डो.भु.भु.म. भुंग्याचा आज वाढदिवस


 

 

 

हाच तो दिवस होता, २० मार्च २००९ जेंव्हा ’डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंग्याने’ महाजालावर पदार्पण केले आणि बघता बघता असंख्य वाचक मिळवले. ९ महिन्यात एक लाखाच्यावर वाचक वर्ग आणि ’स्टार माझा’च्या मराठी ब्लॉग स्पर्धेत मिळवलेला प्रथम क्रमांक हे त्याच्या शिरपेचात खोवले गेलेले दोन मानाचे तुरे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर्व वाचकवर्गाने मनापासुन दिलेले प्रेम आणि वेळोवेळी आपल्या अमुल्य प्रतिक्रियांनी दिलेला प्रतिसाद हाच तो त्या भुंग्याचा ह्या वर्षात कमावलेला ठेवा.

जानेवारी महिन्यात लाखांचा टप्पा पार झाल्यावर खरं तर फारसे लेखन ह्या ब्लॉगवर झालेच नाही. पण तरीही पंचविस हजाराच्या वर वाचकांनी ह्या ब्लॉगला भेटी दिलेल्या पाहुन वाचकांना हा ब्लॉग अजुनही तितकाच भावतो आहे ह्याचा विश्वास वाटला आणि त्याच निमीत्ताने ह्या ब्लॉगवर साठलेली धुळ झटकण्याचा चंग बांधता आला.

पुन्हा एकदा हा भुंगा लवकरच भुणभुणायला लागला आहे, आणि एका दीर्घ रहस्यमय, खुनांवर बेतलेली गुन्हेगारी कथा घेऊन आपल्या भेटीस येण्यास उत्सुक आहे.

आपला ह्या ब्लॉग वरील विश्वास, प्रेम आणि लोभ असाच कायम रहावा हीच ह्या पहिल्या वाढदिवशी ’डोक्यात भुणभुणणाऱ्या मराठी भुंग्याला’ आपण दिलेली सप्रेम भेट ठरेल.

धन्यवाद.

35 thoughts on “डो.भु.भु.म. भुंग्याचा आज वाढदिवस

 1. अभिनंदन … 🙂 पुढच्या लिखाणाची वाट बघतोय… तू ते ‘मेहेंदीच्या पानावर’ पूर्ण केलेस का रे???

 2. sahajach

  अनिकेत अभिनंदन….. लवकरच पुन्हा भुणभुणायला लाग……
  आणि हा भुंगा असे अनेक वाढदिवस साजरे करो!!!!!

 3. सचिन

  अभिनंदन. असाच भुंगा डोक्यात भुणभुणत राहो.

  लाख लाख शुभेच्छा.

 4. मन:पुर्वक अभिनंदन….फ़ोटाफ़ोटी बरोबरच थोड खरडणही चालु ठेवा….पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा तुमच्या डो.भु.भु.म. भुंग्याला….

 5. ARUNAA ERANDE

  भु भु भुन्ग्याला माझ्या शुभेच्छा. तुझी भु भु अशीच सतत चालू राहू दे अशी देवाच्या चरणी प्रार्थन.

 6. अनिकेत

  मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. भुंगा नक्कीच ह्या अंतरजालावर अस्साच भुणभुणत राहील 🙂

 7. उशिरा जागा झालो.तरी फार उशिर झाला नाही.आमच्या मनःपुर्वक ढेर सार्‍या वाहाशु! मनःपुर्वक हाशु ! म्हणजे पिवळा पीतांबर प्रमाणे द्विरुक्ती !!

 8. बाळाचे आणि बाबांचे मनःपुर्वक अभिनंदन.
  “रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा…
  सांगिसी थ्रिलर रे भ्रमरा….
  लिहीत रहा तू रे भ्रमरा….लिहीत रहा तू रे भ्रमरा……..भ्रमरा……भ्रमरा……
  मांडिसी तू कथेला भ्रमरा………..”

 9. अभिनंदन.. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.
  लिहिलं नाही, तरी कमीत कमी नविन फोटॊ तरी लोड करा..

 10. अभिनंदन…..आपली बर्‍याच जणांची मागच्या मार्चची बॅच दिसतेय आणि तुझा अर्थातच नंबर पैला आहे टॉप लिखाण करण्यात…चला आता नव्या वर्षात कामाला (लिहायच्या रे…) लागा…

 11. Shailaja

  अभिनंदन अनिकेत.
  खरेच खूप दिवसांपासून पोस्टची वाट पाहत होते. नवीन कथा म्हणजे मजाच येणार. प्लीज, मेहेंदीच्या पानावर एकदा पूर्ण करा.

 12. Rahul Patki

  अनिकेत,
  मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा….

 13. अनिकेत

  प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार, नविन कथा लवकरच पोस्ट करत आहे 🙂

 14. मन:पूर्वक अभिनंदन! चला पुन्हा एकवार भुणभुण जोरदार चालू कर रे. 🙂

 15. अभिनंदन … आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा! लेखन आणि फोटो दोन्ही जोरात चालू दे या वर्षी!

 16. ARUNAA ERANDE

  भू भू भुन्ग्या, आता वाढदिवस खूप दिवस झाला ह! आता नवीन पोस्त येऊदे ना!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s