‘फ्रेंच किस’ रस्त्यावर???


‘सांकृतीक राजधानी’, ‘विद्येचे माहेरघर’ अशी बिरुदावली मिरवणारे पुणे बदलले आहे, जणु कातच टाकली आहे. पण इतके बदलले असेल याची मला कल्पना नव्हती.

बरेच दिवसांत आमचे डेक्कनला जाणे झालेच नव्हते, मुख्यतः संध्याकाळी. पण काल संध्याकाळी काही तरी काम निघालं आणि साधारणपणे ७-७.३० ला डेक्कनवरच्या झेड ब्रिजवरुन परतत होतो. आणि लक्षात आले की तो पुल कपल्सच्या शृंगाराने फुलुन गेला होता. पुलावर दुचाक्या लावुन त्याच्या आडोश्याला कोणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन होते, कुणी एकमेकांच्या मिठीमध्ये विसावले होते तर काही ठिकाणी चक्क फ्रेंच किसेस चालु होते.

आश्चर्याचा धक्काच बसला. डेक्कनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस असे प्रकार म्हणजे…! पुणं कधीपासुन इतके ‘प्रगत’ झालं? नाही म्हणजे, पुण्यात आहेत अशी अनेक ठिकाणं जेथे संध्याकाळी असा शृंगार फुललेला असतो, पण झेड-ब्रिजवर म्हणजे फारच झाले.

अर्थात त्यांची काही चुक नाही. त्यांनी तरी जायचं कुठं? ‘आमच्या’ काळी चांदणी चौकात, गार्डनकोर्ट पासुन एन.डी.ए पर्यंत रस्ता हा काळोख आणि एकांतात बुडलेला असायचा. तो स्पॉट ‘योग्य’ होता, पण नंतरच्या काळात त्या भागात चोऱ्यामाऱ्या वाढल्या आणि हळु हळु तेथील ‘गर्दी’ कमी होत गेली. पार्क्समध्येही आजकाल पोलीस उठवतात. आकाराने लहान होत चाललेली घरं आणि अजुनही अस्तीत्वात असलेली एकत्रीत कुटुंब पध्दती त्यामुळे प्रेमी युगुलांना हक्काच्या अश्या जागाच उरल्या नाहीत. सो त्यांचा प्रॉब्लेमही समजण्यासारखा आहे.

नुकतेच पुण्यात सिंहगड रोडवरील काही लॉज वर पोलीसांनी छापा घातला आणि ‘क्वालिटी टाईम’ साठी रुम्स भाड्याने घेउन राहीलेल्या अनेक कपल्सना ताब्यात घेतले. नुकतेच पुणे मिरर्स मध्ये ‘प्यार किया तो डरो’ नावाने याच्यावर आर्टिकल वाचण्यात आले होते.

फॅशन्सचा सर्व-सामान्य जनतेपर्यंत झालेला शिरकाव, अनेक ब्रॅन्ड्सचे कपडे, कॉस्मेटिक्स, विदेशी परफुम्स यामुळे ऍव्हरेज लुक्सचे तरूण-तरूणीही आजकाल आकर्षक दिसु लागले आहेत. चित्रपटात वाढत चाललेली चुंबन दृश्य, वाढती शारीरीक जवळीकीची दृश्य यामुळे ‘अश्या’ गोष्टी कॉमन झाल्या असाव्यात. पण तरीही, शारीरीक ओढ इतकी वाढावी?? ‘फ्रेंच किस’ रस्त्यावर घेण्याइतकी?

सहज मनामध्ये विचार आला जगं केंव्हाच बदलले आहे, बदलतं आहे. आम्ही संसारात, मुलाबाळांत इतके रममाण झालो आहोत की बाहेरच्या बदलत्या जगाची काही खबर-बातच राहीली नाही. बाजारात आलेल्या तरूणाईच्या ब्रॅन्ड्स-पेक्षा पोरांच्या खेळण्यांच्या ब्रॅन्ड्सची माहीती जास्ती ठेवली जात आहे बघा!!

पण खरं कारण तेच आहे, का आम्ही म्हातारे झालो आहोत? हे सगळे प्रकार आता अगदी ‘कुल’ झाले असले तरी आमच्या लेखी मात्र ते अजुनही ‘हॉटच’ आहेत!

31 thoughts on “‘फ्रेंच किस’ रस्त्यावर???

  1. महेंद्र

    झेड ब्रिज वर आधी पासुनच चालताहेत हे प्रकार. मी दोन महिन्यापुर्वी एकदा सात वाजता दिसलं होतं असलंच प्रकरण!!
    थोड आडोसा असलेल्या जागा तर आहेत तिकडे बसावं…

    Reply
    1. अनिकेत Post author

      थोड आडोसा असलेल्या जागा तर आहेत तिकडे बसावं

      हो ना, माझंही तेच म्हणणं आहे

      Reply
  2. Sarang Pethe

    punyat z bridge ha adhipasunach hya sathi prassiddha hota… magchya varshi bharpur vela punyala jaycho tevha ashich drushya disaychi….
    mala vatta lahan mulanche parks, nana-nani park….tasech ata couples park kadhayla have…!!!!

    Reply
    1. अनिकेत Post author

      mala vatta lahan mulanche parks, nana-nani park….tasech ata couples park kadhayla have…!!!!

      मनापासुन पटलं, खरंच हवे आहेत असे पार्क्स

      Reply
  3. Abhijit

    हे तर नेहमीचच आहे. ५-७ वर्षांपासून चालू असेल हे. ही पोस्ट जरा उशीराच आल्यासारखी वाटते.

    Reply
    1. अनिकेत Post author

      असु शकेल. मी कधीच नाही म्हणलं माझी पोस्ट किंवा माझा ब्लॉग हा लेटेस्ट घडामोडींवर प्रकाश टाकणारा आहे. 🙂

      Reply
  4. भुंगा

    झेड ब्रीज हा “लव्ह बर्डस” पॉईंट झालाय… ! शिवाय नदीच्या काठाने पहा – बरेच प्रकार चालतात. पुणे मिरर मधले ते “प्यार किया तो डरो” लेख वाचला. बॅचलर असे पर्यंत या ब्रीजवरुन कुतुहुल म्हणुन फिरायचो…

    जग बदललय हे खरंय मात्र कोणत्या बाबतीत आपण बदलतोय ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी आहे!

    Reply
    1. अनिकेत Post author

      हो रे, नदीच्या काठचे प्रकार मला माहीत होते. नदीच्या अलीकडे रॅम्बो सर्कस आणि पलीकडे टिंब टिंब सर्कस 🙂

      Reply
  5. Aparna

    अनिकेत आपण काही म्हातारे झालो नाही आहोत…पण आता आपल्या आसपासचं जग मात्र जरा जास्त झपाट्याने बदलतंय आणि वेगळ्या दिशेनं इतकंच….मला माझ्या आणि माझ्यापेक्षा लहान मावसभांवडांत पण जनरेशन गॅप आल्यासारखं वाटतंय इतके फ़्री राहाणे याबद्दलचे त्यांचे विचार वेगळे असतात…..फ़क्त आपल्या मुलांना आपण चांगलं आणि वाईट यातला फ़रक कुठल्या प्रकारे समजावा याचा विचार पडतो कारण बाहेर सगळंच ओपनली चाललंय ना….

    Reply
    1. अनिकेत Post author

      हम्म. खरंच जनरेशन गॅप मला पण जाणवते. पटापट बदल होत आहेत जगात

      Reply
    2. sonalw

      मलाही तोच प्रश्न पडतो अपर्णा.
      सध्या माहितीचा महापुर आलाय आणि नजर असल्या प्रकारांना मरत चाललिये. शेवटी चांगल्या वाईटाची ओळख करून देण आपल्या हातात आहे. आणि आपल्या मुलांचे मित्र होवून राहणे सुद्धा.
      निदान ‘भीती’ पोटी किंवा ‘असुरक्षित’ वाटल्याने त्यानी चुकीच्या व्यक्तींच्या आहारी जावू नए इतकी काळजी आपण घ्यायची. नैसर्गिक भावना कोणाला चुक्ल्यात पण संस्कारच कुंपण भक्कम असावं.

      Reply
  6. Tejaswini

    झेड ब्रिज च्या पाठोपाठ आता अनेक ब्रिज चे हेच स्वरुप दिसू लागले आहे. राजाराम ब्रिज चे सुद्धा हेच चित्र आहे. या मधे कॉलेज तरुणाचे प्रमाण जास्त असले तरी कधी कधी मध्यमवयीन लोक सुद्धा दिसतात. तेव्हा मात्र त्यांच्या पेक्षा आपल्यालाच लाज वाटते…

    Reply
    1. अनिकेत Post author

      अरे बापरे, असं पण आहे का? मला नव्हतं माहीत हे

      Reply
  7. Ajay

    मी सुद्धा एके काळी झेड ब्रिज वर असायचो, अहाहा… गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…
    बाकी तुमच्यासारखे जलनेवाले जलते रहे हमे क्या ? 🙂

    मस्त पोस्ट बरं का !

    -अजय

    Reply
    1. अनिकेत Post author

      नाही रे बाबा, जळत वगैरे काही नाही प्रत्येकाचेच दिवस असतात. मग तु कुठल्या पुलावर असतोस सध्या? 🙂

      Reply
  8. अमृता

    Thats realy sad. असं प्रेमाचं जाहीर प्रदर्शन का मांडावं? तुम्हाला हवं ते करा पण जरा स्थळ आणि काळाच भान राखून.

    -अमृता

    Reply
    1. अनिकेत Post author

      मान्य आहे, पण स्थळं राहीलीच नाहीयेत पुण्यात सध्या, अर्थात म्हणुन पुलावर बसणे मात्र जस्टीफाय नाही होत.

      Reply
  9. gouri

    navaryaacha sakhol abhyas asato tarunaai vishayi – badalanaare trends, fashions, nave hotspots etc etc … 🙂

    mitr / maitrinila bhetanyasathi dusari jaga nahi ha kharech genuine problem aahe punyasarakhya shaharat. aani saddyachi pidhi jast bold ani open ahe he kharech.

    Reply
  10. Deep

    hmm so called sanskrutee rakshkaana ajun ek bahan milel mag todfod karnyacha! mag taaliban aani aplyat fark to kaay?

    mulatch aapan french kiss kade shudh najrene pahat naahi! (tashee shikvanch naahi lahanpanapaasn tylaa aapn taree kaay karnaar mhna 😦 ) 😛

    Reply
  11. vijay

    वाह ,
    म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नाना-नानी पार्क सारखेच प्रेमी युगुलांसाठी पार्क हवेत… म्हणजे थोडक्यात तुम्हाला चाळे (कार्यक्रम) करायला मोकळी आणी हक्काची जागा हवी ते सांगणा.., मग त्या साठी हॉटेल्स वगैरे आहेतच ना … त्या साठी पब्लिक प्लेस, बागीचे ते का ???

    प्रेम असतानि असे चाळे(पब्लिक प्लेस मधे असल्यामुळे चाळे बोलत आहे) करणे नक्कीच समर्थनीय नाहीये.
    आणी तुम्हाला असे चाळे करायचे असतील तर बेस्ट लग्न करा आणी काय धुदगुस घालायचा आहे तो घाला…!

    अशा प्रकारे प्रेम करणार्‍यांना प्रेमा साठी जागा हवी की शारीरिक *** साठी जागा हवी ????

    Reply
    1. अनिकेत Post author

      ए विज्या उगाच राईचा पर्वत करु नकोस. मी शारीरीक संबंधासाठी नाही म्हणत आहे, पण काही तारूण्य सुलभ भावना असतात की नाही? आणि त्यात काही वाईट आहे असे मी म्हणत नाही, नैसर्गिक आहे. आणि समजा वाईट असेल तरी ते असे रस्तो-रस्ती होण्यापेक्षा वेगळीकडे झालेले काय वाईट.

      महेंद्रंची एक पोष्ट होती ह्या विषयावर ज्यात त्यांनी चिन देश्यामध्ये असे काही पार्क उभे रहात असल्याबद्दल माहीती दिली होती. चिन सारख्या कर्मठ कम्युनिष्ठ देश्यात होऊ शकते तर आपल्या देश्यात का नाही?

      बाकी राहीले तर लग्न झालेल्यांचे, पोष्ट मध्ये म्हणल्याप्रमाणे, घरांचे आकार लहान होत असल्यामुळे अश्या गोष्टी सहजासहजी घरात शक्य होतं नाहीत मग त्यांनी काय रात्रीची वाट बघत बसायचे का? मला तरी यात अगदीच काही गैर वाटत नाही बरं का!!

      Reply
    1. अनिकेत Post author

      धन्यवाद अंजु. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा

      Reply
  12. anju

    yumhi mazya mail var kay ani kashya baddal pathaval ahe tech kalat nahi? jam bhiti vattey kay ahe te kashya sandarbhat ?karan aj pahilyanda comments dili ahe ani tyat he as .mala blogs baddal jast mahiti nahi pan sahaj marathi charolya chalayala gele ani he chhan vachayala milal.ata mondaylach mala vacha ta yeil. karan sundayla sutti asate.

    Reply
    1. अनिकेत Post author

      मी? काही नाही पाठवले तुला? तुझ्या कमेंटला प्रत्युत्तर दिले त्याची मेल आली असेल, त्याव्यतीरीक्त काही म्हणजे काहीच पाठवले नाही ये मी तुला आणि कुणालाही.

      स्पॅम मेल असेल कदाचीत

      Reply
  13. ruchita redkar

    माझ्या अनुभवावरुन सान्गतेय , जर मुलाला वा मुलीला ईतर छन्दामध्ये गुन्तवले तर सन्स्कार चान्गले होतात व मुले असे काही करत नाहीत
    उदा. शास्त्रीय सन्गीत, नाच ई.
    माझ्या पालकान्नी तेच केले, माझे मन मुम्बईत राहूनसुध्धा भरकटले नाही. मी आज १९ वर्षाची आहे पण माझा घरच्यान्शी सन्वाद व्यवस्थित होतो,
    पालकान्शी सन्वाद असल्यास पावले चुकत नाहीत. हे पाल्य व पालक यान्ना कळले पाहीजे.
    आणि हो मला ब्लोग आवडला, इथे(नेटवर) असे काही दर्जेदार वाचायला मिळेल वाटले नव्हते…

    Reply

Leave a reply to अनिकेत Cancel reply