फ्रेंडशिप, लव्हशिप


‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चे फॅड यायच्या आधी म्हणजे साधारणपणे १९९०-१९९५ या काळात ‘फ्रेंडशिप’ आणि ‘लव्हशिप’ या शब्दांची फारच चलती होती. म्हणजे नविन कॉलेज प्रवेश झाल्यावर नविन मुलींशी ओळख कशी करायची? नव्याने कॉलेज सुरु झाले की पहिले काही दिवस नजरा इकडे तिकडे भरकटत असतात. कोण कसे आहे? कोण चांगलं? कोण वाईट? कोण ठिक-ठाक? ह्याची चाचपणी करण्यात जायचा. पहिले काही आठवडे उलटले, एकदा आपल्या वर्गातले चेहरे पाठ झाले की मग कधी कॅन्टीन मध्ये, कधी पार्कींग मध्ये तर कधी जिन्यामध्ये जाता येता एखादी छोटीशी स्माईल किंवा ‘हाय’ आणि ‘बाय’ जमलं तर दुधात साखरचं. पण ओळख ह्या-उपर नसायची. चोरुन, इतर मित्र-मैत्रिणींकडुन त्याच्याबद्दलची किंवा तिच्याबद्दलची अधिक माहीती गोळा करणं चालुच असायचं. आणि मनामध्ये कुठेतरी वाटायला लागायचं हा किंवा ही आपली जिवाभावाची मैत्रिण किंवा मित्र झाला तर?

मग कित्तेक दिवस मनावर येत चाललेले दडपण, मनालाच समजावण्याचा प्रयत्न “अरे बोलुन तर बघ! विचारल्याशिवाय कसे कळणार तुला त्याच्या/तिच्या मनामध्ये काय आहे?”

शेवटी तो दिवस उजाडतो, तुम्ही तिला किंवा त्याला कुठेतरी एकट्यात गाठता आणि मनामध्ये रेंगाळत राहीलेला तो प्रश्न विचारता – “मला फ्रेंडशिप देशील?”

तुमच दिसणं, वागणं, बोलणं, हसणं थोडक्यात तुमचा प्रेझेंन्स ह्यावरुन ह्या प्रश्नाचे उत्तर असायचे. उत्तर ‘नाही’ असं आलं तर तुम्ही अगदी देवदास होऊन जायचा. एकतर ‘दुनिया डुब गयी’ किंवा ‘दुनिया को जलाकर राख कर दुंगा’ ह्यापैकी एक असं काहीसं होऊन जायचं. दुसऱया दिवशी ‘तो’ किंवा ‘ती’ समोर दिसली तर मान खाली घालुन समोरुन निघुन जाणं हा एकमेव पर्याय समोर असायचा. ग्रुप मध्ये कळलं तर फार मोठ्ठी नाचक्की होईल ह्या विचाराने तुम्ही शक्यतो त्या घटनेवर पडदा टाकायचा प्रयत्न करायचा. तरी तुमच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ह्याची कुणकुण लागायचीच, मग तुमच्या सांत्वनाचे सोपस्कार पारं पडायचे. “जाऊ दे रे / गं, एवढं काय त्यात? असतो एकेकाला माज!”

पण उत्तर ‘हो!’ असं आलं तर मात्र आकाश ठेंगण वाटायला लागायचं. चोरी-चोरी, छुपके-छुपके, तरीही मनामध्ये कुठेतरी कुणीतरी बघावं, कुणाला तरी कळावं ह्या भावनेने दोघांचे कॅन्टीन, लायब्ररी, पार्कींग मध्ये कोपर्य़ात गप्पा चालु व्हायच्या. बाजारामध्ये त्याकाळी नुकतेच फ्रेंडशिप बॅन्ड्सनी एन्ट्री केली होती. तुमची ती, किंवा तुमचा तो जरा ‘मॉड’ प्रकारातला असला तर एखाद्या रम्य दिवशी तो किंवा ती तुमच्या पुढे फ्रेंडशिप बॅन्ड धरायचा. मग काय विचारता बाप्पा!! ‘आय हॅव कॉन्कर्ड द वल्डच” की. तो रंगीत धागा जणु हिऱ्या मोत्यांनी सजलेल्या कड्यावानी भासायचा नं!. मनगटाला बांधलेल्या त्या रेशमी धाग्याच्या गुदगुल्या हृदयापर्यंत पोहोचायच्या. तो रेशमी धागा अगदी ‘शेखचिल्लीच्या’ धाग्याप्रमाणे जपला जायचा, जणु काही तो तुटला तर आयुष्य खल्लास..!

त्या ‘फ्रेंडशिप बॅंन्ड’ ने दोघांमधलं बॉन्डींग अधीक घट्ट व्हायचे. एकाशिवाय दुसऱ्याला करमायचेच नाही. त्याच सुमारास ‘शाहरुख-काजोल-राणी मुखर्जी’ चा कुछ कुछ होता है प्रदर्शित होतो.

“प्यार क्या है?” ह्या प्रश्नाला शाहरुख म्हणतो ‘प्यार दोस्ती है! अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नही बन सकती तो मै उसे प्यार कर ही नही सकता!!’

बस्स.. नकळतच दोघांच्याही मनात ‘क्या ये प्यार है?’ असा प्रश्न डोकावु लागण्याची शक्यता निर्माण झालेली असते. ‘लव्ह इज इन द एअर’ असते, प्रेमाचा मौहोल तयार झालेला असतो. ‘फ्रेंडशिप बॅन्ड’ चा स्पर्श शरीरावर रोमांच उभे करत असतो. मैत्रिचे दिवस फुलपाखरासारखे केंव्हाच उडुन गेलेले असते. नकळत होणारे स्पर्श, चेहऱ्यावर ‘मिनींगफुल’ वाटणारे हास्य वेगळेच इशारे करत असतात.

लव्ह लव्ह लव्ह… ओ माय गॉड.. आय एम इन लव्ह!!!

ईटरनीटी.. मोठ्ठी पोकळी.. जी भरुन काढणे गरजेचे असते…
‘विचारावं का?’
‘नको जाउ देत!, उगाच चांगली मैत्री तुटायची!’
‘पण असं जगण्यात तरी काय अर्थ आहे? किती दिवस असं चालणार? आणि विचारल्याशिवाय त्याच्या / तिच्या मनामध्ये काय चालले आहे कसं कळणार?’

‘बस्स.. इस्स पार या उस्स पार, जे होईल ते होईल’

आणि मग शेवटचा ‘तो’ प्रश्न…. ‘मला लव्हशिप देशील??’

Advertisements

32 thoughts on “फ्रेंडशिप, लव्हशिप

 1. Hmm, shala collage madhe tich tar majja asate …
  Ugach nahi mhanat …

  “…Give me another chance
  I wanna grow up once again”

  “Lahanpan dega deva mungi sakharecha rawa..!
  Eraavat ratn thor tyaasi ankushacha maar ..!”

  Missing those school, collage days.

  Love … friends .. What a life that was ..!

 2. kharach sahi hota १९९०-१९९५ wala jamana..all this process was really subtle..
  10 varshat he sagala khupach badlun gela aahe..
  aata “friendship deshil?” asa kahi chukun koni konala vicharla, tar vedyat kadhtil tyala/tila!
  Friendship aaj kal assumed asate.. koni konashi ekda bolla ki jhale friends!.. aani bolayala konala kahi reason lagat nai..
  Aani loveship la pan phar kahi kashta ghyave lagat nahit aaj kal
  Single dating phar june jhale ase mhanne aahe aajchya pidhiche.. aaj-kal “Double dating” ka jamana hai!
  4 varshan purvi mala koni Double dating mhanje kay vicharle asate tar mi sumbha sarakhi pahat rahile asate .. pan aaj kal its too normal!
  Ya saglyat padnya peksha arrange marriage concept phar bara vatato 🙂

  1. खरं आहे प्राजक्ता, सध्याचे युग सगळ्याच गोष्टींत वेगळं आहे बघ.

   बाकी तु एरेंज मॅरेजला फेव्हर करतेस? असं नको करुस, असं केल्याने तु तुझ्या कित्ती तरी चाहत्यांची मनं मोडती आहेस 🙂

 3. He ase asayache ka tevha? mala mahitach navhate. 90-95 madhe mi shalet hote. Arthat tyane kahi farak padat nahi.
  @prajakta: Ase mhanu nakos, phar kala purwi mala pan asech watayache. pan shewati love-marriage ch kele! Ya muddyawar mi aniket la support karate.

 4. Mast zalay lekh….90-95 chya kalat mi 7 varshacha hoto….. 🙂 An frindship detis ka yavar Makyacha 7 chya AAt gharat madhil joke aathvala….Mazya Gava kade ajun kahi pramant aahe he….Pan Chya aayala Ya Punyatlya Pori laich Forward aahet…Maza pahile kahi divas locha zla hota rao……Pan mi zaloy adjust….

 5. कसलं सही लिहिलयं…
  कुछ कुछ होता है चा संदर्भ तर भन्नाटच…

 6. मित्रा,
  तु एकदम जुन्या आठवणी जाग्या केल्या (खरेतर जखमेवरची खपली काढली.) माझ्याबाबत घडलेला एक किस्सा (बाकीचे सर्व संदर्भ वगळून आणि गोपनीयता सांभाळून सांगतो.)
  १९९८ किंवा १९९९ साल असेल. मी इंजिनीयरींग कॉलेजमध्ये होतो. मेकॅनिकला असल्याने सुंदर मुलींच नेहमीप्रमाणे दुर्भिक्ष्य !!
  त्याचसुमारास कॉंप्युटर इंजि. मध्ये मला एक मुलगी भावली. पुणेरी, अतिशय सुंदर, ग्रेसफुल, नाजूक, एखाद्या कवितेची प्रेरणा असावी अशी.. त्याकाळी मी दिसायला फारच विचित्र होतो. (अर्थात आता काही फार चांगला नाही दिसत..) अल्लड, स्वप्नाळू वयात जर अशी मुलगी आवडली तर काय होते हे सांगायची गरज नाही. खुप धीर करून आणि मित्रांच्या सततच्या पाठपुराव्याला कंटाळून तिला विचारायचे ठरवले. माझ्या धैर्याची झेप पहाता मी काही डायरेक्ट प्रपोज करू शकणार नाही हे पहिल्या आठवडाभरातच मला कळून चुकले. एक दिवस मनाचा हिय्या करून तिला बोलायचे ठरवले. स्थळ होते कॉलेजचे पार्कींग. ती आपली सायकल घेऊन घरी निघालेली. (हाय रे..त्या काळच्या बहुतांश मुली सायकल वापरायच्या. हे स्कूटी पेप वगैरे फॅड नंतरचे..) त्यानुसार आपली नायिकासुद्धा तिची ती सायकल काढण्याच्या तयारीत असताना मनातून अक्षरश: थरथर कापत मी तिच्यासमोर गेलो. साधारण दोन दिवस अतिसाराने ग्रस्त होऊन डॉक्टरकडे तपासणीसाठी गेलेला रूग्ण ज्या आवाजात बोलेल, त्या पीचमध्ये मी म्हटलं “हाय”. तीने चमकून माझ्याकडे पाहिलं.
  ती: येस
  मी:(उगाचच घसा खाकरत)आर यू मधुरा? (सालं माणूस नको तिकडे मातृभाषा सोडून उगाचच का आंग्लाळतो काही कळत नाही.)
  ती: येस
  मी:(आवंढा गिळत,शक्ती एकवटून) आय वॉंट टू मेक फ़्रेंडशिप विथ यू
  ती:बट आय डोंट वॉंट टू.
  मी:(थोबाडीत खाल्यासारखा चेहरा करून)बट व्हाय?
  ती: आय ऑलरेडी हॅव मेनी फ़्रेंडस (शिंचे हे काय कारण आहे का?)
  मी: (घशातल्या घशात) लेट्स्‌ हॅव ओअन मोअर….
  आमची नायिका मात्र हे शेवटचे वाक्य न ऐकता स्कार्फ बांधून निघुन गेली. अश्या प्रकारे माझी ’एक छोटीसी लव्ह स्टोरी’ आरंभ होण्याआधीच संपली. तेंव्हाच मी मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रतिज्ञाआ केली की काहीही (???) करेन पण कुठल्याही सूंदर मुलीला फ्रेंडशिप करशील का म्हणून विचारणार नाही :P:P

  1. लय भारी विक्रांत 🙂
   असो, जे झालं ते झालं, आता सद्य परीस्थीती काय आहे? अजुनही ‘सिंगल रेडी टु मिंगल’ ?

 7. अनिकेत,
  लेख छान, लोक मागच्या काळात गेले पण माझ्या काळात मात्र फ्रेंडशिप मागणं वगैरे प्रकार नव्हते. बाकी बरयाच गोष्टी समजल्या या लेखामुळे.

  विक्रांतः अनिकेतची पोस्ट वाचायच्या अगोदर मी तुझी प्रतिक्रिया वाचली. एक नंबर, हसून हसून पोट दुखतंय माझ. भारी अनुभव होता.
  मजा आली.

  -अजय

 8. माझ मत याउलट आहे. फ्रेंड शिप बेल्ट वगैरे ठीक आहे पण लग्न म्हणजे अरेंज मेरीजच योग्य. माझ्या मते लग्न आधी प्रेम असेल तर नंतर ते स्थिर राहत नाही. लग्न हा पुनर्जन्मासारखे असते. तेथून नवीन सुरुवात केली तर प्रेम जास्त जोमाने वाढत जाते व टिकते. असो ज्याची त्याचीसमज वेगळी असते.

  1. माझ्या मते ‘लव्ह मॅरेज विच इस ऍरेज्ड’ बेस्ट पर्याय आहे. प्रत्येक याचे काही प्रोस आणि कॉन्स आहेत त्यामुळे ज्याची त्याची मतं वेगळी असु शकतात

 9. khupcha chhyan aare junya aathvani jaagya kelayas. tu mahantos te khare aahe halli valantianday mahatle ki mule aakhdya mulila tya divshi kase propose karta yael aachacha vichar karat aastat. tashi mala vikrant chi story far aavadli. Aniket tujhya blog che post che post vachun far maja yate byeeeeeeee.

 10. 1.sundar post..bhari.
  2. Arranged kaay kinva love marriage kaay. Lagn he premachya nardyala nakh ahe. Lagna itaki premachi kashi itar kashanech hou shakat nahi.
  3. Tarihi lagn karane atyavashyak..karan lagn na karta nusti loveship karat rahile tari kahi varshaat tech honaar.
  4. School days loveship sarvaat mast..
  5. Cycle stand var exam la best luck dyayala jaane..cycle stand var pori varoon itar gund poraanchya dhamkya khane he shubh labh sudaivane mala hee jhalet..mhanoon aayushy sampann ahe..aso.

  1. प्रतिक्रिय्बद्दल धन्यवाद नचिकेत

   मुद्दा क्र.५ -…. अरे गुलाsssssमा!!!

 11. प्रिय अणिकेत
  मी तुझा ब्लॉग खूप दिवसा पासून वाचत आहे परंतु आज पर्यंत तुला मी रिप्लाइ केला नाही परंतु तुझा फ्रेंन्ड शिप वरील ब्लॉग वाचला आणि मला शाळेतील व कॉलेज मधील आठवणी ताज्या झाल्या व तुला काही लिहावे से वाटले माझे काही अनुभव सांगावे से वाटले शाळा व कॉलेज मधील खूप अनुभव आहे एक शाळेतील अनुभव सांगतो मी व ती शाळेत असताना एकमेकना सातवी पासून ओळखत असे. दोघा मधे फक्त नझरा नझर होत असे त्या वेळेस काय वय लहान होते त्यामुळे जास्तसमजत नसे. दोघे एकमेकांना खूप आवडायेचो परंतु बोलायची हिंमत होत नसे. असेच सातवी चे वर्ष संपले तसेच आठवी चे वर्ष संपले नाव्हवित असतांना आकर्षण जास्त वाढत गेले परंतु बोलायची हिम्मताच होत नसे एकमेकामधे आभ्यासा बद्दल बोलणे व्हायचे नोट्स ची देवाण घेवाण पण व्हायची परंतु एकदम सरळ मनाने. शेवटी शेवटी वर्ष संपतेवेली दोघां मधील आकर्षण अजुन वाढत गेले, शेवटी आम्ही वर्गातल्या शेवटच्या दोन कोपर्‍यातल्या बेंच वर बसून एकमेकांकडे बेंच वर डोके ठेवून बघत बसायचो परंतु प्रेमाबद्धाल बोलायची दोघांची देखील हिंमत होत नसे शेवटी वर्ष संपले आम्ही दोघे पास झालो. मी कसबसा काठावर पास झालो. परंतु आमची दहावी ला भेट झालीच नाही कारण तिची बदली झाल्य मुळे दोघे एकमेकान पासून वेगळे झालो दहावी ला ती दुसर्‍या ठिकाणी गेली व आमची अशी अर्धवट प्रेम कहाणी अपूर्ण राहिली परत आमची भेट झालीच नाही. खरतर माझ्या अशा लाजालु पानामुळे माझे हे प्रेम अर्धवट राहीले. परंतु दुसरे अशे ही वाटते की जे झाले ते बरेच झाले कारण आम्ही दोघे ही तेव्हा लहानच होतो आणि असल्या लहान वयात असले प्रकार ठीक नाही . तुला काय वाटते त्या वेळेस मी विचारायला पहिझे होते का?

  अण्णा

  1. ब्लॉगवर स्वागत. मला वाटतं प्रेमाबद्दल बोलणे कदाचीत योग्य ठरले नसते. किंबहुना ते प्रेमच होते का नुसते आकर्षण हे सुध्दा सांगणे कठीण आहे. पण तुम्ही एक गोष्ट जरुर करायला हवी होती आणि ते म्हणजे तिच्या नविन बदलीचा पत्ता.
   बदली अशी एका दिवसात अचानक होत नाही, तेंव्हा जाण्याआधी आपण संपर्क क्रमांक किंवा नविन पत्ता घेतला असतात जेणेकरुन नंतर संपर्क करता आला असता आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर कदाचीत काळाच्या ओघात मिळाली असती.
   ब्लॉग वाचत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा

   आभार

 12. hi,me kharach sangte,chup chaan lihitos tu Aniket,actually me jevha shalet hote,tevha ek mulga satat pahat asaycha,me 9th madhe hote tevha,satat aamchyat marks konala jast miltat yachi zunzad asaychi,to social sci.madhe tr me maths madhe jast marks,ase nehmich,pan mala to aavdaycha,tyachi hairstyle,class madhle sarv jan mala aani tyalahi ekmekanchya navavarun chidvayche,tyaveli prem kay aste yachi kalpana navti,mhanun me ragvayche,aani tyala rakhi pathvli tr tyane ti return keli,nanter college madhe bhetla,tevha hi chorun chorun pahaycha,me mazya friends na tyala dakhvle,sarvanna to aavdla,aani ka kon jane to mala shodhnyacha praytn karaycha tevha mi hi sukhd vhyayche,pan aata to kadhi bhetat dekhil nahi,pan tuzya ya junya aathvnimule mala maze divas aathvle tyasathi dhanyavaad

 13. Hi Aniket, Mi tuza blog barech diwas vachat aahe… khupaach chaan … it is my routine to read it now … ani secondly mala melavyachi kalpana khupaach avadali ..keep it up guys ..mala tar khup eccha hoti pan mi sydney madhe ahe so cant come.
  hya blog varun .. mala maze college diwas athavale … I married to my best friend ..we knew each other since 12 years before marriage ….we started when we were kids .. I was in 7th Std ani to 11th madhe 🙂 ..mi tar khupach lahan hote ..pan it wwas so good ..and journey is so beautiful … mi tar ek motta article lihila aahe … long back .. ata amchya lagnala 3 varshe jhaali .. i have njoyed every bit of it ..and I am and i wil .. pan i certainly believe in LOVE-MARRIAGE… i feel ekda tari manasaane premaat padavech ..it is a beautiful thing in the world .. premaat padalyavar sagala kahi badalatach .. ani ek vegala khup chaan journey chalu hoto …. career, struggle, eccha , ambition hya sagalyala ek strength milate ani sagala drushtikon ch badalto .. phone var bolana, vaat pahana .. ekmekana chorun bhetana ..miss karana .. it is so amazing .. so I would always PLEASE FALL IN LOVE and RISE in LIFE ..:) cheers Shraddha from Sydney

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s