लाईफसायकल


पुण्यामध्ये नुकतेच एका मोठ्या मॉलचे उद्घाटन झाले. ६००० स्क्वे.फुट पसरलेल्या ह्या मॉलमधील अनेक गोष्टी इंपोर्टेड आहेत. त्यांची किंमत ८,०००रु. पासुन ते ३.५ लाखापर्यंत आहे.

आता तुम्ही म्हणाल हे नक्की कसले मॉल आहे? हे आहे पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिले वहीले पुर्णपणे सायकलींसाठी वाहीलेले अनेक देशी-विदेशी बनावटींच्या सायकलींचे मॉल.

पुणे एके काळी सायकलींचे शहर म्हणुन ओळखले जायचे. स्वयंचलीत वाहनांची संख्या पुण्यात अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी कमी होती. अनेक आबाल-वृध्द दैनंदिन कामांसाठी, कामाच्या ठिकाणी, शाळा, भाजी, दुकानात जाण्या-येण्यासाठी सायकलींचाच वापर करत होते. पण काळाच्या ओघात पुणे शहराने सुध्दा कात टाकली आणि शहराबरोबरच राहणीमान सुध्दा गतीमान झाले. ह्या गतीशी ताळमेळ राखण्याकरता पुणेकरांनीही सायकली सोडुन स्वयंचलीत वाहनांची कास धरली.

लोकसंख्या वाढली, घरटी एक नव्हे तर दोन-दोन दुचाकी आणि शिवाय एखादं चारचाकी सुध्दा दिसु लागली. शहर गजबजले परंतु रस्ते मात्र पुर्वीइतकेच राहीले. आणि काही दिवसांतच प्रदुषण, रहदारीचा ताण, गोंगाट वाढु लागला, पर्यायाने त्याचा विपरीत परीणाम पुणेकरांच्या प्रकृतीवर दिसु लागला. उच्च रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना आणि शारीरीक व्याधींवर मात करण्यासाठी पर्यायी वाहन म्हणुन पुणेकरांनाच नव्हे तर तमाम भारतीयांना पुन्हा एकदा सायकलचा पर्याय दिसु लागला.

सायकलींनीसुध्दा मग कात टाकली. केवळ पेपर-दुध वाल्यांची मक्तेदारी असलेल्या ऍटलस-हर्क्युलस सायलींऐवजी विवीध रंगाच्या, नाजुक, वजनाने अतीशय हलक्या, २१ किंवा त्याहीपेक्षा अधीक गेअर, डबल सस्पेंशनच्या अल्युमिनीयम्च्या सायकल बाजारात आल्या. ह्या सायकलींनी सर्वांनाच भुरळ पाडली. चालवायला सोप्या, अनेक किलोमीटर चालवुनही कमी दम लागणाऱ्या ह्या सायकलींची मागणी वाढु लागली आणि सायकलींच्या बाजाराने पुन्हा एकदा बाजारात हात पाय पसरले. ५-६ हजारांपासुन चक्क लाखांमध्ये किंमती असलेल्या अनेक विवीध सायकलींचा पर्याय ग्राहकांसाठी खुला झाला. पुणेकरांचा सायकलींकडे असलेला वाढता ओघ पाहुन महानगर पालीकेने सुध्दा अनेक ठिकाणी सायकलींसाठी वेगळे मार्ग निर्माण केले.

म्हणतात ना, एखाद्या बिंदु पासुन सुरु झालेले एक चक्र पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबते. सायकलींच्या बाबतीतही तस्सेच होऊ घातले आहे. रस्त्याने सायकल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्याच चक्राला इंग्रजी भाषेमध्ये ‘LifeCycle’ असे संबोधतात. परंतु सायकलींचे अनेक फायदे बघता ‘Life IS Cycle’ असे म्हणल्यास ते अयोग्य ठरु नये.

कुठलेही कार्य सुरु करताना गरज असते ती प्रोत्साहनाची, बरोबर ना? तर मग ही घ्या सायकल चालवण्यासाठीची ४१४ प्रोत्साहीत करणारी कारणं –

5 thoughts on “लाईफसायकल

  1. ह्या सायकलिंबरोबर त्या चित्रात दिसणार्‍या ललना पण मिळतात का?

    • काय राव हे तर फार झाल … सुई घेतली कि शर्ट फ्री …
      हो भेटता की … पण त्या साठी कमीत कमी ५ वर्ष फक्त सायकल वापरावी लागते .. आणि मग सोडत (लोटरी )..

  2. त्या ललना सोबत मिळणार असतील तर साडेतीन लाखाची सायकल काय वाईट नाही…..!!!!…:-)

  3. नक्की काय साडेतीनलाखात? त्या ललना की सायकल??

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s