ढेपाळत चाललेले पालकत्व


सकाळी सकाळी पेपरमधल्या ‘त्या’ बातमीने आज लक्ष वेधुन घेतले. मुंबई-ठाणे परीसरात तिन कोवळ्या जिवांनी आत्महत्या केली. ११ ते २० वयोगटामधील ही मुलं ज्यांना आत्महत्या ह्या शब्दाचा अर्थही माहीती नसेल त्यांनी काही क्षुल्लक कारणांमुळे आपला जिव दिला.

मन अगदी हेलावुन गेले. एक मुलगा परीक्षेत नापास झाला म्हणुन, एक मुलीला तिच्या आई-वडीलांनी नृत्याच्या क्लासला प्रवेश घेऊन दिला नाही म्हणुन तर एकीला एका रिऍलीटी शो मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणुन. कारणं अगदी क्षुल्लकच, आपल्या दृष्टीने, पण त्या मुलांच्या दृष्टीने ही कारणं इतकी पराकोटीची होती की त्यांना आपला जिव गमवावा लागला.

लहान मुलांना प्रेशराईझ करु नका, त्यांच्यावर अपेक्षांचे, अभ्यासाचे ओझे टाकु नका असे आजवर अनेक मानसोपचारतज्ञ सांगत आले आहेत पण पालकांचे मात्र अजुनही त्याकडे दुर्लक्षच होत आहे. रिऍलीटी शोज मध्ये लहान लहान मुलांचा सहभाग हा लक्षणीय आहे. कित्तेक मुलं तर रिऍलीटी शोज नंतर प्रसिध्दी मिळवुन आज त्या चॅनलच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांचा भाग झालेले आहेत. कधीही टि.व्ही लावा, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात कधी ऍंन्करींग म्हणुन तर कधी ‘शो’ मधल्या रिकाम्या जागांमध्ये ‘फिलर्स’ म्हणुन काहीतरी पाचकळं विनोद करताना दिसतात. ज्या वयात ‘ससा ससा दिसतो कसा?’ ह्या गाण्यांवर नाचण्या-बागडण्याचे दिवस त्या वयात ‘सेक्सी आणि आयटम सॉग्स वर’ ही मुलं विचीत्र आणि कित्तेक वेळा अश्लिल नृत्य सादर करताना दिसतात. मनामध्ये विचार येतो त्या गाण्याचा आणि त्या नृत्याचा अर्थ तरी त्या मुलांना समजत असेल का? आणि विशेष म्हणजे त्यांचे पालकही त्यांच्या कुलदिपकाच्या ह्या चाळ्यांना टाळ्या वाजवुन प्रोत्साहन देताना दिसतात.

सहज विचार केला, ही मुलं अभ्यास कधी करत असतील? त्यांच बालपण कधी अनुभवत असतील? आज तुमच्याकडे कामं आहे, प्रसिध्दी मिळते आहे, पैसा येतो आहे म्हणुन शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. पण उद्या तुमच्याकडे काम नसेल तर हे शिक्षण, शालेय वयात मिळालेले संस्कारच तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. सचिन तेंडुलकर एक महान क्रिकेटपट्टु आहेच, पण तो कमी शिकलेला असुनही एक चांगला माणुस आहे. यश त्याच्या डोक्यात गेले नाही आणि अपयशाने तो खचुन गेला नाही. प्रत्येक वेळेस त्याने परीस्थीतीशी दोन हात करुन पुन्हा यशाच्या शिखराचा मार्ग पत्करला. आणि ह्याला कारणं आहे त्याला लहान वयातच मिळालेले संस्कार. जर तेच तुमच्याकडे नसेल तर मग त्या वेळेला आलेल्या प्रेशरचा, परिस्थीचा मुकाबला कसे करु शकणार? इतक्या लहान वयातच ह्या मुलांना प्रेशराईझ होत असेल आणि इतकी टोकाची भुमीका घ्यावीशी वाटत असेल तर मोठं झाल्यावर आलेली परीस्थीती, जबाबदारी कशी सांभाळणार?

आजचे युग हे स्पर्धात्मक आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ही आहेच. स्पर्धा निकोप असेल तर ती प्रत्येकासाठी पोषकच ठरते. जिंकण्याच्या जिद्दीबरोबर हार पत्करण्याची तयारीही प्रत्येकानेच ठेवायला हवी. आणि त्यासाठी आपल्या मुलांना सक्षम बनवणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. अपवादात्मक वेळेस परीस्थीमुळे, तर बहुतांश वेळा पैश्याच्या मागे लागुन आई आणि वडील दोघंही कमावताना दिसतात. अश्यावेळी पाल्याकडे, त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होणं सहाजीकच आहे. मुलांना ‘बेस्ट’ तेच देण्याच्या प्रयत्नात ‘तेल ही गेले आणि तुपही गेले, हाती राहीलं धुपाटणं’ अशीच परीस्थीती होतं चालली आहे.

विचार करा आपल्या आजी-आजोबांनी कशी मुलं वाढवली असतील? ती पण थोडी-थोडकी नाहीत, चक्क ८-१० मुलं. सर्वांना भौतीक सुख नसतील देऊ शकले पण त्यांना आनंदी बालपण मिळाले, मोठेपणी सक्षमपणे आव्हानं पेलण्याचे सामर्थ्य मिळाले. स्वावलंबनाचे, स्व-बळावर मोठे होण्याचे धडे मिळाले. पुढे त्यांनीच आपल्याला वाढवले, लहानाचे मोठे केले, शक्य तेंव्हा चांगलेच देऊ केले. पण आपण मात्र आजची पिढी आपल्या पाल्यांसाठी भक्कम आर्थीक पाठबळ देण्याव्यतीरीक्त अजुन फार काही करतो आहोत का? त्याने /तिने मागीतलेल्या १० गोष्टींपैकी ४ गोष्टींना नाही म्हणण्याची हिम्मत आहे का आपल्यात? त्याला /तिला वाईट वाटु नये म्हणुन म्हणा किंवा ‘आपल्याला मिळालं नाही, त्यांना मिळु दे’ म्हणुन म्हणा त्यांचे प्रत्येक लाड पुरवले जातात. एखाद्या दिवशी तुम्ही त्यांना मग ‘नाही’ म्हणता. तुमच्या नाही म्हणण्यामागची भुमीका त्यांना समजत नाही आणि मग ते आकांडतांडव करतात. सरळ मागुन नं मिळणारी गोष्ट आक्रस्ताळेपणाने मिळते म्हणल्यावर मुलं तश्शीच होतात. ‘नाही’ शब्द त्यांना अपमानकारक वाटु लागतो.

बाळाची चाहुल लागल्यापासुन त्याच्या / तिच्या जन्मानंतरच्या काही वर्ष जो आनंद, जो वेळ आपण आपल्या पाल्याला देतो तितकाच किती पालक त्यानंतरच्या काळात देऊ शकतात? कित्तेक वेळेला ३ ते ६ महिन्यांपासुनच बाळांची रवानगी ‘डे-केअर’ मध्ये केली जाते. ज्या वयात त्यांनी आईचं बोटं धरुन जग पहायला शिकायचं, ज्या वयात आईच्या घट्ट मिठीची उब अनुभवायची, ज्या वयात आज्जी / आजोबांकडुन लाड करुन घ्यायचे, ज्या वयात त्यांच्याबरोबर लहान होणाऱ्या बाबांबरोबर मस्ती करायची त्याच वयात ते कुठल्यातरी ताई, मावशी, काकु, आज्जीच्या घरी रहातात. ज्यांनी आपल्या आई-बाबांना फक्त सकाळी धावपळ करताना आणि संध्याकाळे दमलेले, त्रासलेले, कंटाळलेले, वैतागलेले पाहीले आहे त्यांना आपल्या आई-वडीलांबद्दल असा कितीसा आदर वाटणार? ज्यांनी लहानपणी आईला वेळ नाही म्हणुन कुठल्याश्या स्वयंपाकीण बाईने केलेला किंवा बाहेर दुकानात/हॉटेलमध्ये मिळणारा आहारच खाल्ला आहे त्यांना आईच्या हातच्या वरण-तुप-लिंबु भाताची चव कशी कळणार?

झाडाची मुळच जर जमीनीत घट्ट रोवली गेली नाहीत तर त्याचा वटवृक्ष कसा होणार? ज्याचे बालपणातच मन पोखरले गेले आहे, ते कणखरपणे स्वतः काय घडणार? आणि पुढची पिढी काय घडवणार?

असं म्हणतात आजची पिढी स्वतंत्र आहे. मान्य आहे, पण हे स्वातंत्र्यच एक दिवस त्यांच्या मुळावर उठणार आहे. ह्यांना इतके स्वातंत्र्य दिलं कोणी? आपणच!, आपणच दिलेल्या भक्कम पॉकेटमनीने, लहान वयातच मिळणाऱ्या प्रसिध्दीने, पालकांच्या वेळेअभावी केल्या जाणाऱ्या स्वैराचाराने.

प्रश्न खुप आहेत, आणि त्याची उत्तरही आपल्याच आजुबाजुला कुठेतरी दडलेली आहेत. अनेक पालक वेळेवर गरज ओळखुन स्वतःला बदलुन घेतात. पाल्याच्या संगोपनासाठी स्वतःच्या चांगल्या नोकरीचा त्याग करणाऱ्या महीलाही आहेतच. पण जेथे नाही तेथे गरज आहे आपणं ती खोदुन काढण्याची. हे सगळे कुठे तरी थांबवले गेलेच पाहीजे नाही तर डोक्यात गेलेले हे यश आणि त्यानंतर आलेले अपयश, एकाकीपणा ही पिढी पचवु नाही शकणार आणि पेपरमधील कॉलम्स अश्या अनेक बातम्यांनी भरुन जातील.

तुम्हाला काय वाटते?

Advertisements

35 thoughts on “ढेपाळत चाललेले पालकत्व

 1. Ani, too good, satya lihele ahes tu; he vachun maybe parents will learn a lesson after reading this article

  Ekdum chan aheya lekh ani prabavshaali suddha, sakal paper la yeu de ha lekh 🙂

  – Kirti

  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद किर्ती. मला नाही वाटत पेपर मध्ये छापुन येण्याइतपत छान झालाय

 2. मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. सध्याच्या परिस्थितीत पालक आणि मुलं या दोघांचेही समुपदेशन केले जाणे आवश्यक आहे,म्हणजे पालक योग्य प्रकारे पालकत्व निभावू शकतील आणि मुलंही अशा परिस्थितीला योग्य त्या प्रकारे सामोरे जावू शकतील.

  1. धन्यवाद देवयानी.

   खरं तर समुपदेश ह्या प्रकाराला अजुनही आपण सरावलेले आहोत असं वाटत नाही. स्वतःहुन सहसा कोणी समुपदेशकाकडे जात नाही. मध्ये कोठेतरी वाचले होते, की आता सरकारी दवाखान्यांमध्ये समुपदेशक नेमणार आहेत. तसे झाले तर खरंच बरं होईल.

   सरकारी / खाजगी कार्यालये, शाळांमध्ये पण अशी सोय असावी असे वाटते.

 3. फार छान लिहिलं आहे. २००७ मधे ‘ग्रहकहित’ च्या दिवाळी अंकात ह्या विषयी लेख वाचला होता. लेखकाने पालकांना कळ्कळिचि विनंती केली होती की मुलं ६-७ वर्षा ची होई पर्यंत त्यांना भरपूर वेळ द्या कारण त्यांना पालकांचा सहवास हवा असतो. करियरची शर्यत थोडी बाजूला ठेवा. आणि एकदा का आपण ही जावबदारी घेतली की मुलांना वळण लावणे, प्रसंगी नाही म्हणणे वैगरे जमू लागेल. मग पुढे मुलं स्वता:च्या व्यापत गुंतले की पालकांना पुन्हा करियर/ इतर व्याप सांभाळायला वेळच वेळ आहे. Quantity of time is also important, not only quality. फार छान लिहिलं आहे. २००७ मधे ‘ग्रहकहित’ च्या दिवाळी अंकात ह्या विषयी लेख वाचला होता. लेखकाने पालकांना कळ्कळिचि विनंती केली होती की मुलं ६-७ वर्षा ची होई पर्यंत त्यांना भरपूर वेळ द्या कारण त्यांना पालकांचा सहवास हवा असतो. करियरची शर्यत थोडी बाजूला ठेवा. आणि एकदा का आपण ही जावबदारी घेतली की मुलांना वळण लावणे, प्रसंगी नाही म्हणणे वैगरे जमू लागेल. मग पुढे मुलं स्वता:च्या व्यापत गुंतले की पालकांना पुन्हा करियर/ इतर व्याप सांभाळायला वेळच वेळ आहे. “Quantity of time is also important, not only quality. Can you abandon food and survive only on vitamin pills?” मला तरी हे पूर्णत: पटलं.

  1. मुलं ६-७ वर्षा ची होई पर्यंत त्यांना भरपूर वेळ मिळावा या मताशी मी पुर्णपणे सहमत आहे. असो, लोकांच्या डोक्यात लवकर प्रकाश पडो हीच आशा नाहीतर अशी अनेक कोवळी फुल उमलण्याआधीच खुडली जातील 😦

 4. farch chhan tujha ha lekh sakal ya news paper madhe yeude. aaree he halli aasech chalale aahe.hya na tya karnavarun suside kartat mahunch ha lekh please news paperla yeu de.

 5. अनिकेत
  मी स्वतः बायकोला मुली मोठ्या होई पर्यंत नौकरी करु दिली नव्हती. म्हंटलं, की मुलींचा आणि तुझं बॉंडींग असं झालं पाहिजे की ते पुर्णपणे अनसेपरेबल असावं.
  मुली स्वयंपुर्ण झाल्यावर, म्हणजे धाकटी मुलगी जेंव्हा ९ वीत गेली तेंव्हाच सौ. ला नौकरी करु दिली.
  पण मला वाटतं की हा प्रत्येकाचा अगदी पर्सनल व्ह्यु आहे. बऱ्याच लोकांना जर काही कारणाने पैशाची गरज जास्त असेल तर बरेचदा इच्छा नसतांना पण नौकरी करावी लागते ..
  पण लेख अतिशय उत्तम झालाय…

  1. आमच्याकडे ही तसेच आहे. बायकोला इतक्या चांगल्या ऑफर होत्या, आहेत जापनीज ट्रान्स्लेटर साठि पण तिने स्वतःहुन आणि मी मिळुन आम्ही ठरवले की मुलासाठी दोघांनीही नोकरी करायची नाही.

   अर्थात तिचा माझ्या पॅरेंटींग वर विश्वास नाही, नाही तर मी नोकरी सोडुन मुलाला सांभाळायची तयारी दर्शवली होती

 6. khup chan lihilele ahe. tumhi sarvach vishyavar bolat…halli chi pidhi he samjaun ghet nahi kadhi ki balpan hai dondaach yete ek jevha apan lahan asto ani tevha jevha aple mul lahan aste ani tyachyabarobar apan lahan houn majaa karto.
  hope halli chi pidhi thodi tari sudharavai…

  1. आशेवर आयुष्य आहे मित्रा, आशा करायला काहीच हरकत नाही 🙂

 7. हम्म!!
  माझं याविषयावर जरा वेगळं मत आहे. माझे आईबाबा दोघेही नोकरी करायचे, मी आणि माझी बहीण आई येईस्तोवर एका मावशींकडे रहायचो…
  तरिही आई आम्हाला भरपुर वेळ द्यायची..रवी शनी तर पूर्णवेळ आई बाबा आमच्यासोबतच असायचे..त्यावेळ्ची आर्थिक परीस्थिती बेताचीच होती तरिही त्यांनी आमचं उत्तम प्रकारे संगोपन केलं..

  अर्थात त्याहीवेळी प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये आम्ही दोघीही भाग घ्यायचो..

  ज्यांनी आपल्या आई-बाबांना फक्त सकाळी धावपळ करताना आणि संध्याकाळे दमलेले, त्रासलेले, कंटाळलेले, वैतागलेले पाहीले आहे त्यांना आपल्या आई-वडीलांबद्दल असा कितीसा आदर वाटणार? >> हे दमणं, त्रासणं, वैतागणं जर मुलांना पाहुन हरवलं नाही तर पालक होण्याचा अर्थच काय?

  ज्यांनी लहानपणी आईला वेळ नाही म्हणुन कुठल्याश्या स्वयंपाकीण बाईने केलेला किंवा बाहेर दुकानात/हॉटेलमध्ये मिळणारा आहारच खाल्ला आहे त्यांना आईच्या हातच्या वरण-तुप-लिंबु भाताची चव कशी कळणार? >> आईला स्वयंपाकाला वेळ नाही यात आईच्या टेंडंसी चा दोष आहे असे मी म्हणेन..धावपळीच्या नोकर्या करुन आपल्या मुलांचं नीट संगोपन करणार्या किती आयांची नावं मी सांगु तुला..

  कदाचित याच कारणास्तव मला संदीप खरे ची “दमलेल्या बापाची कहाणी” कविता आवडत नाही..

  हे बघ, हे आपणच विनाकारण माजवलेलं स्तोम आहे..”आईला वेळ नाही, बापाला वेळ नाही” ..आयुष्यात कुठल्या गोष्टीची किती प्रायोरिटी आहे हे नं कळालेल्या लोकांची गोष्ट तु वर लिहिली आहेस..

  1. तुझी कमेंट वाचुनही माझे मत किंचीतही बदललेले नाही. मान्य आहे, अशीही लोकं आहेत हे दोन्ही सांभाळुन सगळे छान जमवत आहेत. अशी लोकं आहेत ज्यांना परीस्थीतीमुळे नोकऱ्या करणं भाग आहे आणि म्हणुनच मी तसे म्हणलं ही आहे. अपवादात्मक लोकं आहेत.. मान्य. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच, माझ्या पोस्टमध्येही मी अपवाद अमान्य करत नाहीये.

   पण निदान माझ्या पहाण्यात तरी अश्या लोकांचे प्रमाण खुपच कमी आहे नगण्य.

   नवऱ्याला वार्षीक ९ लाख पगार, त्यात बऱ्याच वेळा अमेरीकावारी म्हणजे $$ चे उत्पन्न अधीक. मुलीला पगार ३-४ लाख म्हणजे पैश्यांचे भरपुर सेव्हींग झालेले होते. जबाबदारी काहीच नाही. अश्यावेळेस मुलगी झाल्यावर काय करायला हवे? तु सांग! तुझ्या सद्सद विवेक बुध्दी काय म्हणते.

   माझ्या मते, जर मुलगी शिकलेली आहे, नोकरी करायची आहे कारण शिक्षण वाया घालवायचे नाही. मान्य.. नक्की कर, तिचा वैयक्तीक प्रश्न आहे तो. पण कधी?? मुलगी ३ महिन्याची झाल्यावर???? तिला पाळणाघरात ठेवुन??? हे काय? मला तर नाही पटलं हे.

   हे झाले एक उदाहरणं अशी १० उदाहरणं मी कसलाही विचार न करता तुला देऊ शकतो, कारण ती माझ्या डोळ्यासमोर आहेत.

   मी कधीच कुठलीही पोस्ट कुणी स्तोम माजवले आहे म्हणुन किंवा मिडीया हाईप आहे म्हणुन लिहीली नाही आणि लिहीणार पण नाही. मी जे पहातो, जे सत्य माझ्या आजुबाजुला आहेत त्यावर लिहीले आहे.

  2. अधिक विचार केल्यावर माझ्या असं लक्षात येतेय की तुझी कमेंटच थोडीशी चुकीची आहे. कारण माझ्या पोस्ट मध्ये मी आपल्या आई-वडीलांच्या पिढीबद्दल चांगलच लिहील आहे. कौतुकच आहे ज्या पध्दतीने त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले.

   माझी पोस्ट आपल्या पिढीबद्दल आहे. आपली पिढी, इन द सेन्स जे ६५-८० च्या काळात जन्मलेले आहेत आणि सध्या पालक आहेत. ह्या काळातील काही लोकं अशी आहेत ज्यांच्याबद्दल माझ्या पोस्ट मध्ये लिहीलं आहे.

   हा परीच्छेद तु निट वाचलास पुन्हा एकदा तर तुझ्या लक्षात येईल –

   विचार करा आपल्या आजी-आजोबांनी कशी मुलं वाढवली असतील? ती पण थोडी-थोडकी नाहीत, चक्क ८-१० मुलं. सर्वांना भौतीक सुख नसतील देऊ शकले पण त्यांना आनंदी बालपण मिळाले, मोठेपणी सक्षमपणे आव्हानं पेलण्याचे सामर्थ्य मिळाले. स्वावलंबनाचे, स्व-बळावर मोठे होण्याचे धडे मिळाले. पुढे त्यांनीच आपल्याला वाढवले, लहानाचे मोठे केले, शक्य तेंव्हा चांगलेच देऊ केले. पण आपण मात्र आजची पिढी आपल्या पाल्यांसाठी भक्कम आर्थीक पाठबळ देण्याव्यतीरीक्त अजुन फार काही करतो आहोत का?

   असो, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 8. अनिकेत , खरं तर मन सुन्न होते असे काहीही वाचले की…..

  हा गोंधळ गेले ८-१० दिवस खरं तर मनात आहेच……विषय आहे माझ्या लेकीच्या शाळेच्या सुरूवातीचा….तिच्या बरोबरीची म्हणजे अजुन ३ पुर्ण न झालेली बाकिची मुलं साधारण ऑक्टोबरपासून म्हणजे वयाच्या अडिचाव्या वर्षीच शाळेत जायला लागलेत. मी मात्र नको तो अट्टहास म्हणून तिला काही अजून शाळेत टाकलेले नाही. निदान वयाची ३ वर्ष तरी पुर्ण व्हायलाच हवीत या विचारावर आम्ही ठाम आहोत.

  तरिही अगदीच नाही तरी जुजबी तरी माहिती तिला व्हावी म्हणून तिच्याकडून थोडी अक्षरओळख करून घेत होते……इथे मराठी माध्यम शक्य नाही त्यामूळे A,B,C आले……..मग eye दाखव, nose, hands, legs वगैरे सुरू आहे एकीकडे…….. अगदी खेळातच सहजपणे जे तिला शिकवता येइल ते शिकवतेय मी!!!!!! तिच्या बरोबर असणारी आणि एक जोडी म्हणजे शेजारची एक मुलगी आणि एक मुलगा मात्र जाताहेत शाळेत ……खरं तर हा मुद्दा वैयक्तिक प्रश्न या सदरात मोडतोय……

  पण त्या मुलाच्या आईने सांगितलेले कारण असे की, “उतनाही ३/४ घंटे बाहर जाता है…थोडा रिलाक्स होता है घर!!!!”…..दुसरीचा मुद्दा असा की बच्चे स्मार्ट बनेंगे, ईसलिये उन्हे ज्यादा से ज्यादा exposure मिलना चाहिये…………सगळेच धावताहेत, मग त्या लहानग्यांनाही कोणी वगळत नाही……त्यांच्या फाईल्स घेउन त्यांच्या आयाच चर्चा करत असतात. पण मला जेव्हा माझी शेजीबाई म्हणाली की क्यूँ अपने बच्ची का नुकसान कर रही है?…….तेव्हा कळेना खरं तर काहीच…….तिला हसत ,” क्या करेंगे सारे ही बच्चे स्मार्ट बनके कुछ ऐसेही रहेंगे तो ही स्मार्ट चमकेंगे ना और वैसे भी उसके घर रहेनेसे मुझे कोइ प्रॉब्लेम नही है!!!!! ” असे म्हणून वेळ मारून नेली……..

  अश्या वेळी असे वाटायला लागते की आपण चुकतोय की काय? माझे लेकरू मागे पडेल की काय? पण मग विचार येतो मागे पडणार म्हणजे कुठे मागे , मुळात नर्सरी, KG या स्पर्धा आहेत का? की ईयता ? ज्ञानाचे लहानसे टप्पे….जिथे मुलांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या घडणीची सुरुवात होते…….जिथे त्या पिल्लांना किती आश्वासक वाटायला हवेय…….ज्या कोवळ्या हातानी, बोटाने खेळ खेळायचेत, मस्ती करायचीये त्या हातात पेन्सिल देउन आपण काय कमावणार नी काय गमावणार…….लिहीणे म्हणा किंवा चित्रकला, कलरिंग या गोष्टी मुलांना करायच्याच असतात पण त्या बळजोरीने न करता त्यांच्या मनाप्रमाणे करू दिल्या पाहिजेत ना!!!!

  आजकालच्या स्पर्धांमधे निरागसता हरवल्यासारखी आहे…….टि.व्ही. वर सतत होणारे रिऍलिटी शो नावाचे प्रकार ……या मुलांना आपण आपल्या आयुष्याच्या खेळण्याच्या, बागडण्याच्या, उन्मुक्तपणे बहरण्याच्या टप्प्यात आहोत या ’रिऍलिटी’ पासून किती दुर नेताहेत…….

  यशाची व्याख्या काय हेच कळत नाही…….सगळाच घोळ आहे रे…..मगे सोनलनेही छान लिहीलय यावर…..

  1. अश्या वेळी असे वाटायला लागते की आपण चुकतोय की काय?

   मलाही आधी हाच प्रश्न पडायचा. शाळेतले पालक त्यांच्या मुलांसाठी इतकं हायपर होतात हे पाहुन वाटायचं अरे तुम्ही असं वागताय की तुम्ही शालेय जिवनात नेहमी टॉपरच होतात. नाही ना!,तरीही जिवनात यशस्वी आहातच ना! मग तुमच्या चिमुकल्यांसाठी इतक्या लहानवयापासुनच इतकी का मारामारी?

   परवा तर चक्क एक आई तिच्या मिनी-केजी मधल्या मुलाला रस्त्याने ओरडत चालली होती, असा कसा तुझा रनिंग रेस मध्ये नंबर नाही आला म्हणुन

   कठीण आहे बाबा सगळं

 9. खुप छान लिहले आहेस ,
  हे सर्व खर आहे , पण हल्लिचे युग हे पूर्णपणे धावपलिचे युग आहे , त्यमाधे कोणी जर थांबले (का तर मूल लहान आहेत म्हणून ) तर खुप मागे रहनार , पैशाची कमी , सुखसोयीची कमी होणार ॥
  पण पालकाना हे कलायला हवे की फ़क्त पैसा पैसा करूँन कमवून काही सुख मिळत नहीं , चटनी भाखरी खावुन सुधा खुप मजेत दिवस जातात पण पूर्ण समाधानाने ,,,
  श्रीखंड पूरी खाव़ून , धावत रहायचे हे उपयोगाचे नाही ..
  जगा मोजकेच दिवस दिलेत देवाने ..

  1. खरं आहे, सुखाची व्याख्या ज्याची त्याने ठरवायला हवी. कुठे थांबायचं याची जाण ठेवली तर अशक्य काहीच नाही, नाही का?

 10. पालकानी आपल्या ईच्छा मुलांवर लादुन त्यांच स्वातंत्र्य हिरावु नये.त्यांच्या मनात काय आहे हे त्यांच्याशी सुसंवादान्र काढुन घेतले पाहिजे.नुसत्या सोयी पुरवुन काहिच फ़ायदा नाही तर त्यांच्यासाठी वेळ काढण फ़ार गरजेच आहे.पुर्वीच्या एकत्र कुटुंब पदधतीत मुलांवर घरात बरयापैकी संस्कार व्हायचे.(कारण त्यांच्यासाठी वेळ काढणार कोणीतरी असायच घरात) आजकालच्या बरयाच मुलांना आपल्या भावना कोणासमोर मांडता येत नाहीत आणी ते आतल्या आत खचत जातो.असो खुपच संवेदनशील विषय आहे हा आणी तुम्ही योग्य प्रकारे हाताळला आहे या लेखात.

  1. खरंच आहे, त्रिकोणी कुटुंबामुळे एकुलत्या एक मुलाला / मुलीला भावना मांडायला कुणीच नाही.

   पालकांनी हा विचार करणे गरजेचे आहे, तुमचे बालपण तुम्हाला भाऊ/बहीण होती म्हणुन जसे झाले तसे तुम्ही एकटे असताना झाले असते का? तुम्ही जसे तुमच्या भावंडांबरोबर बालपण अनुभवले तसेच बालपण अनुभवण्याचा हक्क तुमच्या मुलाला / मुलीलाही आहे

 11. sahajach शी अगदी सहमत….आणि हो…अनिकेत तुमच्या लेखातील एकेका शब्दाशी सहमत…
  खरच काय मिळवतो आपण धावुन???? पॆसे??
  मात्र त्या बदल्यात आपण जे काही गमावतो आहे ना…त्याची किंमत कशी करणार…
  ३० जाने ला बरोब्बर १ वर्श होईल …मी IT मधली मोठया पगाराची नोकरी सोडुन….आणि मागचा १ वर्श खरच इतका पटकन गेले…
  माझ्या पिल्ले सोबत भरपुर मजा केली…आणि करीअर आहेच की…ब्रेक के बाद….

  1. मनाली, आपण जो निर्णय घेतलात तो खरंच स्वागतार्ह आहे.

   आपण आणि आपले पिल्लु ह्यामधील नाते असेच वाढत जावो आणि तुम्हा सगळ्यांना अस्सेच अनेक सुखाने ओतप्रोत भरलेले क्षण नशीबी येवोत हीच सदिच्छा

 12. छान लिहीलं आहेस अगदी समर्पक. बाय द वे, तू पुन्हा ब्लॉगींग करताना पाहून खुप आनंद झाला. अनिकेत, थोडं का होईना लिहीत जा रे, नेहमीच छान वाटतात तुझे पोस्ट.:-)

  -अजय

 13. Aniket, Lekh khup mast aahe, pan mala vatate ki ajun ek option aahe, to mhanaje aai cha part-time job. Manya aahe ki part-time job madhe job-satisfaction milat nahi pan kahitari kelyache samadhan milate. Swataha chya anubhavahun bolat aahe.

  When my elder one was born, I quit the job but I was misarable at home. I was working for few yrs before and it was not easy for me to quit and take care of a child 24*7. Me being misarable was not helping the kid too. Thats when I joined part-time. Now I get some me-time and at the same time I get enough time (Atleast according to me) with my kids.

 14. अगदी खरय. खूप मोठा प्रश्न मांडला आहे तुम्ही. कुठेतरी चूक पालकांचीच आहे.मुलांना प्रत्येक प्रसंगाला तोंड देता आले पाहिजे, अपयश पचवता आले पाहिजे तसेच यशाने हुरळून जाता कामा नये हे सगळ मुलांना स्वतःला थोडेच समजणार. ते पालकांनीच शिकवायला हवे.
  आपल्याकडच्या शिक्षणावर मी एक post लिहिणारच होते. त्यातले काही मुद्दे post आणि comments मध्ये चर्चिले गेले आहेत. तरीही लिहीन म्हणते.

 15. तुमची पोस्ट परत एकदा पाहुन खुप आनंद झाला. खरेच, आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जे बालपण दिले ते आपल्या मुलांना देण्याची शक्ती व बुद्धी देवाने आपल्याला द्यावी. कारण आपल्या पालकांनी आपल्याला काही द्यायचे राहिले आहे असे आपल्याला वाटत नाही, आणि आपल्या मुलांनीहि हेच म्हणावे. (पाळणाघर व व्रध्दाश्रम या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असेहि काहिजण म्हणतात)

 16. अनिकेत, तुझी पोस्ट वाचून बरं वाटतंय आणि वाईटही…बरं म्हणजे तू लिहिता झालास याचं आणि वाईट अर्थातच त्या सर्व निरागस कळ्यांसाठी ज्यांनी उमलण्यापुर्वीच स्वतःला संपवलं…आजही अजून पाच आत्महत्यांबद्द्ल वाचताना डोळे भरून येतात…कोण चुकलं?? पालक, आपली शिक्षणपद्धती की सगळीकडची जीवघेणी स्पर्धा?? आता भारतात परत यायचे डोहाळे लागलेत तर असं सगळं वाचून भिती वाटते रे…शेवटी आपलं पोरही त्याच स्पर्धेच्या लाटेत अडकणार की काय?? माझ्या भाचीला तिथे आजकाल माझ्याशी फ़ोनवरही बोलायला वेळ नसतो (वय वर्ष–अकरा) नेहमीच ही परिक्षा ती स्पर्धा काहीना काही तरी….बरं बाकीचे करतात म्हणून स्वतःलाही तिला सगळ्यात भाग घ्यायचा असतो…आणि पालकत्वाचं म्हणशील तर मीही मुलासाठीच घरी आहे पण इतकं कष्ट करून शिकलंय ते असंच घरी बसून राहाव यासाठी नाही फ़क्त आता तो लहान आहे म्हणून त्यालाही आई हवी…आजी घरी असणं हाही एक पर्याय आहे पण सर्वांच्या बाबतीत ते शक्य नसतं….असो…पण तू जे लिहिलंस त्यालाही बरचसं अनुमोदन आहे…
  मागे ओजसला फ़ोटो चांगले येतात पण तू मॉडेलिंग करत नाहीस हे पाहून मला खरंच बरं वाटतंय…
  आणि या सो कॉल्ड कॉंपिटिशनमध्ये आपल्या वयाला न साजेसं जे काही मुलांकडून करवलं जातं ना त्याला माझाही विरोधच आहे….अगदी लिटिल चॅम्प्सच्या लावण्यांनादेखील….
  लिहिता राहा…

 17. अजय, सोनाली, जिवनीका, शैलजा, अपर्णा – प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

  खरंच आहे, काल पुन्हा एकदा ४-५ आत्महत्यांबद्दल ऐकले. खरंच काय म्हणायचं ह्याला? ‘प्रेशरकुकर जनरेशन’???

  मला तर सगळं सोडुन एखाद्या खेडेगावात जाऊन रहावेसे वाटते आहे जेणेकरुन आपण आणि आपली मुलं ह्या रॅट रेस मध्ये ओढली नाही जाणार.

  आपण अश्या कितीश्या स्पर्धा-परीक्षा दिल्या होत्या तरी आपण यशस्वी आहोत ना? म्हणजे अगदी शिखरावर नसलो तरी आपले आणी आपल्या कुटुंबीयांचे पोट भरुन चार पैसे शिलकी ठेवु शकतोच ना? मग कश्याला हवी आहे ही पळा-पळी

  ४ लोकांच्या ह्या मुर्खपणामुळे बाकीचे लोकंही त्यामध्ये आपसुकच ओढले जातात. स्वतःचे तर आयुष्य उध्वस्त करतातच पण त्या बिचाऱ्या पोरांचे बालपणही विस्कडुन टाकतात

 18. khup chaan post. ya wiahyawar kitihi lihil tari kamich aahe. mulanna aapla wel hawa aahe. tyanna aapla bhakam aadhar hawa aahe. apan parabhut jhalo, padalo tari aapale aai-baba aaplyala titkyach premane swikartil ha wishwas hawa aahe.
  Tanvi, malahi kadhi kadhi bhiti watate ki majhya asha attitude madhe anushka mage nahi na padnar? pan kharach mage mhanje kuthe mage? fakt mark mhanjech sagal ka? tila ek manus mhanun samarth banwan jat mahtwach nahi ka?
  Shewati sukh aani anand yatla farak kadhi kalnaar aahe ya paalkanna? sukh denyasathi sagali jhatpat. aani aanand? to matr uthal. warwarchya bhoutik goshtinmadhe. thambayla hawa ha aghori khel mulanchya manashi chalawlela. aani he aapanach karu shakato.
  mage ek post taakli hoti mi sasa aani kasawawar. yach wishayawarun. aniket, I agree to all yur points. thoda tras hoil tujhya majhya saarkhyanna pan prawahachya wirodhat pohan sadhya garjech aahe. aaplya fulansathi.

 19. Please kahi navin horrer…suspence…kiva love story keva yenar….. me keva pasun vat baghtey…….please mail kaerun kalva ha tumcha reply….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s