डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

अप्सरा आली..

29 Comments


इंद्रनगरी मध्ये सर्व देवदेवतांची सभा चालु होती.

इंद्र देव म्हणाले, “बोला नारद मुनी, काय म्हणतं आहे भुलोक?”
नारदमुनी म्हणाले, “नारायण! नारायण!! काय सांगु देवा, अहो सर्व भुलोक तुमच्या नावानं बोटं मोडतं आहे?”

इंद्र देव म्हणाले, “अस्सं, का बरं? ह्याच कारण सांगु शकाल का तुम्ही?”

“महाराज, अहो तुम्ही इथे तुमच्या ह्या मोठ्ठ्या महालात बसुन सुरेल संगीत आणि मोहक अप्सरांच्या नृत्याचा आस्वाद घेता आहात, पण हा मनुष्य-गण ह्या परम सुखापासुन अजुनही वंचित आहे. महाराज आपण मनुष्य-प्राण्याची ही इच्छा आपण पुर्ण करावीत महाराज”, नारदमुनी हातातील चिपळ्या वाजवत म्हणाले.

“मुनीवर, तुमची इच्छा आम्ही पुर्ण करु. ह्या भुतलावर लवकरच एक अप्सरा अवतरेल, पण त्या अप्सरेला अनुभवायला आम्हाला एक नाही ३-४ रुप निर्माण करावी लागतील”, असं म्हणुन इंद्रदेवांनी सभा स्थगीत केली.

आणि काही दिवसांनी खरंच एक अप्सरा अवतरली, “नितळ कांतीच्या, आस्मानी डोळ्यांच्या सोनाली कुलकर्णीच्या देहात, मोहक आणि अतीशय गोड गळ्याच्या बेला शेंडेच्या आवाजात, अजय-अतुल ह्याच्या अजरामर वाद्यवृंदात, अप्सरा आली.. अप्सरा आली.”

नटरंग सिनेमाबद्दल, त्याच्या कथानकाबद्दल अनेक लोकांनी लिहीलेच आहे. त्याबद्दल अधीक काय लिहावे? थोडक्यात सांगायचे झाले तर दोन घुंगरांच्या पटावर पडण्यापासुन सुरु झालेला हा चित्रपट अगदी शेवटचा ढोलकीचा ताल संपेपर्यंत जो रंगत जातो ते वर्णने केवळ अशक्यच आहे.

बेला शेंडेच्या आवाजात, अमृता खानविलकरच्या ठसकेबाज लावणीत सुरु झालेला हा चित्रपट अंगाअंगावर रोमांच उभे करतो. चित्रपटगृहात नुसता टाळ्या आणि शिट्यांचा आवाज भारलेला असतो. आपला हात आपसुकच डोक्यावर जातो. पण आपल्या डोक्यावर हवेत उडवायला नाही फेटा असतो, नाही टोपी. अतुल कुलकर्णीचा कसलेला रेखीव बांधा पाहुन वाटते कश्याला आपण शाहरुख, अमिर, सलमान च्या सहा आणि आठ पॅक्सचा बाऊ करतो अहो आपला अतुल काय मागे आहे काय? आणि त्यावर साज त्याच्या त्या पिळदार मिश्यांचा. कसला तरणाबांड गडी दिसतो तो!!

सोनाली कुलकर्णीची “एन्ट्री” पण लाजवाब, तिला नाचताना पाहुन असं वाटतं सरळ जागेवरुन उठावं आणि त्या जत्रेत जाऊन तिच्यासोबत ताल धरावा.

चित्रपट भावनांच्या अनेक हिंदोळ्यावर पुढे सरकत रहातो आणि तो चित्रपट अनुभवतानाच मनात एकच विचार चालु असतो, “अप्सरा कधी प्रगटणार?”

“अप्सरा आली” हे गाणं खरंच इतकं देखणं आहे. सोनाली कुलकर्णीचा तो नाजुक, कमनीय बांधा, त्यावर पांढरी शुभ्र साडी, अप्सरांना साजेसा साज-शृंगार, त्याला बेला शेंडेच्या गोड आवाजाची साथ आणि अजय-अतुलचे संगीत. सर्व काही मोहीनी घालणारे. ७० फुटी पडदा आणि डॉल्बी सिस्टीमच्या आवाजात खरोखरच आपण एखाद्या इंद्रपुरीत तर नाही ना? अस्साच भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. हे गाणं इतकं रंगत की त्याला काही तोडच नाही. स्वर्गीय, डिव्हाईन, पवित्र, मनावर नाजुक संगीतांचे तरंग उमटवणारे अश्या अनेक शब्दात ह्या गाण्याचे वर्णन करता येईल. वाटतं दोन्ही हातं हवेत फिरवुन बोटं डोक्यावर मोडुन दृष्ट काढावी, मला खात्री आहे, सर्व बोटं काड काड आवाज करत मोडली जातील 🙂

चित्रपट संपल्यावरची ती ढोलकी तर अक्षरशः बाहेर पडण्यासाठी उठलेल्या तमाम प्रेक्षकवर्गाला जागच्या जागी खिळवुन ठेवते. डोक्यापासुन पायाच्या नखांपर्यंत रोमांचक लहर ढोलकीच्या प्रत्येक थापावर पसरत असते. असं वाटतं हे सुख कध्धीच संपु नये, हे वाद्य असंच वाजत रहावं.. कायमचं!!!

चित्रपटाला आलेला एक चकचकीतपणा उठुन दिसण्यासारखा. कॅमेराने टिपलेले रंग अगदी सुरुवातीचा तो घुंगरु पडताना टिपलेला मोरपंखी असो, रात्रीची निळाई असो, की विवीध रंगांनी रंगलेला तमाश्याचा फड असो, सगळंच अतुलनीय.

“सारं गावं नावं ठेवायला लागलंय तुला, सगळे तुला नाच्या, फलक्या म्हणत आहेत”, ह्या टोमण्यावर रागानं थरथरणाऱ्या अतुलचा “जे म्हणत आहेत त्यांच्या आया बहीणी दे लावुन माझ्याकडे, दावतो एकेकाला” हे उत्तर पुर्ण थिएटर दुमदुमुन सोडते.

तमाश्याला, त्या कलाकृतीला वाईट दिवस आले आहेत असे नेहमी ऐकण्यात येते. पण नटरंग चित्रपट पाहिल्यापासुन मला तर वाटते पुर्ण मराठी जनता तमाश्यामागे, लावण्यांमागे वेडी झाली आहे. पुण्यामध्ये डेक्कनच्या पुलाखालील पात्रात जेथे बऱ्याच वेळा सर्कस किंवा मनोरंजन नगरी उभी असते, तेथे तमाश्याचा एक फड टाकुन तर बघा, अख्खी जनता लोटेल तेथे. मला तर उगाचच हे सो-कॉल्ड फॉर्मल कपडे फेकुन देऊन मस्त एक पांढरा पायजमा, त्यावर पांढरा सदरा, पायताण आणि डोक्यावर एक फेटा घालुन फिरावेसे वाटायला लागले आहे बघा. आणि हिच परिस्थीती माझ्यासारख्याच अनेक संगणक क्षेत्रात काम करणार्य़ा तरूणांची आहे.

चित्रपट प्रदर्शाच्या आधीपासुन, आजपर्यंत रोज मी यु-ट्युब वर जाऊन ह्या चित्रपटातील गाण्यांचे व्हिडीओ मिळतील का पहातो आहे. ही गाणी कित्तीही वेळा ऐकली तरी कानांचे आणि मनाचे समाधानच होतं नाही आहे. अजुन एकदा.. अजुन एकदा करुन दिवसभर तीच गाणि सतत ऐकत बसावी असं वाटतं बघा!

सर्व उत्तम तर आहेच हो.. पण “जाऊ द्या नं घरी” आणि “अप्सरा आली” गाणी ऐकली की असं वाटतं “अजय-अतुल” आणि “बेला शेंडे” ह्यांना एक कडकडुन ‘प्यार की झप्पी’ द्यावी आणि म्हणावं… “तुस्सी ग्रेट होssss”

Advertisements

29 thoughts on “अप्सरा आली..

 1. वर्णन मस्त केले आहेस रे … अमेरिकीला यायच्या आधी पिच्चर पहायचा राहिला… 😦 हॉउसफुल होता रे … टिकिट्स नाही मिळाली.. आता आलो की नेक्स्ट डे बघणार मी.. होप्फूल्ली थीएटरला असेल…

 2. असेल म्हणजे, असणारच, लय भारी शिनेमा आहे, इतक्यात काही जात नाही बघ :-).

  नक्की बघ

 3. Kudos to Aniket..
  Cinema pahatana exactly kay vatate tyache exact varnan kele aahes bagh 😀

  phakta aata ti shevtchi dholki milali na kuthuntari ki samadhan vatel bagh..
  prayatna karit rahuch aapan 🙂

  aani hopefully aata circus chya jagi tamasha lagel punyat..
  but i cant imagine punyacha crowd kay karel..
  tamasha baghnya sathi khali baskan mandun baslya shivay tamasha chi majach kay ti..
  pan Punekar khurchya ghalun bastil kadachit..
  shittya marane tar Punekaranna hardly jamtay bagh..
  aani hatat firvayala gharun towel gheun yave lagtil kadachit 😛
  (No offence intended.. mi pan Punekarach aahe aata :))

  aamchya gav chya jatret dar varshi asto tamasha..
  ya veli hi aahe..
  yenar ka?

  • लय वेळा प्राजक्ता, कधीच जाणार सांग.. एक सच्चा पुणेकर काय करु शकतो ते तुला तुमच्या गावच्या जत्रेत दाखवुन देईन 🙂 खरंच जाऊ.. सांग मला कधी ते!

 4. आयला एकदम झाक वर्णन केल बगा
  अगदी असच वाटत हुत ह्यो सिनेमा पाहताना

  बराबर ‘मनातले’ लिहल हाय तुम्ही

  लय भारी 🙂

 5. mast eakdam zakas lehele aahe tu .. सिनेमा kahe aajun pahela nahe pan .. songs matra lahe bhari aahe paha ..

  sam

  • तु यायला हवं होतस राव त्या दिवशी, अज्जुन मज्जा आली असती बघ.

   जरुर बघ सिनेमा!

 6. mala ajun ekda jayachaa ya cinemala, ‘ved’ aahe ha cinemaaa….

  -Ajay

  • हो, खरंच बेस्ट आहे, मी पण दुसऱ्यांदा बघीतला

 7. (माझे अत्यंत लाडके कलावंत श्री. अवधूत गुप्ते यांची क्षमा मागून..)
  अन्या…मित्रा…..मर्दा….माझ्या सोन्या…….. जिकलंसं रे जिकलंस… पार तोडून फोडून टाकलंसं…. एकदम रापचिक लिहिलय… कडकडीत म्हणजे कडकडीत..
  आमच्या कोल्हापुरात जर तू असा लेख दाखवलास ना तर म्हणतील ’नाद्‍खुळा…. टांगा पलटी घोडं फरार’ !!!
  आयटीतला माणूस ना रे तू? मग तुझ्यासारख्यानं हे असं लावणी आणि तमाश्यावर लिहायचं म्हणजे राखी सावंतनी शुभंकरोतीवर आपलं मत देण्यासारखं आहे… पण तू एकदम चाबूक लिव्हलयं (टीप – हा “चा” चाकामधला “चा” नसून चार मधला “चा” आहे :P)कानफाडात मारल्यासारखा ब्लॉग झालाय हा…
  ढोलकीवर थाप पडली अन् ते टण् टण्‌ टण् टण्‌ टणाणाण्ण्ण्ण सुरू झालं की ज्याचे पाय थिरकत नाहीत तो मराठी माणूस नाहीच… सॉल्लीड……..सॉ…ल्ल्ल्ल्ल्लल्ल्लीड…….

  • धन्यवाद विक्रांत, तुझे प्रोत्साहन आहे म्हणुनच जमतयं बघ. तुझ्या प्रतिक्रियांबद्दल, वेळोवेळी दिलेल्या सल्यांबद्दल शतशः धन्यवाद.

   बाकी तुझाही ब्लॉग चिकटत आहेच ह्या श्रुंखलेत तेंव्हा कळेल कोण तोडतेय ते 🙂

  • ही कमेटपण टांगा-पलटी, घोडं फरार आहे…

 8. Apratim!!

  Vartamanpatratale reviews jhak martil tuzhya ‘review’ pudhe. Nustya varnanane tu Sonali sakshat ubhi kelit dolyasamor. Atul Kulkarni che varnan zhakas.

  Asech abhipray lihit raha.

  – Sanjay

 9. Chan zalaiy post….An kharach Ajay Atul ch music,Atul cha abhinay,Sonali cha danse bharic jamalay…..Exam zalyavar pahilyanda hach pic pahanar…..

  • नक्की बघ सागर, असे सिनेमे फार कमी वेळा बनतात

 10. apsara ali bhutalavar

 11. मित्रा, खूप एकलं आहे नटरंग बद्दल ! नक्कीच पाहणार हा चित्रपट.

  राहिली गोष्ट लावणीची … जुन्या मराठी चित्रपटातल्या सारखा तमाशा/लावणी बर्‍याच यात्रे मधे पाहता येईल असं वाटलं .. पण निराशा झाली.
  फक्त धूम मचाले आणी दर्द-ए-डिस्को सोडलं तर नशिबी वेगळं काही नाही आलं ..(आर. आर आबांची मेहरबाणी – डान्स बार बंद – सगळी पब्लिक तमाशा मधे होती)

  एकदा वरगिनल लावणी पाहायची आहे ..!

  • नक्की बघ, प्रश्नच नाही. मी सुध्दा तरसतो आहे लावणी प्रत्यक्षात बघायला. २०१० च्या विश-लिस्ट मधील एक मुद्दा आहे बघ तो 🙂

 12. चित्रपट खरोखरंच सुंदर आहे. एकदा पाहून मन भरलेलं नाही. पुढच्या आठवड्यात पुन्हा पहाण्याचा बेत आहे.

  • हो कांचन खरं आहे, मी सुध्दा दुसऱ्यांदा बघीतला

 13. मस्त झालंय लेख. एकदमच.. आणि अप्सरेला प्रत्यक्ष इंद्राने स्वर्गातून भूतलावर पाठवण्याची कल्पना तर अफाटच.
  आम्हाला अजून एकदाही बघायला मिळालेला नाही आणि लोकं मस्त २-२ द बघतायत.. 😦 .. मजा आहे बाबा…

 14. वा! वर्णन छान केलेय ! माहितीबद्दल धन्यवाद!

 15. tumhi nashibvan ahat rao, ajun ethe apsara alich nahiye, tyamule vat baghna suru ahe………………………….

 16. मनात आलं डोक्यात घुसलं – खूळ तमाशाचं,
  कला ह्याची बावनकशी – भय कसलं मग समाजाचं.

  पैसा सोडंल घरदार सोडंल – सोडंल की हो कुणी लाज,
  मर्दानगीच्या गोष्टी करणारं – होईल का पर कुणी नाचं?

  नावच ज्याचं गुणा – अंगी गुणांची खाण,
  पुरषाच्या शरीरामधी – वागवतो बाईचा प्राण.

  बाईचं घेतलं रुप स्वतः – देवानं भक्तांसाठी,
  पैलवानाचा होई नाच्या – इथंच रसिकांसाठी.

  ऐशी ज्याची किर्ती – देह झिजवी कलेसाठी,
  मानाचा मुजरा रसिकांचा – ‘अतुल’ नटरंगासाठी…

  http://aisiakshare.blogspot.com/2010/02/blog-post.html

 17. mast ho shinde saheb mast ani ho aniket chan lihale ahe

 18. lai bhari varnan kel aavdl…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s