मजेदार मुलाखत


रिसेशन / मार्केट स्लो-डाउनने कच खाल्ली आणि आय.टी. कंपन्यांमध्ये नविन जागा, नविन संधी पुन्हा उपलब्ध होऊ लागल्या. अर्थात वेळ वाचावा म्हणुन म्हणा किंवा उमेदवार दुसऱ्या गावचा असल्याने म्हणा, प्रथम मुलाखत ही शक्यतो दुरध्वनीवरच घेतली जाते.

अश्याच एका मजेदार मुलाखतीचा मी अनुभवलेला हा प्रसंग –

समोरच्या दुरध्वनीचा स्पिकर चालु करुन त्यावर दिलेला नंबर डायल केला. उमेदवार चैन्नई नामक शहरातील होता. संगीतमय कॉलर ट्युन्स मुळे फोन लागताच तमीळ भाषेतील कुठलेसे गाणे जोरदार सुरु झाले. मी दचकुन फोनच्या स्पिकरचा आवाज कमी केला.

‘हालो’, पलीकडुन आवाज आला.
‘एम आय स्पिकिंग तु मिस्टर गोपालक्रिश्नन अय्यर? (नाव बदलेले आहे)’
‘यास सार, दॅट इज करेक्ट सार’

मग जुजबी चौकश्या करुन, मुख्य मुद्याला हात घातला. प्रश्न चालु होते एक क्रिटिकल प्रश्न विचारला आणि इतक्यात

‘कुssssss.. धडाड धडाड.. धडाड धडाड..’ मोठ्ठा आवाज आला. शेजारुन आगगाडी जात होती.
पुर्ण वेळ स्पिकरवर कु… आणि धडाड चे आगगाडिचे आवाज येत होते.

कॉन्फ रुम मधुन असले अपरीचीत येणारे आवाज ऐकुन बाहेरुन ३-४ लोक दरवाज्यापाशी जमा झाली होती.

शांतता झाल्यावर.. मी विचारलं..

‘हॅलो.. मिस्टर अय्यर, यु देअर..’
‘यास सार.. सारी सार, ट्रेन’

मी पुढचा प्रश्न विचारणार एवढ्यात

कुठलीशी ए़क्स्प्रेस येत आहे याची तेथील निवेदीकेने तिच्यापरीने काढलेल्या गोड आवाजात सुचना केलेली ही ऐकु आली.

‘हॅलो मिस्टर अय्यर, व्हेअर आर यु राईट नाऊ?’ मी
‘सार आय एम ऍट रेल्वे प्लॅटफॉर्म’
‘कॅन यु प्लिज गो टु सम प्लेस व्हेअर देअर इज अ लेस डिस्ट्रबंन्स?’
‘येस सार, सॉरी सार’
‘मिस्टर अय्यर, इंटरव्हु वॉज स्केड्युल्ड लॉंग बॅक, यु शुड हॅव…’
‘सारी सार.. आय एम गोईंग आऊट सार’

मग थोड्यावेळ वेगवेगळे आवाज येत राहीले कधी अनांन्समेंट्चे, कधी दुरुन येणाऱया आगगाड्यांचे, कधी त्याचा चालताना दम लागलेला.. श्वास घेताना…

दाराबाहेर थांबलेली लोकं, आत मध्ये येऊन बसली होती.

‘सार, वुई कॅन टॉक नाऊ…’ अय्यरचा आवाज आला
‘गुड.. सो व्हेअर वेअर वुई’.. मी विसरलोच होतो मुलाखत चालु होती.

मग परत प्रश्न सुरु झाले. बाजुने अजुनही गडबड गोंधळाचे आवाज येत होतेच, पण निदान ते रेल्वेच्या आवाजापेक्षा बरे होते.

थोडाफार डिस्ट्रर्बंन्स कमी झालेला बघुन परत एक हुकमी प्रश्न विचारला. उत्तर ऐकु येणार इतक्यात..

‘ए ताना.. दिन ताना.. उर्वशि.. ढिंक टाक.. ढिटांडा.. ढि..’ जोरदार आवाज आला..
‘मिस्टर अय्यर.. नाऊ व्हॉट इज धिस?’ मी वैतागुन ओरडलो..
‘सारी सर, आय एम स्टॅंडीग ऍट अ सिग्नल सर, सम कार विथ अ लाऊड म्युझीक प्लेयींग इज स्टॅंडीग इन फ्रंट ऑफ मी.’
‘बट मी. अय्यर..’
पण तो पर्यंत त्याने फोन कानावरुन काढला होता आणि तो त्या कारवाल्याशी काही तरी बोलत होता.

कॉन्फ रुम मध्ये खसखस पिकली होती.. माझ्या रागाचा पारा अनावर झाला होता.. वाटत होतं फोन आपटुन बंद करुन टाकावा..

थोड्यावेळाने सिग्नल सुटला असावा, जोरजोरात गाड्यांचे हॉर्न ऐकु आले.. मग बस, रिक्षा, टु-व्हिलर्स गाड्या गेल्या, मिस्टर अय्यर चा पळत पळत रस्ता ओलांडणे, सगळे ऐकले.

‘सारी सर, टु मच डिस्टर्बंन्स’
‘मि.अय्यर, आय कान्ट कंन्टीन्यु विथ द इंटर्व्हयु राईट नाऊ, लेट्स रि-स्केड्युल ईट टुमॉरो, प्लिज बी ऍट अ बेटर प्लेस’
‘ओके.. सार, सॉरी सार’
‘बाय द वे मि.अय्यर, व्हेअर आर यु स्टॅंडीग नाऊ?’

‘… सारी सार.. आय वॉज गोइंग इन अ रेस्टरुम, देअर वोंट बी एनी डिस्टर्बंन्स’

मी फोन ठेवुन दिला. नंतर विचार केला.. बरं झालं ठेवला फोन, मुलाखत चालु ठेवली असती तर न जाणो अजुन कसले कसले आवाज ऐकायला लागले असते….

[कृपया प्रादेशीक भाषा, प्रदेश याबद्दलचा कोणताही वाद ओढवु नये. केवळ हा एक घडलेला प्रसंग नमुद केला आहे, त्यात कोणत्याही व्यक्तीची, प्रदेशाची टिंगल करण्याचा हेतु नाही.]

Advertisements

25 thoughts on “मजेदार मुलाखत”

  1. धन्यवाद जान्हवी, मला आठवले की अजुनही हसु येते.

 1. My studying now….Lekh chan hota an i learned that we should be at some good place where disturbance will not occur….

  nahi tar bad impression padun select nahi vhaycho na…….
  Baki Varnan ekdam zakkas……

  1. भाग्यश्रीला म्हणल्या प्रमाणे, बाहेरचा डिस्टर्बंन्स परवडला असता रे.

 2. हा हा….अनिकेत बाकी इतके आवाज ऐकण्यापेक्षा रेस्टरूमचा आवाज …….:P

  लोकं पण भारीच असतात नाही….. एकदम कॆज्युअल……

  1. भाग्यश्री, नाही नाही, उलट इतर आवाज मला परवडले असते 🙂

  1. त्या दिवशी कश्याला, अजुनही जेवणात ‘सार’ आले की मला तो दिवस आठवतो 🙂

 3. मस्त रे…..किती दिवसानी लिहायला लागलायेस पण पोष्ट लय भारी!!!!!!!!!!!’सार सार’ मस्त..:)

  शेवट मात्र खासच!!!!!!!!!!!!!

  1. धन्यवाद तन्वी. खरंच ब्लॉगवर येणं होतच नाहीये सध्या.

 4. kaay he? Nibandh aatopale ka? Ki aata eka mulakhatkartyache aatmawrutt lihile aahes? Nashib to jewat navhata nahi tar sur, sur…… phur, phur…….glup glup……….ase kahi tari aikawe lagale asate!

  1. निबंध नाही गं अजुन संपले, काय सांगु? चालु आहेत ‘सबमिशन्स’ 🙂

 5. मस्तच 🙂
  मी घेतलेले टेलिफोनिक इंटरव्ह्यू आठवले. गूगल वर सर्च करून उत्तरं देण्यापासून ते दुसऱ्याच कोणीतरी इंटरव्ह्यू देण्यापर्यंत वेगवेगळे नमुने असतात यात … आणि रिंगटोन, बाकी मागे येणारे आवाज तर एकदम एकाहून एक भारी असतात.

  1. हो.. गुगल चा अनुभव मला पण आलाय, प्रश्न विचारला की उगाचच.. ‘सॉरी, पारडन’ वगैरे विचारुन वेळ काढायचा आणि त्यावेळेत.. मागुन किबोर्डचे पटापट आवाज यायचे.

 6. हा हा हा.
  जबरा किस्सा आहे, लिहण्याची स्टाईल मस्त होती, वाचताना हसुन हसुन पुरेवाट झाली.

  पण खरचं, लोकं हे सर्व फ़ारच कॆज्युअल घेतात.
  चेष्टा नाही पण माझा पण असाच अनुभव आहे, मी एका नविन भरती होणा-या उमेदवाराला फ़ोन केला होता सकाळी १०.३० वाजता तेव्हा ते महाशय थेटरात गेले होते मॊर्निंग शो पहायला, हा किस्सा पुण्यातला आहे.
  इंटरव्ह्युव्ह राहिला बाजुला, मी आणि माझ्या कलिगने पोटभर हसुन घेतले व उलट त्यालाच स्टोरी वगैरे विचारली, त्या शहाण्यानेही सिरीयसली सर्व काही सांगितले.

  नंतर त्याला डायरेक्त हापिसातच बोलावुन घेतला मुलाखतीसाठी.

  – छोटा डॊन

  1. अरे आजचा एक किस्सा ऐक हं..
   मुलाखतीची सुरुवात..
   एका १ वर्ष ३ महीने झालेलं पोरगं होतं. पहीली कंपनी ७ महीने, दुसरी ४ महीने, तिसरी ४ महीने. मी विचारलं का रे इतक्या पटापटं कंपन्या बदलल्यास.
   “फॉर ऑन साईट ऑपुर्चुनीटी. ऑन-साईट मीन्स मोर मनी, मनी मॅटर्स इट वॉज ऑन कॉन्ट्राक्ट ऍन्ड नो कंपनी ऍब्सॉर्ब्ड मी अफटर ४ मंथ्स”
   “सो आर यु ओन्ली लुकींग फॉर ऑन-साईट?”
   “येस”
   “फ़्रॅन्कली स्पिकींग वुई डोंन्ट हॅव ऑन-साईट, डु यु वॉन्ट टु कंटीन्यु विथ द इंटर्व्यु देन?’
   “ओके..! देन व्हॉट अबाऊट पॅकेज”
   “व्हॉट आर युअर एक्सेपक्टेशन्स?”
   “मिनीमम ४.५ लॅक्स पर ऍनम?”

   माज बघ.. एका कंपनीत रहाता येत नाही आणि म्हणे ४.५ हवेत..!

 7. खूपच मस्त, खरच हसून हसून पुरेवाट झाली. शिवाय छोटा डॉन ची comment तर आणखीनच भारी. मजा आली वाचून

  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी ब्लॉगला भेट दिलीस ते?

   1. होय, मध्यंतरी परीक्षेमुळे जरा ब्लोग्गिंगला सवड मिळाली नाही. पण तुमचा ब्लोग वाचून नेहमीप्रमाणेच मजा आली.

 8. मजा आली वाचताना. फोन वर हातवारे करून बोलतात कसली धम्माल येते पाहायला. डावीकडे वळा असे फोन वर बोलतात व त्या प्रमाणे हात पण हवेत फिरवतात. हा अनुभव असेलच
  मला ही आवडेल वाचायला.

  1. खरंच आहे, कुठल्या तंद्रीत असतात लोकं काय माहीत. आणि अजुनही लोकं मोबाईलवर बोलताना ‘ठेवु फोन मग?’ अस्संच म्हणतात, लॅंन्डलाईनची सवय अजुन काय!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s