भानामती


‘भानामती’ हा काय प्रकार आहे हे खरं तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ‘अंधश्रध्दा निर्मुलन समीतीकडुन’ तर भानामती ही केवळ अंधश्रध्दा आहे हे अनेक वेळा लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपलं वेडं मनं असल्या निरर्थक गोष्टी कुठेतरी ठेवुन देतंच ना आणि मग काय घडतं त्याचा हा किस्सा..

झालं असं, रविवारी दुपारी जेवणं उरकुन आरामात पहुडलो होतो, इतक्यात स्वयंपाकघरातुन भांडी पडण्याचा आवाज आला. एक, दुसरं आणी त्यामागोमाग तिन-चार भांडी धडाधड कोसळली.

काय झालं बघायला म्हणुन बायको स्वयंपाकघरात गेली आणि जोरात किंचाळलीच. म्हणुन मी, मागोमाग आई, वात्रट पोरगं ही धावलं काय झालं बघायला.

बघतो तर काय, एक छोटा कुंडा आपोआप पुढे सरकत होता. दोन मिनीटं बघतोय ते खरं का खोटं हेच कळेना.

हा काय प्रकार?, भानामती झाली की काय?“, मनामध्ये विचार चमकुन गेला. मग घाबरत घाबरत कपडे वाळत घालायची काठी आणली आणि त्या भांड्यावर जोरात मारली. दोन क्षण ‘ते’ भांड स्तब्ध झालं आणि लागलं की परत पुढे पुढे जायला. जाम टरकली होती. मग परत काठीने त्या भांड्याला ढोसरले, एका कडेने ढकलुन भांड उपडं केले आणि सगळा उलगडा झाला.

झालं असं, की स्वयंपाकघराच्या उघड्या खिडकीतुन एका खारुताईने आतमध्ये उडी मारली ती थेट भांड्यांच्या रॅकवरच. त्यामुळे धडाधड भांडी कोसळली. खारूताई पण घसरुन खाली पडली, आणि तिच्या अंगावर तो कुंडा पडला. त्यामुळे तिला काहीच दिसेना आणि ती ते भांड्याच्या आतुन पुढे पुढे जाऊ लागली.

भांड्यातुन बाहेर पडताच, टूणकण उड्या मारत, परत भांडी पाडत खारूताई खिडकीतुन बाहेर पळुन गेली.

हिच ती डॅंम्बीस भानामती खारूताई.

19 thoughts on “भानामती

  1. tujhyawar pan konitari bhanamati keleli distey! Mhanun tu nibandh, rajkot bhanamati aani kaay kaay war lihito aahes pan mendichya panawar lihayala suchat nahiye! Chalu de time pass!

    • माधुरी, कळतोय मला तुझा राग 🙂 करणार, अधुरी गोष्ट लवकरच पुर्ण करणार

    • खुश!!, चेकाळलं होतं ते, आणि त्यात ते रामाच्या बोटांची गोष्ट माहीत आहे ना, दिवस्भर तेच चालले होते सारखे

    • हो ना, भानामती सारखेच अजुन एक प्रचलीत गोष्ट म्हणजे “हाकामारी”. मागे पुण्यात हाकामारीची केवढी अफवा उठली होती. जो तो घरावर फुल्या मारत सुटला होता

    • हो ना, बघीतले तेंव्हा आधी कळालेच नाही हे भांडे आपोआप कसे पुढे चालले आहे ते 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s