टॅगला


टांग टिंग टींगा क टांग टींग टींगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा.
हे टॅगा टॅगी चाललेले बघुन मी शोधंत होतो कुणी मला टॅगले आहे का. महेंद्रंच्या पोस्टमध्ये नावं बघुन हुश्श केले, त्यांना मनापासुन धन्यवाद दिले आणि पोस्ट लिहावयाला घेतली.

1.Where is your cell phone?
नेहमी तिथेच असतो जिथे मी शोधत नाही

2.Your hair?
कटींगचे चार्जेस वाढल्याने शरीराने नविन उगवणे बंद केले आहे. उरलेले पोरगं उपटतो

3.Your mother?
उत्तर देणं अशक्य, आईबद्दल काय वाटतं शब्दात मांडण्याइतकं शब्द सामर्थ्य नाही आहे अजुन

4.Your father?
काय लिहु? काहीच कळत नाही

5.Your favorite food?
पुरणं पोळी, आमरसं, वरणं भात, आळुची भाजी, जिलेबी, भेळ

6.Your dream last night?
मी कुणाचातरी खुन केला होता आणि पोलीस मागावर आहेत म्हणुन पळुन जात होतो.

7.Your favorite drink?
दुध-साखरं आणि त्यामध्ये खुप सारी पार्ले-जी बिस्कीटं फोडुन टाकायची 🙂

8.Your dream/goal?
लवकरात लवकर कामातुन निवृत्त होऊन एखाद्या छोट्या गावात सेटल व्हायचे आहे. शक्य असल्यास एखादी लायब्ररी चालवणे. आणि हो.. एक तरी पुस्तक छापायचे आहे. आणि.. खुप सारी मुलं असली तर मज्जाच.. पण परवडायचं का?? हा मोठ्ठा प्रश्न आहे.

9.What room are you in?
बेड-रुम. खरं तर क्रिसमस इव्ह म्हणुन परमीट रुम मध्ये हवो होतो का?

10.Your hobby?
तश्या आहेत बोटावर मोजण्याइतक्या, पण मनापासुन आनंद घेतो ते म्हणजे – फोटोग्राफी

11.Your fear?
कुटुंबापासुन दुर होणे

12.Where do you want to be in 6 years?
जिवंत कुठेही

13.Where were you last night?
घरीच

14.Something that you aren’t diplomatic?
अशक्य आहे, मला वाटतं मी प्रत्येक गोष्टीत डिप्लोमॅटीक आहे.

15.Muffins?
काय असते हे?

16.Wish list item?
मेरीडा VS, किंवा ट्रेक ४७०० (सायकल आहेत), स्कॉर्पिओ, बेटर हेल्थ, एखादं कन्या रत्न

17.Where did you grow up?
कुडाळ, राजापुर, रत्नागीरी, पुणे

18.Last thing you did?
फेसबुक वर फार्मव्हिला चालु केले

19.What are you wearing?
काळा टी-शर्ट, राखाडी ट्रॅक पॅन्ट

20.Your TV?
केबलची लाईट गेली आहे त्यामुळे तिनही टिव्ही बंदच आहेत

21.Your pets?
स्वीटी, पॉमेरीयन भुभु

22.Friends
ओजस (४ वर्षाचा मुलगा) आणि पल्लवी (सौ)

23.Your life?
तसं छान आहे, पण प्रत्येक सुखाच्या मागे दडुन काहीतरी दुःख येतंच त्यामुळे सुखाची आजकाल भिती वाटायला लागली आहे.

24.Your mood?
चिंतामणी. कश्याचीही मला चिंता असु शकते.

25.Missing someone?
हो, बायकोला, जस्ट वॉक वर गेली आहे.

26.Vehicle?
ल्युमाला सायकल, बजाज प्लॅटीना बाईक आणि मारुती स्विफ्ट

27.Something you’re not wearing?
रिस्ट वॉच, कधीच घालत नाही

28.Your favorite store?
बिग-बझार

Your favorite color?
काळा. प्रचंड आवडतो मला हा रंग, माझे निम्याहुनही जास्ती कपडे काळ्या रंगाचेच आहेत.

29.When was the last time you laughed?
१० मिनीटांपुर्वीच. आज सकाळी ब्रेकफास्टला सांजा केला होता आणि योगायोगाने आत्ताही सांजाच झाला, तर मुलगा विचारतो आहे, “क्रिसमसला पिवळा सांजा का करायचा असतो?”

30.Last time you cried?
जेंव्हा अमेरीकेला जावे लागले, आणि मुलाशी स्काईपवर बोलताना तो म्हणाला, “बाबा तु मला दिसत नाहीयेस, कुठे आहेस, ये ना लवकर घरी. मला तुझ्याशी खेळायचे आहे”

31.Your best friend?
ओजस

32.One place that you go to over and over?
ब्लॉगचा कमेंट्स सेक्शन

33.One person who emails me regularly?
स्पॅम

34.Favorite place to eat?
स्वयंपाकघर

मी कुणाला टॅगु? बहुतेक सगळे टॅगलेलेच दिसत आहेत??. मे बी.. मी टॅगतो बेबलॉष्की फेम निवेदीता बर्वे ला.

Advertisements

10 thoughts on “टॅगला”

 1. अनिकेत मजा आली वाचायला….काय रे बायको वॉकला गेली तरी मिस करतो लकी आहे….ती……….:) असे नवरे जास्त ठिकाणी जन्माला येत नाहीत ……..ही ही………….
  हे आणि ते लायब्ररीचं मला आवडलं यार…मला पण आवडेल..इथल्या लायब्ररीत मुलाला घेऊन जाते तेव्हा तेव्हा हाच विचार येतो की आपल्याकडे पण अशा सोयी हव्यात…नेमकं टॅगच्या वेळी टांग मारली वाटतं विचाराने…

  1. धन्यवाद अपर्णा. किती सुख आहे ना लायब्ररीमध्ये, कामंही होतं, थोडेफार पैसेही मिळतात आणि बाकी आजुबाजुला जो इतका खजीना असतो भरलेला तो अनुभवताना दिवस कसे जात असतील कळतच नसेल.

 2. he post vachun pot dharun hasat hoto… mast re….. zopayla jatana hasre shan gheun jaatoy…. so aajchi ratra kharach chaan jail..!!!

  1. काय सांगु यार काय झक्कास सायकल आहेत त्या. इथे टिचकी मारुन बघ, किंमती पण बघ, तरी बरं सेल वर आहेत. सायकल का DSLR का दोन्ही मी अजुन ठरवु शकलो नाहीये. कोणी ह्या गरीब, होतकरु मुलाला चंदा देईल का हो?

 3. answers khup chan dilet… mast.
  32.One place that you go to over and over?
  ब्लॉगचा कमेंट्स सेक्शन
  he khup chan answer hot ….:-)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s