नानाची दादागीरी


‘फाटकासमोर वाहनं लावु नयेत’, ‘इथे गाड्या लावु नयेत’ लावल्यास असं केलं जाईल, तसं केलं जाईल वगैरे पुणेरी पाट्या आपल्या वाचनात आल्या आहेतच. पण सोशीक पुणेकर सहसा असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडत नाहीत. पण नानाच्या.. अहो आपला ‘नाना पाटेकरच्या’ कृत्यांमुळे आमच्या कार्यालयातील कर्मचारी मात्र त्रासले आहेत हे नक्की.

त्याचे झालेय असे की आमच्या कंपनीच्या एका क्लायंटचे कार्यालय हे लॉ-कॉलेज रोडवरील एका गल्लीत आहेत आणि नेमके त्याच्या समोरच नाना पाटेकरांचा बंगला आहे.

कार्यालयाला पार्कींगची फार मोठ्ठी जागा नसल्याने बऱ्याचवेळा गाड्या रस्त्यावरच लावाव्या लागतात. एखाद्याने गाडी चुकुन नानाच्या बंगल्याच्या गेटा-बाहेर लावली तर मात्र त्याची काही खैर नाही.

काही दिवसांपुर्वीच माझ्या एका मित्राची वॅगन-आर एकाबाजुने चेपलेल्या स्थितीत आढळली. बघणार्य़ांकडुन आणि त्या बंगल्याच्या वॉचमनकडुन कळले की नानानेच ती गाडी मुद्दामहुन ठोकली. का? कारण ती गेटच्या समोर लावली होती. आणि असे किस्से बऱ्याच वेळा घडले आहेत.

काल तर मात्र कहरच झाला. माझ्या एका मित्राने त्याची स्कोडा गाडी बंगल्याच्या गेट समोर लावली होती. दुपारी खाली आला तेंव्हा गाडीच्या कडेच्या खिडकीच्या दोन्ही काचा आणि गाडीची मागची पुर्ण काच फोडलेली होती. तो बिच्चारा बघतच होता की नाना पाटेकर तिथे आले आणि त्याला त्याच्या खास शैलीत ऐकवले..

ये आपका गाडी है क्या? अच्छा.. बच्चे.. गाडी वापस यहापे लगानेका नही हा.. याद रखना.

ठिक आहे.. तो एक मोठ्ठा कलाकार आहे, त्याच्याबद्दल कलाकार म्हणुन मला आदर वाटतो आणि आवडतो सुध्दा, पण एक माणुस म्हणुन मला तरी त्याचे हे कृत्य आवडले नाही बा!

कोण पोलीसांत तक्रार करणार त्याची? आणि नोकरी धंदे सोडुन त्या शिघ्रकोप्याशी कोण भांडत बसणार? आपलीच चुक म्हणुन बिच्चारा मित्र गप्प बसला अजुन काय?

बर अगदी गेटाच्या बाहेरच गाडी लावली आहे, आणि त्याला गाडी काढताच येत नाही बाहेर तर गोष्ट वेगळी. असो.. पोस्ट लिहीण्याचा उद्देश हा, की तुमच्यापैकीच कोणी चुकुन याठिकाणी आलात आणि कुणी तुम्हाला सांगीतले की हा नाना-पाटेकरचा बंगला आहे, इथे गाडी लावु नका, तर त्यावर विश्वास ठेवुन १० कि.मी. लांब लावावी लागली तरी चालेल, पण तिथे गाडी लावु नका.

Advertisements

12 thoughts on “नानाची दादागीरी

 1. त्याऐवजी जर एखादी चेपलेली व काचा मसलेली गाडी मुद्दाम त्याच्या गेटसमोर लावली तर? त्याचाही नक्षा साफ उतरेल 🙂

  कदाचित तो “नाना करते प्यार तुम्हीचे कर बैठे…” वगैरे गाणी गाईल…

  1. हा हा हा.. कल्पना चांगली आहे. खरं तर त्याचीही काही चुक नाही. तो पार वैतागुन गेला असेल. पण हा मार्ग योग्य नाही ना. तो ‘नाना’ आहे म्हणुन करु शकला, एखाद्या सामान्य नागरीकाने असे केले असते तर?

 2. nana sarakhe ajun hi lok aahet ethe Hinjwadi madhe Dominos Pizaa madhe aamhi ekda gelo hoto parking sathi bilkul jaga navati mhanun maza maitrini ne tich car eka dukana samor park keli arthat tya dukana pasun thodi dur ch hoti tar tyacha malakane saglaya chakali hawa kadhali nashib samor ch petrol pump hota ……..var parat uddam pane khup bolala to …….

 3. त्यांचा उद्देश चांगला आहे पण मार्ग वाईट. कोणालाही धडा शिकवण्याची हि पद्धत नव्हे. असो, पण निदान आतातरी लोकांनी पुन्हा त्यांच्या वाटेला जाऊ नये.

 4. ह्म्म्म्म………नानाने आधी ( कदाचित बरं का….हेहे ) चांगल्य़ा पध्दतीने लोकांना सांगायचा प्रयत्न केला असेल पण ….. शेवटी नानाच तो…. यापेक्षा वेगळे तो काही करेल हा आशावादच धारिष्ट्याचा आहे. तेव्हां जपूनच राहावे झाले. बाकी जॊन सारखा त्यालाही धडा शिकवणारा कोणीतरी भेटेलही…. पुन्हा आशावाद आलाच… पण घडेलही असे. 🙂

 5. अनिकेत जरा आधी नाही का ही पोस्ट टाकायची. अरे इथे सम्मेलनाच्या वेळी एकदम सभ्य भाषेत बोलला होता नक्कीच विचारलं असतं की काय असं पण करता..आणि त्याने इथे गाडी लावु नका अशी पाटीतरी लावलीय का आसपास लोकांना कळायला की असंच येतो आणि गाडी ठोकतो???

 6. सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, तिथे नानाचा बंगला नसुन तेथील एका इमारतीमध्ये त्याचा प्लॅट आहे. आणि कोणीही इमारतीच्या गेटला लागुन गाडी लावत नसुन गेट नंतर मध्ये एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला गाडी लावता, which according to me is alright.

 7. नाना अमिताभ सारखा ब्लॉगवेडा असला तर ! त्याने हि पोस्ट वाचली तर ! त्याची काय प्रतिक्रिया असेल. येथे तर ब्लॉग आहे गाडी नव्हे राग काढायला. मला वाटते या निमित्ताने नाना सुद्धा ब्लॉग लिहायला सुरुवात करेल व त्याच्या ब्लॉग चे नाव असेल “डोक्यात भुणभुणणारा एक ब्लॉग ‘भुंगा'” 🙂

 8. Nanan Sarkhi Vyakti Ase Naahi Karu Shakat. Pan Tarihi Chukun Hou Shakte, Dar veles

  lokana sangu shakat nahi. Tari Nanani Hi Padhat Vaparu Naye, Maharashtrache brand

  ambassador Ahat Tumh.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s