अरे भुंग्या आहेस कुठे?


ब्लॉग संबंधी जो भेटतो तो हेच विचारतो आहे. खरंच आहे कुठे मी?

’गेले काही दिवस कमालीचा व्यस्त होतो’ म्हणालो तर काही खवचटं लोकं भुवया उंचावुन म्हणतील, ’जसं काही आम्ही मोकळेच बसलो आहोत :-)’. आणि ते कारण तितकसं खरं सुध्दा नाही. कारण व्यस्त तर सगळेच जणं असतात, पण तरीही वेळात वेळ काढुन ब्लॉगींग चालु असते. गेल्या वर्षी सुध्दा मी व्यस्त होतोच की, पण तरीही ब्लॉगवरील लेखन हे चालुच होते. मग आता काय झालं??

हम्म.. काही जणांना माहीती आहे कारण, आणि ते म्हणजे गेल्या महीन्यात झालेली नविन खरेदी डी.एस.एल.आर ची. कित्तेक दिवसांचे जपलेले स्वप्न पुर्णत्वास गेल्यावर माणुस जसा खुळा होतो ना, तस्सेच झाले आहे माझे, थोडक्यात सांगायचे झाले तर अगदी शेजारच्या चित्रात दिसते आहे तस्सेच. कुठलीही नविन वस्तु कुठल्या ऍंगलने कशी दिसेल हे बघण्याचे वेडच लागले आहे मला.

पण आता फोटो काढायचे म्हणजे कुठले? कारण फोटोचे वेड मला तसे बर्‍़याच वर्षापासुनचे त्यामुळे फुल, पान, किडे मकोडे, पोरं-बाळ, निसर्ग दृष्य जवळपास सर्व प्रकारचे टिपुन झाले होते आणि काही तरी नविन करण्याचा ध्यास लागला होता.

फ्लिकर नामक संकेत स्थळावर ’सिक्रेट लाईफ ऑफ टॉइज’ नावाचा एक ग्रुप सापडला आणि मला ’युरेका युरेका’ असेच झाले. किती मस्त गोष्टी माझ्या जवळपास होत्या आणि त्या टिपण्याचा मी कधी प्रयत्नच केला नव्हता. ह्या उघडल्या गेलेल्या नविन दालनाने फोटो काढायला मला एक नविन दिश्याच मिळाली. रोज.. हो.. अतीशयोक्ती करत नाहीये, अगदी रोज न चुकता कसल्या नं कसल्या प्रकारचे, खेळण्यांचे फोटो कार्यालयातुन आल्यावर काढण्यात मग्न आहे मी आणि त्यामुळेच खरं सांगायचे तर ब्लॉग लिहायला वेळच मिळत नाहीये.

घरातील ’न मोडलेली’ (अर्थात फारच थोडी फार जी होती ती) खेळण्यांचे फोटो काढुन झाले आणि आता पुढे काय? हा प्रश्न पुन्हा एकदा आss वासुन समोर उभा ठाकला आणि ह्याचे परीणाम म्हणुन की काय अचानकच ’अरेच्चा, ओजसला बर्‍याच दिवसांत नविन खेळच आणले नाहीत की आपण’ असे म्हणुन माझ्यातला पिता नाराज झाला. मग काय विचारता एका दगडात दोन पक्षी मारता येत आहेत आणि माझ्यातला पुणेकर शांत कसा बसेल. म्हणजे बघा, नविन खेळणी आणली तर ओजसपण खुश आणि मला फोटो काढायला मिळत आहेत म्हणल्यावर मी पण खुश 🙂 आजच सकाळी पुण्यातील ’एस.मॉल’ मध्ये जाऊन गाड्यांचे काही मिनीएचर घेउन आलो. इतके मस्त कलेक्शन आहे त्यांच्याकडे, इतके महाग नसते तर खुप सार्‍या घेउन आलो असतो. मला आणि ओजसला दोघांनाही कुठले घेउ आणि कुठले नको अस्सेच झाले होते (फक्त दोघांची कारणं वेग-वेगळी होती :-))

तर असा प्रकार आहे बघा सगळा, हेच उद्योग चालु आहेत सध्या. तसे फ्लिकरवर सगळे फोटो टाकतच असतो मी, तरीपण असेच काही निवडक फोटो इथे जोडत आहे.

तसेच बर्‍याचश्या फोटोंमध्ये दिसणारा ’बोकेह’ नामक दिव्यांचा खेळ कॅमेरातुन टिपायचा कसा? ह्याबद्दलचा एक लेख आपल्या ’मराठीमंडळी.कॉम’ ह्या संकेतस्थळावर इथे लिहीला आहे.

चित्र कशी वाटली हे जरुर कळवा.

Advertisements

16 thoughts on “अरे भुंग्या आहेस कुठे?”

  1. मस्त फोटो जमलेत. बाकी माझ्या कडे फोटोग्राफी ची काही ई-बुक्स आहेत. तुम्हाला हवी असतील तर पाठवु का?

  2. फोटो छान आहेतच, प त्यान्चे एफ़क्ट्स पण छान आहेत. मि अजुन तो लाइट एफ़ेक्ट्स वर लिहिलेला लेख वाचला नाहि, आता वाचेन.
    तुम्चे भुन्गा नाव सार्थ आहे. you seem to enjoy the essence of everything fully.
    three cheers to you.

  3. मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, पंक्या, तुला तर सर्व गोष्टींबद्दल धन्यवाद 🙂

  4. Hey kharach khup chan blog aahe..mala to scooter cha photo baghun ‘ babanchya Bajaj scooter’ chi athavan aali..:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s