मकर संक्रांत


आज १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. हा सण मला खुप म्हणजे खुप म्हणजे खुपच आवडतो. ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात. मला काळा रंग खुप म्हणजे खुप आवडतो.

ह्या दिवशी सर्वांना तिळगुळ द्यायचा असतो. मेंदु म्हणतो आपण तिळाचा हलवा द्यायचा, तो स्वस्त असतो आणि इतरांकडुन तिळाच्या वड्या घ्यायच्या. आमच्या घरी पण तिळाच्या वड्या बनवल्या आहेत पण न आवडणारी लोकं घरी आली तर आम्ही तिळाचा हलवाच देतो.

१४ तारखेला माझ्या दोन मित्रांचे वाढदिवस असतात. ‘मधुरा गोडबोले’ आणि ‘केशव काळे’.

ह्या काळात पतंग उडवायचे असतात. पण मी उडवत नाही. मला पतंगाची कणी बांधता येत नाही आणि तसेही मांजा हाताला काचतो. एवढे प्रयत्न करुन उडलाच पतंग तरी कोणतरी तो काटतो आणि पैसे वाया जातात.

१४ तारीख चोरांना आज्जीब्बात म्हणजे आज्जीब्बात आवडत नाही कारण ह्या दिवसापासुन दिवस मोठ्ठा होत जातो आणि रात्रं लहान होत जाते. त्यामुळे त्यांना चोऱ्या करायला वेळ कमी मिळतो. मला पण रात्र कमी झालेली आवडत नाही, झोपायला फार कमी वेळ मिळतो, सकाळी सुर्य लवकर उगवतो त्यामुळे झोपमोड होते.

अजुन एका कारणाने मला संक्रांत आवडत नाही ते म्हणजे सकाळी उठल्यावर न्हाहारीला कालच्या दिवशी भोगीला बनवलेली, उरलेली मुगाच्या डाळीची खिचडी आणि उरलेल्या भाकरीचा चुराच असतो, तर दुपारी जेवायला प्रसादाच्या नावाखाली कुठलीतरी घाणेरडी भाजी खावी लागते. आई सारख्या तिळाच्या वड्या खाऊन देत नाही कारण त्यामुळे म्हणे खोकला येतो.

कधी कधी आमच्याकडे गुळाच्या पोळ्या सुध्दा बनवतात. पण मला पोळीची कड आवडत नाही. फारच ती कडक असते, आणि त्यात गुळ जास्ती नसल्याने ति गोड पण लागत नाही.

चाळीतल्या बायका एकत्र जमुन हळदी-कुंकु, हळदी-कुंकु खेळतात आणि त्याला तुळशीबागेत मिळणाऱ्या स्वस्तातल्या प्लॅस्टीकच्या वस्तु भेट म्हणुन देतात.

नको नको म्हणत असतानाही आम्ही संक्रांतीला सॅन्ट्रो गाडी घेतली होती, ती पण काळ्या रंगाची आणि एका वर्षातच त्या गाडीला काहीतरी मोठ्ठा लोच्चा झाला त्या दिवसांपासुन आम्ही संक्रांतीला काही म्हणजे काहीच खरेदी करणं बंद केले आहे.

असो, माझे मनोगत लांबत जाते आहे. त्यापेक्षा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन टाकतो –

तीळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू

“डोक्यात भुणभुणणाऱ्या मराठी भुंग्या”च्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!!

21 thoughts on “मकर संक्रांत”

 1. मकर संक्राती च्या हार्दिक शुभेच्छा.

  तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.

 2. अजुन एक कारण आहे मला संक्रांत न आवडन्याचे rather मला तर वाटतय प्रत्येक मराठी माणसाला न आवडन्याचे
  कारण त्याच दिवशी आपले पानीपत झाले होते आणि सक्रांत कोसळली…
  पराभवाचे शल्य बोचत राहते…
  असो परभवातुन काही तरी शिका…नवी उभारी घ्या.
  तिळ गुळ घ्या गोड गोड बोला…

 3. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…तिळगुळ घ्या गोड गोड बोला

 4. मला पोळीची कड आवडत नाही. फारच ती कडक असते, आणि त्यात गुळ जास्ती नसल्याने ति गोड पण लागत नाही. – सही लिहिलय. 🙂 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

 5. लाखांचा पल्ला गाठल्याबद्दल शुभेच्छा!!!

  1. धन्यवाद, आपण ब्लॉगवर पहिली कमेंट देऊन उत्साह वाढवला नसता तर कदाचीत इथपर्यंत आलो नसतो

 6. तिळगूळ घ्या, गोड बोला ! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

 7. अजुन एक कारण आहे मला संक्रांत न आवडन्याचे rather मला तर वाटतय प्रत्येक मराठी माणसाला न आवडन्याचे
  कारण त्याच दिवशी आपले पानीपत झाले होते आणि सक्रांत कोसळली…
  पराभवाचे शल्य बोचत राहते…
  असो परभवातुन काही तरी शिका…नवी उभारी घ्या.
  तिळ गुळ घ्या गोड गोड बोला…

 8. तुम्हालाही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!! बाकी मनोगत आवडलं बघा तुमचं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s