डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

..अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं!

12 Comments


खरं सांगतो, आम्ही आय.टी. वाले ना, जरा अती-शहाणे असतोच, पण तितकेच गॅडेट्स्च्या इतक्या आहारी गेलेलो असतो ना की एखाद्या दिवशी ह्या टेक्नॉलॉजीने ‘राम’ म्हणले तर आमचं काही खरं नाही.

आज अस्संच काहीसं झालं त्याचा हा किस्सा.

एक नविन ऍप्लीकेशन लिहायचे होते त्यासाठी मॅनेजरने मिटींग बोलावली. समोरच्या पांढऱ्या फळ्यावर निरनिराळ्या आकृत्या, टिपण्या, कल्पना, लॉजीक्स लिहीली जात होती. अर्थात हे सगळे मलाच करायचे असल्याने ते लिहुन घ्यावे म्हणुन मी कागद आणि पेन सरसावुन बसलो.

मॅनेजरने एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि म्हणाला, ‘अरे लिहीतोस काय सगळे? आपली मिटींग संपली की मोबाईलने ह्याचे फोटो काढु, मग ते मी तुला ई-मेल करतो आणि त्याचा संदर्भ घेऊन तु एक छानसे डॉक्युमेंट बनव!’ मी सुध्दा खुश झालो, म्हणलं चला हे सगळे लिहीत बसण्याचा त्रास वाचला आणि परत फारसं लक्ष नाही दिलं तरी चालते आहे. नंतर फोटो बघुन कळेलच काय लिहायचे आहे ते.

पुढचा एक तास अगदी मस्त, आरामात गेला.

मिटींग संपली. बाहेर आल्यावर मस्त कॉफीपान करुन आलो. खुर्ची ओढली, संगणक चालु केला आणि इन-बॉक्स उघडला. “आली.. मेल आली..‘, लगेच सगळे फोटो संगणकावर उतरवुन घेतले. ते चालु असतानाच मेल वाचत होतो..

माफ कर मित्रा, मोबाईलमध्ये काहीतरी गडबड झालेली असल्यामुळे फोटो निटसे आले नाहीत त्यामुळे तुला आठवत असेलच, त्यावरुनच डॉक्युमेंट लिहुन टाक

तरी म्हणलं, ‘ठिक आहे.. मोबाईलचे फोटो तसेही काही वेळेस निट येत नाही. अगदी प्रमुख मुद्दे वाचता आले तर खुप झालं’

पण फोटो बघीतले आणि उरले सुरले अवसानच गळुन गेले. का? तुम्हीच बघा फोटो कसे आले आहेत ते. जसेच्या तसे इथे जोडत आहे. साईझ सुध्दा तोच बरं का! मी रिसाईझ वगैरे काही केले नाही. जसे फोटो आले आहेत तस्सेच जोडले इथे.

बरं मित्र असता तर दोन शिव्या तरी घातल्या असत्या. मॅनेजरला कुठल्या तोंडाने म्हणु मिटींगमधले मला आठवतं नाही म्हणुन?

आत्ता तुम्हीच सांगा, कसं काय लिहु डॉक्युमेंट? चांगलं लिहीलं असतं कागदावर तरं ..अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं!

अरे रामा, कृष्णा, गोविंदा, परमेश्वरा वाचवं रे बाबा.

Advertisements

12 thoughts on “..अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं!

 1. Hahahaha… white balance hukala photos cha…

 2. हा हा हा, लै भारी किस्सा आहे.
  हे साले बॉस लोक असेच ऐनवेळी गोची करणारे असतात …

  बाय द वे, एक सजेशन देतो.
  मस्तपैकी एक “चायनीज, मँडेरीन किंवा इन्का स्क्रिप्टचे डोक्युमेंट” बनवुन टाक आरामात आणि ते “माफ कर मित्रा, सॉफ्टवेअरच्या स्किप्टमध्ये काहीतरी गडबड झालेली असल्यामुळे अक्षरे निट दिसत नाहीत त्यामुळे तुला आठवत असेलच, त्यावरुनच रिपोर्ट बनवुन टाक‘ ह्या कमेंटखाली दे पाठवुन …

  पाहु तरी मज्जा !!!

  – बॉस ( छोटा डॉन )

 3. आता काय , काम सोप्पं झालं, काहिही लिहायचं अन म्हणायचं असंच डिस्कस झालं होतं…. 🙂 कोणीच ऑब्जेक्ट करु शकणार नाही.

  • हा हा हा, हे तर मला सुचलचं नव्हतं, बेस्ट कल्पना

 4. ह्याला म्हणतात “करून गेला गाव आणि बाबूरावचे नाव”…

  अजुन एक सजेशन. हे फोटो CID कडे (सोनी टीव्हीवरच्या बरं का) पाठवून द्या. ते कागदाच्या राखेतूनपण कागदावर काय लिहले होते हे शोधून काढतात. तुमचा तर किंचित resolution आणि clarityचा प्रॉब्लेम आहे.

 5. अजुन एक सजेशन. हे फोटो CID कडे (सोनी टीव्हीवरच्या बरं का) पाठवून द्या. ते कागदाच्या राखेतूनपण कागदावर काय लिहले होते हे शोधून काढतात. तुमचा तर किंचित resolution आणि clarityचा प्रॉब्लेम आहे.

  हा हा हा, लै भारी सिद्धार्थ

 6. आता थोडा वेळ डोकं खाजवा आणी जो पहीला विचार डोक्यातुन निघेल तो लिहुन टाका रिपोर्ट म्हणुन….! 😀

 7. bari ahe,
  pan bagh vishay firun parat tithech yetoy tula eka changlya camerachi garaj ahe 🙂

 8. ही मोबाईलवर Minutes of Meeting घ्यायची आयडीया मी Thermaxमध्ये असताना २००६ साली coin केली. बर्‍याचश्या मीटींग अश्याच पार पडल्या. एका महत्वाच्या मीटींगला मात्र तुझ्यासारखाच problem झाला. मेंदूला ताण देऊन देऊन लिहून काढले. कुणालाच काही विशेष आठवत नसल्याने चालून गेले 😀

 9. अनिकेत..
  मला मायबोलीवर कळलं की तुझ्या ब्लॉग ला स्टार माझा च्या स्पर्धेत प्रथम परितोषीक मिळाले आहे…
  अभिनंदन…
  असेच लिहीत रहा…

 10. lai bhari…….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s