गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – २


एक मोssssठ्ठ शहर असतं. त्या गावात किनई एक छानसं जोडपं रहात असतं. ‘हॅप्पी कप्पल’!! तो जो नवरा असतो ना, तो थोडास्सा दुःखी असतो. म्हणजे कारण असं की तो ज्या कंपनीत काम करत असतो ना, त्या कंपनीचा मालक म्हणजे त्याचा बॉस ना, त्याच्या बायकोचा बाप असतो. आणि हे लग्न ना त्याला मान्यच नसतं मुळी. केवळ एकुलत्या एक मुलीच्या आग्रहाखातर त्याने जमवुन घेतलेले असते. पण त्यावरुन तो त्याच्या ‘जावयाला’ घालुन पाडुन बोलत असतो.

अश्या ह्या दुःखी जावयाच्या संसारात त्याचा एक मित्र येऊन टपकतो. काही तरी बनण्यासाठी, करण्यासाठी तो या मोठ्ठ्या गावात आलेला असतो. पण त्याचं असं कुणीच नसत ना, मग काय करणार बिच्चारा तो त्याच्या मित्राकडेच येऊन रहातो. पण त्याने होतं काय, ह्या दोघांचा संसार उध्वस्त व्हायला लागतो ना. त्यांना स्वतःची अशी प्रायव्हसीच रहात नाही. तो इतके काय काय घोळ घालतो घरात, ती बायको जाम भडकते त्या नवऱ्यावर. ‘एक तर हा तरी राहील घरात नाही तर मी तरी’ इथपर्यंत येऊन पोहोचते.

परंतु, हळु हळु प्रकरणं निवळत आणि तो मित्र त्या बायकोचा फेव्हरेट व्हायला लागतो. दोघांच चांगलं सुत जुळते. बायको शाळेत शिकवायला असते आणि एकदा कसल्याश्या प्रोजेक्टसाठी लेक्चर द्यायला ती तिच्या नवऱ्याला बोलावते. परंतु तो येऊ शकत नाही आणि नेमका त्याच वेळेस डबा घेऊन तो मित्र येऊन पोहोचतो. मग तोच लेक्चर देतो. इतकं छान की मुलं पण खुश आणि ती बायको पण खुश.

याच वेळेस, त्या नवऱ्याच्या ऑफीसमध्ये काही वेगळे घडत असते. एका प्रेस्टेजीयस प्रोजेक्टचे त्याने मेहनत घेऊन बनवलेले डिझाईन तो बाप दुसऱ्या कुणाच्यातरी नावाने खपवुन टाकतो नं. जाम भडकतो तो नवरा, आणि अश्या तडकलेल्या डोक्याने घरी आलेल्या नवऱ्याला त्याच्या मित्राच्या आणि बायकोच्या सलोख्याच्या संबंधांबद्दल शंका यायला लागते.

मग बऱ्याच घटना घडतात आणि दोघांमधील दुरावा वाढत जातो. शेवटी वैतागुन तो नवरा घरातुन निघुन जातो.

मग तो मित्र आजुबाजुच्या परिसरातील छोट्या मुलांच्या सहाय्याने ‘मित्र हरवला आहे’ अश्या आशयाची पत्रक बनवतो आणि गावभर ती पत्रक घेऊन मित्राचा शोध घेत फिरतो.

शेवटी एकदाचा तो मित्र भेटतो, दोघांमधील शंका, वाद मिटतात. तो मित्र नवऱ्याला घेऊन घरी येतो आणि शेवट गोड होतो.

‘प्रसाद ओक’ आणि ‘मकरंद अनासपुरेच्या’ मैत्रीवर बनलेला तुम्हाला ‘दोघांत दुसरा आता सगळं विसरा’ ह्या सिनेमाची ही गोष्ट वाटली की नाही. बरोबर आहे तुमचं उत्तर, पण ही गोष्ट खरी आहे ती ‘यु मी ऍन्ड ड्युपरी’ ह्या २००६ मध्ये प्रदर्शीत झालेल्या एका इंग्रजीपटाची.

बघा, सापडला की नाही दुसरा चोर???

आय.एम.डी.बी.: ५.७/१०
कॅटेगरी: विनोदी / फॅमीली

Advertisements

19 thoughts on “गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – २

 1. हा हा हा…पकडली चोरी तू त्यांची आणि आम्ही तुझी…..अगदी मागच्याच आठवड्यात पाहिला..काहीच दुसरं नव्हतं बहुतेक करण्यासारखं म्हणून….:)

  1. अरे, नक्की बघ, ‘यु मी ऍन्ड ड्युपरी’ मस्तच आहे सिनेमा

 2. अजुनही बरेच चोर असतिल, पण जो पर्यंत सापडत नाहीत तो पर्यंत त्यांना चोर म्हणता येणार नाही.. खरं नां? मागे एक पोस्ट होतं भाग्यश्री कुलकर्णीच्या ब्लॉग वर याच विषयावरचं, तिने चक्क साईटच दिली होती अशा चोरलेल्या सिनेमांची..

 3. चोरीबद्दल माहित होतं पण प्रचंड बोअर झाला हा सिनेमा…
  डुप्री बघायचा चान्स दोन तीनदा गेला… … अजून परत मुहूर्त लागायचाय…

  चालायचंच!

 4. अश्या अजून काही मी पकडलेल्या चोर्‍या –
  (यात काही तर अगदी फ्रेम टू फ्रेम कॉपी आहेत)
  १) My Cousin Vinny – कायद्याचं बोला
  २) When Harry Met Sally – हमतुम
  ३) The Wedding Date – आप के खातीर
  4) Where Eagles Dare – लोहा, तेहलका
  5) Death At Funeral – बाप रे बाप
  6) There is something about Marry – दिवाने हुए पागल
  7) Out of Time – जहर

  1. Death At Funeral – बाप रे बाप
   हा तर खरंच जश्याच्या तस्सा उचलला आहे, पाहीला आहे मी

 5. अजून एक मराठी सिनेमा चेकमेट म्हणजे इंग्रजी Confidence 🙂

 6. Same thing about Kaydahya Bola by Makrand Anaspura… It directly from english movie… I couldn’t remember the name properly but it is somthing like My Uncle….
  which comes frequently on Star Movies…

 7. महेश भट आनि मन्डळिन्चे ७०% चित्रपट हे hollywoodचे कथानक चोरुन बनवलेले असतात,छोट्या मोट्या scenechi तर कित्येकवेळा उचलेगिरि होते ,किन्वा २,३ चित्रपट एकत्र करुन त्यान्चा एकच चित्रपट बनवतात ,नविन आलेला जानि दुश्मन हा एकच चित्रपट पाहिला तरिकित्येक hollywood चित्रपट पाहिल्याचे पुन्य आपल्या खात्यावर जमा होते .

 8. Tich goshta EK DAV DHOBIPACHAD chi… Silvestor Stalone chi OSCAR pahilye ka koni?.. tya film chi jasshaaaas tashiiiiiiii copy aahe Ek Dav… agdi camera angles… characters… ani.. sagla kahi.. but surely watch.. OSCAR u will knw n even enjoyy…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s