मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना


असं म्हणतात, पुणेकर कधी सुचना देण्याची संधी सोडत नाही, मग आम्ही तरी त्याला कसा अपवाद असणार?

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना –

१. ब्लॉगर्स मेळाव्यातील सदस्य ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खुण (उदा. हातात गुलाबाचे फुल) ठरवलेली नाहीये. उगाच ह्या बाबतीत नसत्या चौकश्या करु नयेत
२. पार्कींग किंवा प्रवेश फी साठी लागणाऱ्या सुट्या पैश्यांची मागणी आयोजकांकडे करु नये. आम्ही कधीही कुठल्याही मंदिरासमोर बसत नाही, सुट्यापैश्यांचा प्रश्न आम्हालाही भेडसावतो.
३. मेळाव्यामध्ये खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली नाहीये, उगाच त्या उद्देशाने येऊन स्वतःचा हिरमोड करुन घेऊ नये
४. अनुपस्थीतीत ब्लॉगर्स किंवा त्यांच्या ब्लॉग्स बद्दल वाईट-साईट बोलुन स्वतःचा शाब्दीक अपमान करुन घेऊ नये
५. तिळगुळ म्हणुन (स्वस्तातला) हलवाच मिळेल, तिळाच्या वड्यांचा आग्रह धरु नये
६. पुण्याबाहेरुन आलेल्या सदस्यांना पुण्यातील ‘प्रेक्षणीय स्थळांची’ माहीती ह्या मेळाव्यात दिली जाणार नाही
७. बागेमध्ये भेळ-पाणीपुरी मिळत नाही, तसेच लहान मुलांसाठी झोपाळे, पाळणे, घसरगुंड्यांची सोय नाही.
८. शिमग्याला अजुन वेळ आहे, त्याची तयारी आत्तापासुन करण्याचा प्रयत्न करुन नाचक्की ओढवुन घेऊ नये.
९. ब्लॉगर्स मेळाव्यामध्ये सर्वांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे त्यामुळे महीलांनी येताना, विणकाम, भाजी निवडण्यासारख्या गोष्टी बरोबर आणु नये
१०. मेळावा संपल्यावर, फुलं, गजरे, पेढा वगैरेंसारख्या गोष्टी किंवा कोणत्याही प्रकारची प्रसाद या सदरात मोडणारी गोष्ट देण्यात येणार नाही. उगाचच सुचक नजरांनी काही शोधण्याचा प्रयत्न करु नये
११. ईलेक्ट्रॉनीक्स गॅजेट्स, मोबाईल फोन, कपड्यांवरील सेल, तुळशीबागेतल्या नविन वस्तु यांवर ह्या मेळाव्यात चर्चा केली जाणार नाही.
१२. नुकत्याच उद्योगाची सुरुवात केली असली तरी पापड, लोणची, कुरडया, सुगंधी तेलं, उटणी, वनौषधी यांची विक्री इथे खपवुन घेतली जाणार नाही. मराठी माणसांचा पाय ओढण्याचा आमचा उद्देश नाही परंतु त्यासाठी ह्या मेळाव्याचा कृपया वापर करु नये.
१३. मराठीब्लॉग विश्वातील घडामोडींवर इथे चर्चा होईल, दुरचित्रवाणीवरील सारेगमप, अनुबंध, ह्या गोजीरवाण्या घरात वगैरे मालीकांवर नाही.
१४. मेळाव्याला आलेल्या सदस्यांचे बागेत बसलेले, फुलांशेजारी, हिरवळीवर बसलेले फोटो काढुन मिळणार नाहीत, त्याबद्दल उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
१५.मेळाव्याच्या ठिकाणी ह्या सुचनांना विनोदाचा विषय बनवु नये

जरा हलकेच घ्या हं!! तुम्हा सर्वांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!

38 thoughts on “मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना

 1. याला म्हंणतात अस्स्ल पुणेरी (इथे ’म्ह’ वर अनुस्वार आहे आणि तो नाकातून उच्चारायचा शब्द आहे याची कृपया नोंद घ्यावी अन्यथा विनोद न समजल्यास/कमी समजल्यास कॉमेंटकर्ता जबाबदार नाही)
  मित्रा, लय्य्य्य्य्यय्य्य्य्य्यय्य्य्य्य्यय्य्य्य भारी… अश्या सूचना पाहिल्या की खात्री पटते की आपण (अजूनही) पुण्यात आहोत !!!!!!!!

 2. “पार्कींग किंवा प्रवेश फी साठी लागणाऱ्या सुट्या पैश्यांची मागणी आयोजकांकडे करु नये. आम्ही कधीही कुठल्याही मंदिरासमोर बसत नाही, सुट्यापैश्यांचा प्रश्न आम्हालाही भेडसावतो.”
  ************************
  लगे रहो अनिकेतभाई !!!!!!!!!

 3. Madhuri

  Hoshiyar ssssss Khabardar sssssss
  Pesh hai Asali Puneri Aniket aur Sath hain Usase bhi asali “Suchana”(Kon hi?)

  Aniket tu na aanakhi ek blog suru kar. “Assal puneri blog”.

  1. अनिकेत

   नको गं, एक आहे त्यालाच पुर्ण वेळ देऊ शकत नाहीये, अजुन एक म्हणजे….

 4. Prajakta

  “ब्लॉगर्स मेळाव्यामध्ये सर्वांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे त्यामुळे महीलांनी येताना, विणकाम, भाजी निवडण्यासारख्या गोष्टी बरोबर आणु नये.”
  अवघड आहे!!!!

 5. आनंद पत्रे

  ८. शिमग्याला अजुन वेळ आहे, त्याची तयारी आत्तापासुन करण्याचा प्रयत्न करुन नाचक्की ओढवुन घेऊ नये.

  हा…हा…हा…

 6. 😀 😀

  १६. आमची कोठेही शाखा नाही.
  १७. नो पर्किंगमधली वाहने उचलली गेल्यास आम्ही जबाबदार नाही.
  १८. मेळावा संपल्यावर विनाकारण गर्दी करून गप्पा मारू नयेत.

  1. अनिकेत

   १८ चेच पुढे.. कुणी चहापाण्याला बोलावण्याची अपेक्षा करु नये 🙂

 7. swapna

  are dada ajun baryach goshti rahilyat hyat…
  taripan hya lai aahet……..
  baregawachi lok suchana vachuanch palun jatil……..

  1. अनिकेत

   बाहेरगावच्या लोकांना पुण्यातील लोकं कशी असतात ते माहीती आहे गं, अश्या अनेक पुणेरी पाट्या वाचल्या असतील त्यांनी 🙂

 8. sahajach

  कठीण आहेस अनिकेत तू!!!!!!!!!!!!!

  शेवटी ’तरिही आपले स्वागत आहे अगत्याने येण्याचे करावे” लिहीलेस………..हाहाहा!!!

 9. rupesh

  ha marathi shenamerava aahe, aapli mula – muli dakhavnacha nahi kyachi krupya nonda ghavi, ugacha dusracha mula-muli chi chaukashi aayojaka kade karu naye

 10. आता कसं जरा पुणेरी मेळाव्यासारखं वाटतंय….अनिकेत लगे रहो भाई…शिमग्याचा मेळावा कुठं ठेवावा याची चर्चा इतक्यात करू नये…असं काही नाही का??? 🙂

 11. १५.मेळाव्याच्या ठिकाणी ह्या सुचनांना विनोदाचा विषय बनवु नये

  १५.मेळाव्याच्या ठिकाणी ह्या सुचनांना विनोदाचा विषय बनवु नये

  अगदि शेवटी अशी सुचना टाकून आमचा अपमान केलास की रे ! अशी आमच्या जन्मसिध्द हक्कावर गदा आणलेली आम्ही कधीच खपवू’ण’ घेणार नाही.

  च्या …… ….. …. …. ” …….घो …घो …घो “

 12. अनिकेत

  अजुन एक –
  तिळगुळ समारंभाच्या वेळी आम्ही दिलेला तिळगुळच पुन्हा आम्हास ‘गोड बोला’ म्हणत परत देऊ नये. अश्या वेळी आम्ही गोड बोलु शकणार नाही 🙂

 13. हॆहॆहॆ! सुचना अग्दी पुनेरी हायत ब्वॊ! ह.घ्या सांगितले ते बर क्याल. नाय त मंग ल्वॊक कडकडन कल्टी मारायचे! आम्ही बी वजच येनार हाय!

 14. Pingback: First Marathi Blog Camp « Amit Paranjape’s Blog

Leave a Reply to Aparna Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s