लाईफ़ इन आय.टी.


कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो. बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.

भयाणं.. अंगावर दडपण आणणारा..

आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.

इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी.

कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.

बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट ‘येल्लो फ्लॅग’ मधुन ‘रेड फ्लॅग’ मध्ये गेल्याची बातमी देत असते.

भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

‘कॉफी?’ संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,

‘नो यार, बिट बिझी! लॅटर’
‘ऑल राईट, सी या’
तुमची विनोद बुध्दी जागृत होते, तुम्ही तेवढ्यात त्याला म्हणता, ‘cya म्हणु नकोस, त्याचा अर्थ वेगळा होतो, खोटं वाटते तर गुगल वर cya शोध’

तुम्ही मान उंचावुन त्याच्याकडे बघता, त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन तुम्हाला हासु येते.. क्षणीक.. आणि परत कामात मग्न होता.

दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.

दुसऱ्या क्युबीक मधील एका कन्येशी तुमची नजरानजर होते. ती दोन्ही डोळे मिचकावुन एक हास्य फेकते. तुम्ही हास्य देऊन परत इतरत्र पाहता. मानेवरुन फिरणारे हात, नखांचे कुरतडणे, बोटांची टेबलावर लयबध्द टिक-टिक. प्रत्येकाचंच घोडं कुठेना कुठे अडलेले असते.

संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. ‘कॅन यु कॉल मी नाऊ’ क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. ‘साले, रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.’

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.

आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक ‘एस्कलेशन’ येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, ‘आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?’

थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, ‘आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.’

शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.

‘बाबा मला सायकल शिकवा ना..’ पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.

दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.

क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.

कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.

तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.

कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, ‘अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.’

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. ‘लकी गाय’, त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?

मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.

थांबला तो संपला….

समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.

कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.

तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन ‘बकरा’ रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..

‘जा रहे हो?’
‘हा सर!’
वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..
‘अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?’

त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….

Advertisements

40 thoughts on “लाईफ़ इन आय.टी.

 1. अक्शरश: अंगावर काटा आला हे वाचुन…

  मी देखील ७ वर्शे याच वातावरणात काढ्ली आहेत….
  जायची वेळ पक्की….घरी कधी येणार..???? माहीत नाही…
  Inbox मधे mail आली की पोटात धस्स!!! आता काय नवीन?

  मागच्या वर्शी मात्र हे सर्व सहन करणे अशक्य झाले आणि अखेर I T ला राम राम ठोकला…

  सर्व मित्रमॆत्रिणी विचारतात “एवढ्या पगाराची नोकरी का सोडलीस?”
  त्यांना कसे सांगायचे की जेव्हा ३ वर्शाच्या मुलाला घ्यायला मी त्याच्या शाळेत जाते तेव्हा त्याच्या चेहर्र्यावरचा आनंद बघितला की जे समाधान वाटते त्याची तुलना पॆशाशी करणे निव्वळ अशक्य आहे….

  There are some things money cant buy….हेच खरे…

  मनाली

  1. Khup changla nirNay ghetlas manali! shewati he dushtchakra kadhitari bhedaylach hav na?
   shewati ‘sukh’, ‘samadhan’, ‘aanand’ ya wegweglya goshti aahet aani wyakti saapeksh badlataat. Pan ya niragas balanchi premachi bhuk matr ‘universal constant’ aahe na? tithe alternatives asu shakat nahit.
   khup lihita yenyasaarakh aahe ya baddal. pan ithech thambte.

  2. great !!!! IT che lok nokari sodu shaktaat he vachun ashcharya ani anand vatala….

   manajog kam karanyasarakha dusara anand nahi 🙂

 2. Congrats Manali for taking the right decision at right time! I dont work in IT but i m facing similar situation and cant think about leaving the job.

 3. आय. टी. मधल्या एका दर्दी बापाची कहाणी वाचून मन गहिवरलं…
  हे चित्र कधी बदलणार नाही का.. ??

 4. IT che INSIDE STORY hai he…
  sagale mantat graduation kashat karnar IT , Computer
  pan atale paristiti far vagale hai….pan apan samajala che rhun phedanas asamartha hoto…manse , natevaik hasana, bolana visrtrun jato… fakata ghany la jumpalayvane kam.

 5. खरय…. आय.टी. मधे रहायचा तर हे सगळ ओघानी येत. आपण सोडू शकत नाही माहित असत आणि पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो.

 6. खरच यार मनातलं लिहिला आहेस सगळं. आपलं सगळं आयुष्यच मेकेनिकल होऊन बसलं आहे. कधीतरी वाटत कि नको तो पगार, नको ते टेनशन, पळून जावे कुठेतरी दूर. हे एक दुष्ट चक्र आहे आणि त्यात आपण अडकलो आहोत. लोकांना दिसतो तो पगार, शनिवार रविवार ची जोडून सुट्टी पण त्यामागील भयाण सत्य म्हणजे आठवडाभर १२ / १६ तास ते पण साधसुध नाही तर टांगत्या तलवारी खाली हे कोणी पाहत नाही. सरळ सरळ म्हणतात तुम्ही काय बाबा आई टी वाले……..
  यातून काही सुटकेचा मार्ग आहे

 7. aamhi ugach IT valyana shivya deto , sagla mahag kela mhanoon.
  aamha dhandevalyancha (chhotya) life barach bara distay.
  +ve points
  1. pahije teva vel kadhu shakto. (weekday dupari movie)
  2. prachanda work satisfaction (most important..nahi ka??)
  3. madhyam paisa.
  -ve
  1. pahile 2-3 varsha prachanda stress , pahate ghaam yeoon jaag yenyaitka. (having a working spouce helps a lot)
  2. thooooda social standing kami (amka TATA madhe, tamka Infy aani ha spare Parts ka kahitari trading karto)
  3. mitranchi kami. office madhe tumhi boss aani direct employees,peon. mitra nahitach. mag yatunach dhandevalyanche “groups” suru hotaat.
  4. Home loan vagaire milna avghad (karan tax vachvayla incom kami dakhavlela asta)
  5. kadhi kadhi achanak cash crunch , itka ki “ya mahinyat sadhe tandool gheoo” (nahitar FD (sugichya kalaat kelelya) modaychi vel yete)
  6. thodi risk taking tendency vhadoo shakte (stock market on borrowed money. have to be careful)
  7 nokri vaale joone mitra suddha haloo haloo laamb jaataat. sagle subjectach vegle, perspective vegla hoon jaato.
  8 canvas thoda chota rahto… eg clients mumbai punyache where as mitra “international falamfolk” karat astaat, US europe sahaj travel kartaat (co chya paisyavar). ikde 1 europe trip pan “plan” karavi laagte (swatachya paisyavar).

  This is for not too ambitious dhandevalas, somewhat settled, not much business loan.
  Jar tumhala Ambani banaycha asel tar varil lagoo nahi.

 8. Apratim … agdi manaatla bollaas. Mi 14 varsha kaadhlele aahet IT madhye, tyaat kityek varsha hyaach feeling ne agdi demotivate jhaaloy … kay saangu mitra …. tumne mere moo ki baat cheen li.

 9. अनिकेत,
  एकेक शब्द खरा लिहीला आहेस…यातली जवळपास प्रत्येक गोष्ट मी अनुभवली आहे आणि अनुभवत आहे… आजचेच उदाहरण घे, क्लायंट म्हणाला एकदम सकाळचा कॉल नको म्हणून आमच्या पीएमने आपल्या रात्री १२ ला म्हणजे त्याच्या १०.३० ला मीटींग ठेवली 😦
  आयटीने माझ्या प्रकॄतीवर परिणाम केलाच पण माझे छंदही मागे पडले :(:(
  ही खुप निष्ठुर दुनिया आहे. यांना फक्त कर्मचार्‍यांचे रक्त शोषण्यात रस…
  मी अजून खुप भर घालू शकतो यात, पण सध्या लिहायला वेळ नाही…
  भिंतीवरचं घड्याळ दाखवतयं की क्लायंटची सकाळ होऊ लागली आहे, त्या आधी माझी test script त्याच्या inboxमध्ये पोहिचली पाहीजे… माझा पीएम reminder पाठवत आहे आणि आजच्या नविन issue बद्दल तयारी कर म्हणून दम देत आहे…
  तेंव्हा… बाकीचे नंतर…. आता एक कप चहा (मशिनचा) पितो.. ठसठसणारे डोके, तारवटलेले डोळे, आंबलेले शरीर यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि की बोर्ड ओढतो…पुढचे deliverable due आहे आज 😦

 10. Just wondering if this is the situation of developers in all IT companies or is it just the ones that do contract work for international clients.
  Well, also isn’t it the project manager’s responsibility to give the clients a realistic deadline for a project? I mean if the developers are having to work 12-16 hours its really overambitious timeline that they are trying to meet!

 11. Too good post…very true…
  Keep it up!
  Reading ur blog since long time…
  Congratulations for winning prize!!!

  – Tejaswini Agnihotri

 12. Life In IT article thoda atirek watato. Tu mention kelele mudde jari yogya vatat asle tari still tu IT industry (which is state of the art) sathi kam karto ahes he mahatvache…. Baki lihit ja asech.

 13. Aniket, sarva It walyana je mhnanayache aahe te tu agadi nemkya shabdat sangitale aahes..Mi majhya navryala pan hi post wachun dakhawali..ithe US madhe asun tyachi sadhya ithlya economy mule bahutek pan almost bharta sarkhi kamachi dagdag chalu zali aahe…
  Mi pan IT cha bhayanak anubhav ghetala aahe fakt 3 warshachya karkirdit…tevha ani aata nehmi watate ki IT madhale loka itka pagar ghetat pan ektra yeun ya prob cha solution ka nahi kadhat?? asa kiti warsha aapan chalu dyayacha??
  Aata ithe pan asa work culture pahun bhiti watay…mi parat job shodhen to pan IT walach asnar karan kahi dusara kelach nahiye itkya warshat IT shiway….baap re…tension aahe…
  tujhya hya post warun ugach asa watay ki tuzya babit kahi tari asach chalu aahe…kalaji ghe…

  –Aparna

 14. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

  हे एकदम बरोबर लिहिलस.

  BTW, तु याहु “मित्रमैत्रिणी”चा मॉडरेटर आहेस का ?

 15. लाइफ़ इन मेट्रो प्रमाणे ‘लाइफ़ इन आय.टी.’ असा एक पिच्चर काढावा असे मस्त लिखाण झाले आहे. मी स्वतः काही असे अनुभवलेले नाही कारण मी आय.टी. मध्ये नाही. अनुभव छान लिहिला आहेस.

  पण एक मात्र नक्की… चक्रव्युव्हात प्रवेश करता येतो पण प्रत्येकाला बाहेर पड़ता येते असे नाही… असे कितीतरी आय.टी. मधले अभिमन्यु आहेत ज्यांचे अनुभव तू एकदम चपखल शब्दात मांडले आहेस.

  शेवटी … नाही म्हटले तरी …
  “People treat you the way you allow them to treat yourself … isn’t it ???”

  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद रोहन.

   “People treat you the way you allow them to treat yourself … isn’t it ???”

   हे मात्र अगदी खरं बोललास.

 16. अक्षर न अक्षर सत्य आहे. हे खरं तर occupational hazard आहे! काहीही पर्याय नाही!

  1. पर्याय आहेत आदीत्य, पण आपणं इतके ह्या साच्यात अडकलो आहोत की त्यातुन बाहेर पडुन दुसरा पर्याय निवडायला मोठी हिम्मत हवी

 17. खुप सुंदर ..प्रत्येक शब्द अगदी खरा आणि अंगावर काटा आणणारा. तुझा हा लेख मला फॉरवर्ड मेल मधुन आला होता फक्त खाली तुझं नाव नव्हत. आता इथे वाचुन कळलं की हे तुच लिहिलयस. वाटलं तुला सांगावं.

  -अजय

  1. धन्यवाद अजय. चालायचेच, मलासुध्दा माझे काही लेख फॉर्वर्ड येतात 🙂

 18. This seems to me as coming out of frustration. Every job has its positives and negatives…….I don’t think your job is that bad because in spite of all this i see people following their interests going for trekks and outings every weekend and all that.
  So please cheer up ……there are worse jobs than yours……..:)

 19. mi itake divas ugach bicharya IT walyanwar jalat charfadat hote.tynacha life mhanje khup swachand aahe asa watat hota……

  pan javu de………..

  aaliya bhogasi asve sadar…ani zop ali asta dolyat odhavi chadarrrrr…………………

  1. खरं आहे, पण लोकांच्या दृष्टीने आय.टी. मधील आयुष्य खुपच चैनीचे, सुखाचे असते असा एक समज पसरला आहे, कारण त्यांना फक्त मिळणारा पगार दिसतो. तो समज दुर करण्यासाठी हा लेख लिहीला बाकी काही नाही 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s