गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – १


आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, अगदी छोट्याश्या.

गोष्ट १ –
एक असते छोटेसे गाव. त्या गावात एक कुटुंब रहात असते. कुटुंबात असतात एक नवरा बायको, एक छोटी मुलगी, एक मुलगा, एक भाऊ आणि एक आजोबा. तो मुलगा आणि त्या भावाच्या बाबतीत काहीतरी विचीत्र प्रकार असतो. काय? ते नंतर सांगेन!!.

मुलीला नृत्याची फार आवड असते आणि अश्यातच तिला नृत्याशी संबंधीत एका स्पर्धेत मध्ये भाग घेण्याची संधी मिळते. घरची परिस्थीती बेताचीच असते. परंतु सर्वजण एकत्र होऊन त्या मुलीला त्या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देतात. इतकेच नाही, तर सर्वजणच त्या स्पर्धेला त्या मुलीबरोबर प्रोत्साहन देण्यासाठी जाण्याचेही ठरवतात. ही स्पर्धा दुसऱ्या गावाला असते ना, त्यामुळे सर्वजण एक गाडी भाड्याने घेतात आणि निघतात सगळे या प्रवासावर.

मग काय होतं, नेमकं वाटेत त्यांची गाडी बिघडते. म्हणजे काय होतं की, गाडी बंद पडली की परत सुरुच होत नाही. मग ती सुरु करण्यासाठी सर्वांनी मिळुन गाडीला धक्का मारणं हा एकमेव पर्याय उरतो. त्या दुसऱ्या गावाला जाईपर्यंत ही ‘धक्का’दायक गोष्ट चालुच रहाते. बंद पडली गाडी सगळेजण खाली उतरून धक्का मारायचे, गाडी सुरु झाली की पटापट गाडीमध्ये चढुन बसायचे. मजल दर मजल करत असा त्यांचा प्रवास चालु असतो. मध्ये मध्ये छोट्या छोट्या अडचणीय येतच असतात. एकदा तर काय होतं, ते ते आजोबा अचानक आजारी पडतात. मग त्यांना
उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागते. त्यामुळे आजोबांना दवाखान्यातच सोडुन बाकीचे सर्वजण स्पर्धेला निघुन जातात.

स्पर्धेला विवीध भागातुन छान छान कपडे घातलेले, नटलेले, श्रीमंत लोकं आलेले असतात, त्यांच्यापुढे ही बिच्चारी मुलगी खुप्पच फिक्की पडते. परंतु कसे बसे करुन ती तो शो निभाउन न्हेते..

आणि मग.. एक मिनीट काय म्हणालात? ही गोष्ट ऐकलेली आहे? काय?.. सिनेमाची आहे. हो बरोबर.. कुठल्या?? ‘दे धक्का’… चुsssssssकले…. म्हणजे तसे बरोबर आहे, पण त्याआधी ही गोष्ट आहे एका इंग्रजी सिनेमाची ‘लिटील मिस सनशाईन‘ जो २००६ साली प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटाची गोष्टच काय, या चित्रपटातील बरीचशी दृश्य जश्शीच्या तश्शी ‘दे धक्का’ चित्रपटात उचलली आहेत अगदी कॅमेराचे ऍंगल सेटींग सुध्दा.

काही किरकोळ फरक आहेत म्हणजे ‘दे धक्का’ मध्ये तो मुलगा पहेलवान दाखवला आहे तर यामध्ये तो मुलगा ‘गे’ असतो. ‘दे धक्का’ मध्ये ‘सिद्धार्थ जाधव’ ला विनोदी व्यक्तीरेखा आहे तर या चित्रपटात तो भाऊ ‘थोडासा वेडा’ दाखवला आहे. ‘दे धक्का’ मध्ये आजोबा (शिवाजी साटम) जिवंत रहातात, यामध्ये ते मरतात. ‘दे धक्का’ मध्ये ती मुलगी शेवटी जिंकते, या मध्ये जिंकत नाही आणि शेवटचे म्हणजे ‘दे धक्का’ मध्ये ‘सिक्स सिटर’ वाहन दाखवले आहे, यामध्ये ‘मेटाडोअर’ आहे. असे किरकोळ फरक वगळता बाकी सगळे शेम टु शेम.


आय.एम.डी.बी.: ८/१०
कॅटेगरी: विनोदी / फॅमीली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुढच्या भागात – दोघांत तिसरा आता सगळं विसरा..

Advertisements

14 thoughts on “गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – १

 1. हा…हा..हा…
  असे बरेच उदाहरणं सापडतील..
  उदा.
  एक डाव धोबीपछाड = ऑस्कर
  डोंबिवली फास्ट = फॉलींग डाउन
  🙂

  1. हो ना, करा, करण्याबद्दल काही नाही, पण खाया पिया सब कुछ और डकार भी नही दिया. कुणी एक अक्षर काढलं नाही, इन्स्पायर्ड सुध्दा कोणी म्हणलं नाही.

   बाकी ‘डोंबिवली फास्टचे’ मला नव्हते माहीत 😦

 2. माझ्यासाठी तर हे खूपच ‘धक्का’दायक आहे
  काय मला एक डाव धोबीपछाड ,डोंबिवली फास्ट आणि याच्याबद्दलहि काही माहिती नव्हते 😦

 3. हे काय मला वाटल आपले मराठी लोक आता चांगले चित्रपट बनवु लागले आहेत पण हे काय….माझ्यासाठी पण‘धक्का’दायकच आहे हे.
  अजुन एक चोर(http://wp.me/pziD7-6G)मी पकडलेला…

 4. डोंबिवली फास्ट बद्दल नव्हतं माहित…पण लिटिल मिस सनशाईनचं ठाऊक होतं…..काय यार आपल्याकडे सगळे एक एक चोरगुरू आहेत एकंदरित…

 5. मराठी सिनेमा ‘इंटरनॅशनल’ होत चालला आहे अजुन काय ? लिटील मिस सनशाईन बद्दल माहीत होतं पण ‘डोंबिवली फास्ट’ बद्दल वाचून आश्चर्य वाटलं.

  -अजय

 6. हो. LMS वरून ’दे धक्क” बेतला आहे, हे मला माहित नव्हतं, ते मला नव-याने सांगितलं. खरं सांगू का, त्यावेळेस मला खूप अवघडल्यासारखं झालं. चित्रपट चांगला बनवला आहे पण शेवटी चोरीच ना!

  1. अंग बेतला कसला चक्क कॉपी पेस्टच आहे म्हणं ना

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s