निबंध


“फार छान लिहीतोस रे तु..” एक परीचीत मला काही दिवसांपुर्वी मला म्हणाले होता. त्याचे पडसाद काय असतील ते मला तेंव्हा समजले नव्हते जे नंतर समजले.

झालं असं की, माझा हा मराठी ब्लॉग आणि त्यावरील लिखाण बघुन माझ्या एका परीचीतांनी मला नुकतीच एक नविन कामगीरी सोपावली आहे, निबंध लिहीण्याची. त्याचा मुलगा दहावीच्या परीक्षेला बसत आहे आणि त्यासाठी त्याला मराठी निबंध हवे आहेत. काही दिवसांपुर्वी शाळेत सांगीतले आहे म्हणुन काही निबंध मी लिहुन दिले, जे फारच आवडले. पण आता त्यांनी मला बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतील असे अपेक्षीत १५-२० निबंध लिहायला दिले आहेत. कळलं तुम्हाला आता सध्या माझ्या ब्लॉगवर जास्ती पोस्ट का नाहीत? आणि माझी कथा इतकी का लांबली आहे? पटापट पोस्ट का येत नाहीत? एकतर कामाच्या व्याप सध्या वाढलेला आहेच, पण त्याहुनही जो वेळ मिळेल त्यात मी दहाविचे अपेक्षीत निबंध लिहीत आहे ना!

असो.. माझ्या लेखन शैलीचा कुणाला उपयोग होत असेल तर काय वाईट आहे? त्यातुनच पुढे विचार केला की हे निबंध जर ब्लॉग वर उपलब्ध करुन दिले तर कदाचीत इतर मुलांनाही थोड्याफार प्रमाणात मदत मिळु शकेल. माझ्या माहीतीत तरी महाजालावर अशी संकलीत माहीती एकत्र उपलब्ध असेल असे वाटत नाही.

निबंधामध्ये काही संदर्भ हे महाजालावर उपलब्ध असणाऱ्या माहीतीच्या आधारे घेतलेले आहेत त्याचे राईट्स ज्या त्या लेखकाला साभार.

निबंधाची लांबी जास्तीत जास्ती हस्ताक्षरात एक फुल-स्केप इतकी हवी असल्याने थोडक्यात लिहीले आहेत. त्यामुळे सर्व विषय निबंधाच्याच रुपात असतीलच असे नाही. काही ठिकाणी प्रमुख मुद्दे थोडेसे विस्तार करुन लिहीलेले आहेत. आवश्यकता भासल्यास आपण ते मुद्दे वाढवुन निबंधाची लांबी वाढवु शकता.

हे निबंध आपल्याला कोणत्याही प्रकारे उपयोगी पडल्यास प्रतिक्रिया जरुर कळवा.

निबंधाच्या पानावर जाण्यासाठी इथे टिचकी मारा.

11 thoughts on “निबंध”

 1. मित्रा,
  आता एकच राहिलयं… तू officially काही पुणेरी पाट्या बनवून घे….

  १) ’अनिकेत समुद्र’ यांचे ’निबंधालय’ – वेळ सकाळी ८ ते १०. रात्री ९ ते ११. (टीप – उरलेल्या वेळेत फोनवर negotiate करण्याचा आगाऊपणा करू नये)
  २) येथे सर्व प्रकारचे निबंध (रास्त भावात) लिहून मिळतील (/In bigger Fonts/)असे समजू नये.
  ३) निबंधाचा दर त्याचा विषय, आशय आणि त्यातील काव्यात्मकता यावर अवलंबून राहिल.
  ४)निबंध नेण्यापुर्वी तपासून पहावा. एकदा नेलेला निबंध परत edit करून मिळणार नाही.
  ५)शुद्धलेखनाच्या अचुकतेचे वेगळे पैसे पडतील
  ६) एकच निबंध वेगवेगळ्या शाळेत जाऊ शकतो. ग्राहकांचे Uniquenessचे हट्ट पुरवले जाणार नाहीत.
  ७) निबंधातील काव्यपंक्तीच्या निवडीचे आणि वापराचे सर्वाधिकार लेखकाकडे. बापट, गदीमा, कुसुमाग्रज, ज्ञानेश्वर, तुकाराम, बोरकर अश्या मान्यवर कवींच्या अवतरणांना extra charge पडेल.
  ८) आमच्या येथे One by Two निबंधांची सोय नाही याची नोंद घ्यावी.
  ९) ग्राहकांनी विकत घेतलेले निबंध आपापल्या जबाबदारीवर शाळेत सादर करावेत. शिक्षकांच्या शंकांना आणि आक्षेपांना उत्तरे दिली जाणार नाहीत.
  १०) Schemes Available – Family, Elite, Standard, Scholar, Literary, Multi-School, Multi-Standard, Rebell,

  1. हा हा हा.. विक्रांत, मस्तच लेका.जाम आवडली ही कमेंट, मी अजुनही हसतच आहे. तुझी परवानगी असेल तर तुझ्या नावासहीत ही कमेंट निबंधाच्या पानावर वापरु इच्छीतो.

 2. मित्रा कल्पना फारच छान आहे …
  विक्रांतानी दिलेल्या टिप्स तर अत्युत्तम .

  चालुद्या…
  मी पण लिहीन निबंध कधी मधी… दिलेल्या विषयावर … :):)

  1. वा मोहीनी, खरंच. आवश्यकता भासल्यास तुला कळवतो, ओव्हरलोडेड होत चाललो आहे 🙂

 3. मित्रा कल्पना फारच छान आहे …
  विक्रांतानी दिलेल्या टिप्स तर अत्युत्तम .

 4. va mitra chanach lekh lihitos malahi kavita karayala far avadte. reply pathvayala visru nakos bara ka!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s