मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यातील काही ठळक घटना


आज पार पडलेल्या मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्याचा वृतांत, फोटो आणि चलचित्रफिती लवकरच पोस्ट होतीलच, परंतु त्या अगोदर काही ठळक घटना मांडाव्याश्या वाटतात (teaser) ह्या मेळाव्याचा वृत्तांत जाणुन घेण्यासाठी बहुतांश लोक अधीर असतीलच त्यांच्यासाठीच ही पोस्ट.

 • ह्या स्नेहमेळाव्याला दणदणीत ६० पेक्षा अधीक लोकांची उपस्थीती
 • पुण्याबाहेरुन सुध्दा खास मेळाव्यासाठी आलेल्या लक्षणीय सदस्यांची उपस्थीती
 • वृत्तपत्र आणि मिडीया कडुन ह्या मेळाव्याची दखल
 • सकाळ, पुणे मिरर, हिंदुस्तान टाईम्स, स्टार माझा, साम मराठी आणि झी-टिव्हीमध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सहभाग
 • काही निवडक ब्लॉगर्ससाठी मराठी चित्रपटांची प्रदर्शनापुर्वी स्क्रिनींग करण्यात येणार. हे निवडक ब्लॉगर्स कोण असतील ते लवकरच घोषीत करण्यात येईल. त्या ब्लॉगर्सनी त्या चित्रपटाची अन-बायस्ड स्क्रिनींग त्यांच्या ब्लॉग्स वर प्रसिध्द करावी अशी अपेक्षा आहे जेणेकरुन वृत्तपत्रांकडुन काही चित्रपटांची पुर्वग्रहदुषीत होउन केले जाणारे टिका-समिक्षण कमी होईल, तसेच मराठी चित्रपटांची प्रदर्शनापुर्वीच भारतात आणि भारताबाहेर प्रसिध्दी होईल.
 • स्नेह-मेळाव्यासाठी काही पुस्तक प्रकाशकांचीही हजेरी. शोध नविन लेखकांचा. लवकरच त्या प्रकाशकांची चांगल्या ब्लॉगर्सशी ह्या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे ओळख करुन देण्यात येईल.
 • मराठी साहीत्य संमेलनात ब्लॉग्सतर्फे प्रसिध्द केल्या जाणाऱ्या साहीत्याची ही दखल घेतली जावी असे अनेकांना वाटते आणि त्यासाठीचे निवेदन येत्या काही दिवसांत अखिल भारतीय संमेलनाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी ह्याच्याकडे एका शिष्टमंडळातर्फे सुपुर्त केले जाईल. स्नेहमेळाव्याच्या आयोजकांनी हा ठराव आणि त्यासाठीचे निवेदन तयार करुन ठेवले आहे. कुलकर्णी साहेबांची वेळ मिळतात ते त्यांच्याकडे सुपुर्द केले जाईल.
 • पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात मराठी ब्लॉगर्ससाठी एक स्टॉल स्पॉन्सर्ड झाला आहे. ह्या स्टॉल तर्फे संमेलनात येणाऱ्या वाचकांना ब्लॉग्सबद्दल, त्यावरील साहीत्याबद्दल अधीक माहीती दिली जाईल तसेच काही निवडक ब्लॉग्सचे साहीत्य आणि त्या ब्लॉग्सचे दुवे त्या त्या लेखकांच्या संमंतीने ह्या स्टॉलवर मांडले जातील. याबाबत अधीक माहीती येत्या काही दिवसांत प्रसिध्द केली जाईल
 • मराठी ब्लॉगर्सचा एक फॉर्मल ग्रुप स्थापन करुन त्याअन्वये मराठी भाषा, मराठी ब्लॉगींगचा प्रचार आणि अनेक कार्य करण्याचा मानस आहे. ह्या स्नेहमेळाव्यानंतर आयोजक आणि काही प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत अश्या अनेक घटनांचा उहापोह करण्यात आला, ज्याबद्दल सविस्तर माहीती नजिकच्या काळात प्रसिध्दीस देण्यात येईल.
 • ब्लॉगींग आणि ह्या नविन स्थापन होऊ पहात असलेल्या ग्रुपच्या कार्यांची आणि होऊ घातलेल्या कार्यांची माहीती सांगण्यासाठी नजीकच्या काळात एक प्रेस-कॉन्फरन्स घडवुन आणवावी अशी गळ अनेक प्रसिध्दी माधमांच्या प्रतिनीधींनी घातली आहे. बघु कसे जमते ते.
 • याशिवायही अनेक ठळक घटना घडल्या ज्यांबद्दल आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही, सो वेट ऍन्ड वॉच
 •  

  ह्या स्नेहमेळाव्यास अनेक लोकांनी कळत-नकळत सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपुर्वक आभार. अनेक लोकांना इतर महत्वाच्या कामांमुळे व्यक्तीशः बोलणे शक्य झाले नाही त्याबद्दल खरंच खेद वाटतो, परंतु नजीकच्या काळात अश्या अनेक गाठी भेटी आपण घडवुन आणु ज्यावेळी मनमोकळपणाने आपल्याला चर्चा करता येईल ह्याची श्वास्वती बाळगावी.

  @सम्राट फडणीस (ई-सकाळ एडीटर) – धन्यवाद. हा मेळावा संपतो ना संपतो त्याच्या आतच ह्याची बातमी इ-सकाळवर झळकली होती.
  @प्रसन्न जोशी (स्टार माझा) – धन्यवाद. तुमचे अनुभव, अनेक गोष्टीत झालेली मदत, भविष्यातील कार्याबद्दल दिश्या दर्शवल्याबद्दल.
  @योगेश जोशी (हिंदुस्तान टाईम्स) – धन्यवाद, सगळ्यासाठीच. काय काय सांगु आता?
  @नितीन (पुणे मिरर्स) – प्रेस कॉन्फरंन्स बद्दल माहीती, ब्लॉगींगबद्दलचे अनुभव – धन्यवाद
  @रानडे काका – सर्व स्नेहमेळाव्याचे शुटींग आपण केलेत, खरंच धन्यवाद
  @गौरी (झाले मोकळे आकाश ब्लॉग) – धन्यवाद, टेस्टी तिळाच्या वड्यांसाठी. मस्त झाल्या होत्या एकदम
  @प्रभास (कवडसा ब्लॉग) – लाईव्ह ट्विटींगसाठी
  @श्री. अभ्यंकर – पु.ल.देशपांडे उद्यानाची पुर्वपरवानगी आणि संबंधीत कार्यात आपली फार मोलाची मदत झाली. धन्यवाद.

  बहुतेक कुणाला विसरलो नसावा, असेन तर दोन टपल्या मारुन आठवण करुन द्या, लगेच ब्लॉग अपडेट करतो

  सर्व आयोजकांचे (पेठे काका, अनिकेत, विक्रांत देशमुख, दिपक शिंदे, पंकज) हार्दीक अभिनंदन. आजचा स्नेहमेळावा अपेक्षेपेक्षाही अधीक फलदायी आणि छान पार पाडल्याबद्दल

  मराठी ब्लॉगींगच्या एका नव्या पर्वाची ही एक सुरुवात आहे म्हणल्यास ते वावगे ठरु नये. आजच्या ह्या मेळाव्याने त्याची मुहुर्तवेढ रोवली गेली आहे, आता आपल्या सगळ्यांना हे कार्य पुढे न्यायचे आहे.

  आहात ना तुम्ही बरोबर?

38 thoughts on “मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यातील काही ठळक घटना

 1. मराठी पाउल पड़ते पुढे … वा रे… भले शाब्बास… आहोत की आम्ही.. यायला जमल नसले म्हणुन का य्झाले… मराठी ब्लॉग्गिंगचा झेंडा आता सर्व एकत्र पुढे नेउया…

 2. खूपच छान..तुम्ही म्हणजे पत्रकारांपेक्षा उत्तम कव्हरेज दिले आहे..मेळावा खूपच सुरेख झाला..फोटो टाकतोय लवकरच

 3. vinayak

  uttam uttam uttam
  mi shekhar joshi na loksattat batami cover karayala sangitali aahe
  pudhari valynashi boallo aahe
  prassan dadashi bolun bare vatale
  khup chaan prayatn aahe
  aaj yevu nahi shakalo
  pan majhe man tithech hote
  sarakhe pankaj la phone karat htot
  thanks
  YA SAGALYAT MI NAVHATO MHANUN MALA CHANCE DEVU NAYE ASE KAH IAKRU NAKA HA!! HA HA HA
  Vinya
  kaushal inamadarnshi boallo
  tekhup aandit zale hote

 4. निवडक ब्लॉगर्ससाठी मराठी चित्रपटांची प्रदर्शनापुर्वी स्क्रिनींग, स्नेह-मेळाव्यासाठी पुस्तक प्रकाशकांचीही हजेरी, नविन लेखकांचा शोध, मराठी साहीत्य संमेलनात ब्लॉग्सतर्फे प्रसिध्द केल्या जाणाऱ्या साहीत्याची दखल घेतली जाणे आणि पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात मराठी ब्लॉगर्ससाठी एक स्टॉल… वा, वा, वा!!! पहिल्याच मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यात किती positive घटना घडल्या नां. सर्व आयोजकांचे मनपुर्वक अभिनंदन.

 5. अनिकेत हे सारे वाचून अतिशय आनंद झाला. आपल्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने एका वेगळ्याच पर्वाची जाणीवपूर्वक सुरवात झाली आहे. सगळ्य़ांचेच मन:पूर्वक अभिनंदन!

 6. हो,
  मला पण मिट ला जायचं होतं पण वेळेवर वेगळचं काम निघालं म्हणुन जमलं नाही.
  पुढच्या वेळी नक्की येईन

 7. अप्रतिम. खूप छान वाटलं वाचून. मस्तच. एकाच आणि तेही पहिल्याच बैठकीच्या मानाने बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या आणि मस्त निर्णय झालेत. अजून अपडेट्सची वाट बघतोय.

 8. पहिला मराठी ब्लॉगर्सचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. पुढील काळात प्रत्यक्षपणे सहभागी होण्यास उत्सुक आहे. अधिक माहिती देत रहालच याची खात्री आहे.

  आपला

  अमोल केळकर

 9. sahajach

  अनिकेत या यशाचे श्रेय तुमचे, तू,पेठेकाका आणि भूंगा,पंकज सगळ्यांचे!!!! सगळ्यात आधि तर तुम्हा सगळ्यांचे आभार…
  मजा आली असेन ना!!! एक वेगळाच अनुभव…चला प्रत्यक्ष नाही तरी तुमच्या लेखनातून आणि फोटोतून पहातो आम्ही……….

  तुम्ही मांडलेले मुद्देही अगदी व्यवस्थित आहेत…
  तेव्हा लगे रहो!!! हम तुम्हारे साथ है!!!!यावेळेस तर नाही जमले पण जुनमधे मात्र नक्की भेटते तुम्हा सगळ्यांना!!

  या ब्लॉग्स नी आपल्याला एक वेगळी ओळख तर दिलीच आहे पण कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसलेली निखळ मैत्री आज आपण सगळे अनुभवत आहोत……आपल्या वैयक्तिक आय़ुष्यातही आपण सगळे ऑर्कूट द्वारे म्हण, वा मेल्स द्वारे एकमेकांशी संपर्कात आहोत, एकमेकांना मदत करत आहोत ह्यापरते दुसरे यश ते कुठले!!!!

 10. मराठी ब्लॉग मेळावा जो यशस्वी पार पडला त्याबद्दल आपले अभिनंदन. मी स्वतः लेखिका आहे. साहित्य संमेलना बाबत जे निर्णय होतील त्याबद्दल माहिती द्यावी ही विनंती.

  धन्यवाद

  उज्ज्वला केळकर

  सांगली
  http://www.ujjwalakelkar.blogspot.com

 11. Sagalya ayojakanche parat ekada abhinandan.
  Mazyakadun kay madat shakya asel ti nakki.
  Amachya sadhya in production asalelya film cha screening bloggers sathi Pune ani Mumbait nakki. Kal Yogesh la hi mi he sangitala.

 12. mugdhamani

  अभिनंदन सगळ्यांचेच..!! सगळा कार्यक्रम फोटोस आणि ठळक घडामोडींच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला याकरताही सगळ्यांचेच आभार..

 13. Meenal

  अभिनंदन!!
  जे येऊ शकले नाहीत त्यांना पुढील ब्लॉगर्स मेळाव्याची प्रतिक्षा आहे.
  तरी, या पहिल्या वाहिल्या मेळाव्याचा आनंदच काही वेगळा आहे.
  सर्वांना अनेक शुभेच्छा.

 14. सुधीर कांदळकर

  छान. वाचून आनंद झाला. सहभाग घेणारांचें तसेंच वृत्तांत सादर करणारांचें अभिनंदन.

  सुधीर कांदळकर

 15. अर्थातच अनिकेत! आम्ही सोबत आहोतच तुमच्या. अरे, येणं शक्य झालं नसलं तरी मनाने तिकडेच होते मी. पंकजने ’स्टार माझा’ सुद्धा कव्हर करतंय म्हटल्यावर मी वेड्यासारखा घरी फोन करून ’स्टार रिमोट’ किंवा तत्सम कार्यक्रमात या मेळाव्याबद्दल काही दाखवतायंत का पहा, असं दोन-दोनदा सांगितलं. पंकजचा एस. एम. एस. आला की मला बरंही वाटायचं आणि जीवाची घालमेलही होत होती की मला तिथे यायला जमलं नाही.

  मेळाव्यात घडलेल्या गोष्टींचा आणि मुद्यांचा तू व्यवस्थित आढावा घेतला आहेस. सोहळा अपेक्षेपेक्षाही जास्त सुरेख रंगलेला दिसतोच आहे, शिवाय या मेळाव्याने बरंच काही हाती लागलं आहे.

  बाकी सर्व आवश्यक आणि ठळक घटनांची माहिती तू योग्य वेळी देशीलच. तू आतापर्यंत दिलेली सर्व माहिती एक ब्लॉगर म्हणून खूप अभिमानास्पद व कौतुकास्पद वाटतेय. हा मेळावा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सर्वांचंच मनापासून अभिनंदन. पुढच्या मेळाव्याला मला हजर रहाता येईल, अशी अपेक्षा आहे.

  सकाळ मधे आलेली बातमी वाचली, आता डी. एन. ए.

 16. विनायक रानडे

  ६० मराठी डोकी एकत्र आलेली पाहून आशा उंचावल्या. मराठी तरुणांना करता खुप काही करायची इच्छा आहे. थोडी आधी ओळख झाली असती तर चांगले चलचित्रण करता आले असते. तसा व्यावसायीक साधनांचा संच माझ्या जवळ आहे. सगळ्या वयोगटातील तरूणांना मित्र करायची इच्छा आहे. नजीकच्या काळात अशी संधी येवो ही विनंती.

 17. Abhijit Thite

  अरे मित्रा… खूप छान माहिती दिलीस. काल यायचं होतं, पण जमलं नाही. सम्राटनं माहिती दिली. खूप आनंद झाला. मागे बंगलोरला ब्लाॅगर्सची परिषद भरली होती. पण ते सारे इंग्लिश ब्लाॅगर्स होते. मराठी ब्लाॅगर्स एकत्र जमले, ही खूप मोठी गोष्ट होती. पुन्हा एकदा धन्यवाद…

  खरं नाव अभिजित थिटे.
  टोपण नाव ः सुडोकू
  ffive.in

 18. आल्हाद alias Alhad

  व्वा! वाचून आनंद झाला.
  पुढची मीट कुठे आणि कधी घ्यायची?????

 19. छान सुंदर अभिमानास्पद.
  पहिल्याच प्रयत्नात खूप काही साध्या केलाय तुम्हा सर्वांनी त्याबद्दल मनापासून अभिनंदन!
  यात आल नाही याच दुःख आहेच. पण या मेळाव्याच्या यशाबद्दल आनंद देखील आहे.
  खरच इतक साहित्य प्रसिद्ध होतंय ब्लॉग्स च्या माध्यमातून की त्याला जर प्रसिद्धी मिळाली नाही तर ते मराठी भाषेचं मोठ नुकसान ठरेल. त्या दृष्टीने जी पावलं उचलली आहेत तुम्हा सर्वांनी ती खरच कौतुकास पात्र आहेत.
  निवडक साहित्याचा एखादा e -अंक (वेगळ्या स्वतंत्र URL सहित) जर प्रसिद्ध करता आला दर महिन्याला तर ते देखील बघता येईल.
  पुढला मेळावा कसाही करून गाठायाचाच अस ठरवलंय.
  पुन्हा एकदा अभिनंदन, सगळ्यांचंच!

 20. ब्लॉगर्सच्या मेळाव्याला यायचे सकाळी ठरविले. पण अचानक महत्वाचे काम उपटले आणि राहून गेले. तुम्ही मंडळी ह्या निमित्ताने मराठीची जाण आणि पोज वाढवित आहेत याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. माझा ब्लॉग निमित्त आहे. तुमच्या कार्यात पहभागी होण्याची इच्छा आहे. माझा उपयोग झाला तर आनंदच वाटेल. पुढची प्रगती जरूर कऴवा. त्यासाठी माझा मेल आहे….

 21. अहो, आम्ही हिन्दीतून ब्लॉग लिहीत असलो तरी काय, “ब्लॉगर” म्हण्टले कि एकच जात आपली… तेव्हां आमची पण बधाई स्वीकार करावी… अज़ून हिन्दी ब्लॉग विश्व एवढे सुधारलेले नसले तरी इकड़ची रिपोर्टिंग आम्ही तिकड़े करु, बहुधा अक्कल येईल हिन्दी वाल्यांना पण्… 🙂 तुमचे प्रयास खूपच छान आहेत… (मला मराठीत जास्त लिहीता येत नाही म्हणून येथेच थांबतो…) नमस्कार्…

 22. नमस्कार,
  मराठी ब्लॉगर्सचा हा पहिला मेळावा आयोजित करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन!

 23. atishy abhimanachi goshta ahe……… mi alo nahi yache dukh ahe…………… tari pudhachya blog bhetila kuthalyahi paristhitit upasthit rahanar…………. gudhi padavyala marathi nav varsha nimittane ekhada ank kadhala tar kay harkat ahe./ apalyatil kahinche nivdak lekh vagaire collect karun/ printing n designing chi jababdari mi gheto………..

 24. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन 🙂 महेश

 25. नाही येता आल हयाची तगमग आहेच..पण तुमच्या आणी पेठेकांकानी लिंक दिलेल्या ब्लॉग्सवरुन बरयाच अंशी अनुभवता आला हा मेळावा…हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन…

 26. mipunekar

  लयीच भारी….
  सर्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन.
  पहिला मेळावा इतका यशस्वी झाल्याचे पाहून खूप मस्त वाटले.
  बाकीचे अपडेट्स आणि फोटोची आतुरतेने वाट पाहत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s