku. nahi tar aaplyala asach nehami ladhat basawa lagel tyat na aapla bhala honar aahe na vikas
  he maze vyaktik (personal) wichar aahet, aani yatun mala kunala hi dukhawayacha hetu nahi, ase zalyas krupaya mafi asawi….

 31. Striyan sathi aani jati dharmavar aarakshan asu naye….ya muddyacha jar war war vichar kela tar purushi ahankar aani jatiya wadacha waas yeil pan sadya paristhiti madhe ashya kahi mahanagarpalika aahet jyancha mananiy mahapour bai saral chuliwarun uthun khurchiwar basalelya aani tyanchya nawane tyanche naware lok karbhar karnar. mag aapan striyana aani jatiya aarakshana deun kay milawat aaaheot…. bhrashtachar karnyasathi aankhi ek marg … dusara kahi nahi… hi gosht saglya striya babat khari nahi karan aniket jasa mhanala tashya sabal striya hi samajat aaple sthan pakke karun aahet tyana kontyahi aarakshanachi garaj watli nahi hich gosht khari tharte ekhadya hushar pan open categoru madhlya vidyarhti warga sathi. ya saglya uhapohatun yewadhach nishkarsha kadhayacha aahe ki jar ekhadya vyakti kade gunawatta asel tar tyana kontyahi kubadichi jarurat bhasat nahi.
  stri aani jatiya aarakshana babat aniket ne mandlela mudda khupach molacha aahe.

  krupaya maze he mat vyaktik aahe aani kunachyahi bhawana dukhawinyasathi nahi, bhawana dukhawalya astil tar mafi asawi

 32. mi sudha raj chya barobar ahe. kalji fakt avdhich vatate ki raj sudha eter netyan pramane satta hatat alyavar tond tar nahi na firvnar.
  asa vichar karnari khup lok ahet tar tyan sambhala.
  me tuzyasobat ahe raj

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s