पुणे मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा, निमंत्रण पत्रिका(टिप: वरील निमंत्रण पत्रिकेवर टिचकी मारुन अधीक मोठ्या आकारातील पत्रिका आपण वाचु शकता किंवा संगणकावर उतरवुन घेऊ शकता.)

नमस्कार मंडळी,

मराठी ब्लॉगर्सचे पुण्यातील पहिले-वहिले संमेलन येऊ घातले आहे. शनिवारी पेठे काकांबरोबर बसुन कार्यक्रमाची अंतिम रुपरेषा ठरवली आहे. ह्या मेळाव्यासाठी “स्टार माझा” मध्ये काम करणारे श्री. प्रसन्न उपस्थीती लावणार आहेत, तसेच पुण्यातील मिडीया-हाईट संस्थेतर्फे काम करणारे त्यांचे काही मित्र सुध्दा ह्या सोहळ्यास येतील. मराठी ब्लॉगींग विश्वाचा गाढा अनुभव असलेल्या ह्या लोकांचे अनुभव, अपेक्षा, अधिक माहीती कळेल अशी आशा वाटते.

कार्यक्रमाची रुपरेषा अशी राहील –

दिनांक – १७ जानेवारी, २०१०
वेळ – सायंकाळी ठिक ४ वाजता
स्थळ – पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग बाझार जवळ, पुणे ४११ ०३९.
(राजाराम पुलावरुन सिंहगड रोडवर डावीकडे वळावे)

४ ते ४.१५ – सर्व ब्लॉगर मित्र-मैत्रीणींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जमणे

४.१५ ते ४.३० – उद्यान प्रवेश. तेथून डाव्या बाजूने धबधब्या जवळ असलेल्या गोल झोपडीत जमणे. येथे एक रजिस्टर ठेवले जाईल. त्यात प्रत्येकाने पुढील क्रमाने माहिती देणे अपेक्षित आहे..१)संपूर्ण नाव २) पत्ता ३) दूरध्वनी क्रमांक ४) ब्लॉग चे नाव ५ ) ब्लॉगचा पत्ता URL ६) ई-मेलचा पत्ता इत्यादी.

४.३० ते ५ – श्री. अनिकेत समुद्र, श्री. सुरेश पेठे आणि श्री. दिपक शिंदे आलेल्या मित्र-मैत्रिणींचे स्वागत आणि प्रास्ताविक करतील. नुकत्याच पार पडलेल्या संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर (१४ जानेवारी) छोटेखानी तिळगुळ समारंभ पार पडेल.

५ ते ५.३० – प्रत्येकजण आपली ओळख, आपल्या ब्लॉगची ओळख करुन देतील.

५.३० ते ६.०० – चर्चा. ब्लॉगबद्दलच्या अपेक्षा, मराठीब्लॉग्सच्या श्रुंखलेत जोडल्या गेलेल्या ब्लॉग्समधील घडामोडी, त्यातील चांगले वाईट मुद्दे, ब्लॉग्सबद्दलच्या शंका त्यांची उत्तरे वगैरे

६ ते ६.३० – श्री प्रसन्न जोशी आणि मिडीया-हाईट कंपनीमधील त्यांचे सहकारी ब्लॉग्सबद्दलचे त्यांचे अनुभव सांगतील तसेच सर्व ब्लॉगर्सना मराठी ब्लॉग्स अधीकाधीक समृध्द होण्यासाठी मार्गदर्शन करतील.

६.३० ते ७ – पुढे काय? सर्व जण एकत्र येऊन काही चांगल्या योजना राबवु शकतो का त्याबद्दलची चर्चा. अश्या गाठी-भेटी कधी करायच्या याबद्दलचा आराखडा मांडुन हा स्नेहमेळावा समाप्त होईल.

स्नेहमेळाव्याची औपचारीकता संपली असली तरी ७ ते ७.३० पर्यंत सर्वजण (ज्यांना शक्य आहे त्यांना) एकत्र थांबुन अनौपचारीक गप्पा मारण्यासाठी वेळ.

ह्या स्नेहमेळाव्याचा वृत्तांत आणि फोटोग्राफ्स आपल्यातीलच एक ब्लॉगर प्रभास गुप्ते त्यांच्या मोबाईलमधुन लाईव्ह ट्विट करणार आहेत. आपण हे ट्विट्स पुढील पत्यावर पाहु शकता –
http://twitter.com/PrabhasGupte

ह्या स्नेह-मेळाव्याबद्दलची एक स्वतंत्र पोस्ट सुरेश पेठेकाका टाकतीलच. वरील पोस्टमध्ये काही चुकले असेल किंवा राहीले असेल तर ते त्यांच्या पोस्टमध्ये मांडतील. पण तो पर्यंत ही पोस्ट पुण्यातील पहिल्या-वहिल्या मराठीब्लॉगर्सच्या स्नेहमेळाव्याची निमंत्रणपत्रिका समजा.

चला तर मग एकमेकांना आपल्या ब्लॉग्सच्या नावाने ओळखणारे आपण ह्या ओळखीचे रुपांतर व्यक्तीगत ओळखींमध्ये करुन टाकु. आपली उपस्थिती ह्या स्नेहमेळाव्यासाठी प्रार्थनीय आहे.

दिशा-दर्शक

नकाश्यावर टिचकी मारुन मोठ्या आकारातील नकाशा पहाता येईल.

वरील नकाश्यामध्ये ‘A’ हे ठिकाण ‘राजाराम पुल’ दर्शवते. राजाराम पुल नवसह्याद्री सोसायटी (ताथवडे बाग) मधुन सरळ पुढे आले की हा रस्ता लागतो. किवा आपण म्हात्रे पुलावरुन डावीकडे वळुन “डी.पी.” रोड पकडुन सरळ पुढे येत राहीलात तरी हा रस्ता लागतो.

राजाराम पुलावरुन डावीकडे वळायचे आणि सरळ जात रहायचे, थोड्या अंतरावर आपल्याला सिंहगड रोडवरील ‘बिग-बझार’ दिसेल (नकाश्यामधील ठिकाण ‘B’), तेथुनही सरळ पुढे जात रहायचे. मग एक पेट्रोल पंप लागेल त्याच्या समोरच पु. ल. देशपांडे उद्यान आहे (नकाश्यामधील ठिकाण ‘C’).

आपण मित्र मंडळ चौकातुन येत असल्यास सिंहगड रस्त्यावर दत्तवाडी ह्या भागापर्यंत (नकाश्यामधील ठिकाण ‘D’) आल्यानंतर पत्ता विचारल्यास सापडण्यास सोप्पे जाईल.

उद्यानामध्ये पार्कींगची भरपुर सोय आहे.

अधिक सखोल दिशा दर्शक हवा असल्यास कृपया मला किंवा पेठे काकांना संपर्क करा.

93 thoughts on “पुणे मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा, निमंत्रण पत्रिका

 1. नमस्कार,
  मी चैतन्य रुद्रभटे मी फलटणला राहतो. माझी बारावीची पूर्व परीक्षा असल्याने मला येत येणार नाही. पण मला मेळावा कसा झाला हे पाहायचं आहे, माझ्यासारखे अनेक जन असतील त्यांची काही ना काही अडचण असेल. आमच्यासाठी या मेळाव्यातील झालेले ठराव आणि मेळावा कसा झाला हे सांगण्यासाठी video shooting करून पाठवले तर बरे होईल…

  1. अनिकेत

   शक्य त्या सर्व मार्गाने ह्या मेळाव्याचे क्षण वेचण्याचा आणि ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 2. या स्नेह मेळाव्यातल्या घडामोडी मी LIVE ट्विट करतोय. या सगळ्या ट्विट #mbm या शब्दानं सुरु होतील, म्हणजे तुम्हाला ओळखायला सोप्पे जाईल.

  mbm = Marathi Bloggers’ Meet

  उदाहरण:
  #mbm we have HUGE crowd here!

  1. अनिकेत

   तुम्ही येउ शकला असतात तर अजुन बरं झालं असतं. अशीच एक पुण्याची धावती भेट समजुन जमल्यास जरुर या.

 3. या सम्मेलना मधे चोरीचे पोस्ट टाकणाऱ्या ब्लॉग वर , किंबहुना केवळ चोरीचेच पोस्ट टाकणाऱ्या ब्लॉग च्या संदर्भात पण काही तरी डिस्कस व्हावे अशी इच्छा आहे. मन माझे या ब्लॉग वर सगळंच साहित्य चोरीचं आहे. आयदर मायबोली किंवा इतर ब्लॉगर्सचे लेख इथे चोरुन पोस्ट केले जातात.. या ब्लॉग च्या मालकाला हळदणकर सचिन नांव आहे त्याचं, त्याला मेलने कळवलं, की हे लिखाणं कोणाचे आहे तरी पण स्टबॉर्न अटीट्य़ूड दाखवतो हा माणुस आणि बेशरम सारखा पुन्हा एक पोस्ट टाकतो की हे सगळं मला इ मेल ने आलंय म्हणुन.. मराठी ब्लॉग्ज डॉट नेट यावर पण हा ब्लॉग जोडलेला आहे. अशा लोकांनच्या बाबतित काय केले पाहिजे? किंवा सामाजिक बहिष्कार कसा टाकायचा?? यावर पण मतं मागवावीत.. अन्यथा अशा चोरांमुळे लेखकांचा उत्साह संपुन जाईल.

 4. त्याला जेंव्हा सांगितलं जातं की हे लिखाण कोणाचं आहे ते , तरी पण हा माणुस त्या लेखा खाली मुळ लेखकाला क्रेडीट्स देत नाही. आणि त्याखाली स्वतःचेच नांव लिहितो.

  1. अनिकेत

   जरुर, हा विषय नक्की चर्चला जाईल. हे चोरा-चोरीचे प्रकार थांबलेच पाहीजेत

 5. Aniket,
  Mi mulat punekar asale tari 98 pasun punyat faar kami asate tyamule mala hi jaga mahit nahi. tasach tithe aaspaas parking chi soy ityaadi chi kalpana nahi. Map ani parking baddal kahi mahiti asalyas ti taku shakashil ka?
  Kinwa pethe kaka tumhi takal ka?
  Neeraja

  1. अनिकेत

   हा पत्ता सापडायला अत्यंत सोप्पा आहे. तु कोणत्या भागातुन येणार आहेस ते मला इमेल वर कळव, मी तुला सविस्तर पत्ता सांगतो. जमल्यास ह्याच पोस्टमध्ये एखादा नकाशा टाकायचा प्रयत्न करीन नाहीतर पेठेकाकांच्या पोस्टमध्ये ह्यावर सविस्तर प्रकाश टाकला जाईल.

   पार्कींगचे म्हणशील तर भरपुर पार्कींग आहे आतमध्ये. ५-६ ट्रक, १-२ बसेस, ५० एक दुचाकी आणि २०-३० चार-चाकी सहज बसु शकतील. थोडे फार शिस्तीत पार्कीग केले गेले तर रिक्षा, सिक्स-सिटर, टॅक्सी आणि इतर किरकोळ वाहने जसे सायकल्स पण बसण्याची व्यवस्था आहे.

   फक्त हेलीपॅडच नाहीये 🙂

 6. पुण्यातील पहिल्या-वहिल्या मराठीब्लॉगर्सच्या स्नेहमेळाव्यास ‘ भविष्याच्या अंतरंगात ‘ या ब्लॉगतर्फॅ शुभेच्छा. मराठी ब्लॉगर्स एकमेकांना भेटून, ओळख वाढवण्या बरोबरच काही भरीव उपक्रमही भविष्यात करता येऊ शकतील आणि त्यादृष्टीने हे उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. शक्य असल्यास एखादी संघटना ( मराठी ब्लॉगर्स ) स्थपन करण्याविषयी ही प्रार्थमीक चर्चा घडवता येऊ शकेल.
  असो काही कारणाने प्रत्यक्ष येऊ शकत नाही. मात्र पुढील काळात योग आल्यास सहभागी होण्यास उत्सूक आहे.

  आपला
  (मुंबईकर ब्लॉगर ) अमोल केळकर
  http://www.juily.blogspot.com

  1. अनिकेत

   शुभेच्छांबद्दल धन्यवाद अमोल. नक्कीच ‘भरीव उपक्रमा’बाबत चर्चा घडणार आहे

 7. अनिकेत, खूपच छान आमंत्रणपत्रिका आहे. आणि हो सगळ्यांना तिळगूळ देताता माझ्यातर्फ़ेपण “गोड गोड बोला”चा संदेश द्या. तिथे असते तर नक्कीच आले असते..आणि हो तो चोरीमारीचा आणि ब्लॉग एटिकेट्स हे दोन खरंच चर्चा करण्यासारखे विषय आहेत..शुभेच्छा.

  1. अनिकेत

   धन्यवाद अपर्णा. हो त्याविषयावर चर्चा घडवली जाईल.

  1. अनिकेत

   मस्त रे.. बाकी तु येणार म्हणल्यावर तुझ्यालायक काम म्हणजे… बास का राव!.. आता सांगायलाच पाहीजे का? तुझे ते फोटो काढणारे यंत्र घेऊन ये, बाकी अधीक सांगणे नं लागे!!

 8. महेंद्र काकांशी पूर्ण सहमत. हल्ली तर या अशा चोर्या खुपच वाढल्या आहेत. दिवसाला एक नवा चोर सापडतो आहे. “मन माझे” चा सख्खा भाउ म्हणजे “गावचा कट्टा”… तिथेही सगळे लेख चोरीचे आहेत. या चोऱ्या थांबवण्याबाबत ब्लॉगर्स मेळाव्यात काहीतरी चर्चा घडावी अशी विनंती आहे.

 9. सगळ्यांना प्रत्यक्शात बघायची आणि गप्पा मारायची खुप इच्छा असली तरी काही भोगौलिक कारणांमुळे माझे येणे दुरापास्त आहे 😉
  “गुलमोहर” कडुन मराठी अनुदिनीकारांच्या या मेळाव्यास खुप खुप शुभेच्छा!!
  असाच एखादा ई मेळावा करता आला तर खुप छान होईल…

  1. अनिकेत

   जरुर मुग्धा, खरंच एखाद्या सुट्टीच्या दिवशी असा इ-मेळावा जमवु, एखाद्या कॉन्फ चॅट रुम मध्ये, कल्पना चांगली आहे

 10. व्वा! अनिकेत हाच फरक असतो तुझ्यासारख्या तज्ञ व माझ्या सारख्या अडाण्यात ! जमलंच तर आम्हालाही ही तंत्र विद्या शिकव !

  आमंत्रण पत्रिका अत्यंत सुरेख झाली आहे. तुझ्या कडील नावांची एक लिस्ट माझ्या पोस्ट वर एकत्रित टाक व तुझ्या ब्लॉगचा चित्र फलक माझ्या ब्लॉग वर टाकण्या साठी लिन्क मेल कर.

  1. अनिकेत

   🙂
   ब्लॉगमध्ये इमेज दिसण्यासाठी आणि त्यावर टिचकी मारल्यावर मोठ्ठ्या आकारातील निमंत्रण पत्रिका दिसण्यासाठी हा कोड तुमच्या ब्लॉग मध्ये वापरा –

   
   <a href="http://a4.vox.com/6a00cd97863cb2f9cc0123f1948494860f-pi" target="_blank"><img alt="" src="http://a4.vox.com/6a00cd97863cb2f9cc0123f1948494860f-500pi" title="पुणे मराठी ब्लॉगर्स मेळावा, निमंत्रण पत्रिका" class="aligncenter" width="500" height="500" /></a>
   (<em>टिप: वरील निमंत्रण पत्रिकेवर टिचकी मारुन अधीक मोठ्या आकारातील पत्रिका आपण वाचु शकता किंवा संगणकावर उतरवुन घेऊ शकता.</em>)
   
   
 11. संमेलनाचे लाईव्ह ट्विट्स येणार आहेत, हे तर फारच छान. मी मुंबईची असल्याने ’येईनच’ असं आश्वासन देत नाही पण प्रयत्न करेन. पुण्याला यायचं तर एकटीला यावं लागेल म्हणून थोडा विचार करतेय. नकाशा दिलाय त्यामुळे मार्ग नीट कळतोय.

  महेंद्रजींनी ब्लॉग पोस्ट चौर्यकर्माबद्दल जे लिहिलं आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. ब्लॉगर्सनी या मुद्द्यावर चर्चा करावी व एखादा ठाम उपाय सुचवावा. (एखादा असा ब्लॉग किंवा संस्थळ, जिथे केवळ स्वलिखित प्रकाशित करणारे ब्लॉगर्स स्वत:ला रजिस्टर करू शकतील व त्यांची एखादी पोस्ट चोरलेली आढळली की त्या ब्लॉगवरून संबंधित चोर व्यक्तीला मेल किंवा संदेश पाठवता येईल. पंकजचं नशीब चांगलं की त्या चोराने इमेलमधे चांगली भाषा वापरली. माझे लेख ज्याने चोरले, त्याने मला लिहिलेली ईमेल इतकी गचाळ होती की मी ती माझ्या रेकॉर्डमधेसुद्धा ठेवली नाहीत. 😦 फार वाईट अनुभव.) शिवाय अपर्णाने उल्लेख केल्याप्रमाणे ब्लॉग एटिकेट्स वर चर्चा होणं आवश्यक आहे, असं मलाही वाटतं.

  पोस्ट वाचतानाच चैतन्यप्रमाणे Vido Shooting चं डोक्यात आलं होतं, मात्र ते शक्य असेल तरच! केल्यास सोन्याहून पिवळं. फोटो तर काढले जातीलच. श्री प्रसन्न जोशी आणि मिडीया-हाईट कंपनीमधील त्यांच्या सहका-यांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळतील, तेव्हा जे ब्लॉगर्स या संमेलनाला उपस्थित रहाणार आहेत, त्यांनी प्रश्नावली आधीच तयार करून ठेवावी, जेणेकरून वेळेचा सदुपयोग करून घेता येईल. प्रभास गुप्ते ला ट्विटींगसाठी धन्यवाद. मेळाव्याला उपस्थित रहाण्या-या सर्व ब्लॉगर्सना माझ्याकडून ’तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’.

  मला काही छोटे छोटे मुद्दे सुचवावेसे वाटतात, ते येथे देत आहे. शक्य झाल्यास त्यावर चर्चा केली जावी:

  १. ब्लॉगरने आपल्या ब्लॉग प्रोफाईलमधे आपला संपर्क इ-मेल पत्ता अवश्य दयावा. एखाद्या वाचकाला जर काही सूचना करावयाची असेल, जी प्रतिक्रियेमधे लिहीणं श्रेयस्कर नसेल, तर वाचक ब्लॉगरला ईमेलद्वारे कळवू शकतो. तसेच काही ब्लॉगर्सच्या लेखावर प्रतिक्रिया देताना अडचणी येतात. (वर्ड वेरिफिकेशन करता येत नाही. स्क्रोल बार दिसतत नाही इ.इ.) तेव्हा ब्लॉगरने ईमेल पत्ता दिल्यास वाचक किमान ईमेलने आपल्या प्रतिक्रिया व सूचना कळवू शकतो.

  २. माझ्यासारखे ब्लॉगर्स आपला ब्लॉग वेल-फॉर्म्ड दिसण्यासाठी थर्ड पार्टी विजेट्स वापरतात. (ज्यामुळे ब्लॉग स्लो होतो असं मी ऐकलं आहे.) तर कोणत्या विजेटस वापराव्या, कोणत्या वापरू नयेत, हेही तज्ञ ब्लॉगर्सना माहित असल्यास त्यांनी ती माहिती इतरांबरोबर वाटून घ्यावी. (दिपक शिंदे – भुंगा यांच्याकडे ब्लॉगींगचं उत्तम तांत्रिक ज्ञान आहे, त्यांनी दोन-चार युक्या इतरांशी शेअर कराव्यात.)

  ३. ब्लॉगरोल बद्दल काल महेंद्रजींनी लिहीलं आहे, त्यावर सुद्धा चर्चा व्हावी, असं मला वाटतं.

  1. अनिकेत

   जरूर कांचन, शक्य तेवढे सर्व मुद्दे ह्या स्नेह-मेळाव्यामध्ये उपस्थीत केली जातील. परंतु हा पहिलाच मेळावा असल्याने मेळाव्याचा मुख्य उद्देश हा एकमेकांच्या ओळखी करुन घेणे आणि यापुढील भेटीगाठींसाठी एक कच्चा मसुदा तयार करणे हा राहिल.

   एकदा का सर्व आराखडा तयार झाला की प्रत्येक महीन्यात अश्या गाठी-भेटी घेऊन असे अनेक मुद्दे चर्चीले जातील.

 12. आमंत्रण पत्रिका एकदम झकास आहे. मी फोटोशॉप (स्वत:चं स्वत: ;-)) शिकतेय. त्यामुळे ही पत्रिका बनवताना कशी बनवली असेल, याचा विचार करतेय. मस्त आहे. कॉपी करू का?

 13. मी सांगलीत राहतो. मला पण यावसे वाटते.पण माझी अडचण आहे .तरी तुम्ही twitter वर update देणार आहात त्यामुळे
  काही अडचण येणार नाही.
  तरी माझ्याकडून मेळाव्याला शुभेछा!!!!!!

  1. अनिकेत

   धन्यवाद गुरु, प्रभास गुप्तेच्या सौजन्याने ट्विट्स वाचत रहा.

 14. swapna sapre

  mi pan yenar aahe. pethe kakani mala yayachi permission dileli aahe.me sadhyach blogpost lihayala suruwat keli aahe ithale blog wachun farach maja yete.malahi navin kahitari shikayala milatey.lihayache kase ha ek motha prashna aahe.aani te shikawata yet nahi.te aapanach shikayala lagat.journalism student asalyane hya goshti kalalya.n hya site mule jastach fayada zala.
  aata lihinare sagale ekada behtale ki ajun majja yeil…..mazyasobat ajun 1-2 jani yenar aahet jya journalism shikat aahet…..
  pethe kaka n aniket kaka aamhala pan gruhit dhara……

  1. अनिकेत

   जरुर या.. तुला काहीही मार्गदर्शन हवे असेल तरी ते इथे मिळेलच.

   बाकी अनिकेत काका!!! वाचुन धक्का बसला.. का गं अशी माझ्या वाईटावर उठली आहेस? दादा म्हण हवं तर, काका म्हणजे!!..

   1. swapna sapre

    dhanyawaad.pethe kaka jestha aahet he mahitiye mala.mhanun tyana kaka.pan tumachyabaddal mahit nahiye n tumhi tyanche mitra.pethe kakanche mitra mhanaje kaka ch zale na????mahnun kaka…..
    tuamchi permission aahe tar mag dada.pan ek prob aahe dada mhatal ki “a dada” mhantat.tumhala “a dada” mhanu ki “o dada”??
    (lahaan paniche sanskar aaichi maitrin mawashi.babancha mitra kaka.bahinichi matrin tai,bahvacha mitra dada)

    1. अनिकेत

     असं काही नाही, कोणीही कोणत्याही वयाच्या व्यक्तीचे मित्र असु शकतो. माझ वय वर्ष ३२ आहे, त्याप्रमाणे तुला जे म्हणायचे ते म्हण 🙂

 15. सुरेश पेठे

  aniket,

  ase sarv points ekatrit lihun ghyavet ,tya tya blogger chya nava sahit. jase jamel tase charchet gheuya.

  1. अनिकेत

   हरकत नाही, अजुन येऊ देत मुद्दे, मग सगळ्यांचे एकत्र संकलन करुन एक प्रिंट घेतो

 16. bhagyashree joglekar kulkarni

  मेळाव्यानंतर फोटो वगैरे टाका रे ब्लॉगवर आणी मस्त लिहाही त्याविषयी.आम्हा इंदोरकरांकडुनही ह्या मेळाव्यास शुभेच्छा.

  1. अनिकेत

   धन्यवाद भाग्यश्री, शक्यतो सर्व बारीक-सारीक गोष्टी शक्य त्या माध्यमांतुन आपल्यासाठी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.

 17. सचिन

  मी रोजचा वाचक आहे या सर्व ब्लाग चा. माझीही खुप इच्छा आहे यायची. परंतु त्याच दिवशी आमच्या गावची यात्रा आहे म्हणुन गावी निघालोय.

  शुभेच्छा.

  1. अनिकेत

   धन्यवाद सचिन, ह्या वेळेस नाही, पण पुढच्या वेळेस नक्की जमवा 🙂

 18. Rohan

  भारतात असतो तर नक्की आलो असते रे मित्रा… पण सध्या US मध्ये आहे. पुढच्या वेळेला नक्के येइन. मेळाव्यासाठी खुप शुभेच्छा … 🙂

  1. अनिकेत

   धन्यवाद!!
   नक्की ये माधुरी, आम्ही वाट बघतो आहोत.

 19. अरे वा…माझ्या आणि माझा ब्लॉग बेधुंद कडून तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !!! सगळ्यांचे फोटोज शेअर करा बरं का नक्की.

  -अजय

 20. sahajach

  अनिकेत मस्त तयारी चाललीये…..अनेक अनेक शुभेच्छा………….
  फोटो आणि माहिती टाक म्हणजे आम्हालाही आल्यासारखे वाटेल….

  1. अनिकेत

   टाकणार, नक्की टाकणार, शक्य त्या सर्व माध्यमातुन आपल्यापर्यंत माहीती पोहोचवण्याचे कार्य मी नाही तर कुणाकडुन तरी नक्की केले जाईल.

   तु इथे आल्यावर पुन्हा एकदा असा स्नेह-मेळावा आयोजीत करुच. पेठे काकांचे दावणगिरीचे डोसे अजुन पेंडींग आहेत

   1. sahajach

    आहे तर तुझ्या लक्षात…..खाऊ नकोस एकटाच मी येतेच आहे जुनमधे…..

 21. मी English मध्ये ब्लोग लिहीतो, पण मराठी ब्लॉगस् चा नियमित वाचक आहे. मी तुमच्या गटात सहभागी होऊ शकतो का?

  1. अनिकेत

   अरे हा काय प्रश्न झाला का भाऊ? जरुर.. १००%. पेठे काकांच्या ब्लॉगवर तुझा मोबाईलनंबर टाकुन दे आणि १७ तारखेला जरुर ये, काहीच हरकत नाही.

 22. सुरेश पेठे

  अनिकेत,
  आपणाला खाजगीत संपूर्ण कार्यक्रम शूट करणारा मिळेल ?

  आहे अशी कुणाची तयारी ? त्याने जरूर या. नंतर फोटोसहित त्याची सी डी बनवून अल्प किमतीत विकायला ठेवता येईल !

 23. अनिकेत, ब्लॉग मेळाव्याची जी विजेट बनवली आहे, तिला मी gif Animation दिलंय. माझ्या ब्लॉगवर आहे. प्लीज पहातोस का, कशी वाटतेय? की मी सर्वांनीच लावलेली विजेट लावू? नुकतंच gif मधे काम करायचं माहित झालंय म्हणून प्रयोग करून पाहिला.

  1. अनिकेत

   राहु देत की तु बनवलेली, छान दिसती आहे. हिले-डुले आयटम चांगले वाटतात 🙂

   1. होय कांचन, खूप छान वाटतंय ! आणि हालते असल्याने लक्ष पण वेधून घेतंय !

    मलाही शिकवशील ना photoshop च्या गम्मती !

 24. पत्रिका खूपच छान जमलीये .. बेंगलोर मध्ये असल्यामुळे येऊ शकत नाही 😦 .. पण याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. मला खात्री आहे सर्व ब्लोग्गेर्स आपले अनुभव पोस्त करतील..

 25. अरारारारारा…. ही दुसरी तारीख पण नेमकी आड येते आहे. १७ तारखेला मुंबईत एका प्रथितयश संगीतकाराच्या घरी जायचे आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी दादरला एका कार्यक्रमात… तिकडे आम्ही व्यासपीठावर आहोत. म्हणजे सगळाच राडा !!!!!! ह्या अश्या अपरीहार्य पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मला नाही वाटत मी येऊ शकेन… जर काही चमत्कार होऊन हे रद्द झाले तर मी नक्की हजेरी लावेन.
  अन्यथा ’माझे जगणे होते गाणे’ ब्लॉगच्या वतीने माझ्या सर्व ब्लॉगबंधूंना आणि भगिनींना हार्दीक शुभेच्छा !!!

  1. अनिकेत

   हम्म, हरकत नाही. पण तुला व्यक्तीगत भेटायचे आहे मित्रा, जमव एकदा, यावेळी आला असतास तर खरं खुप बरं झालं असतं

 26. सगळ्यांनी एकत्र यायची हि खूपच छान कल्पना आहे.. यायची खूप इच्छा आहे पण सोमवारी मी विदेश दौऱ्यासाठी साठी निघतोय आणि तयारी काहीच झाली नाहीये पण मी येणार काहीतरी करून येणार पूर्ण वेळ नाही थांबू शकणार पण तोंड दाखवून जाईनच…माझा ब्लॉग आहे वैभवभोसले.कॉम.

  1. अनिकेत

   धन्यवाद मित्रा, थोड्यावेळासाठी का होईना नक्की येऊन जा

 27. अनिकेत
  नमस्कार
  आमच्याकडे (लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त) मी ब्लॉगर मेळाव्याची दिलेली बातमी आजच्या (१३ जानेवारी २०१०)च्या मुंबई वृत्तान्तमध्ये पान एकवर प्रसि्द्ध झाली आहे. त्याची लिंक मी पाठवत आहे.

  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=39364:2010-01-12-15-03-25&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

  कळावे
  आपला
  शेखर जोशी

  1. अनिकेत

   धन्यवाद शेखर. ह्या मेळाव्यासाठी अधिकाअधीक लोकं एकत्र येणे अत्यावश्यक आहे, यातुनच पुढे मराठी ब्लॉगींग आणि त्या अनुषंगाने मराठीला वाढला लेखक आणि वाचक वर्ग लाभेल.

   आपल्या सहकार्याबद्दल पुनःश्च धन्यवाद

 28. swapna sapre

  tnx aniket dada.tyadiwashi mazyasobat mazya don maitrini pan yeanr aahet…….
  tyana pan count kar……..
  aanakhi ek mala karanyasarakha kahi kaam asel tar nakki sang…..sandhyakali 6 nantar me freech asate……..

 29. मुंबईहून पुण्याला या मेळाव्याला येणं आवडंलं असतं, पण एका घरगुती समारंभात अडकणार असल्याने जमणार नाही. पण आयडियाची कल्पना चांगली आहे. या मेळाव्याला माझ्याकडून शुभेच्छा !

 30. rohini

  Namaskar,
  Ya snehamelavyasathi aganit subhechha..
  maza swatacha konatahi blog nahi…
  rather, “blog” ya goshtibabat mala khoopach kami mahiti hoit, ajunahi ti farashi wadhali nahi tyamule maza marathi wachan fakt news papers ani books paryantach maryadit hota…

  pan marathi blogs pahoon khoop anand zala….lekhahi apratim ahet, (although couldn’t read all of them, so far)

  mala ya melavyas yayala awadel….

  punha ekada snehmelavyasathi hardik subhechha..

  1. अनिकेत

   रोहीणी, नक्की ये. तुला नविन ब्लॉग सुरु करण्यासाठी काहीही मदत हवी असल्यास येथील अनेक लोक तुला मार्गदर्शन करु शकतील. आम्ही तुझी वाट पहात आहोत.

 31. Mi aatapasunach miss kartey ha melawa. 😦
  Mjhyakadun asaglyana ankrantichya shubbheccha de aniket nakki.

  ho lekhan choury discuss whyayalach have. mala watat pratyekane aaplyala mahit asnaare ase blogs/bloggers chi naw aawarjun share karawit, tyachi list publish karawi.
  jyanna technically adhik mahiti aahe tyanni yawar kaay kaay upay asu shaktil te pahawe. aaple likhan encrypted karun (copy-resistant) publish karata yete ka? watermark image mhanun taakta yeil ka? ya paryayncha wichar jarur karawa, nidan thoda tari aala basel.

  Baki manapasun shubheccha.

  1. अनिकेत

   धन्यवाद सोनल, हा मुद्दा चर्चेला येईलच. पण तु काय किंवा महेंद्र काय किंवा बाकीचे लोकंही जमवुन आला असतात तर बहार आली असती 😦

   1. सोनल,
    धन्यवाद मागे तुमच्या की अजून कोणच्या नक्की आठवत नाही पण ब्लॉग वर ऑन लाईन ब्लॉग संबंधी चर्चा झालेली वाचल्याचे स्मरते.
    कोणी त्याबाबत च्या पोस्ट ची लिन्क देईल

    सुरेश पेठे

 32. बऱ्याच जणांनी मेळाव्याला येत असल्याचे इथे कळवले आहे. कृपया त्यांनी मला येथील संदर्भ देऊन मेलने आपले नाव, गाव, ब्लॉग असेल तर त्याची महीती, त्याचे नाव व आपला फोन नंबर कळवावा ही विनंती.

  बाकीच्या सर्व ब्लॉग धारकांनी वरील प्रमाणे माहीती व आपण आपल्या ब्लॉगचा चित्र फलक केलेला असला तर त्याचे विजेट पाठवावे.

  जर केलेले नसेल तर ’ भुंगा ’ वा कोणीही मदत करू शकतील. त्यसंबंधीचे काय करायचे ते अजून माझ्या डोक्यात शिजत आहे. कळविनच काही ठरवले तर.

  आपला,
  सुरेश पेठे

  sureshpethe@gmail.com

 33. ngadre

  My best wishes..
  Pan pudhachya veli Saturday la kinva 2 days holiday alela pahoon first day la theva. Baher gavchya, even Mumbai chya lokanahi 8pm nantar midnight la parat yeun dusarya diavashi sakali uthoon office gathane avghad..Pune centric sammelane (as usual) karoon all inclusive honaar nahi..

 34. ngadre

  My best wishes..
  Pan pudhachya veli Saturday la theva. Rather saturday la sarvana off nasoo shakato mhanoon 2 days holiday alela pahoon first day la theva. Baher gavchya, even Mumbai chya lokanahi 8pm nantar midnight la parat yeun dusarya diavashi sakali uthoon office gathane avghad..Pune centric sammelane (as usual) karoon all inclusive honaar nahi..:-)

 35. Ganesh

  Aniket,
  Me marathi blogs cha niymit vachk aahe..
  Melavyala yayache khoop manat aahe..pan kama nimiit gavi jave lagnar aahe..
  pudhcya melavyas nakki yenin..
  Ya melavya sathi khoop sarya shubheccha

 36. ग़ौरी

  मी मुख्यतः ब्लॉग वाचक आहे. मी आले तर चालेल का? चालत असेल तर मी नक्की प्रयत्न करीन. प्रयत्न असे म्हणण्याचे कारण की मी पुण्यातले दोन पत्ते शोधत आहे. मी पुण्यात पुर्वी आले असले तरी पुण्याची मला नीट माहिती नाही. ते मिळाले तरच येणे होईल. 1)गुळवणी महाराजांचा आश्रम आणि 2)त्यांचे शिष्य काकासाहेब पटवर्धन यांचा पत्ता. कोणी हे दोन पत्ते देऊ शकेल का? म्हणजे त्या दिवशी सकाळी (किंवा दुसर्‍या दिवशी) मी या दोन ठिकाणी जाईन आणि मेळाव्यातपण सहभागी होता येईल (अर्थात तुमची परवानगी असेल तर).

  1. अनिकेत

   काहीच हरकत नाही, जरुर ये.
   गुळवणी महाराजांचा कुठला आश्रम तु शोधत आहेत? मला पत्ता पाठव. कारण एक आश्रम माझ्या घराच्या समोरच आहे.

 37. ग़ौरी

  अनिकेत :
  काहीच हरकत नाही, जरुर ये.
  गुळवणी महाराजांचा कुठला आश्रम तु शोधत आहेत? मला पत्ता पाठव. कारण एक आश्रम माझ्या घराच्या समोरच आहे.

  धन्यवाद!

  पत्ताच तर मला माहित नाहिये. त्यांचे बरेच आश्रम आहेत का? मला हे माहितच नव्हते. मला त्यांच्या आश्रमाद्वारे प्रसिद्ध झालेली पुस्तके विकत घ्यायची आहेत. त्यांच्या आश्रमाच्या इतर उपक्रमांबद्दलही (जसे शक्तिपात दीक्षा, सत्संग वगैरे) जाणून घ्यायचे आहे.
  आश्रमाचा फोन आपल्याला माहित आहे का?

  त्यांचे एक शिष्य काकासाहेब पटवर्धन पुण्यात असतात असे एका परिचीताकडून कळले. त्यांना मला प्रत्यक्ष भेटायचे आहे.
  त्यांचा पत्ता वा फोन माहित असल्यास कृपया सांगावा.

 38. मस्त कल्पना आहे. मी मुंबईत राहात असल्याने हजर राहता येणार नाही,तरीही माझ्या शुभेच्छा आपल्याबरोबर सदैव आहेतच. 🙂
  स्टार माझाने ’ब्लॉग माझा’ ही २००९ मध्ये स्पर्धा घेतलेली होती. त्या स्पर्धेचा निर्णय जाहीर होऊन जवळ जवळ २महिने उलटून गेले परंतू अजूनही पारितोषिक वितरण समारंभ झालेला नाहीये. स्टार माझाचे प्रसन्न जोशी ह्यांना ह्याबाबत विचारणा करणारा विरोप पाठवूनही ते त्याचे आजवर उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांच्या ब्लॉगवरही मी हाच प्रश्न विचारलाय पण त्याचेही उत्तर अजून त्यांनी दिलेले नाहीये.
  माझी अशी विनंती आहे की आपल्या ह्या मेळाव्याला प्रसन्न जोशी हजर राहणार आहेत तर त्यांना त्याचे स्पष्टीकरण करण्यास सांगावे.

 39. नमस्कार मित्रहो,
  मी मायबोलिवरचा सदस्य आहे, नुकताच या संकेतस्थाळावर आलोय, मी तुमच्या कार्यक्रमात येऊ शकतो का?
  कळावे.
  माझा ब्लॉग

  mdramteke.blogspot.com

  1. अनिकेत

   अहो हे काय विचारणं झालं? तुम्ही कुठलेही सदस्य असा, मराठी ब्लॉग लिहीत असाल तर जरुर या, आम्ही आपली वाट पहात आहोत

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s