लख लख चंदेरी


एक लाक वाचकांची संख्या झाली होssssss

बघता बघता “डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली सुध्दा. हा ब्लॉग सुरु केला २० मार्च २००९ रोजी. म्हणजे फक्त १० महिने आणि १८६ पोस्टमध्येच हा लाख भर वाचकांचा टप्पा ह्या भुंग्याने पार केला.

सकाळी वाचकांची संख्या ९९,३०० च्या आसपास पाहुन ‘तो’ दिवस आजचा असणार का? अशी एक अनामीक हुरहुर मनामध्ये होती. आधी ६०० मग ४००, ३००, १०७, ८५, ३८ वाचक राहीले होते. दुपारपासुन माझ लक्ष सारखं ‘स्टॅट्स’ वरच लागुन होते. शेवटी संध्याकाळपर्यंत ८०० हुन अधीक वाचकांनी ब्लॉगला भेट देऊन हा ‘एक लाख’ वाचकांच्या मैलाचा दगड पार करवुन दिला.

ब्लॉग सुरु करण्याचा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे मनाचे जे स्वःगत चालु असते ते कुठे तरी उतरवणे. डायरी लिहीणे हा प्रकार कालबाह्य झाला आणि त्यात लिहीण्याचा आळस. त्यामुळे उगाचच कागद-पेन खर्ची न घालता ते संगणकाच्या सहाय्याने उतरवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग होता. सुरुवातीला वाटले होते की दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारा आपला ब्लॉग असेल. पण तो वाटलं त्यापेक्षा अधीक कठीण निघालं. महेंद्र, कसं काय जमतं बुवा तुम्हाला?

दुसरा पर्याय होता तो म्हणजे सुचत असलेल्या कथा उतरवणे. फार पुर्वीपासुन इच्छा आहे हो, आपलं एखादं तरी पुस्तक छापायचेच. पण मेला कोणी प्रकाशकच भेटत नाही. मग म्हणलं ह्या (फडतुस) गोष्टींना आपल्या ब्लॉगवरच स्थान द्यावे आणि अनपेक्षीतपणे थोडंफार जमु लागलं.

ब्लॉगच्या ह्या यशाचे सर्वच्या सर्व श्रेय जाते ते वाचकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना. पोस्टला मिळालेली प्रत्येक कमेंट ही माझ्या दृष्टीने लाख मोलाची होती, आहे. त्यामुळेच माझा उत्साह वाढत गेला. मनापासुन सांगतो, मला माझा ब्लॉग कध्धीच आवडला नाही. ह्यातील कुठलीही पोस्ट ‘पब्लीश’ केल्यानंतर मी पुन्हा वाचली नाही, वाचणार नाही. परंतु हा ब्लॉग वाचकांच्या पसंतीस उतरला ह्याचा मला फार आनंद वाटतो.

दोन चार दिवसांपुर्वीच ‘रुचीता’ नामक एका वाचकाने एका रात्रीत माझा ब्लॉग बराचसा वाचुन काढला. प्रत्येक कमेंटमध्ये ‘आता रात्रीचे २ वाजले आहेत’, ‘आता ३’ तर ‘आता सकाळचे ४ वाजले आहेत’ असा उल्लेख होता. मी इतका खुश झालो होतो, त्या कमेंट मी सर्व मित्रांना दाखवत होतो. रात्रीच्या वेळी ब्लॉग वाचुनही झोप आली नाही म्हणजे ब्लॉग नक्कीच बरा असणार, नाही का? अश्या प्रतिक्रियांनीच खरं तर लिहीण्याचे बळ दिले.

गेल्या वर्षी ‘स्टार माझा’ने आयोजलेल्या मराठी ब्लॉगस्च्या स्पर्धेत ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’ने बाजी मारली हा प्रकार माझ्या दृष्टीने अजुनही अविश्वसनीय आहे. माझे आई,वडील काय किंवा बायको, बहीण, भाऊ काय, कोणीही अजुन ह्या ब्लॉगवर फिरकले देखील नाही ये 😦

आज, खरं सांगायचे तर मी थोडासा भावनाविवश जरुर झालो आहे. इतरांचे असते तसे माझेही ह्या ब्लॉगशी एक घट्ट, जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या कारणाने हा ब्लॉग माझ्या मनात राहीलेला आहे. फावल्या वेळी ब्लॉग्स वरील प्रतिक्रियांचा, नविन लिहावयाच्या पोस्टचा विचार सतत मनामध्ये चालु असायचा. आपले लिखाण आधीकाधीक कसे चांगले करता येईल हा विचार मनामध्ये रुंजी घालत रहायचा.

मराठीब्लॉग्स.नेट चे सहकार्यही ह्यामध्ये खुप आहे. त्यांच्यामुळेच माझ्या ब्लॉगला इतका वाचकवर्ग लाभु शकला. त्याबद्दल त्यांचे खुप आभार.

“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार. त्यांच्या ब्लॉगवरील प्रेमामुळे, लोभामुळे, प्रोत्साहनामुळेच ही उंची गाठणे शक्य झाले. यापुढेही तुमचे ह्या ब्लॉगवरील नाते अस्सेच कायम राहील अशी आशा करतो.

शेवटची एक पुणेरी सुचना 🙂 ब्लॉगचे एक लाख वाचक झाले म्हणुन लगेच ब्लॉगच्या चालकांकडे पार्टीची (ओली किंवा सुकी) मागणी करु नये. ब्लॉगचे चालक हे उभरते लेखक आहे, कुठल्या खानावळीचे मालक नाहीत.

43 thoughts on “लख लख चंदेरी

 1. अनिकेत

  धन्यवाद तेजस्वीनी. तु सुध्दा अशीच येत जा ब्लॉगवर 🙂

 2. Prajakta

  ब्लॉगचे एक लाख वाचक झाले म्हणुन लगेच ब्लॉगच्या चालकांकडे पार्टीची (ओली किंवा सुकी) मागणी करु नये. ब्लॉगचे चालक हे उभरते लेखक आहे, कुठल्या खानावळीचे मालक नाहीत!!!!!

  phar kahi nahi ek chocolate magitla asata..
  pan te pan denar nahiyes tu.. Puneri kuthala

  tari pan majhya shubbhechha tula..
  mi ashi party vina kahi konala det nasate..
  pan tujhya sathi itka nakki 😛

  Bhunga asach gun gunat rahude 🙂

  1. अनिकेत

   बस्स, इतकंच ना, चलं दिलं! थोड्या वेळाने इमेल बघ, एक काय छान छान फॉरेनची दहा चॉकलेटं पाठवतो, आणी पाहीजे तर वर बोनस म्हणुन एक केक.. हॅप्पी?
   बाकी शुभेच्छांबद्दल शतशः धन्यवाद

 3. सचिन

  नवीन वर्षाच्या मुहुर्तावर महेंद्र काकांनी आणि संक्राती दिवशी तुम्ही १ लाख वाचक संख्या ओंलाडलीत.

  असंच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सुचोत आणि आम्हा वाचकांना त्याचा लाभ होवो.

  लाख लाख शुभेच्छा.

 4. Sagar

  Are wah……Abhinandan….
  Oli va suki Party rahudya,mahit aahe Khanavaliche malak nahit pan blog che malak aahat mhanun Roj kahitari post nakkich det ja….
  Upashi thevu naka aamhala…Aamch ya blog var manapasun khup prem aahe…

 5. दुसरे लखपती आले हो

  अभिनंदन भावा 🙂

  लाखांचा पल्ला गाठल्याबद्दल आणि संक्रातीच्या शुभेच्छा!!!

 6. अनिकेत वैद्य

  Congratulations for not-out 100,219 hits.

  मधेच निव्रुत्ती जाहीर करायची अन मग पुन्हा जोमाने लिहायच. कार्यालयातली सवय का? increment साठी पेपरची अफ़वा उठवायची तस?
  आमीर खान ला हा स्टंट सांगितला पाहीजे.

 7. अनिकेत दादा.. तुझ्या ब्लॉग ला आजचाच गोड दिवस भेटला..
  लखपती व्हायला.. 🙂 अभिनंदन..

  तुला आणि तुझ्या गोड परिवाराला..
  मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
  तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

 8. Miheer

  va congrats, lakhpati jhalya baddal, evhadhi unchi gathlya baddal, ha lekh mhanje NAMRATECHA (tuzyatlya) sundar namuna ahe. tuza he jamini var asnach tuzya yashach gamak ahe. tyamulech evhadya unchi var astana sudha tu amhala (kshudra vachakana) amcha amchyatlach vatatos. tyamule lakh hi kahi mothi goshtta nahi lavkarach tu ankhi hi khup unchi gathshil yat shankka nahi

 9. अनिकेता,
  लक्षाधीश झाल्याबद्द्ल हार्दीक शुभेच्छा.
  तुझा व्यासंग, तुझी लिहीण्याची प्रेरणा आणि ब्लॉगची क्वालीटी पाहता हे अपेक्षितच होते.
  असाच जल्लोश आपण दहा लाख वाचक झाल्यावर करूयात.
  मी नेहमी माझ्या ’ब्लॉगाळू’ मित्रांना सांगत असतो ’ ब्लॉग कसा असावा याचा नमुना पहायचा असेल तर अनिकेतचा पहा’ !!!!!!
  लगे रहो. तुझे हार्दीक अभिनंदन. आणि भावी वाटचालीसाठि All The Best.

  ता.क. – बाकी सर्व ठीक आहे पण अजून पल्लवीवहिनींनी व्हिजीट केली नाही हे पटत नाही यार… तू जपानी भाषेवर एक लिही लेख. किंवा मीच कधीतरी फोन करून ऐकवीन त्यांना यजमानांचे पराक्रम !!

  1. अनिकेत

   अरे खरंच. तिला ब्लॉगचा यु.आर.एल. सुध्दा माहीत नाही. नाव विचारले तर “भुणभुणणारा भुंगा” असं काहीतरी आहे म्हणते. म्हणतात ना जिथे उगवतं तिथे विकत नाही का तिथे काही किंमत नसते अस्संच काही तरी 🙂

 10. लाखाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन. मराठीतून लिखाण करार्‍यानी तुमचा आणि महेन्द्र काकांचा आदर्श ठेवावा असेच तुमचे ब्लॉग आहेत.

  1. अनिकेत

   धन्यवाद सिध्दार्थ, ऐकुन छान वाटतंय बघ, पण खरंच अजुन असे खुप ब्लॉग आहेत ज्यांचा आदर्श ठेवु शकतो, कदाचीत ते इथे जोडलेले नसतील

  1. अनिकेत

   अगं काय बोलती आहेस? काही ही, नको बाबा नाही जमायचं. हे आपलं लाखाच्या मोहापायी झालं कसं तरी 🙂

 11. चांगला मुहुर्त साधलात लक्षाधिश व्हायला…ब्लॉगच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा….

 12. तू आणि महेन्द्रकाका यावर्षी लखपती झालात म्हणून न सांगता पार्टी द्याल अशी एक (मुंबै मॅंटेलिटीप्रमाणे) अपेक्षा होती…पण त्याबाबतीत तू उगाच पुण्यनगरीला पुढं करतोस….असो…तुझ्या आनंदाच्या दिवशी शिव्याची लाखोली कशाला वहा….:) अभिनंदन अभिनंदन…आणि तुझ्या पोस्टस तुला आवडत नाही हे वाचुन सखेद आश्चर्य वाटलंय…असो…बहुतेक तुला अजुन उच्च कोटीचं लिहायचं असणार….:) लिहिते रहा…..

 13. Ganesh

  Abhinandan,
  Are tu tuzi post parat kadhich vachta nahi tyamule ch tula ajun kale nasel ki tu kiti chhan lihtos te 🙂
  Asech chhan chhan lihit raha….
  Ani shevatchi puneri style tar aflatun aahe 🙂

 14. Geeta

  Abhinandan Aniket aani sankrantichya hardik shubheshya. tu mehindichya panavar bhag 6 kadhi post kartos please lavkar post kar mala far ustukata lagali aahe.

 15. sahajach

  अनिकेत मनापासून अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!

 16. अनिकेत

  शुभेछांबद्दल, प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे शतशः आभार. प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर नाही देऊ शकलो परंतु हीच एकमेव प्रतिक्रिया गोड मानुन त्याचा स्विकार कराल अशी आशा आहे.

  पुन्हा एकदा, धन्यवाद

 17. आल्हाद alias Alhad

  हार्दिक अभिनंदन!

  “शेवटची एक पुणेरी सुचना ब्लॉगचे एक लाख वाचक झाले म्हणुन लगेच ब्लॉगच्या चालकांकडे पार्टीची (ओली किंवा सुकी) मागणी करु नये. ब्लॉगचे चालक हे उभरते लेखक आहे, कुठल्या खानावळीचे मालक नाहीत.”

  हे बाकी झ्याक…
  लिहीत रहा…

 18. अभिनंदन! हे आमच्या साठी अंगूर खट्टे असेच आहे. तुमचे पुन्हा अभिनंदन! 🙂

 19. लक्षाधीशा मन:पूर्वक अभिनंदन! अशीच जोरदार घौडदौड सुरू राहीलच. अनेक शुभेच्छा!

 20. अनिकेत, मला वाटतं ब-याच ब्लॉगर्सचं असं होतं. घरचं कुणी वाचक नसतं पण इतर वाचणारे बरेच असतात. आता हे सर्व ब्लॉगर्स मिळून एक निराळच कुटुंब बनलंय. तू निदान प्रकाशक शोधत तरी होतास, मी तर ते पण केलं नाही. गॅरंटी ना! तुझ्या ब्लॉगला इतकं भरभरून यश मिळाल्याबद्दल तुझं अभिनंदन. लिहिता रहा. लेख कमी वगैरे करण्याच्या गोष्टी करून नकोस. तू छान लिहितोस. मला जसा वेळ मिळतो, तसं मी वाचत असते.

 21. मी होवू शकतो प्रकाशक तुझ्या कथांसाठी… पण वितरक शोधावा लागेल…
  प्रिंटींग वगैरे मी करू शकतो रे…बाकी शेवटची सुचना अप्रतिम…
  आणि लखपती झाल्याबद्दल अभिनंदन…!!

 22. sushma

  ratriche 12.30 wajle tri mi “bhu bhu bhugyat”ch aadkli aahe…..mala khtri aahe 2/3diwast “bhu bhu bhugya” 2lakhacha palla gathal……..lihit raha…pudhi post sathi Best Luck…….
  (IN ADVANCE- 2lakhacha palla gathlya baddal “ABHINANDAN”)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s