सानियाने शोएबसाठी घेतलेला उखाणा


सानिया आणि शोएबचा अनेक अडचणींवर मात करुन एकदाचा ’निकाह’ पार पडला. सानियाचे फोरहॅन्ड्स आणि शोएबचे स्केवर-ड्राईव्ह अनेक दिवस बातम्यांमध्ये झळकलेच. अर्थात ही ब्रेकींग न्युज वेगळी आहे. आत्ताच सुत्रांकडुन हाती आलेल्या बातम्यांमध्ये सानियाने शोएबसाठी कोणता उखाणा घेतला ह्याची माहीती ब्रेक झाली हाच उखाणा ब्लॉगच्या वाचकांसाठी –

चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे,
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या, तोंड कर इकडे

तुमच्याकडेही काही उखाणे असतील जे सानियाने शोएब साठी घेतले असतील किंवा तुम्हाला वाटते ती घेऊ शकली असती, तर ते प्रतिक्रियेमध्ये जरुर कळवा.

जिओ-टि.व्ही ने बनवलेला सानिया-शोएब वरचा हा व्हिडीओ पाहीलात का? नसल्यास इथे टिचकी मारुन पाहु शकता.

29 thoughts on “सानियाने शोएबसाठी घेतलेला उखाणा

 1. भुंगा

  आला आला रुखवत.. दणाणली आळी..
  आला आला रुखवत.. दणाणली आळी..
  …. उघडुन बघतात तर आर्धीच ‘नळी’..!

  आळी = गल्ली.
  नळी = मटणाचे हाड

  Reply
 2. अनिकेत Post author

  मिडीयाने नाव घेण्याचा पुन्हा पुन्हा आग्रह केल्यावर सानिया म्हणते –

  एक होती चिऊ, एक होता काऊ
  शोएबचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ 🙂

  Reply
 3. vidyadhar

  तुमचा मस्तच आहे…पण आमचेही चार आणे..

  आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून…
  शोएबमियांचे नाव घेते..आयेशा आपाचा मान राखून…!

  Reply
  1. अनिकेत Post author

   हा हा हा.. 🙂 मस्त आहे हा, येउ द्यात अजुन

   Reply
 4. अनिकेत Post author

  आगासीच्या मॅचला स्टेफी असायची हजर,
  आगासीच्या मॅचला स्टेफी असायची हजर,
  शोएबच्या मॅचवेळी मात्र सगळ्यांची माझ्यावरच नजर

  Reply
 5. अभिजित

  इ सकाळवरचा एक उखाणा !
  पूर्वी होते मी सोहराबची जानिया, शोएब रावांचं नाव घेते, मी मिर्झांची सानिया !!!

  Reply
 6. arundhati

  हा हा हा…. मस्त!
  आता हा अजून एक घ्या उखाणा ….

  कमळाभोवती भ्रमराचे गुंजन
  शोएबराव तरी कुठे आहेत सज्जन ?

  Reply
 7. म.ना. काळे

  उखाणे मजेशीर आहेत. जर हिंदी/उर्दूत असते तर बहार आली असती.

  Reply
 8. sharad

  इकड़े आड़ (भारत) तिकड़े विहिर (पाक)
  शोएब चे नाव घेऊन सेट्ल होते दुबईला

  Reply
 9. Aparna

  हा हा हा…. सानियाचे उखाणे तर छानच आहेत पण पब्लिकतर्फ़े हा कसा वाटतोय???

  तिला नाही जमत सर्विस अन त्याला सिक्सर
  आयत्यावेळी शोएबचं नाव घेऊन टाकला सानियाने बाउन्सर….

  Reply
 10. Ajit

  खड्ड्यात जाउदे समोरच्या कोनाड्यातील हिंदमाता..
  खड्ड्यात जाउदे समोरच्या कोनाड्यातील हिंदमाता..
  आणि, शोऐबचे नाव घेते माझा रंग हिरवा..!!

  Reply
 11. amol pote

  हा हा हा…. मस्त!
  आता हा अजून एक घ्या उखाणा ….

  कमळाभोवती भ्रमराचे गुंजन
  शोएबराव तरी कुठे आहेत सज्जन ?

  Reply
 12. राधेशाम

  सचिन च्या बॅटला नमस्कार करते
  वाकुन,
  सचिन च्या बॅटला
  नमस्कार करते
  वाकुन

  शोएब चे नाव घेते
  पाच गडी राखुन

  Reply
 13. dongre

  tenis chya court var marte first hand,
  tenis chya court var marte first hand,
  shoyab che nav ghete husband maza second hand!

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s